Satyamev Jayte - 6 books and stories free download online pdf in Marathi

सत्यमेव जयते! - भाग ६

भाग ६.

राजवीरने महालक्ष्मीला बाहेर तर आणले होते. पण महालक्ष्मी गाडीत देखील थोडीशी घाबरून आसपास पाहत बसलेली होती. आपल्या साडीचा पदर ती अंगावर टाकून अंग झाकून घेण्याचा प्रयत्न करत होती. राजवीरची नजर ड्राइव्ह करता करता तिच्यावर पडली की, त्याला देखील कसतरी होत असायचं.आधी तर महालक्ष्मी अस कधीच करत नसायची. पण या घटनेनंतर मात्र ती खूप घाबरून राहायला लागली होती.
"आय स्वेअर महालक्ष्मी, तुझ्यावर असा प्रसंग आणणाऱ्या लोकांना मी अजिबात सोडणार नाही. कोर्टला तर त्यांना नंतर पोहचवणार. पण त्या आधी मात्र त्यांना चांगली शिक्षा देणार!!"राजवीर मनातच म्हणाला.खूप वेळाने त्याची गाडी एका सुनसान रस्त्यावर थांबते. तसा तो महालक्ष्मीला पाहून गाडीचा दरवाजा खोलून खाली उतरतो. राजवीर तिच्या बाजूला जातो आणि हळूच तिच्या बाजूचा दरवाजा ओपन करून तिच्या समोर स्वतःचा एक हात पुढे करतो."मही, बाहेर ये. हे आपलं आवडत ठिकाण आहे ना नेहमीच?" राजवीर चेहऱ्यावर हसू ठेवून बोलतो. त्याच बोलणं ऐकून ती आसपास पाहते. त्याच्या चेहरा कडे पाहून नकळतपणे तिचा चेहरा बदलत जातो. राजवीर जरिही जास्त श्रीमंत नसला, तरीही त्याच्या बोलण्याच्या पध्दतीने, स्वभावाने तो लोकांवर भुरळ पाडत असायचा. दिसायला देखील खूप सुंदर होता. त्यामुळे बऱ्याच मुली त्याच्या मागे असायच्या. पण तो मात्र कोणाला भाव देत नसायचा. कारण त्याला असलं काही आवडत नसायच. महालक्ष्मी वर प्रेम असल्याने इतर मुली त्याला भावत नव्हत्या. आताही तिची साथ सगळयांनी सोडली, तरीही मात्र त्याने ती सोडली नव्हती.


"राज...आपण घरी...जाऊ"महालक्ष्मी कचरत म्हणाली. कारण सध्या तरी तिला बाहेरच जग नकोसे वाटत होते."जाऊ, आपण. पण त्या आधी इथं येऊन फिर माझ्यासोबत. मोकळी हवा, मोकळा श्वास घेऊन तर बघ मही. बरे वाटेल तुला."राजवीर तिला समजावत हळूच तिचा हात पकडून तिला बाहेर काढत म्हणाला. तो एका बाजूने तिला जवळ पकडतो. त्याच्या अश्या वागण्याने ती अंग चोरून घेते."भीती वाटते दुर्गा तुला? आधी तर घाबरत नव्हती ना मला?" राजवीर तिचा हात स्वतःच्या दुसऱ्या हातात पकडत म्हणाला."आता सगळं बदलले आहे राज...मी, तू सगळं वेगळं आहे.. मी आता समाजातील एक अशी मुलगी झाली आहे की, ती कोणालाच नको आहे..कधी कधी वाटत मरण का नाही मिळतं मला??"महालक्ष्मी गहिवरून बोलते."अजिबात नाही. तू सध्या तरी स्पेशल आहे. आपण कधीच वेगळे नव्हतो, दुर्गा!! नेहमी एकसारखे होतो. आपले विचार, मत सारखी होती. पण तरीही आपण चांगले मित्र होतोच की, मग आता अस का बोलत असते दुर्गा तू? एवढी घाबरून नको राहू. ज्यांनी तुझ्यावर अशी परिस्थिती आणली, ती तर लोक खुश जगत आहे. मग तूच का अशी घुसमटून राहते. मनमोकळे पणे बोल माझ्यासोबत. तुझ्या अश्या वागण्याने सर्वांना त्रास होत आहे. उद्या, परवा त्या लोकांना कोर्ट मध्ये आणले जाईल. त्यावेळेस तू, काही नाही बोलली तर आपण ही केस हरू शकतो दुर्गा. त्यामुळे धीट बन!! मी तुला दुर्गा म्हणतो, कारण तू तशीच होती. पण आता थोडीशी घाबरून राहते. हे मला आवडत नाही आहे"राजवीर मनमोकळे पणाने आज तिला समजावत बोलत असतो. कारण तिला त्याला थोडेसे मोकळे करायचे होते.
अशा केसेस मध्ये पोलिस लोक पीडित मुलींना बाहेर आणण्यासाठी, समुपदेशन करायला सुरुवात करतात. त्यांना हळूहळू बोलते करण्यासाठी स्पेशल महिलांची टीम काम करत असते. कारण कधी कधी पीडित असलेल्या मुली या खूप कमी वयाच्या असतात. त्यांना बोलण्यासाठी भाग पाडण्यासाठी म्हणून ती लोक त्या लेव्हलचा विचार करून समजावत असतात. आता महालक्ष्मी, इतरांना भेटायला घाबरत असल्याने तोच ,तिला समजावयाला लागतो. महालक्ष्मी हळूहळू त्याच्या सोबत बोलायला लागते. तो घाई न करता, हळूहळू तिला नॉर्मलं प्रश्न विचारत असतो. एकदम तिला बोलत करण्यासाठी. मेंदू तिचा थोडासा चांगला आधीसारखा बनवण्यासाठी तो तस करत असतो.महालक्ष्मी त्याच्या सोबत बोलायला लागते. तिच्याही नकळत ती आता त्या वातावरणात रुळायला लागते. राजवीरच प्रत्येक तिच्या हालचालीवर लक्ष असते. आता थोडस त्याला समाधान वाटतं असत.तो बोलता बोलता महालक्ष्मीला टेकडीच्या ठिकाणी आणतो. त्या टेकडीच्या खालच्या बाजूला पाहताच पूर्ण दिल्ली दिसत असायची. सध्या अंधार होत होता, त्यामुळे दिल्लीतिल लाईट्स आता लागायला सुरवात झाली होती. राजवीर तिला ते दृश्य दाखवायला लागतो.
"हे, आहे दिल्ली शहर.."राजवीर खाली पाहत म्हणाला."दिल्ली...अंधकार करत...सगळे आनंदी आहेत...पण माझ्या आयुष्यात अंधार पसरला आहे"ती मनातच म्हणाली."असच तुझं आयुष्य एकदिवस बहरून निघेल मही."तो मनातच म्हणाला.त्या टेकडीवरची शांतता आणि हळुवार येणारा वारा त्यांना भावत होता. महालक्ष्मी कितीतरी दिवसांनी अस काही अनुभवत होती. त्यामुळे ती शांत डोळे मिटून, हाताची घडी घालून उभी होती.
"दुर्गा, चल जाऊ घरी. काय आहे ना मॅडम, आता मला ड्युटीला जावे लागेल. त्यामुळे सॉरी. उद्या येऊ आपण"राजवीर हसून भानावर येत म्हणाला. त्याच्या आवाजाने ती भानावर येते आणि फक्त मान हलवून स्वतःच हळूहळू चालायाला लागते. तिला अस चालताना पाहून त्याला बरं वाटत. कारण ज्या कारणासाठी त्याने तिला इथं आणलं होतं. ते थोडंफार तरी सफल झाल. याच समाधान त्याला वाटत होतं. महालक्ष्मी सरळ येऊन गाडीत बसते. त्यानंतर राजवीर देखील येऊन बसतो आणि गाडी स्टार्ट करून तिला तिथून घेऊन जातो. तो महालक्ष्मीला घरी व्यवस्थित सोडतो. तसाच , तयार होऊन आपलं आवरुन रात्रीचा ड्युटीला निघून जातो.
दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीला तिची आई फ्रेश करून हॉलमध्ये नाष्टा भरवत असते की, तेवढ्यात त्यांच्या घरात चालू असणाऱ्या टीव्ही न्यूज वर बातमी झळकते.
"आशाना मलिक, राहुल वायपेयी इन बडी हस्तीयोंको पुलीसने गिरफ्तार किया हैं। रातोरात इनके दोनो इंडस्ट्री को हुआ बडा नुकसान।" एक रिपोर्टर हिंदीतच मोठ्याने माईक हातात धरून ओरडत असते.एका बाजूला त्यांचे चेहरे फोटोतून दाखवत असतात. ते चेहरे पाहून महालक्ष्मीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. ती एकदम घाबरून कानावर हात ठेवते आणि मोठ्याने ओरडायला लागते."नाही$$$, नको...वाचवा....हेल्प...."ती अस घाबरून ओरडत म्हणाली. तिचा आवाज ऐकून ड्युटीवरून घरात प्रवेश करणारा राजवीर देखील पळतच तिच्याकडे येतो आणि टिव्हीवर पाहून महालक्ष्मीकडे पाहतो. महालक्ष्मी ते चेहरे पाहून पॅनिक झाली हे त्याच्या तल्लख बुद्धी कडून सुटत नाही. तसा तो टीव्ही बंद करतो.

"मही रिलॅक्स!!" तो म्हणाला. पण तिच्यावर फायदा झाला नाही. ती कितीतरी वेळ ओरडत असते. आता तिच्या डोळ्यांतून पाणी देखील येत असते. तिची आई देखील तिला समजावत असते. पण तिची मनस्थिती सध्या चांगली नसते.

"महालक्ष्मी$$$" तो ओरडून मोठ्यानेच तिचा चेहरा ओंजळीत पकडून म्हणाला. त्याच्या ओरडण्याने ती दचकून भानावर येते आणि त्याला मिठी मारून रडायला लागते. तिच्या आई बाबांना काही कळत नाही. पण राजवीरला मात्र कळून जात तिचे मन. तो हळूच पुन्हा एकदा तिच्यावर इंजेक्शनचा वापर करतो. कारण त्याला तिचं रडणं बघवत नव्हते. आई बाबांना काय बोलावे? हे कळत नव्हते. मुलीची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यांतून पाणी येत असते. तिने काय भोगले होते? याची कल्पना कोणीच करू शकत नव्हते.
काहीवेळाने महालक्ष्मीचा आवाज शांत होतो.तसा राजवीर तिला स्वतःच्या हातात उचलून घेऊन रूममध्ये निघून जातो. तिचे आई बाबा मात्र भरल्या डोळ्यांनी त्याला पाहत असतात. काहीही नातं नसताना राजवीर सगळं काही करत होता त्यांच्या मुलीसाठी , हे पाहून त्यांना बर वाटतं? पण त्याची काळजी देखील वाटते. राजवीर महालक्ष्मीला व्यवस्थित रूममध्ये ठेवून, बाहेर येतो. तसे महालक्ष्मीचे बाबा, त्याच्या समोर आपले हात जोडून उभे असतात. त्यांना अस पाहून एवढ्या वेळचे त्याने थांबवलेले अश्रू बाहेर येतात. तो त्यांचे हात खाली घेऊन "नाही" मध्ये मान हलवतो. तसे महालक्ष्मीचे बाबा त्याला मिठी मारून रडायला लागतात."माझी महालक्ष्मी$$$"ते रडतच बोलतात. त्यांना अस पाहून त्याला वाईट वाटत.

क्रमशः
--------------------------

कथा वेगळी आहे...लास्ट पार्टला सगळ्यांची उत्तर देईन...त्यासाठी काही दिवस थांबा..इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED