Satyamev Jayte - 1 books and stories free download online pdf in Marathi

सत्यमेव जयते! - भाग १


भाग १.

स्थळ :- दिल्ली
वेळ:- रात्रीचे १२:३०

दिल्ली भारताची राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर!! शहर नेहमीच गजबजलेले असायचे. पण फक्त रात्री नऊ पर्यंत काही दिल्ली मधील फेमस बाजार आणि प्लेसेस गजबजलेले असायचे. इतर ठिकाणी मात्र तुरळक लोक असायची. कधी कधी नसायची देखील!! दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये तर शांतता असायची आणि ती मुलींसाठी भयानक असायची. कारण एकच काही मवाली, गुंड लोकांचा हा वेळ असायचा. जेव्हापासून निर्भया प्रकरण घडलं होत. तेव्हापासून प्रत्येक जण आपल्या मुलीला दिल्लीत पाठवताना विचार करत असायचे. पण ती मात्र आईला बाबांना धीर देऊन त्यांना समजावून दिल्लीत आली होती. आपलं कॉम्प्युटर सायन्स या मध्ये तिला डॉक्टरेट डिग्री पूर्ण करायची होती. ते देखील तिने केलं आणि आता ती एका नावाजलेल्या कंपनीत उच्च पदावर कामाला होती. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करून तिने त्यांना दिल्ली मध्येच राहायला एक हक्काचे घर तयार केले. आता ते दिल्लीतच राहत होते!!

आज तिला कामावरून निघायला बराच उशीर झाला. त्यामुळे ट्रेन सुध्दा उशिराची मिळाली. न्यू दिल्ली च्या स्टेशनवरून ती सरळ चालतच थोडीशी घाबरतच झपाझप पाऊले टाकून चालायला लागते. कारण वेळ रात्रीची होती आणि कोणाची चाहूल देखील रस्त्यावर तिला ऐकू येत नव्हती. आता फक्त काही वेळातच ती घराच्या रस्त्याला लागणार होती आणि तिथून सरळ घरी पोहचणार होती. त्यामुळे थोडीशी खुश होते आणि तिथून घराच्या रस्त्याच्या दिशेला जात असते, की तेवढ्यात एक व्हॅन येते तिच्यासमोर. तिला काही कळायच्या आत त्या व्हॅन मधील काही दोन ते तीन लोक बाहेर पडतात आणि तिला आत टाकून तिथुन घेऊन जातात.

व्हॅन रस्त्यावर धावत होती आणि त्यात तिचा आवाज घुमत होता. पण बाहेर शांतता असल्याने तो आवाज कोणालाच ऐकू गेला नाही. काही वेळाने तो आवाज बंद होतो. आणखीन एक निर्भया शिकार झाली होती दिल्लीच्या गल्ली मध्ये. त्या व्हॅन मधील लोक तिला काही अंतरावर फेकून देतात आणि तसेच हसत तिथून व्हॅन मध्ये बसून निघून जातात. ती मात्र अगदी निपचित होऊन, रक्ताळलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेली असते. डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते. कपडे पण काही ठिकाणी फाटले होते. जे स्वप्न पाहिले ते सगळं काही एका क्षणात तिचे संपून गेले होते. जास्त मोठी स्वप्न नव्हती तिची. पण आता ह्यामुळे ते सगळं काही संपून गेलं होतं. स्वतःला सावरत ती कशी तरी उठण्याचा प्रयत्न करते. पण अंगात बळच नव्हतं उठायचे.रडू मात्र येत होते. या ही अवस्थेत आई बाबा वाट पाहत असतील म्हणून ती शक्तीनिशी उठण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःला सावरत पुन्हा तशीच घराच्या दिशेने चालायला लागते. काही अंतर कापून ती स्वतःच्या गल्लीत पोहचते. तसे, त्या ठिकाणी असणारे लोक विचित्र नजरेने तिला पाहून कुजबुज करायला लागतात. पण तिला काही ते ऐकू जात नव्हतं. ती तशीच आपली चालायला लागते.

"महालक्ष्मी, हे काय झालं पोरी?"एक बाई तिच्याजवळ येऊन विचारते.त्यांच्या या बोलण्यावर ती काहीच उत्तर देत नाही. ती पटकन आपल्या साडीच्या पदराने तिला मिठीत घेऊन अंग झाकण्याचा असफल प्रयत्न करते. पण उपयोग काहीच होत नाही.


"रेप, हुवा लगता हैं। जरूर इसने ही कुछ किया होगा, इसलीए ऐसा हुआ। इसके साथ" एक रस्त्यावर असलेली बाई म्हणाली.


"महालक्ष्मी , चल आत. उद्या हळद आहे पोरी तुझी. तरीही सांगितले होते कामाला जाऊ नको. पण तू काही ऐकलं नाही. आता संतोष रावांना काय उत्तर देऊ आम्ही."ती बाई डोळ्याला पदर लावून म्हणाली. त्या बाईच ऐकून महालक्ष्मीला रडायला येत. ती मोठ्याने मोठ्याने हमसून रडायला लागते. घरात आलेले लोक तिला पाहतात आणि ते तिची अवस्था पाहून कुजबुज करायला लागतात. पण कोणी पुढं जाऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत नाही!!


"आई, सगळं संपलं ग!!त्या लोकांनी सगळं संपवलं..."महालक्ष्मी रडतच म्हणाली. तिचं रडणं पाहून तिच्या आईला वाईट वाटत. त्या आपल्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करतात पण तिच्या मनावर एवढा परिणाम झाला होता की, तिला समजवणे अवघड झाले होते.काहीवेळाने तिचे बाबा तिथे येतात आणि आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून त्यांना भरून येते. ते पटकन जाऊन आपल्या मुलीला जवळ घेतात. जग काय बोलत? याकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते. फक्त आपल्या मुलीची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटत होतं.कधीही न रडणारे तिचे बाबा आज मात्र तिला जवळ घेऊन रडत होते. घरातील इतर पाहुणे मंडळी मात्र कुजबुज करून तिलाच दोष देत होती. अचानक पणे महालक्ष्मीला चक्कर आल्यासारखं होत, तशी ती बाबांच्या कुशीत जाऊन पडते. तिचा बाप घरात आलेल्या लोकांना गयावया करून कॉल करायला सांगतो हॉस्पिटलमध्ये. पण कोणीच काही करत नाही. सगळे तिच्या वडिलांना बोलून तिथून निघून जातात.


"महालक्ष्मीच्या आई, आपण आपल्या मुलीला यातून बाहेर काढू!!आजवर माझ्या पोरीने काही चुकीचे केलं नाही, हे मला माहित आहे. त्यामुळे तिला आपण जपू. संतोष रावांना बोलावून घ्या आणि त्यांना सांगा सगळं. ते नक्कीच समजून घेतील माझ्या मुलीला" महालक्ष्मीचे बाबा म्हणाले. त्यांचं म्हणणं ऐकून तिची आई कोणाला तरी फोन करते आणि डोळ्याला पदर लावून रडतच सगळं काही सांगून टाकते. फोनवर ती गयावया पण करत असते. पण पलीकडून रागातच एक आवाज येतो."तुम्ही, तुमच्या मुलीला माझ्या माथी मारण्यापेक्षा तिला मारून टाका. तसेही ती आता अपवित्र झाली आहे आणि अशी मुलगी आमच्या घराण्यात नको आहे!! हे लग्न मोडल आम्ही!!" एक माणूस चिडूनच फोनवर बोलतो आणि पुढचं ऐकून घ्यायच्या आधीच कॉल ठेवून देतो.तशी महालक्ष्मीची आई रडतच त्या फोनकडे पाहत बसते. महालक्ष्मीचे बाबा कसतरी महालक्ष्मीला उचलून बेडरूममध्ये ठेवतात आणि बाहेर येऊन पाहतात तर महालक्ष्मीची आई हसतच मेहंदी हातावर काढत असते."उद्या माझ्या मुलीचे लग्न आहे. मी खूप आनंदी आहे. आपण ना तिला डोलीत बसवू आणि नवऱ्याकडे पाठवून देऊ"महालक्ष्मीची आई विचित्र पणे हसतच हातावर मेहंदी काढत म्हणाली. तिचं ते ऐकून महालक्ष्मीच्या बाबांना काय बोलावे सुचत नाही!! कारण त्यांनी नवऱ्याकडंच बोलणं ऐकलं होतं आणि अस होऊन ही महालक्ष्मीची आई अस काही बोलत होती जे की त्यांना ऐकून कसतरी होत होते."महालक्ष्मीच्या आई, काय बोलत आहात तुम्ही? लग्न नाही आहे आपल्या मुलीचे!! कळलं तुम्हाला? जी लोक आपल्या मुलीला अपवित्र बोलले त्यांच्यासोबत आपण कोणत्याही प्रकारचे संबंध नाही ठेवायचे!! आपल्या मुलीच्या मनावर आघात झाला आहे. त्यातून तिला बाहेर काढायचे आहे आपल्याला" बाबा थोडेसे ओरडून हातातील मेहंदी कोन काढून घेत म्हणाले. त्यांचे बोलणे ऐकून आई भानावर येतात आणि ढसाढसा रडायला लागतात. बाबांना देखील रडायला येत.एकुलती एक मुलगी होती महालक्ष्मी त्यांची आणि तिच्यासोबत अस घडल्याने त्यांना वाईट वाटत होतं. सगळयांनी त्यांच्या मुलीची साथ सोडली होती. पण तिचे आई बाबा मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. लग्नासाठी सजलेल घर आज खाली झालं होतं आणि पूर्ण घरात काळोख पसरला होता. तसाच काळोख महालक्ष्मीच्या जीवनात पसरला होता!! रात्रीची वेळ असल्याने डॉक्टर काही असली केस घ्यायला तयार होत नाही. त्यामुळे आई बाबा तिला हॉस्पिटलमध्ये नेत नाही. ते दोघे तिच्या बाजुला बसून तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत बसतात. जस काही तिच्या आयुष्यात काही घडलंच नाही असे दाखवण्यासाठी ते नॉर्मलं होतात.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED