सत्यमेव जयते! - भाग ७ Bhavana Sawant द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

सत्यमेव जयते! - भाग ७

भाग ७.

"माझी महालक्ष्मी$$$"ते रडतच बोलतात. त्यांना अस पाहून त्याला वाईट वाटत."काका, शांत व्हा!! तुम्ही , असे हतबल झालात तर महालक्ष्मी पण तशीच होईल. त्यामुळे तुम्ही सावरा स्वतःला. निदान तिच्यासमोर तरी चांगले रहा!!" राजवीर त्यांना धीर देत म्हणाला. त्याने त्यांना बाजूला केले आणि व्यवस्थित धरून उभे केले."काका, महालक्ष्मी वर आज जी वेळ आली आहे, तशी इतर कोणावरही येऊ नये !! यासाठी मी नेहमी कार्यरत राहीन. आपल्या महालक्ष्मी मुळे पोलीस महिलांसाठी एक हेल्पलाईन सुरू झाली आहे "दुर्गा" नावाची. त्या हेल्पलाईन मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या मुली आहेत. जेव्हा अशी मुलगी घाबरलेली दिसली आणि तिने आमच्याकडे मदत मागितली की, दुर्गा हेल्पलाईन तिला मदत करणार आहे. पुन्हा असे प्रसंग कोणावर येऊ नये त्यासाठी हे सर्व आहे काका" राजवीर काहीसा त्यांना समजावत स्पष्टपणे म्हणाला. त्याचे म्हणणे , ते शांतपणे ऐकून घेतात. त्यांना तर ते सगळं ऐकून बरं वाटत.

"त्यावेळी पण अस कोणी केलं असत, तर महालक्ष्मीची ही स्थिती नसती!!",महालक्ष्मीचे बाबा म्हणाले. राजवीर त्यांना समजावतो आणि रूममध्ये पाठवून देतो.तसाच तो आपल्या रूममध्ये येतो."काहीही करून आता मला महालक्ष्मीच्या केसला पुढे न्यावे लागेल. आशाना मलिक आणि राहुल वाजपेयी यांना पाहून ती किंचाळली. म्हणजे या दोघांनी काहीतरी केलं असेल? महालक्ष्मीच्या होणाऱ्या नवऱ्याला पकडायला हवं आधी. तोच आता सगळं काही सांगेल" राजवीर इकडून तिकडून फिरत मनातच विचार करत म्हणाला. कारण आता तो क्षणभरपण शांत बसणार नव्हता. महालक्ष्मीच्या यातना पाहून आता त्याला देखील त्रास होत होता. कधी एकदा तिच्या गुन्हेगारांना शिक्षा होईल? अस त्याला झाले होते. त्याने आपल्या हातातील मोबाईल वर एक नंबर डायल केला आणि कॉल करून त्या व्यक्तीसोबत बोलून तो मोबाईल बंद केला."संतोष महाडिक लवकर किंमत मोजावी लागेल तुम्हाला महिच्या आयुष्यात येऊन अस काही वागण्याची. आज वर बऱ्याच मुलींना तुम्ही फसवलं. पण आता मही या केसमध्ये समोर येणार आणि तुमच्या ना पाक गोष्टीला वाचा फोडून त्याची शिक्षा तुम्हाला देणारच",राजवीर गुढपणे हसत म्हणाला. तो तसाच बेडवर पडतो आणि महालक्ष्मीच्या विचारातच मध्यरात्री कधीतरी झोपून जातो.
दुसऱ्या दिवशी राजवीर लवकरच उठून आपल्या कामाला निघून जातो. तो जाता जाता महालक्ष्मी सोबत बोलायला विसरत नाही. तिची विचारपूस करून तिला व्यवस्थित खाऊ घालून तो निघून जातो."अपर्णा, हे सगळे पुरावे मिळाले. पण अजून ही मजबूत असा पुरावा मात्र मिळत नाही आहे.",राजवीर विचार करत म्हणाला. तो अपर्णाला भेटण्यासाठी कोर्टमध्ये आला होता. त्याने केसला हवे तेवढे पुरावे शोधून काढले होते. पण मजबूत असे पुरावे सध्या तरी त्याला मिळत नव्हते. त्यामुळे तो निराश होत असतो."राजवीर, आपल्याकडे सत्य आहे. पण त्याला देखील पुरावा सादर करावा लागतो. माझ्या मते, त्या दिवशीच तू त्या रोडच सीसीटीव्ही फुटेज चेक कर. कारण दिल्लीत कॅमेरे बसवले आहेत. पण ते जास्त लोकांना माहीत नाही.",अपर्णा म्हणाली."थँक्यू, अपर्णा मला मदत करण्यासाठी. मी आता जाऊन चेक करतो.",राजवीर थोडासा आनंदी होऊन म्हणाला. कारण आता त्याला कळणार होत नेमकं काय महालक्ष्मी बरोबर घडलं होत ते?
"आजची बातमी पाहिली का तू? गॅस लिकेज मुळे महालक्ष्मी सोबत लग्न करणाऱ्या संतोष महाडिकच पूर्ण कुटुंब संपलं!!",अपर्णा त्याच्या समोर मोबाईल करत म्हणाली. ती बातमी पाहून तो काहीच बोलत नाही.

"प्लॅन आवडला आपल्याला",अपर्णा त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून देखील राजवीर शांत राहतो."इतरांच्या मुली खराब करणाऱ्या लोकांना देव माफ करत नाही अपर्णा!! त्या सगळ्या कुटूंबाचे श्राप लागले असेल. त्यामुळे अस घडलं. आपली केस वर तू फोकस कर. महालक्ष्मी कडून मी सगळं काही घेतलं. आता फक्त आपण मागे हटायचे नाही. ही लोक गेली, पण ते तिघे मात्र आहेत अजून जिवंत!!"राजवीर गुढपणे म्हणाला. त्याचा अर्थ बोलण्याचा तिला लागतो. तशी ती गुढपणे त्याला पाहते.
"ओके, मी पाहीन बाकीच. तू बाकीच कर. पण व्यवस्थितपणे"अपर्णा अस बोलून आपल्या कामाला लागते. राजवीर देखील मग थोड्यावेळाने तिथून निघून जातो. सध्या तरी न्युजवर सगळीकडे गॅस लिकेजची बातमी दाखवली जात होती. ती बातमी महालक्ष्मीच्या घरात देखील कळते. तसे ते शॉक होतात. पण महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळ्या प्रकारचे समाधान असते. कारण संतोषच्या मित्रांमुळे तिच्यावर ही वेळ आली होती आणि आता तो नाही या जगात. अगदी तडफडून, होरपळून मेला हे पाहून ती शांत राहते.
राजवीर दिल्ली कंट्रोल ऑफिसला येऊन स्वतः तेथील लोकांसोबत बोलून त्या दिवशीच कॅमेरा फुटेज पाहत असतो. तो एक एक कॅमेरा जवळून पाहत असतो. पण त्यात फक्त व्हॅन दिसते आणि नंतर महालक्ष्मीला ते उचलून घेऊन जातात हे दिसत. काहीवेळ जाताच महालक्ष्मी विचित्र अवस्थेत दूर अंतरावर पडलेली दिसते. ते सगळं पाहून त्याला कसतरी वाटतं. पण तो मनाला आवर घालतो. त्या लोकांनी चेहऱ्यावर मंकी कॅप लावले होते. त्यामुळे त्यांचा व्यवस्थित चेहरा त्याला दिसत नाही. तो आणखीन ते दृश्य झुम करून पाहतो. तेव्हा मात्र त्याचा चेहरा बदलतो. कारण त्यातील एका माणसाच्या हाताच्या बोटावर एक सापाचा टॅटू काढला होता. जो त्या कॅमेरात कैद झाला. ते पाहून तो रहस्यमयी पणे कॅमेराला पाहतो.
"ओह, तिसरा हा आहे तर?नक्कीच शिक्षा मिळेल तुला. यावेळी मी कोणाचीच गय करणार नाही. घरचाच भेदी आहे इथं तर. त्यामुळे महालक्ष्मी बोलायला तयार नव्हती. लवकरच तुला पण शिक्षा मिळेलच या सर्वांची. महालक्ष्मी एक चांगली, साधी मुलगी होती. पण तुम्ही लोकांनी तिला अश्या स्थितीत आणलं की, तिला आता काहीच सुधारत नाही. आता मात्र, महालक्ष्मीला कळेल आणि तिच्या घरच्यांना कळेल? या सर्वांच्या मागे कोण आहे ते? तेव्हा मात्र सगळेजण कसे रिऍक्ट करतील?काय माहीत?", राजवीर मनातच म्हणाला. कारण आता त्याला हातावरून ती व्यक्ती कोण होती ते कळलं होतं? आता हाच पुरावा त्याच्यासाठी बनणार होता? पण महालक्ष्मीचा परिवार काय करेल यावेळी? याच मात्र त्याला थोडस टेन्शन येत होतं.


राजवीर तेवढंच फुटेज पेन ड्राइव्ह, सीडी, मोबाईल मध्ये कॉपी करून तिथून त्या लोकांकडून घेतो आणि नंतर मनातच स्वतःला तयार करून तिथून निघून जातो.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
-------------------------

कोण असेल भेदी? तुम्हांला काय वाटत? नक्की कळवा..