ती__आणि__तो... - 45 - अंतिम भाग Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती__आणि__तो... - 45 - अंतिम भाग

भाग-४५..शेवटचा भाग..


{सहा वर्षानंतर..}

राधा आणि रणजीतच्या रूममध्ये खुप गोंधळ चालू होता......राधा हातात दुधाचा ग्लास घेऊन तर रणजीत हातात बॅग घेऊन निर्वीच्या मागे पळत होते......निर्वीला क्लासला जायच नव्हतं आणि दूध ही प्यायच नव्हतं.....दोघेही तिला तयार करायला बघत होते पण ती काही केल्या त्यांच्या हातात येत नव्हती.....


राधा: आई ग...दमवल हिने...अग नीरू बस ना आता किती दमवनार मला आणि बाबा ला....


रणजीत: नीरू दमले आई बाबा...प्लीज थांब ना...


निर्वी: ओते..तर तुम्ही दोघानी हार मनली ना?


राधा: अग मनली नाही मानलित ना अस बोलायच...


निर्वी: हो तेच ग आई..


रणजीत: हो मनली हार....😢


निर्वी: ओके मग ठीक आहे..
पण तरी आई मला नाही जायच आहे आज क्लास ला...आज मोठ्या आई ची विधी पन आहे ना...मग मला थांबयच आहे आज...


राधा: बाला आज तुझा वाढदिवस पण आहे की नाही..मग आजच्या दिवशी तुला क्लासला जायला नको का...स्कुलला गेलीस न तशीच...


निर्वी: क़ाय गरज,माझे फ्रेंड्स बड़े पार्टिला येनाल आहेत...प्लीज न आई...माझ मन नाही आज


रणजीत: राधू,...राहुदे आज..


निर्वी: ये जीत यू आर डी बेस्ट डैडी..लव्ह यू..रणजीत..


राधा: नीरू...बाबा ला नावाने हाक मारायच केव्हा बंद करशील ग..


निर्वी: मला असच आवडत ग आणि रणजीत नी मला तेच शिकवल आहे ना...


रणजीत: ए राधू असुदे ना,घरच्याना पन काही प्रॉब्लम नाही तर तू का उगाच ओराडते तिला..आमच बाबा लेकीच बॉन्ड वेगळ आणि स्पेशल आहे क़ाय डार्लिंग...

तो डोळा मारत बोलतो....


निर्वी: यस डार्लिंग...

त्याला बघून ती सुद्धा डोळा मारते....


राधा: आय्या नीरू डोळा मारायल कोणी शिकवल तुला😮


निर्वी: अग हे तर क़ाय नाय मना तर शिट्टी पण येते थांब...

(ती राधाला शिट्टी वाजवुन दाखवत....राधा शॉक होते😯)


राधा: नीरू कोनी शिकवल ?


निर्वी: अजुन कोन असनार..रणजीत..


राधा: रणजीत😮तू तिला है सगळ शिकवल...


रणजीत: ते असच मजा ग..


राधा: तुला सांगितले होता ना,अस काही शिकव्वु नकोस तिला...थांब दोघाना आता छड़ी घेते...


राधा हातात स्केल घेते आणि दोघांच्या मागे पळते......रणजीत निर्वीला खांद्यावर घेतो आणि पळतो.....नंतर निर्वी त्याच्या खांद्यावरुन खाली उतरते आणि खाली निघुन जाते.....राधा रणजीतला धारेवर धरते.....😂त्याला खुप ओरडते.....मग जाऊन रुसुन बसते.....रणजीत तिच्या जवळ जातो,आणि तिला मागून मिठी मारतो....


रणजीत: सॉरी राधा,आम्ही असच गम्मत केली...


राधा: ह्म्म्म...


रणजीत: रागवलीस का...बर राग काढतो तुझा मग ह्म्म्म..


रणजीत राधाला उचलून घेतो.....आणि बेडबर ठेवतो.....हळूच तिच्या जवळ जातो.....तिच्या ओठांवर त्याचे ओठ ठेवतो.....राधाचा राग कुठच्या कुठे निघुन जातो.....ती सुद्धा त्याला साथ देऊ लागते.....तेवढ्यात तिकडे निर्वी येते.....


निर्वी: आई$$$


रणजीत$$$ कुठे गेला तू...?


राधा: ररररर रणजीत उठ नीरू आली...


रणजीत: अअअअअ हो..

दोघे सावरत उठतात....


निर्वी: क़ाय यार तुम्ही क़ाय करतात इकडे...चला खाली गुरुजी आलेत,सदा आजोबाने तयारी करुंन बोलावल आहे...आई मला रेडी कर ना...


राधा: हो ये बाळा...रणजीत तुझे कपड़े तिकडे काढलेत ते घाल हम्म..


रणजीत: हो..


राधा निर्वीला तयार करुंन खाली पाठवते......मग ती साड़ी नेसत असते.......तर रणजीत येतो आणि तिच्या हातून साड़ी घेतो......साड़ी तिला नेसवु लागतो.....ती सुद्धा त्याच्या खांद्यावर हात ठेवून शांत उभी असते......


राधा: जीत खुप आठवण येते रूपाची..तिला जाऊन आज सहा वर्ष झाली रे...तिच्यामुळेच आज आपण आई बाबा होऊ शकलो...निर्वीच्या रूपातुन सुख मिळाल आहे आपल्याला....आज रुपा सुद्धा हावी होती...कदाचित आपल्या थोड्या निष्कळजीपणा मुळे ती पडली आनी.....😢


रणजीत: राधा सावर स्वतःला...रूपाची आठवण मला ही येते...पन ती लांब कुठे गेले ग नीरू च्या रूपाने ती सोबत आहेच शेवट पर्यंत...आणि राधा सगळ्या गोष्टी ह्या देवाने आधीच लिहिलेल्या असतात...वाइट नाही घड़ल तर पुढे जाऊन चांगल ही नसत घड़ल...


राधा: म्हणजे????


रणजीत: बग तुझी माझी इतकी भांडण व्हयाची,तरी आपल लग्न झाल आपन एक झालो म्हणजे वाइट आधी घड़ल नंतर चांगल घड़लच ना...रूपाच्या मनात इतकीच इच्छा होती कि आपल्या बाळाला चांगली जागा मिळावी ती मिळाली...हा फक्त देवाने तिचे प्राण घेतले....तूझ्या आणि माझ्या नशिबात हेच लिहिला होता ते घड़ल...खुप माणस आपल्या आयुष्यात अली गेली....खुप घटना घडल्या....यावरुन लक्षात येत ना कि आपल प्रेम,विश्वास यामुळे आपन सगळ फेस करू शकलो....😢


राधा: ह्म्म्म..हो..


रणजीत: हम्म शांत हो आता..चल खाली जाऊ...


राधा: ह्म्म्म...


सगळे खाली जातात,आधी रूपाची विधि पूर्ण करतात......मग निर्वीचा वाढदिवसा साजरा करतात.......राधा मनोमन रुपाला खुप आठवण करत होती......निर्वी तिच्या फ्रेंड्स सोबत खेळत असते,राधा रूपाच्या फोटो फ्रेम जवळ येते.....ती फ्रेमवरुन हात फिरवते.....तिच्या डोळ्यातुन अश्रु बाहेर पडतात.....


राधा: "रुपाss"😢

नकळत ओठांतुन बाहेर येत....

तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडतो....ती मागे वळून बघते,समोर रूपा उभी होती......तिने राधचे अश्रु पुसले......


रूपा: क़ाय राधा ताई सारख रडतेस तू तर..अस रडून कस चालेल ग...मी कुठे लांब गेले...तू मनापासून मला आठवतेस तेव्हा तुझ्या समोर येते ना मी....


राधा: हो रुपा😢


रूपा: अग हो हो किती रडशील..रोज रोज मला आठवतेस मला खुप उचकया लागतात महिते...आता मी आले तर जरा गप्पा मारुया...रडन थांबव...


राधा: ह्म्म्म😊


रूपा: किती गोड़ दिसते आपली निर्वी..अगदी तुझ्यावर गेले दिसन्यात...


राधा: तुझ्यावर ही गेले...बोलते सेम तुझ्या सारखी...नाटकी खुप करते,पण मनाने निर्मळ आहे,न चुकता अनाथ आश्रम मध्ये पैसे,खेळणी,मिठाई पाठवायला सांगते आम्हाला..खुप निर्मळ आहे...

रूपा: हम्म निर्वी...छान नाव ठेवले आहेस तू बाळाचे...निर्वी म्हणजे सुख..हो न

राधा: हो..


रूपा: सगळे खुप खुश आहेत,रणजीत दादा तर नीरू ला डोक्यावर चडवल आहे ना....अरे वा रेवा पन आले का ? आणि तो सम्राट ना रेवाचा नवरा...दोघ किती सुंदर दिसत आहेत न एकत्र...त्यांचा मुलगा ही खुप गोड़ आहे...


राधा: हो..😊सगळ आहे फक्त तू नाहीस ग😢


रूपा: राधा ताई..नको ना अस बोलूस..मला पण नव्हतं मारायच ग😭 मला जेव्हा पासुन तुम्ही सगळे भेटला होतात तेव्हा जगयाची इच्छा निर्माण झालेली...पण क़ाय करू देवा पुढे कोणाचा चालत ग...पण नशीब की तू माझ्या बाळासाठी होतीस....अशीच काळजी घे आपल्या बाळाची..आणि नेहमी हसत राहा..तू जेव्हा मला हाक मारशील मी समोर असेल...हम्म..😢जाते मी..


राधा: येते म्हणावे ग..😢


रूपा: येते मी..भेटूया,पुढच्या जन्मी...राधा ताई.....
आवाज हळू हळू कमी होत....


निर्वी: आई....आई....आई....आई...


राधा: आयआआआ हु हु क़ाय झाल नीरू..


निर्वी: कुठे लक्ष आहे तुझ...चल ना तिकडे...


राधा: हो बाळा..


निर्वी: मोठी आई च्या फ्रेम ला का बघते तू..


राधा: असच..


निर्वी: आठवण आली तुला...😢


राधा: ह्म्म्म..रोज येते..


निर्वी: बर मग आपन मोठी आई ला लेटर लीहुया आणि तिला बोलावून घेऊ हु..


राधा: हम्म ओके..😀


निर्वी: आता खुश ना...


राधा: हो खुश..😊चला डान्स करूया...चला चला...


निर्वी: ये...आई$$...



समाप्त
(सो गाइज,कसा वाटला आजचा भाग??.....राधा रणजीत आणि त्यांची छोटी निर्वी एक सुखी परिवार...ती आणि तो यांच्या आयुष्यात घड़लेले सगळे प्रसंग,त्यांचा आज अंत झाला....तुम्ही सर्वानी खुप साथ दिली...शेवटी क़ाय झाल समझल नाही माझे विवज कमी झाले,रेटिंग कमी झाल्या...माझ्याकडून लिखण चांगल नसेल झाल तर क्षमा असावी...तुमच स्पोर्ट असाच असुदे...भेटुया लवकर नवीन लव्ह स्टोरी सोबत....☺️थैंक्यू...💐)