Satyamev Jayte - 2 books and stories free download online pdf in Marathi

सत्यमेव जयते! - भाग २


भाग २

कालच्या महालक्ष्मी वर घडलेल्या प्रसंगामुळे तिचं पूर्ण आयुष्य संपले होते. एका रात्रीच बऱ्याच गोष्टीचा सामना तिच्या आई वडिलांना करावा लागला. पण याची भनक देखील तिला नव्हती. कारण ती तर जिवंत असूनही या जगात नसल्यासारखी एकदम शांत होऊन बेडवर पडली होती. सकाळी उशिरा तिने डोळे उघडले होते, पण चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचे हावभाव तिच्या नव्हते. सगळं तेज तिच्या चेहऱ्यावरचे कमी झाले होते. होते फक्त ते नखांचे ओरखडे अंगावर आणि ते पाहून तिच्या आईला रडू येत होतं. त्या स्वतःच्या हातांनी तिचं अंग साफ करत होत्या. पण मनावरचा आघात मात्र त्यांना पुसता येत नव्हता. काही दिवसांपूर्वी त्यांची हसणारी मुलगी आज अचानक शांत झाली होती. तिचे बाबा सकाळपासून काही झालंच नाही असा आव आणून चेहऱ्यावर खोटं हसू ठेवून तिच्यासोबत बोलत होते. पण तरीही ती काही प्रतिसाद त्यांना देत नव्हती.



"महालक्ष्मी, उठ ना ग. सांग ना ग बाळा तुझ्यासोबत काय घडलं ते? अशी शांत राहिली तर उद्या दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत असा प्रसंग घडू शकतो. तुला हे पटत का? तुझं नाव महालक्ष्मी ठेवलं कारण तू आम्हाला लक्ष्मी देवी मुळे मिळाली होती. पण आता तुझी अशी शांतता पाहून मला उगाच तुला हे नाव ठेवलं अस वाटायला लागलं. कारण लक्ष्मी देवी असुरांना सोडत नव्हती!! ती स्वतः संहार करते."महालक्ष्मीचे बाबा तिच्याकडे पाहुन म्हणाले. त्यांचं ऐकून महालक्ष्मीच्या डोळ्यांतून पाणी येत फक्त. ते तिची आई स्वतःच्या पदराने पुसते.




"तू नाही आली तरीही मी जाणार पोलीस तक्रार करायला. कारण मला माझ्या मुलीच्या गुन्हेगारांना शिक्षा झालेली पहायची आहे. इतर कोणत्याही मुलीसोबत अस घडू नये, यासाठी मी जाणार आहे" महालक्ष्मीचे बाबा अस म्हणून तिथून निघून जातात. ती फक्त डोळ्यांत पाणी ठेवून त्यांच्या दिशेला पाहत राहते.





एखादे वडील असते तर एवढं झाल्यावर घाबरून घरात बसले असते. इज्जत जाईल वगैरे याचा विचार करून ते शांत राहिले असते. पण तिचे वडील वेगळ्या विचारांचे होते. त्यांना तर आपल्या मुलीच्या गुन्हेगारांना शिक्षा द्यायची होती!! न्याय मिळवायचा होता. त्यासाठी ते एकटेच तयार होऊन घराबाहेर पडत असतात की, तेवढ्यात एक हँडसम असा सहा फूट उंचीचा मुलगा दारातून त्यांच्या घरात प्रवेश करतो. त्या मुलाला पाहून ते चेहऱ्यावर खोटं हसू आणतात.





"अरे, राजवीर. तू कसा आला? येणार नव्हता म्हटला होता ना?" महालक्ष्मीचे बाबा चेहऱ्यावर खोटं हसू आणत विचारतात.





"काही काय काका, आज महालक्ष्मीच लग्न होत ना. त्यामुळे मी सुट्टी टाकून आलो आहे. तुम्हाला तर माहीत आहे डीएसपी लोकांना सुट्टी मिळणं कठीण असत. कशीबशी टाकून आलो आहे. काही काम आहे तर सांगा आता तुम्ही मला, म्हणजे मी करेन" राजवीर काहीसा हसून म्हणाला. त्याच ते बोलणं ऐकून आता मात्र एवढ्या वेळ चेहऱ्यावर खोटा मुकुटा लावलेल्या महालक्ष्मीच्या बाबांच्या डोळ्यांत पाणी येत. ते पाहून तो मुलगा गोंधळून त्यांना पाहायला लागतो.





"काय झालं काका? अहो, मुलीला द्यायचं नाही आहे का तुम्हाला? तस असेल तर सांगा. महालक्ष्मीला जाऊन सांगतो बाई तू त्या मुलाशी लग्न नको करू. नाहीतर आमचे काका रडत बसतील ना."राजवीर काहीसा हसून म्हणाला.





"राजवीर, लग्न नाही होणार आहे. महालक्ष्मीच लग्न मोडल. कारण तिच्यावर बलात्कार झाला आहे. त्यामुळे नवऱ्या मुलांनी तिला अपवित्र ठरवून तिच्याशी लग्न करायला नकार दिला" महालक्ष्मीचे बाबा रडतच बोलतात. त्यांचं ते बोलणं ऐकून त्याच डोकं सुन्न होत. काय बोलावे या परिस्थित? हे त्याला कळत नसत. तो डीएसपी होता. त्याच्या प्रोफेशनमध्ये त्याने अश्या बऱ्याच केसेस पाहिल्या होत्या. पण आता ही केस त्याच्या मैत्रिणीची होती. जी खुपच त्याला जवळची होती!! महालक्ष्मीने अगदी शून्यातून तिचं जग निर्माण केलं होतं. हे त्याने लहानपणापासून पाहिले होते. जास्त मोठी स्वप्न नव्हती तिची. फक्त आई वडिलांना आनंदी ठेवायचं होत तिला. यासाठी तिची धडपड चालू असायची. महाराष्ट्रातून ती काही वर्षांपूर्वी आली होती दिल्लीत राहायला. पण अस असताना देखील तिने राजवीर सोबत बोलणे सोडले नाही. लग्नासाठी तर तिने हट्ट करून त्याला बोलावे होते. त्यामुळेच तो आला होता. पण आताच तिच्या संबंधीच ऐकून त्याचे देखील नकळत डोळे भरतात.




"काका, मी पाहू शकतो का तिला?" राजवीर डोळ्यातील पाणी बाबांना दिसणार नाही, अश्या चपळाईने पुसत म्हणाला.




"हम्म.." ते एवढंच बोलून मान हलवतात. राजवीर सरळ आपलं सामान जागेवर ठेवून थोडासा फास्टच चालत महालक्ष्मीच्या रूममध्ये जातो. समोरचा निस्तेज झालेला तिचा चेहरा पाहून त्याला वाईट वाटत. तो डोळयांनीच तिच्या आईला धीर देतो आणि तिच्या बाजूला जाऊन बसतो.





"मही, तू बोलली होती ना मी नाही आलो तर तू माझ्यासोबत बोलणार नाही? पण आता तर मी आलो आहे ना? मग एकदा देखील माझ्यासोबत बोलणार नाही का?काय झालं मही?" राजवीर स्वतःला शांत ठेवत तिचा हात हातात घेत बोलतो.तरीही ती त्याला काहीच प्रतिसाद देत नाही. तिची ती अवस्था पाहून आता त्याला भरपूर भरून येत असत. मनात कालवाकालव होत असते.




"मही, माझं प्रोफेशन तुला माहीत आहे ना? तू बोलायची ना मला, राज काही झालं तरीही गुन्हेगार सुटला नाही पाहिजे. मग तू तुझ्या गुन्हेगारांना नाही का शिक्षा देणार?मही, प्लीज भानावर ये. आई बाबा तुझी वाट पाहत आहे. तुझा सखा राज पण वाट पाहत आहे मही."राज थोडस तिला समजावत बोलत असतो. त्याच ते बोलणं ऐकून ती भरल्या डोळयांनी त्याच्याकडे पाहते. तिचे ते पाणीदार, काळेभोर भरलेले डोळे पाहून नकळतपणे त्याचेही डोळे पाणावतात. पण तरीही तो तिचा हात हातात धरत नाही मध्ये मान हलवून एका हाताने डोळे पुसायला लागतो.




"मही, मी आणि तुझा परिवार नेहमी तुझ्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे काय काय घडलं ते न घाबरता सांग? मी तुझा मित्र अस समजून नाही तर एक अधिकारी म्हणून तुला विचारत आहे"राजवीर तिला धीर देत विचारतो. त्याच ते बोलणं ऐकून ती शांत होते.





"संतोष, माझा होणारा नवरा त्याचे तीन मित्र होते ते. संतोष वर माझं प्रेम नव्हतं. ना ही फिलिंग होत्या त्याच्याबद्दल. पण वय निघून जाईल. या काळजीने आई बाबांनी स्थळ पाहायला सुरुवात केली. संतोष माझ्या ऑफिस मध्येच कामाला होता. त्याला कुठून तरी ही बातमी कळली. तर त्याने घरी येऊन मागणी घातली. मग माझ्या घरून होकार त्याला कळवला. तो रोज माझ्यासोबत बोलत असायचा. पण माझ्या मनात कधीच अस प्रेम वगैरे नव्हतं. एक दिवस पार्टीला घेऊन गेला तेव्हा तिथे त्याचे फ्रेंड्स माझ्यावर कंमेंट पास करत होते. तरीही तो काहीही न बोलता हसून त्यांच्यासोबत बोलत होता. त्यावेळी मी विचार केला नाही. पण आज जी काही माझी अवस्था आहे ती फक्त त्याच्यामुळे आहे." महालक्ष्मी डोळ्यात पाणी ठेवत बोलत असते. तिचे ते बोलणं ऐकून राजवीरच्या हाताच्या मुठी आपोआप घट्ट होतात.





"मही, एवढं आपण फोनवर बोलत असायचो. पण तू एका शब्दाने काही बोलली नाही मला. हे सगळं झालंच नसत तुझ्यासोबत"तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत बोलतो.ती फक्त त्याच ऐकून डोळ्यातून पाणी काढत असते. शेवटी, तो तिचे डोळे पुसतो आणि डॉक्टरला कॉल करून बोलावून घरीच बोलावून घेतो. डॉक्टर घरी येऊन तिला चेक करतात आणि त्यांना इन्स्ट्रकशन देऊन निघून जातात. तसा तो तिला पाहून बाहेर येतो आणि हातात हातमोजे घालतो.




"काकी, मला महालक्ष्मीचे कालचे कपडे आणून द्या!! " राजवीर बाहेर येत बोलतो. त्याच बोलणं तर आधी त्यांना कळत नाही. नंतर मग भानावर येऊन ते महालक्ष्मीचे कपडे एका पिशवीत आणून देतात.तसा राजवीर ते कपडे हातात घेतो आणि स्वतःच्या बॅग मधून एक पिशवी काढून तो ते त्यात टाकतो.





"महालक्ष्मीची केस आजपासून माझ्याकडे असेल. मी न्याय मिळवून देईल तिला" राजवीर गुढपणे म्हणाला.ते ऐकून तिचे आई बाबा त्याला पाहत राहतात.





"आजपासून दिल्लीचा नवीन डीएसपी मी आहे. त्यामुळे ही केस मीच सॉल्व्ह करणार आहे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी मी प्रयत्न करेन. कारण सत्याचा नेहमी विजय होतो. आपली बाजू खरी आहे. सत्यमेव जयते!!"राजवीर थोडासा शांत होत बोलतो. त्याचे बोलणे ऐकून महालक्ष्मीचे आई बाबा थोडेसे आश्चर्यकारक पणे त्याला पाहायला लागतात.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
-------------------


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED