सत्यमेव जयते! - भाग ९ Bhavana Sawant द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सत्यमेव जयते! - भाग ९

भाग ९.


महालक्ष्मीने सगळ्यांच्या सपोर्टमुळे ही केस लढण्याचा निर्धार केला. राजवीर आणि अपर्णा तिला कशाप्रकारे कोर्ट मध्ये प्रश्न विचारले जातील? उत्तर आपण कशी दिली पाहिजे? हे शिकवत असायचे. कारण विरुद्ध बाजूच्या लोकांचे वकील कसे प्रश्न विचारून ? महालक्ष्मीचा कॉन्फिडन्स कमी करण्याचा प्रयत्न करतील. हे , अपर्णा आणि राजवीर जाणून होते. त्यामुळे ते आधीच तिला तसले प्रश्न विचारून तिचा कॉन्फिडन्स कमी न करण्यासाठी प्रयत्न करत होते. महालक्ष्मी पण आता हळूहळू आत्मविश्वासाने बोलत असायची. तिचा आधीचा बोलण्याचा आत्मविश्वास तिच्यात आता परतत होता. केस साठी आणि कोर्ट कचेरी साठी आता ती पूर्णतः तयार झाली होती.





उद्या महालक्ष्मीची केस दिल्लीच्या कोर्टमध्ये चालणार होती. आता ही केस चर्चेत देखील आली होती. कारण मोठे दोघे लोक यात अडकले होते. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा इथं लागल्या होत्या. राजकारणी लोकांची मुलं असणारे, या केसमुळे राजकारणावर देखील परिणाम उमटत होते. बरेच मोठे राजकारणी लोकांचे महालक्ष्मीच्या घरी येणे चालू होते. पण राजवीर कोणत्याही व्यक्तीला तिला भेटायला देत नव्हता!! त्यामुळे ती लोक परतून जात होती. रिपोर्टरची लाईन पण आता लागत होती. काहीजण तर मोठ्याने ओरडून काहीही बातम्या पसरवत होते. हे, पाहून आता महालक्ष्मीच्या बाबांना राग येतो. ते रागातच घराच्या बाहेर येतात.



"राजवीर, मला अडवू नको!! मी देतो उत्तर यांना" , महालक्ष्मीचे बाबा राजवीरला बाजूला करत म्हणाले.





"बाबा, अश्यांना आपण कोर्ट मध्ये पाहू.", राजवीर समजावत म्हणाला.





"नाही. राजवीर, यांना मला विचारायचं आहे. तुमच्या मुलीवर असा प्रसंग आला असता, तर असेच बोलले असते का? आम्ही मध्यमवर्गीय आहोत. म्हणून आमच्या मुलींना काहीही बोलायचं का या लोकांनी? मुली या सारख्याच असता. तिचा आदर आणि सन्मान करणे गरजेचे असते. तिची इज्जत गेली आहे. पण या लोकांनी नको ते आरोप करून तिला आणखीन निलाम केलं आहे. मला नाही पटलं हे. समाजात ही लोक पण तेवढीच दोषी असली पाहिजे.", महालक्ष्मीचे बाबा चिडून म्हणाले.





"बाबा, अहो त्यांना काय करायचे? ते करू द्या. आपण नको लक्ष घालायला हवे. त्यांचं कामच तसलं आहे. ", राजवीर त्यांना समजावत म्हणाला. तो त्यांच्या जीवाची काळजी घेऊन समजावून त्यांना आतमध्ये पाठवतो. कारण सध्या तरी त्याला उगाच तमाशा नको होता. एक जरी अपशब्द, रिपोर्टर आणि राजकारण्यासाठी फायद्याचा होता. कारण आणखीन त्यांना महालक्ष्मी आणि तिच्या परिवारावर आरोप लावायला मिळाले असते. मिरची - मसाला लावून दिवसभर तिची न्युज चॅनेलवर झळकली असती. याचा विचार करूनच राजवीर त्यांना समजावतो.




राजवीरचे सेक्युरिटी वाले त्या सर्व लोकांना महालक्ष्मीच्या घरातून घालवून देतात. जे ऐकत नव्हते, त्यांना देखील तो ओरडून घालवून देतो. आता वैताग आला होता त्याला त्या सर्वांचा. सगळं खालच आवरुन तो महालक्ष्मीच्या रूममध्ये येतो.




"मही, भिती वाटते का?" तो महालक्ष्मी जवळ येऊन विचारतो. त्याच ते बोलणं ऐकून ती "नाही" मध्ये मान हलवते. तसा तो तिचा नाजूक हात हातात धरतो आणि तो हात पकडूनच तिला सरळ घेऊन जाऊन बेडवर बसवतो. ती बसताच तो सरळ जाऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवतो.




"राज$$$$ " महालक्ष्मी त्याला पाहून म्हणाली.





"माझं डोकं खराब होईल. सगळयांना उत्तर देता देता. त्यामुळे मसाज कर की. लहानपणी छान करायची. " महालक्ष्मीला हसून म्हणाला. सध्या तरी त्याला महालक्ष्मीला रिलॅक्स ठेवायचे होते!! त्यामुळे तो थोडासा खेळी मेळीच वातावरण तयार करत होता.






"हम्म....अजूनही आठवत तुला? माझ्यासारख मालिश कोणी नाही करून द्यायचं तुझी."महालक्ष्मी नकळतपणे बोलून जाते.






"हो, तू बेस्ट आहेस. माझी दुर्गा, लहानपणी पासून छान आहे आणि सगळ्यात तरबेज अशी आहे. त्यामुळे तर मला आवडते तू!!" राजवीर तिचा हात डोक्यावर फिरवत म्हणाला. ती देखील त्याला पाहून स्वतःचे हात त्याच्या डोक्यावर फिरवते आणि त्याला मसाज द्यायला लागते.







"तू डीएसपी आहेस ना दिल्लीचा? ते कसं शक्य आहे? तू तर महाराष्ट्रात होतास ना? मग इकडे दिल्लीत कसा काय आलास?" महालक्ष्मी विचार करून बोलते.






"कोण मी का? हां सॉरी दुर्गा. मला दिल्लीत येऊन दोन वर्ष झाली. हे, मी कोणाला सांगितले नव्हते. माझ्या कामामुळे प्रमोशन झालं आणि आता मी या पदावर आहे.", राजवीर तिच्या डोळ्यांत पाहून म्हणाला. त्याचे म्हणणे, ऐकून ती शॉक होते.





"काय....तू एवढी वर्षे इथे असून पण मला भेटला नाही? मला नाही बोलायचे तुझ्यासोबत!! तू जा इथून. ", महालक्ष्मी चिडूनच त्याच डोकं बाजूला करत उठत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून राजवीर पटकन उठतो आणि तिचा साडीचा पदर पकडतो. तशी ती जागीच थांबते.




"दुर्गा, नको ना अशी नाराज होऊन जाऊ. मला नाही आवडत अस तुला पाहायला."राजवीर तिचा पदर पकडून म्हणाला. त्याच बोलणं ऐकून ती मागे वळते आणि पाहते तर राजवीरचे डोळे भरलेले होते. त्याचे भरलेले डोळे पाहून तिला वाईट वाटत. तशी ती त्याच्या हातून पदर सोडवून घेऊन उभी राहून त्याला पटकन जवळ करते. तसा राजवीर बसूनच तिच्या पोटाभोवती स्वतःच्या हातांचा विळखा घालून रडायला लागतो. यावेळी महालक्ष्मीला देखील रडायला येत. ती त्याची मान पकडून त्याला कवटाळते.





"नको, रडू...मी तुझीच आहे. खूप प्रेम करतोस ना माझ्यावर? मी आता नाही तुझ्या प्रेमाचा अपमान करणार. मला त्रास झाला की, तुला रडू येत आणि याच कारणासाठी तू संतोषला संपवले ना राज?"महालक्ष्मी रडतच त्याला कवटाळत म्हणाली. तसा तो ते ऐकून तिला पाहतो. पण ती एकदम शांत राहून त्याला पाहत असते.





"तुला कस माहिती हे?"राजवीर विचारतो.






"माझ्या राजला मी ओळखते!! आज नाही तर किती तरी वर्षांपासून. त्यामुळे मला माहित आहे. पण असो, त्याला त्याची शिक्षा मिळाली.", महालक्ष्मी म्हणाली.





"स्मार्ट झाली आहेस. फक्त मला सोडून जाऊ नको आणि आता काही विचित्र वागायचं नाही. तू कलायरीपयट्टू ही आर्ट शिकणार आहेस. ही केस संपली की, आपण लग्न करायचे. मग तू पण जॉबला जायचं तुझ्या!! मला माझी दुर्गा वापस हवी आहे आधीसारखी. ",तो तिच्या पोटाभोवती विळखा घालून बोलतो. त्याच बोलणं ऐकून ती मनात आनंदी होते.






"किती प्रेम करतोस राजवीर तू माझ्यावर? पण मी त्या योग्यतेची नाही आहे. हे तुला कस कळत नाही? मी नाही सुख देऊ शकत तुला.", महालक्ष्मी मनातच बोलते. इकडे राजवीर तिला एक एक सांगत असतो आणि ती आपल्याच विचारात हरवलेली असते.





"मही, तुला त्रास होत असेल ना? तर मी तुला तुझ्या मर्जीशिवाय टच पण करणार नाही. मग मी पाच सहा वर्षे पण वाट पाहेल. मला घाई नाही आहे.",राजवीर विचार करून बोलतो. त्याच ते बोलणं ऐकून ती शांत राहते. त्याला बाजूला करून ती व्यवस्थित त्याला बेडवर झोपवते.





"बस्स झाल तुझं!! आता झोप बघू. उद्या केसला जायचं आहे कोर्ट मध्ये" महालक्ष्मी त्याला दटावत बोलते. तिचं बोलणं ऐकून तो गप्प बेडवर झोपून जातो. महालक्ष्मी तो झोपला हे पाहून बेडवर उश्या ठेवून पार्टिशन करून दुसऱ्या बाजूला पडून राहते. राजवीर वर तिला भरपूर सारे प्रेम करावेसे वाटत होते. पण मनात असून देखील ती तस करू शकत नव्हती. त्यामुळे थोडस अंतर ठेवून ती वागत असायची.







क्रमशः
---------------------