सत्यमेव जयते! - भाग ३ Bhavana Sawant द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सत्यमेव जयते! - भाग ३

भाग ३.

"आजपासून दिल्लीचा नवीन डीएसपी मी आहे. त्यामुळे ही केस मीच सॉल्व्ह करणार आहे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी मी प्रयत्न करेन. कारण सत्याचा नेहमी विजय होतो. आपली बाजू खरी आहे. सत्यमेव जयते!!"राजवीर थोडासा शांत होत बोलतो. त्याचे बोलणे ऐकून महालक्ष्मीचे आई बाबा थोडेसे आश्चर्यकारक पणे त्याला पाहायला लागतात.


"तू इथे कसा काय?"महालक्ष्मीचे बाबा विचारतात.



"अंकल, ते नंतर सांगतो. तुम्ही, महीकडे लक्ष द्या!! मी पाहतो बाकीच" तो एवढं त्यांना बोलून कोणाला तरी कॉल करतो आणि हिंदीतून इन्स्ट्रकशन देतो आणि कॉल कट करतो.



"अंकल, मला चेंज करायला रूम मिळेल काय?"राजवीर त्यांच्याकडे पाहून विचारतो.



"हो, महालक्ष्मीच्या बाजूची रूम आहे. तू तिथे चेंज करू शकतो"महालक्ष्मीचे बाबा म्हणाले. त्यांचं ऐकून राजवीर आपली बॅग उचलतो आणि महालक्ष्मीच्या बाजूच्या रूममध्ये जायला लागतो. जाता जाता तो एकदा महालक्ष्मीवर नजर टाकतो आणि तसाच स्वतःला सावरून फ्रेश व्हायला निघून जातो. यावेळी, परिस्थिती थोडीशी वेगळी होती त्याच्यासाठी. बऱ्याच केसेस त्याने सॉल्व्ह केल्या होत्या. पण ही केस आता त्याच्या मैत्रिणीची होती!! महालक्ष्मीला धीर देऊन यातून बाहेर काढणे , त्याला आधी महत्त्वाचे होते. त्यानंतर पुढचं होत सगळं.


काहीवेळाने तो दिल्ली पुलीसची वर्दी अंगावर चढवून बाहेर येतो आणि महालक्ष्मीच्या आई बाबांचे पाया पडून त्यांना धीर देऊन तिथून निघून जातो. खरंतर तो उद्या जॉईन होणार होता. पण आज संध्याकाळीच कॉल करून तो घरातून निघून गेला.




स्थळ:- डीएसपी ऑफिस,दिल्ली.
वेळ:- रात्रीचे ८:३५

आज नवीन डीएसपी साहेब जॉईन होणार होते दिल्लीत याची बातमी सगळयांना माहिती होती. पण ते उद्या दिल्लीत येऊन कारभार हाती घेणार होते. हे, देखील सर्वांना माहीत होते. त्यामुळे त्या ऑफिस मधील काही ऑफिसर आपले मस्त हळू हळू काम करत होते काय? मोबाईल वर गप्पा काय मारत होते?,असच सगळं काही चालू होतं. जी लोक प्रामाणिक होती. ती मात्र आपलं काम करत होती.


अचानकपणे, एक दिल्ली पोलिसांची गाडी आपला सायरनचा आवाज करत ऑफिसला पोहचते. तस आतमध्ये सगळे जण पटापट गोंधळत स्वतःला सावरत काम करायला लागतात.कारण त्यांना कळलं होतं, ती गाडी डीएसपी सरांची आहे ते. त्यामुळेच सगळेजण स्वतःला सावरत आपलं काम करायला लागतात.राजवीर मस्त असा आपला स्टाईल मध्ये चालतच त्या गाडीतून बाहेर पडतो आणि कोणालाही न बघता सरळ ऑफिस मध्ये जातो. पोलीस लोक त्याला सैल्यूट करत असतात. पण तो मात्र एक नजर त्यांना देऊन सरळ निघून जातो.



"ये ,सर कमाल के हैं। लेकिन भाव नहीं देते। लगता हैं ये भि सभी लोगो की तर्हा हैं।" एक महिला राजवीरला जाताना पाहून म्हणाली.



"क्या पता? दिल्ली में क्राईम लिस्ट बढती ही जा रही हैं। कल ही रेप हुवा एक लड़की पर। लेकिन, उसका कुछ पता नहीं। शायद, बदनामी के कारण डर गये होंगे" दुसरी महिला काहीशी नाराज होत म्हणाली. कारण हल्ली त्यांचे सिनिअर लोक सांगतील तसेच ती लोक वागत असायची. त्यामुळे बरेच क्राईम बाहेर येत नव्हते. लोक घाबरून जात होती इज्जतीला. जी लोक यायची केस बनवायला, त्यांच्यात देखील जर गुन्हेगाराची ओळख मोठी असेल? तर वरून पोलीस लोकांवर प्रेशर आणून सोडून दिले जात असायचे. त्यामुळेच लोक पुढे येत नव्हती!! कारण "सत्यमेव जयते" , हे फक्त आता ब्रीदवाक्य बनून राहील होत. या कलियुगात त्या वाक्याला काहीच किंमत सध्यातरी नव्हती. सत्य असून देखील , त्यावर असत्याचा पगडा बसलेला असायचा. पैसे घेऊन सत्य असत्य बनायचं. मग अशी परिस्थिती असल्याने कोणीच पुढे यायचे नाही!!


राजवीर आपल्या केबिन मध्ये बसतो आणि काहीवेळातच सर्व लोकांना बाहेरच एकत्र यायचा आदेश एक ऑफिसर कडे पाठवतो. तसे ऑफिस मध्ये असलेले ऑफिसर तिथं येतात. पोलीस स्टेशन, पण जवळ असल्याने तिकडचे ऑफिसर देखील तिथं येतात. कारण त्याचा आदेश होता. काहीवेळातच सर्व ऑफिसर लोक ऑफिसच्या बाहेर गोळा होतात. तसा तो बाहेर येतो आणि सर्व ऑफिसर लोकांना पाहायला लागतो.



"नमस्ते, मैं हूं आपका डीएसपी राजवीर देशमुख। आपको मैने यहां पर काम के लिए बुलाया हैं। आज से दिल्ली में होणे वाले अत्याचार को रोकने के लिए हमारी पुलीस काम करेगी।"राजवीर सगळयांना पाहून म्हणाला. एक कॉन्फिडन्स होता त्याच्या बोलण्यात, हे सगळयांना जाणवत. एक वेगळी चमक होती त्याच्या डोळ्यात. असा तडकाफडकी आजवर कोणीही ऑफिसर लोकांना बोलावले नव्हते. पण राजवीरने आल्या आल्या सर्वांना बोलावून घेतले होते आणि त्यात तो अस काही बोलत होता, की ते सर्व सगळ्यांच्या डोक्याच्या बाहेरच होत.



"सर, आप कहेना क्या चाहते हो? मतलब, दिल्ली में हमारे वजह से लडकीया सेफ नहीं हैं क्या?हम अपनी नाईट शिफ्ट अच्छे से करते हैं। "एक ऑफिसर थोडस चिडून म्हणाला.



"मैने ऐसा कुछ कहां नहीं मिस्टर रावत!! मैं सिर्फ आपको , ये बताना चाहता हुं, की आज तक जो हुवा हैं, वो मुझे पता नहीं। लेकिन, आज से हमारी पुलीस एक हेल्पलाईन महिलांओ के लिए शुरु करेगी। इस मे दिल्ली की महिला पुलीस काम करेगी। कोई लडकी, महिला खुद्द को अन सेक्युअर मेहसुस करती हैं, तो वो हमे कॉल करेगी। जब हमारे हेल्पलाईन पर कॉल आयेगा तब एक टीम उनके मोबाईल का लोकेशन ट्रेस कर के उनको मदद करेगी । कोई लडकी खुद्द को असुरक्षित ना समझे, इसलीए ये हेल्पलाईन काम करेगी।" राजवीर सरळ मुद्द्यावर येत बोलतो. त्याच ते बोलणं ऐकून महिला लोकांना समाधान मिळत. कारण आज कोणी तरी महिला सुरक्षितेसाठी काहीतरी करत आहे. हे पाहून त्या थोड्याश्या कौतुकाने त्याला पाहतात आणि काहीजण तर त्याच्या हेल्पलाईनच कौतुक करायला लागतात.


"सर, आपकी ये आयडिया अच्छी हैं, लेकिन हेल्पलाईन का नाम क्या होगा?"महिला ऑफिसरच्या गर्दीतुन एक आवाज येतो. तसा राजवीर त्या दिशेला पाहतो आणि त्या महिलेला पाहायला लागतो. तिला पाहताक्षणी त्याचे ओठ किंचितसे रुंदावतात. पण तो सध्या वर्दीत असल्याने शांत होऊन विचार करतो.




"दुर्गा हेल्पलाईन..कॉल ५०७" राजवीर विचार करत म्हणाला. त्याच ते ऐकून तिथे असलेले ऑफिसर लोक टाळ्या वाजवतात. ते सुद्धा कौतुकाने.


"नाम अच्छा हैं।" ती महिला म्हणाली. राजवीर किंचितसा हसतो आणि त्यांना कशाप्रकारे काम करायचं ? वगैरे या गोष्टी समजावून सांगतो. योग्य माहिती देऊन तो दोन अडीच तासाने आपल्या केबिनला जाऊन बसतो.



"मग भेटली का तुला तुझी मही? दुर्गा तिच्यावरूनच ठेवलं ना नाव? लहानपणी तिला बोलायचा ना त्यामुळे विचारलं आपलं सहज तुला?" एक महिला आतमध्ये येत थोडीशी हसतच म्हणाली.त्या महिलेला पाहून तो तिला एक नजर वर करून पाहतो. थोडासा खुश देखील होतो आणि थोडासा दुःखी देखील.




"दुर्गा हरली आहे !! कोमेजून गेली आहे दुर्गा."तो निराश होऊन बोलतो. तशी ती महिला काळजीने त्याच्याकडे पाहते.




क्रमशः
------------------------
कथा काल्पनिक आहे...वास्तवाशी काहीही संबंध नाही...कोणाच्या भावना दुखावल्या तर सॉरी...राजवीरच सत्य हळूहळू कळेल...

©️®️Bhavana Sawant