सत्यमेव जयते! - भाग १० Bhavana Sawant द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सत्यमेव जयते! - भाग १०

भाग १०.

आज महालक्ष्मीच्या केसचा दिवस होता त्यामुळे राजवीर लवकरच उठला होता. त्याने महालक्ष्मीला मात्र उठवले नव्हते, कारण आता थोडीशी ती उशिरा उठली की , फ्रेश दिसेल या विचारानेच तो तस करतो. स्वतः फ्रेश होऊन आल्यावर तो महालक्ष्मीला उठवतो आणि फ्रेश व्हायला पाठवतो. काहीवेळात महालक्ष्मी फ्रेश होऊन खाली येते. साधासा पंजाबी ड्रेस घातला होता तिने आणि एकदम साधी सिम्पल राहूनच ती खाली येते. मात्र, चेहऱ्यावर कॉन्फिडन्स झकळत होता. आज काहीही झालं तरीहि ती घाबरणार नव्हती. अस जणू तिने मनाला सांगितले होते, असे वाटत होतं.




"महालक्ष्मी, आज काहीही झालं तरीही घाबरायचं नाही आहे तुला. ती लोक विचारतील तसेच उत्तर द्यायचं आहे. ते सुद्धा न घाबरता.",महालक्ष्मीचे बाबा तिला समजावत म्हणाले. त्याच म्हणणे ऐकून ती मान डोलावते आणि मग त्यांची फॅमिली नाश्ता करून घराला कुलूप लावून बाहेर पडतात. महालक्ष्मीला पूर्ण पणे राजवीरने प्रोटेक्शन दिले होते. तिच्या बाजूला दुर्गा पथकातील महिला उभ्या असतात. ज्यांना पाहुन तिला वेगळंच समाधान मिळत.




दुर्गा पथक कोणत्या प्रकारचे काम करत होते? व ती कशाप्रकारे महिलांना मदत करायची? या सर्व गोष्टी त्याने महालक्ष्मीला सांगितल्या होत्या. जे ऐकून महालक्ष्मीला बर वाटल होत. निदान आता तरी दिल्लीत काही वाईट घडत नाही!! हा विचार करूनच तिला समाधान मिळते.




"अपर्णा, महालक्ष्मीला मी तुझ्या स्वाधीन करत आहे. चांगल्या प्रकारे तिला घेऊन ये!!",राजवीर कोर्टात येत म्हणाला.



"नक्कीच राजवीर!!",अपर्णा कॉन्फिडन्सने म्हणाली. राजवीर डोळयांनीच महालक्ष्मी ला बेस्ट ऑफ लक करतो आणि तिथून पोलीस कर्मचारी लोकांकडे निघून जातो. मग अपर्णा देखील महालक्ष्मीला आणि तिच्या फॅमिलीला कोर्टच्या दिशेने घेऊन जायला लागते. विरुद्ध पार्टीला उभे असलेले लोक मुद्दाम महालक्ष्मीच्या फॅमिलीला काहींना काही तरी बोलत असतात. पण ते त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. काहीवेळाने जज साहेब येतात. तसे सर्वजण शांत होतात. जजसाहेबांना या केसबद्दल बरच काही राजवीर कडून कळले होते. त्यामुळे ते शांत राहून दोन्ही पक्षांचे बोलणे ऐकत असतात. विरुद्ध बाजूचे वकील साहेब महालक्ष्मीला बोलावून प्रश्न विचारत असतात आणि ती देखील कॉन्फिडन्सने उत्तर देत असते.ते हर प्रकारे महालक्ष्मीला चुकीचे दाखवण्यासाठी असे, देखील प्रश्न विचारतात ज्याचे उत्तर द्यायला देखील तिला लाज वाटली पाहिजे!! सगळे लोक त्यांचे प्रश्न ऐकत असतात. पण महालक्ष्मी देखील कमी नव्हती. ती आपली बाजू सावरून एकदम कॉन्फिडन्सने त्यांना उत्तर देत होती!! कारण तिला हे सगळं माहीत होतं राजवीर आणि अपर्णा मुळे. त्यामुळे तिने आपली बाजू एकदम घट्ट बनवली होती!!




मात्र, इकडे तिच्या उत्तराने आरोपीची बाजू ढासळत चालली होती. त्यात अपर्णा देखील आपल्या बुद्धी कौशल्याने आरोपींना ततपप करायला लावत होती. आरोपी तिला घाबरून राहत होते. कारण त्यांनी एक उत्तर खोटं दिलं की, अपर्णा लगेच पटापट दुसरा प्रश्न विचारून त्यांची खोड जागीच मोडत होती.




खूप सारे प्रश्न उत्तरे विचारून झाल्यावर जजसाहेब सर्वांना शांत बसायला सांगतात. तसे, सर्वजण शांत राहतात. आता सगळ्यांच्या नजरा जजसाहेबांवर येऊन खिळतात. राजवीर देखील आपलं काम करून कोर्ट मध्ये येऊन बसतो.




"दोनो पक्ष की बाते सूनकर ये कोर्ट तीनों मुजरीमों को, फ़ांसी की सजा सुनाती हैं। क्योकी आगे जाकर ऐसा गुन्हा ना हो इसलीए। ये फ़ांसी महालक्ष्मी देवकर खुद अपने हातों से देगी। आज ही कोर्ट सेक्शन खतम होने के बाद!!सबके सामने!!"जज साहेब अस म्हणून कागद पत्रांवर साईन मारून पेनची निब मोडतात. त्यांचा हा निर्णय ऐकून महालक्ष्मीच्या फॅमिलीला समाधान मिळत. सर्वजण, टाळ्या वाजवून त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतात. मात्र, विरुद्ध पक्षाचे वकील डोक्याला हात लावून शांत बसतात. इकडे अपर्णा आणि महालक्ष्मी ला सगळे अभिनंदन करतात.




"शर्मा सर, मैं आपको कुछ बोली नहीं। पर आपको एक बात बोलू, अगर आपकी बेटी मेरी जगह होती? तो आप उससे भि ऐसे सवाल पुछते क्या? आपको पैसा कितना मिला? क्या मिला मुझे नहीं पता!! लेकिन, किसीं बेटी को सबके सामने शर्मीदा करते समय ये भि याद रखो। आपको भि एक ७ साल की बेटी हैं।"महालक्ष्मी विरुद्ध पक्षांच्या वकीलाकडे जाऊन बोलते. तिचं ते बोलणं ऐकून शर्मा वकील शांत राहतात. कारण त्यांना काय बोलावे? सुचत नव्हते!!




महालक्ष्मी आणि अपर्णा त्यांना एकवार पाहून तिथून निघून जातात. ते गेल्यावर वकील देखील तिथून निघून जातात. जजसाहेब मात्र, तिथे बसून राहतात. काहीवेळाने ते उभे राहतात आणि त्यांच्या चेअरच्या मागच्या भिंतीच्या बाजूवर असलेल्या राजमुद्रेला पाहून मनातच विचार करतात.




"मुझे पता हैं इसके बाद मुझे निकाला जायेगा। लेकिन जाते समय एक बेटी के गुन्हेगार को सजा देकर जा रहा हूं। इसकी खुशी मुझे जीवन तक रहेगी। सत्यमेव जयते!"जज साहेब मुद्रेकडे पाहून म्हणाले. त्यांना आज समाधान मिळत होत की, त्यांनी सत्याचा विजय केला होता. सोबतच महालक्ष्मीच्या गुन्हेगारांना ऐतिहासिक असा निर्णय सुनावून एक वेगळेपण त्यांनी दाखवले होते. त्यांच्यावर देखील प्रेशर राजकारणी लोकांनी टाकले होते. पण ते त्याला न जुमानता आजच कोर्ट जास्त वेळ घेऊन तिला शिक्षा करतात.




आज पहिल्यांदा दिल्ली कोर्ट ने अगदी कमी वेळात निर्णय सुनावून एक नवीन इतिहास कोरला होता. ज्याची नोंद नक्कीच आधुनिक भारताच्या पुस्तकात कुठे ना कुठे तरी नक्कीच होणार होती!! दिल्ली कोर्टच्या निर्णयाचे सर्वजण स्वागत करत होते.




काहीवेळाने एका ठिकाणी जजसाहेब, महालक्ष्मी आणि तिची फॅमिली, सोबत विरुद्ध पक्षाची फॅमिली तिथे उभी राहते. पण यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी होत. राजवीर आपल्या साथीदारांना तिन्ही आरोपींना घेऊन यायला सांगतो. तसे, ते लोक त्यांचे हात बांधून, चेहऱ्यावर काळ कापड बांधून त्यांना घेऊन येतात. येताना ती तीन लोक ओरडत असतात. तरीही, जजसाहेब शांत चेअरवर बसून त्यांना पाहत असतात. जणू त्यांना काहीच वाटत नव्हतं. राजवीरचे साथीदार ऑफिसर त्या आरोपी लोकांना फाशीच्या रशीच्या फंद्यावर अडकवतात. तसे, जजसाहेब महालक्ष्मीला डोळयांनीच पुढे जाऊन पुढची कारवाई करायला लावतात. ते सगळं पाहून आता तिला भीती वाटते. कारण आजवर कधी तिने साधी मुंगी मारली नव्हती आणि आता अस काही.. त्यामुळे ती मनात घाबरते. पण तिचे बाबा तिचा हात हातात घेतात आणि तिला तिथं घेऊन जातात.



"महालक्ष्मी, हे चुकीचे नाही आहे. या राक्षस लोकांचा वध करून तू दुर्गा बनशील पोरी!! यांना आज शिक्षा मिळते आहे, ते त्यांच्या चुकीमुळे. त्यामुळे तू नको घाबरू पोरी.",तिचे बाबा तिला धीर देत बोलतात. त्यांच बोलणं ऐकून महालक्ष्मी बाजूच्या ठिकाणी असलेल्या खटक्यावर हात ठेवते आणि मनातच "सत्यमेव जयते" बोलून तो खटका खालच्या दिशेला करते. तसे त्या आरोपी लोकांच्या किंकाळ्या काही वेळाने बंद होतात आणि त्यांचं शरीर शांत होऊन जातं. तिच्या आईच्या डोळ्यांत पाणी येत. पण आताचे आनंदाश्रू होते!! राजवीर त्यांच्याकडे जाऊन त्यांना सावरतो.




"आई, कधी कधी कोर्ट देखील विचार करतेच. आजच उदाहरण पाहा. सगळं होऊन पण त्यांना शिक्षा झालीच!! कारण आपली बाजू सत्याची होती आणि हे सत्य आपण अगदी खऱ्या पुराव्याने समोर आणले. त्यामुळे आज असा निर्णय झाला!!", राजवीर त्यांना समजावत म्हणाला. महालक्ष्मीचे बाबा तिला पकडून तिथून दूर घेऊन जातात. कारण आता या क्षणी तिच्या मनाची अवस्था कशी होती? हे त्यांच्या शिवाय कोणालाच माहीत नव्हते!! राजवीरचे लोक आरोपींच्या बॉडी आपल्या ताब्यात घेतात.




या दिवसा नंतर जजसाहेबांना आपल्या कामावरून काढून टाकण्यात आले. पण त्यांना या सर्वांनी काहीच फरक पडला नाही. त्यांनी दिल्ली सोडली आणि आपल्या कुटुंबाला घेऊन आपल्या गावी कायमचे निघून गेले. पण इकडे महालक्ष्मी मात्र आपल्यातच राहायला लागली. तिने अजूनही राजवीर सोबतच्या नात्याला मनापासून सहमती दर्शवली नव्हती!! तरीही राजवीर तिथं राहून शांततेत आपलं काम करत असायचा.



दुर्गा हेल्पलाईन आता फेमस हेल्पलाईन होत होती. बऱ्याच महिलांना यामुळे मदत होत होती. दिल्लीत महिलांच्या तक्रारी आता जवळपास कमी झाल्या होत्या!! कारण प्रत्येक ठिकाणी दुर्गा पथक त्यांच्या मदतीला येत होतं!!




"हॅलो, दुर्गा?"एक मंजुळ आवाज त्याच्या कानावर पडतो.



"दुर्गा, मी नाही आहे!!",तो चिडून बोलतो.




"अहो, तुम्ही सगळीकडे हेल्प करतात ना? मग मला पण हेल्प करा!!",ती शांतपणे हसून बोलते.




"मिस, तुम्ही कोण आहात? ते सांगा आधी? मग पाहू पुढचं!! कसली हेल्प हवी आहे?",तो आता डोकं खाजवत बोलतो. तसं काहीवेळ पलीकडे शांतता असते.

.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
--------------------

कधी कधी काही जज लोक असे ऐतिहासिक निर्णय घेतात की, त्याची कल्पना कोणीच करू शकत नाही!! या केसमध्ये पुरावे भरभक्कम होते!! महालक्ष्मी न घाबरता बोलत होती. त्यामुळे जजसाहेबांनी वेळ न दवडता आपलं काम केलं. वेळ दवडला असता तर पुन्हा त्यांना प्रेशराईज केलं गेलं असत. त्यामुळे असा ऐतिहासिक निर्णय झाला!! तुम्हाला काय वाटत याबद्दल?



काही केसेस मध्ये अस घडत बर का? क्राईम फॉरेन्सिक वाले एकदम एकूण एक पुरावा शोधून काढत असतात. मग ते कॉल रेकॉर्ड पासून ते सगळं काही आणून सादर करतात. तसेच या केसमधील पुरावे होते!!