ती__आणि__तो... - 40 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती__आणि__तो... - 40

भाग-४०


राधाची अवस्था बघून रणजीत खुप घाबरला होता.........त्यांला राधाची खुप काळजी वाटत होती........घरातील सगळे अस्वस्थ होते.......रणजीत तर कंटीन्यू रडत होता.......एक दिवस असाच गेला तरी राधाला शुद्ध आली नाही........पहाटे सगळ्यांचा डोळा लागला......तेवढ्यात राधाच्या वॉर्डमधून वस्तु फेकण्याचा आणि रडायचा आवाज येऊ लागला........त्या अवाजाने सगळे उठले आणि तिच्या वॉर्डजवळ गेले.......तर समोर राधा उभी होती.........



राधा शुद्धित आले हे पाहून सगळ्यांना खुप आनंद झाला.........पण ती खुप रडत होती आणि बाजुचे इंजेक्शनस,कैची,ग्लास सगळ फेकत होती.........एका कैचीमुळे तिच्या हाताला जख्म पण झाली होती,हातातून रक्त वाहत होत..........तिच्या डोळ्यात वेगळाच राग होता,खुप दुःख होत.......तिचा हा अवतार सगळ्यांसाठी नवीन होता........


खरच जेव्हा एखादी मूलगी आई होते किंवा तिच्यात आई होण्याची खुप इच्छा असते तेव्हा अनेक बदल होतात हेच खर.....राधा तर आसुसलेली होती बाळासाठी......पण रणजीतमध्ये दोष आहे हे समजल तेव्हा तिने स्वतःला कसबस सावरल,पण तिच्यात दोष आहे हे सत्य समोर आल तेव्हा तिला जास्त दुःख झाल,धक्का बसला....त्यात तिचीच माणस तिच्याशी खोट ही बोली होती......ती खुप अस्वस्थ झाली होती.......चिडली होती,तिच्याजवळ जाण्याची कोणाला ही हिमंत होत नव्हती.......तेवढ्यात क्रिश आला.......


क्रिश: राधा.....यार चील.....क़ाय करतेस हे......शांत हो.....चिड़चिड़ नको करू.....


राधा: (रडत)........नाही....नाही....लांब हो माझ्यापासुन.....😭नाहीतर मी.....(ब्लेड उचलून).....मी वार करेंन हु....मला कोनाशीच बोलायच नाही आहे.....कोण नको मला...मी मी ए ए एकटी राहणार...


माधवी: राधा....अग....(तिच्याजवळ जात)


क्रिश: नाही काकू....ती आता कोणाच्या समज्वल्याने शांत होणार नाही.....रणजीत तू जा आणि तिला शांत कर...आपण सगळे चला बाहेर थांबु...


सुमन: ठिके....


रणजीत: हु.....आ रर राधा....ए राधा....


राधा: रणजीत तू...तू तर माझ्या जवळ सुद्धा येऊ नकोस....लांब हो....नाहीतर मी वार करेन...लांब हो...


रणजीत: र राधा...ऐक ग....राधा शांत हो ना...


राधा: तुम्ही सगळ्यांनी मला फ़सवल....माझ्याशी खोट बोलात....माझ्यात दोष आहे हे लपवले....माझ्यात दोष आहे.....मी कधीच आई नाही होणार.....😭रणजीत तू ही खोट बोलास मझ्याशी...फ़सवल तुम्ही मला....


रणजीत: राधा एक माझ....


राधा: नाही...नाही...मी कधीच आई नाही होऊ शकणार....😭मी वांझ आहे...मी मी...😥😖


रणजीत: राधा...राधा माझ ऐकून घे ना...मी मुदद्दाम नाही लपवल....आणि प्लीज तू आधी शांत हो...ये ना माझ्या मिठित ये ना ग...प्लीज मी आसूसलोय ग तुला मिठित घ्यायला ये ना.😢...(समोर हात करून)


राधा: मला आई व्हायच्य...मी..तू लांब हो नाहीतर मी माझ्यावर वार करेन....लांब हो....मला नाही यायचा तुझ्या मिठित....लांब हो....(चाकू हातावर ठेवून)


रणजीत: ओके,ओके तू अस काही करू नकोस ग प्लीज...माझ एकदा ऐक ना....


राधा: नाही ममम मला आई आई व्हायचय,माझ्या बाळाला खेळवायच आहे..मी अंगाई पण गानार आहे..मला मला येते अंगाई...ह्म्म्म हम्म...


राधा अगदी वेड्या सारख करत होती.........लहान मुलाप्रमाने नाचत होती,बोलात होती........डोळ्यात प्रचंड राग दिसत होता,आणि अश्रुनी डोळे डबडबले ही होते......रणजीतला काही समजायला मार्ग नव्हता.....


रणजीत: रररर राधा राधा तू अस का करतेस...तू अस नको करू ना..क़ाय झाल तुला...अग आता तर तू बोलात होतीस निट अचानक अशी लहान मुलासारखी का बोलतेस.....ककक क़ाय झाल?

तिच्याजवळ जाउन तो बोलतो........


राधा: ए माझ्या जवळ ये येऊ नको हु..मी मारेंन हा स स्वतःला..मारू मारू....😀

तीं चाकू दाखवून,हसत बोलते........


रणजीत: नननन नको नको,मी नाही येत जवळ नाही येत....


राधा: बाहेर जा,बाहेर जा मला एकटीला सोड...नाहीतर मी हात कापेंन कपू कपु....


रणजीत: नन नको मी जज जातो...

तो घाबरत बाहेर जातो.......


मग रणजीत वॉर्डबाहेर येतो,आणि सोनल क्रिशला बोलवायला पाठवतो.......राधा आतमध्ये एकटी रडत बसते........बाहेर जाऊन सगळे तिच्याबद्दल बोलात असतात.......तेवढ्यात आतून कसला तरी आवाज येतो म्हणून रणजीत आत बघायला येतो,तर राधा स्टूल घेऊन त्यावर चढली होती........आणि खिड़कीच्या बाहेर पाय टाकत होती........तिचा तोल बाहेर जाणारच होता की रणजीत पटकन तिच्याजवळ गेला आणि तिला खाली ओढल.......


रणजीत: राधा......पागल झालेस का क़ाय करतेस हे....

रणजीत हात पकड़ून बोलतो...तस तीं विचित्र प्रकारे हसते............


राधा: सोड..सोड माझ बाळ खाली गेल आता या खिडकीतुन मला पण जाउदे...सोड मला....आआ पण तू कोन आहेश..😢

तीं तिचा हात सोडवत बोलात असते........


रणजीत: राधा ऐक माझ...


राधा: नाही....नाही...बेबी माझ बेबी....अअअअअ


रणजीत: राधा...ऐक ना...


राधा: नाही...नाही...मला जाउदे सोड....कोन आहे तू...


रणजीत: राधाssssssssss.....(ओरडून)


राधा ऐकत नव्हती म्हणून रणजीत तिला जोरात कानाखाली मारतो.........तशी राधा बेशुद्ध खाली पड़ते.......सगळीकडे काहीवेळ शांतता पसरते.......घरातले सगळे आवक होऊन रणजीतला पाहत होते........ज्याने राधला कधी साध बोट सुद्धा लावल नव्हतं आज त्याने तिला मारल होता..रणजीतसुद्धा जोरात रडू लागला...मग क्रिश आला आणि त्याने राधाला चेक केल,तिला ग्लानीचे इंजेक्शन दिले...


रणजीत: यार मी हे क़ाय केल आज😖😭माझ्या राधावर हात उचला😖

तो स्वतःला मारत बोलतो......


सुमन: अरे बाळा शांत हो😭तो मुद्दाम नाही केलास रे...अस मारतोस का स्वतःला...


रणजीत: आई क़ाय करू ग मला काहीच सूचत नाही आहे....तू पाहिल न राधा वेड्या सारखी करत होती आई...😢


क्रिश: रणजीत ती वेडी झाली अस नाही आहे,तिच्या मनाला खुप मोठा आघात झालाय,तान पडलाय, म्हणून तीं लहान मुलासारखी अस वागतेय..तीं नक्की आधी सारखी नॉर्मल होइल तिला फक्त थोड़े दिवस दे...लगेच बरी होइल ती जास्त काळ नाही अशी राहनार तीं....


रणजीत: खरच ना...😢


क्रिश: हो फक्त तोवर तिला असच प्रेमाने ट्रीट कर...आणि आता उठल्यावर ती बहुतेक काही लोकानां ओळखनार नाही लहान मुला सारखी वागेल,निट वागली तर चांगली गोष्ट आहे पण जर नाही तर सगळ तुला सहन कराव लागणार आहे....आता ती शुद्धित आल्यावरच समजेल...


रणजीत: हु हो मी सगळ सहन करेन,ती फक्त माझ्या जवळ पाहिजे मला....थैंक्यू क्रिश...😢


क्रिश: थैंक्यू क़ाय यार...चल येतो मी काही लागल तर बोलाव ....


रणजीत: हम्म नक्की..


सुमन: क़ाय होऊन बसल हे...होत्याच नव्हतं झाल😖


सदाशिव: सुमन शांत हो अग ही वेळ आपण कमजोर पडायची नाही,जीतला कोन सावरेल मग...


महेश: हो सुमन...


माधवी: हो ना,पण आमची बाप्पा कड़े एकच प्रार्थना आहे,देवा बाळ नाही झाल तरी चालेल आम्हाला आमची सुन पाहिजे तिला बर कर...😢


सुमन: हो खरच..आम्हाला बाळापेक्षा राधा महत्वाची आहे....😢


रणजीत: मला सुद्धा😭पण राधाला जास्त बाळ जरूरी वाटत आहे...म्हणून तिला अस धक्का बसलाय😭😖


सोनाक्षी: जीत अरे ती एक स्त्री आहे तिला बाळाची तर ओढ़ असणार,त्यात राधाला लहान मूल फार आवडतात....त्यात ती आई होऊ शकणार नाही आणि हिच गोष्ट तू लपवलीस या सगळ्यांचा आघात झाला तिच्या डोक्यावर....म्हणून रे...


रणजीत: हो...माझच चुकला होता त्यावेळी सूचल ते केला मी पुढचा विचार नाही केला😖


राहुल: जीत शांत हो रे सगळ निट होइल क्रिश बोलय ना...फक्त थोडेच दिवस...आणि तू या गोष्टीकडे पॉजिटिवली बग ना तुला आता तीला नव्याने ओळखता येईल,ती नव्याने तुला भेटेल...तू आणि ती जास्त वेळ घालवाल सोबत...हु बाकी ती बरी झाली की बाळाच्या बाबतीत आपण समजवू तिला....


रणजीत: हो दादा...थैंक्यू...

त्यांला मीठी मारून बोलतो.......


राहुल: हु,यू आर माय स्ट्रांग बॉय हु...😊


रणजीत: हो दादा....


मनोहर: रणजीत...


रणजीत: अरे बाबा...


मालती: राधा कुठय आहे आमची...😢


मनोहर: हो...आणि तो सगळा प्रकार तुम्ही आधी का नाही सांगितला आम्हाला....


रणजीत: मला माफ करा बाबा😢


मालती: ग माझी पोरीची अवस्था झाले ओ😖😭


मनोहर: माझ फुलपाखरू...😢

तिला बाहेरुन पाहत ते बोलतात.......


जागृती: राधुची क़ाय हालत झाले😭रणजीत जीजू,तीं बरी होइल ना लवकर.....😢


सनम: हो तिला काही होणार नाही ना...तीं शुद्धिवर कधी येईल....😢


विक्रम: जीत तीं अशी कितीवेळ राहणार....


पल्लवी: आम्हाला तिला अस बघवत नाही आहे...


रणजीत: मला ही😭डॉक्टर बोलेत की तिच्या मनाला खुप मोठा आघात झालाय म्हणून ती लहान मुला सारखी वागतेय...पण काही दिवसात होइल ती बरी....


मालती: अरे देवा😭क़ाय हे मझ्या पोरीच्या नशीबी भोग आलेत....


मनोहर: मालती शांत हो कान्हा सगळ निट करेल...😢


रणजीत: आई तुम्ही शांत व्हा सगळ निट होइल मी आहे राधला काही होऊ नाही देणार....


मनोहर: हु...😢


रात्र होते,रणजीत बाकी घरच्याना घरी जायला सांगतो कोणीच जायला तयार नव्हतं पण तो सगळ्यांना जबरदस्ती घरी पाठवतो..........मग तो हॉस्पिटलमध्ये बसून राहतो..........रणजीत सारखा जाउन राधाला पाहत होता,तीं अजूनही गाढ झोपली होती......काहीवेलाने रणजीतला ही झोप लागते..........नंतर त्यांला त्याच्या चेहऱ्यावर राधाचा स्पर्श जानवतो,तस तो पटकन डोळे उघड़तो.......तर समोर राधा उभी होती तिच्या हातात उशी होती.......ती त्याला एकटक बघत होती.......


रणजीत: आआ ररर राधा ककक क़ाय झाल? तू अशी का उभी आहेस...


राधा: ते मी तुमच्या डोक्यावलच सफेद केश काढत होते😀

राधा हसत बोलते.........


रणजीत: राधा लहान मुलासारख बोलते..😢कदाचित क्रिश बोला तस राधा आम्हाला ओळखत पण नसनार...राधा स्वतःला लहान मूल.समजते....हे क़ाय झाल तुला राधा😭.....नाही,नाही मला अस कमजोर बनुंन नाही चालणार,मला तिच्याशी आता नव्याने ओळख करायलाच लागणार आहे...मी अस हारू नाही शकत...हु....मी अस हारू नाही शकत...हु

तो मनात बोलतो.......


राधा: एक्सक्यूज मी..तुमी कोन आहेत? आणि तुम्हाला माझ नाव कस माहित....?

तीं प्रश्नार्थी नजरेने विचारते........


रणजीत: आआ मी तुझा.....आ ब मी डॉक्टर मी तुझा डॉक्टर आहे.......


राधा: आहा! माझा डॉक्टर....😀


रणजीत: आआ हो माझ नाव ना रणजीत साखरपेकर आहे.....


राधा: साखरपेरकर...😀म्हणजी तुमी साखर पेरता😂

तीं त्यांला चिडवत बोलते........


रणजीत: आआ ब नाही...


राधा: बर साखरपेरकर मला भूक लागले..तुमच्या या हॉस्पिटलमढ़े मला क़ाय खायला नाय का....


रणजीत: तुला भूक लागले...थांब मी आलो जेवन घेऊन हु....आलोच.....


राधा: ओके....


रणजीत घरुन आनलेला डब्बा आनतो..........मग राधाला जेवन भरवतो..........राधा अगदी लहान मुला सारखी खात होती,हसत होती...........रणजीत हेच पाहून आतून सुखावला होता..........पण मधेच त्यांला प्रश्न पड़त होता कि राधाला घरी घेऊन जायच कस??.......तिच्या आई बाबाना सांगायचं क़ाय???....ती त्यांना ओळखेल का?????


क्रमशः
मंडळी कसा वाटला आजचा भाग.........आशा करते आवडला असेल........बघा आता तुम्ही म्हणाल हा ट्विस्ट का तर ट्विस्ट नाही आले तर मजा क़ाय ना......आजुन पुढे खुप ट्विस्ट आहेत......आणि आयुष्यात खुप चढ़ उतार येतात, तेव्हा आपला जोड़ीदार आपल्याला कशी साथ देतो,आपल्यावर किती प्रेम करतोय हे तेव्हाच कळत......म्हणून तीच्या आणि त्यांच्या आयुष्यात काही वेळ एक नवीन वळण आल आहे आणि आता दोघ हे वळण कस पार करतात हे आपण बघनार अहोत.....☺️मला कमेन्ट मध्ये सांगा कस वाटला भाग......(जर भाग नाही आवडला तर क्षमा असावी)

©प्रतिक्षा सुवर्णा✍️🌸