अपूर्ण..? - 9 Akshta Mane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

अपूर्ण..? - 9


ट्रिपचा दूसरा दिवस


.....दुसऱ्या दिवशी सिड टेंटमधून बाहेर आला असच पुढे चालत एका ठीकाणी येऊन थांबला लांबूनच त्याला स्वरा दिसली जी स्वतच्याच मस्तिमधे गाण गुनगुणात होती तीला अस पाहून सिडला डिस्टर्ब करायचय न्हवत पण शेवटी तो गेलाच .   काय स्वरा छान आज चक्क गाण ? लागतायत लागतायत सुर वरपर्यंत तशी ती हलकीच हसली .... चल काय पण काय  ते मी सहजच  जरा मूड झाला म्हणून आणि का मी म्हणू शकतं नाही any way तू इथे काय करतोयस  सकाळ सकाळ?   का सकाळी फक्त तूच उठु शकतेस का आणि आवर पटकन आज आपल्याला निघायच आहे इवन पुढच्या अर्ध्या तासात.  हो तू आमचा अलार्म आहेस ना मी रेडीच आहे सी... चल आता , वर्धा आली वाटत आवाज येतोय बघ तिचा .    दोघांनी समोर बगितल तर... वरुण वर्धाच्या खांद्यावर हात ठेऊन almost फ़्लर्ट करत होता तिच्याशी, तस स्वरा सिडकड़े न पहाताच म्हणाली चिल bro  i know  her just wait and see 😉.  Hy वर्धा नाइस ड्रेस हा ... bytheway तू पुण्याला रहातेस ना माझा मावस भाऊ पण राहतो पत्ता दे भेटु केव्हातरी ....ओह्ह हा कीती बोलतो😴🙄...  ह्याची बोलती बंद करायला पाहिजे वर्धा मनात बोलत होती.
   हीही..सो वरुण राइट ...सो वरुण  फ़्लर्ट ही कला जन्मापासुन आहे की आता आता सूचली .... तसा तो गड़बड़ला.
नाही काहीतरिच काय वर्धा तुझ .   वर्धा त्याचा हात झटकत म्हणाली तू  ना खुप कान चावतोस रे💆... ती डोळे वर करत म्हणाली, .....मग timepass साठी दूसरी कोणीतरी शोध वेल i am engage ती हातातली रिंग दखवत चेहऱ्यावर वेगळच attitude आणत निघुन गेली.😎😂.   सी बगितलस my dear besti मी ओळखते तीला  ती फुल फटाका आहे 💥... तीला फुसकी सुतळ नको समजूस and she is only yours dont be full  हम्म .   Hy तुम्ही  कधी  आलात वर्धने विचारल... ते जाउदे काय बोलत होता हा? ....स्वराने वीचारल्यावर काहीनाही नुसती बडबड ..   ओय सिड चल ना तिथे फ़ोटो काढ़ायला छान व्यू दिसतोय.... प्लीज प्लीज वर्धा म्हणाली...  " ओको चला आता नाही काय म्हणू शकत नाही तो  उगाचच नाटकी करत म्हणाला "   स्वरा चल तू पण ..वर्धाने वीचारल्यावर नाही नको मूड नाही म्हणाली.  ओह्ह कमऑन स्वरा डार्लिंग तू कधीपासुन एवढी cold झालीस.... देवा देवा कुठे गेली ती माझी hottest girl the swrangi deshmukh one of the best beauty diva of college विसलरीस की काय? ये मला नखरे नको आहेत चलायच गुपचुप..   
   इथे वरुण मागे फिरला तर अथर्वचा त्याला धक्का लागला ओह्ह सॉरी ब्रो अथर्व स्माइल देत म्हणाला तस वरुण सुद्धा i also sorry for yesterday night 😐.
   त्यावर अथर्व फक्त हसला चालत रे आता तू समजवत होतास.. हम्म !....  मान्य आहे मी चुकलो आहे पण ती माझ्या माइंड धे बसली आहे आणि तू चुकीच कुठे बोलतोयस गेले कित्तेक वर्ष तू हेच समजवतो आहेस मला पण काल जी तू समज दिली आहेस ना त्यावरून तरी नक्की मी ही चूक परत नाही करणार आणि खुप विचार केला मी रात्रि बघेन जमेल तस विसरेन तीला कठिण आहे but I'll try  आणि......
ही जिची गोष्ट आहे ति तीला परत मिळेल i promise अथर्व इयरिंगकड़े बघत म्हणाला, वरुणने पण डोळे मिचकवले.    तेवढ्यात मागून maddy आला अरे भावानों चला कि आता, अरे हो maddy पण रीया कुठे आहे जा बोलावून आण तीला सकाळ पासुन गायब आहे वरुण म्हणाला तस.... असेल कुठे तरी चित्र काढत मी आलोच तीला घेऊन म्हणत maddy निघुन गेला.

  


  रीया एका झाडाच्या मागे चित्र काढत बसलेली maddy फिर फिर फिरत तिथे पोहचला ..अरे रीया चलना आता कीती ते काढत बसशील चित्र वाट पहात आहेत सर्व आपली .
Maddy चा आवाज येकताच क्षणी तिने पेपर बाजूला लपवला.   काय लपवलस ?  ... "मागे कहिनाही चल निघूया रीया म्हणाली"
.... काहीतरी आहे मागे ....ओह्ह स्केच कोणाच काढल आहेस दाखव लपवयच काय त्यात दाखव ना रीया .

  


 नको ना maddy काहीनाही आहे.... वेळ आली की दखवेंन ना आधी तुला... आता नको अ.. अ पूर्ण पण व्हायच आहे आजून प्लीज हा चल आता.

 


   बस जवळ सर्वजण निघण्याच्या तयारीत होते, maddy  बराच वेळ खाली उभा होता , काय झाल भावा आज यायच नाही आहे का आमच्या सोबत वरुणने विचारल तस त्याने एक नजर रीया आणि सिडकड़े पाहिल जे दोघे हसत गप्पा मारत होते.

 


  मी वेळ लावला वाटत वरुण रीयाला सांगायला काहीतरी सुटल आहे का रे? की मी वाट बघतोय सुटायची?काहीही काय बड़बड़तोयस नीट सांग अथर्व खाली येत म्हणाला .I thought riya like siddharth ..maddy म्हणाला तस काय 😲💥... वरुण आणि अथर्व जवळ जवळ उडालेच.

   


हो मगाशी मी परत एकदा सर्व चेक करायला गेलेलो तेव्हा रियाच्या टेंट मधे मला मगासचा स्केच दिसल मी विचारल तेव्हा दखवल नाही म्हणून उत्सुकता झाली बघायची  आणि बघतो तर ते सिद्धार्थच स्केच होत.   अरे तुला माहीत आहे ना तीला आवडत माणसांच्या चेहऱ्यावरच्या रेखा रेखाटायला असच काढ़ल असेल वरुण म्हणाला .  नाही मी भूमी भूषणच्या हळदी पासुन बघतो आहे वेगळी वागयला लागली आहे ती.But how possible   वर्धा सिद्धार्थ गेले आठ वर्ष रिलेशन मधे आहेत... सो? अथर्व म्हणाला.काय खरच?  maddy  आनंदात उडया मरायला लागला...
पण म ते स्केच ?? .... "  राहुदे ना आता पॉजिटिव विचार कर माणसाने कस पॉजिटिव राहील पाहिजे वरुण म्हणाला "     ..... हो राहुदे तू आहेस ना एक पॉजिटिव एनर्जीवाला... मुलगी नाही म्हणाली तरी दूसरी हो बोलेल ह्या वर जगणारा😹 maddy म्हणाला तस अथर्व हसायला लागला.  ह्यांच्य बोलण कोणीतरी लांबुनच  येकत होत ते म्हणजे स्वरा..  ह्याची भनक सुद्धा न्हवति ह्यांना..   रात्र पुरुन उरेल एवढं ते विहंगमय दृश्य डोंगर- दर्या कुठून तरी उगम पवलेल्या नदया खळखळ वाहनारे धबधबे. रंगबेरंगी फूले नानातरेचे पक्षी आणि सोबतीला ओळखी-अनोळखी माणस.   तस सगळ्यांनाच ट्रेकिंगचा अनुभव होता पण बघता बघता कधी स्वरा वर निघुन गेली समजलच नाही  आणि ते काळाच्या आत अथर्वही गायब .वर पोहचल्यावर मात्र तिने येक सुस्कारा देत अंग झोकुन दिल ते गवतावर .मन पाना पानात दीसे थेंब आसवांचे
मन काहूर होई  ना तो दिसे भासे
चेहेरा लपवी ओंजळी त्याचे अस्तित्व नाकारे...
काहीश्या आवजाने तिने डोळे उघडले गालावर आलेले अश्रु
अलगद बाजूला सारत आजुबाजुला पहिले तर ,  तो... तिथे पाठमोरा उभा होता  ट्रेकिंगचे शूज हातात watch आणि खरच जीम ने कमवलेली बॉडी ऊंच एका रुबाबत उभा होता.अर्णव....सहज बोलून गेली  ती अर्णव ? इथे कसाकाय हो तोच दीसतोय ती उठून त्याच्याजवळ जाणारच होती कि मागून आवाज आला .  अरे वाह्ह अथर्व तू कधीपासुन एवढा पळायला लागला की माला मागे टाकलस तो भूषणचा आवाज होता..
अरे  नाही सहज वाटल स्वताला चेक करुन बघत होतो स्टैमिना आहे कि नाही ते अजुन तो हसत बोलत होता.. 
   पण इथे मात्र स्वराच्या मनाची घालमेल झाली हा.. हा. अर्णव ना.. नाही.... अथर्व?😕 अस कस होउ शकतो भास?
मला  भास कधीपासुन व्हायला लागले नाही पण मी..😣
........हो तो अर्णव होता माहीत आहे पण अर्णव कसा येऊ शकतो परत तो तर तो... अह्ह  काय होतय मला डोक जड़ का झालय.... स्वरा डोक्याला हात लावत खाली बसली .  स्वरा..  काय ग काय झाल अशी का कोपर्यत बसली आहे.
बर नाही वाटत आहे का भूषण तीला उभ करत म्हणाला..
"no am fine "..मागून नुसता कल्ला करत सर्व येत होते आतापर्यंत वर्धा चांगलीच रमली होती त्यांच्यात .  Bytheway  maddy तुझ real name काय आहे म्हणजे maddy नसनारच सांग काय आहे...  मकरंद कदम.बापरे मकरंद... तस वर्धा हसायला लागली बगितल म्हणून मी माझ नाव maddyच  सांगतो सर्वाना .
तस आमची स्वरा आहे ना तीच नाव सुद्धा स्वरा नाही  आहे बर स्वरांगी आहे .
पण  ते फक्त रेशनकार्ड आणि स्कूल id वरच बाकी सगळे तीला स्वरा म्हणूनच ओळखतात .   स्वरांगी  छान नितळ आणि स्वछ नाव आहे  स्वरांगी..सर्व रंगानी भरलेली स्वरांगी पण आख्या नावाची माती एकही गुण नाही आहे हिच्यात राग भांडण आणि उद्धट शिवाय
अथर्व मनातच म्हणत होता.   टेंट वर पोहचल्यावर जेवण आवरुन सर्व शेकोटीजवळ बसले होतो त्यात थंडीचे दिवस त्यात ये अथर्व गाण म्हण ना ..रेचा रीया ने जो सुर धरला शेवटी त्याने गिटार हातात  घेत  सुर छेडले आणि...
🎸🎶🎶🎶🎸🎶🎶🎶
वाटा जागलेल्या तुझ्या भोवताली
तू.. दूर अशी का मी इथे एकटा हा
वाटा जागलेल्या तुझ्या भोवताली..
आस तुझी ही लागे जिवाला
येशील केव्हा मन रमवाया
ध्यास तुझा हा वेड्या मनाला
घेऊन जाई तुझिया दिशेला...गाण येकताच भूमी भूषण वर्धा सिड सर्वच चमकले आता सर्वचे डोळे स्वराकड़े लागले होते तिची रिएक्शन बघायला.
स्वरा गाण्यात हरवून गेली होती कि तिलाच समजल नाही  कधी ति त्याच्या बाजूला जाऊंन बसली .    तुझ  फेवरेट गाण आहे हे स्वराच्या अश्या अचानक  बोलण्याने सर्वच तीच्यकडे बघायला लागले अथर्वपण थंबाला .


 

   सांग तुझ फेवरेट song आहे का हे ?... तस अथर्व हो म्हणाला .  " का ?  तुला आवडत का ? " अथर्वच्या ह्या प्रश्नवर सगळ्यांचीच हुरहुरि लागलेली आता ती काय बोलेल आणि शेवटी तेच झाल ..
नाही ...त्याला आवडायच ...तो गायचा म्हणून मलाही आवडायला लागल.   कोण तो ?... कधी गायचा आपण ओळखतो का?... हे प्रश्न अथर्वच्या  मनात यायला लागले ही ह्या आधिहि असच म्हणाली होती.  बीच वर जेव्हा आम्ही दोघच longdrive ला गेलेलो अथर्व मनात म्हणाला..  मी आलेच u guys carry on म्हणत ती उठून गेली.स्व..ss..  वर्धाने सिडचा हात पकडला नको आता नको she really want to relief वेळ जाउदे थोड़ा हम्म .   इथे सर्वजण आवरुन night lihgt tower hill वर जायच्या तयारित होते . रिया चल maddy म्हणाला तस ..
थांब ना सिडला वीचारुन येते...  पण समोर वर्धा सिडच्या बायसेप्सला पकडून दोघ गप्पा मारत होते, रीया तशीच मागे फिरली.  इथे maddyच तोंड पड़ल होत . पण जस समजल तो आला नाही आहे मनातल्या मनात गॉडचे आभार मानत होता.

   


   बराच वेळ स्वरा कुठे दिसली नाही म्हणून अथर्वची नजर तीला शोधत होती तेव्हा आठवल  ती दरीच्या दिशेने गेलेली.  स्वरा actully सॉरी मी गिल्टी फील करतो आहे कालच्यासाठी हे कानातले तुझेच आहेत  पण.. तीच लक्षच न्हवत त्याच्या बोलन्याकडे.   स्वरा..त्याने एक दोनदा आवाज दिला पण तिचा काहीच प्रतिकार न्हवता dought आला म्हणून थोडासा खंदा  हलवला तिचा त्याने आणि तिची तन्द्री भंग झाली डोळे  रागाने लाल झालेले आणि श्वास घ्यायला त्रासही होत होता तीला..अग.. स्व..रा.. काय होतय तुला  ?अथर्व तू मला विचारलेलस ना मी एवढी भावनाहीन कशी?  शब्द.. व्यवहारात जोड़ते प्रेम म्हणजे काय ते ही विचारलेलस.
मी म्हणालेली ना माझ्यासाठी draknees blackout आहे.    प्रेम..  ते गेले तीन महीने का इम्पोर्टेन्ट आहेत माझ्यासाठी मी एवढी चीडचीडी उद्धट का आहे आणि तो कोण?  स्वरा बोलत होती.


अग हे अस मधेच काय??स्वरा तू उठ चल आपण आत जाउ.येक ना बस सांगते काहीतरी तुला बोलावस वाटत आहे आज, प्लीज...😢    काही क्षण खुप शांततेत गेले तीच शांतता तीला खायला उठली आणि शेवटी बोलायला लागली...   सहा वर्षा आधी मी त्याला भेटलेली,  मी मुलांना भावपण दयाची नाही आणि तो... त्याच्या मागे कोसोने मूली लगायच्या पण सर्वनाशी नीट वागायचा.
मी खळखळ वाहणारा धबधबा तर तो शांत तलाव...मी सूर्यसरखी तापट तर तो चंद्रा सारखा शीतल .   मी कॉलेजची मिस ब्यूटी क्वीन तर तो किंग होता.. थोड्स हसू आणत म्हणाली. तो म्हणजे अर्णव  tha arnav srdesai कॉलेजच्या जुन्या ट्रसट्रीचां नातू पण  पौशाचा गर्व अजिबात न्हवता ...स्वभाव अगदी विरुद्ध ... तर चूक तिथे राडा हेच काय ते धोरण एक होत आमच्यात.   असच एका गैरसमजे मधून भेटलो चांगलीच वट होती कॉलेजमधे आमची ... मी मस्ती , प्लानिंग, राडे अगदी बाँचेस तोडण्यपासुन ते सरांची कॉलर पकडण्यापर्यंत आणि तो .....कॉलेज इवेंटमधे हेल्प,  गरजू मुलांसाठी फीमाफ करण्यासाठीचे  आंदोलन than... एकमेकांनच्या घरी येण जाण वाढल पिकनीक, कैम्प्स , ट्रेकिंग.. अजुन अनुभवल एकमेकांना .  आपण समजतो तितके वाइट कोणीच नसत  फक्त जोड़ लगते ती विश्वासची हे दोघांनाही समजल .  मग he propose me आणि ते ही अगदी मला हव होत तस बोल्ड अंदाज मधे . लाइफ मधे पहिल्यांदा ती फीलिंग अनुभवत होती प्रेम म्हणजे काय हे तेव्हा समजल .   ओह्ह thats ग्रेट म आता कुठे आहे तो आला नाही ते अथर्व म्हणाला .   आता.. ती वर आकाशकडे बघत म्हणाली ...आता सुखात असेल दुसर्यना दुःख देऊन ....  म्हणजे? अथर्व म्हणाला तस म्हणजे...हम्म! ... म्हणजे he.. he is no more , he died one year ago.
  स्व..स्वरा.. अथर्व जरा चाचरत बोलत होता त्याची तर बोलतीच बंद झाली ...   " अरे हो खरच बोलते आहे मी बघ विश्वास नाही ना बसत तुला.. माझा सुद्धा नाही आहे अजूनही...
फ़सवल आहे त्याने मला सर्व प्रॉमिसेस देऊन अर्ध्यवर निघुन कोण जात ? ... त्याने तेच केल  thats why i hate him bottom in my heart I heat him. अचानक रडू आलेल्या डोळ्यात राग दिसू लागला.   पण नवल हे होत की ति अजिबात रडत न्हवति तितक्यात ती चक्कर येऊन खाली पडली...
सो कसा वाटला twiest  आणि कथा खरच आवडते आहे का तुम्हांला प्लीज सांगा सखीचा टॉपिक तर इथेच संपला आणि स्वरा अर्णवचा एवढा राग का करते नक्की काय कारण आहे पाहुया.Note: चारोळी मी स्वतः लिहिली आहे.

क्रमशः

अक्षता माने.


रेट करा आणि टिप्पणी द्या

Preeti Patil

Preeti Patil 4 महिना पूर्वी

Nikita Nik

Nikita Nik 4 महिना पूर्वी

nice dear keep writing 😊

Manjusha

Manjusha 4 महिना पूर्वी

I M

I M 4 महिना पूर्वी

Mansi Gaikwad

Mansi Gaikwad 4 महिना पूर्वी