Satva Pariksha - 13 books and stories free download online pdf in Marathi

सत्व परीक्षा - भाग १३


मिनाक्षी, " ओके आतू, मी लक्षात ठेवेन सगळं . बरं तू उद्या येशील का घरी? मी कुठली साडी नेसू ते सांग.

मावशी, " अगं तुला तुझ्या सगळ्या च साड्या छान दिसतात. तुला जी सगळ्यात जास्त आवडते ना ती नेस. त्यात तू जास्त कम्फर्टेबल राहशील आणि तुझा कॉन्फिडन्स पण वाढेल. "

मिनाक्षी, " थॅंक्यु, तू किती छान बोलतेस.चल बाय. "

मावशी, " बाय. "

आशुतोष च्या घरच्या काही म्हणणं नव्हते. फॉरमॅलिटी म्हणून ते मुलगी बघायला येत होते. लग्न आशुतोष ला करायचं आहे. त्यामुळे सगळे त्याच्या मनासारखे होऊ दे असे त्याला वाटत होते. आशुतोष च्या घरचे खूप आधुनिक विचारांचे होते. अनिकेत ने उद्या रुचिरा ला बोलावलं होते. रुचिरा साठी मंगळसुत्र आणि कानातले घ्यायचे होते. पत्रिका पण छापायला द्यायच्या होत्या. पत्रिकेचे डिझाईन तो आणि काका सिलेक्ट करायला जाणार होते.
काका कामावरुन आले अनिकेत पण आला होता. दोघांनी चहा नाश्ता केला आणि पत्रिका छापायला गेले.
तिथे जाताना अनिकेत म्हणाला, " काका साधीच पत्रिका बघुया. जिथे करायचा तिथे खर्च करु. पत्रिका काय लोकं लग्न झाल्यावर टाकून देतात किंवा विसर्जन करतात. लांबच्या नातेवाईकांना वॉटस्अप वर पत्रिका पाठवू. "

काका, " चालेल तुझं म्हणणं पण बरोबर आहे. आपल्या कडे पण दरवर्षी कितीतरी पत्रिका येतात आणि मग त्य विसर्जीत करण्यात लागतात. वॉटस्अप ची कल्पना छान आहे. आपले नाते वाईक पण खूप लांब राहतात.दोन टोकांना दोन एक कल्याणला तर दुसरा भायखळ्याला. . फोन करून सांगूच. हल्ली तसं पण फार कोणी रागवत नाही."

अनिकेत," जास्त नाही पण १०० पत्रिका छापायच्या का? "

काका, " गावच्या देवाला, मुंबई च्या देवाला, मामा च्या गावाला, गावातल्या मंदिरात. पत्रिका द्यायला लागेल "

अनिकेत, " हो चालेल तुम्हाला जे योग्य वाटते ते करा.
दोघांनी एक साधीशी पत्रिका बघितली. एकदम साधी नाही एकदम छान आणि महाग पण नाही. अशी पत्रिका दोघांनी सिलेक्ट केली.

अनिकेत, "काका, माझं असं म्हणणं होतं की, रुचिरा उद्या येणार च आहे ना मंगळसूत्र सिलेक्ट करायला तर फ्लॅट पण बघून घेऊ. "

काका, " चालेल बघुया. "

दुसऱ्या दिवशी रुचिरा संध्याकाळी लवकरच निघाली. परस्पर ती ज्वेलर्स च्या दुकानात आली होती. घरी आईला कामं होती. म्हणून ती एकटीच आली होती. अनिकेत तिला बघतच बसला. खुप सुंदर दिसत होती. पर्पल कलरची लखनवी कुर्ती तिने घातली होती. व्हाईट कलरची लेगिन्ग्स, कानात सिल्व्हर कलरचे हॅंगिंग चे कानातले घातले होते. तिने अनिकेत ला हाय केलं तरी अनिकेत तिला बघण्यात दंग होता.

"हाय , अनिकेत कसे आहात तुम्ही? "तीने त्याला हलवत विचारले. तसा तो भानावर आला.

अनिकेत,"ओ हाय, कशी आहेस? "

रुचिरा, " मस्त ".

काका, अनिकेत चे आई बाबा आले होते. रुचिरा त्यांच्या आई बाबांच्या पाया पडली. तेव्हा अनिकेत ची आई म्हणाली, " असू दे गो. आता आपले सारखे भेटी होतच राहतील. सारख्या सारख्या पाया पडत बसू नको. एकदा पडलसं ना बस झाला. आता लगीन झाल्यावर सारख्या सारख्या पाया पडुक वाकूकच लागात. "

रुचिरा , " हो आई. तुम्ही कशा आहात? "

अनिकेत ची आई,"माका काय झालां. मी बेस हाय. आई नाय इली. "

रुचिरा, " आईची थोडी गडबड चालू आहे .लग्नाला महिनाच राहिला आहे ना म्हणून ती आली नाही. मी ऑफिस मधून च आले. "

अनिकेत ची आई, " मंगळसूत्र बघून घे तुका खयचा व्हया ता. "

ज्वेलर्स वाल्या ने त्यांना मंगळसूत्र दाखवली. रुचिरा ने एक सुंदर नाजूक मंगळसूत्र निवडले. जास्त छोटे नाही
जास्त मोठे नाही असं बघितलं. मग त्याला मॅचिंग असे कानातले पण घेतले. जोडवी पण तिच्या मापाची घेतली. दागिन्यांची खरेदी झाली होती. काका म्हणाले , आधी आपण घरी जाऊ दागिने घरी ठेऊ आणि मग फ्लॅट बघायला जाऊ. त्याप्रमाणे सगळे दागिने व्यवस्थित ठेवले.
मग काका-मावशी, अनिकेत ची आई, अनिकेत आणि रुचिरा, अनिकेत ची आई सगळे फ्लॅट बघायला गेले. मावशी च्या घरापासून अगदी जवळच होतं.अगदी ५ मिनीटांच्या अंतरावर होतं. बिल्डिंग तशी जुनी च होती. ५व्या मजल्यावर फ्लॅट विकायचा होता.
सगळे जण फ्लॅट बघू लागले. आधीचा मालक तिथून शिफ्ट झाला होता. फ्लॅट खुप छान होता.

हा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियेतून नक्की कळवा.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED