भाग्य दिले तू मला - भाग ९४ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ९४

बिखर गया है हर सपना
दिलं ही दिलं तूट चुका हु मै
कैसे मिलाऊ मै तुझसे नजरे
तुझको खो चुका हु मै....

आत्याचे आशीर्वाद मिळाले आणि स्वराच्या वागण्यात जणू फरकच पडला होता. ती सतत आनंदी राहू लागली होती. एक सकारात्मक मार्ग तिला दिसला आणि ती पुन्हा एकदा प्रामाणिकपणे आपली मेहनत करू लागली. ह्यावेळी तिला आपण यशस्वी होणारच ह्याची खात्री होती. पाहता- पाहता महिन्याचा कालावधी उलटून गेला होता. स्वराच्या त्या मोहरनाऱ्या चेहऱ्यामध्ये कुठलाच फरक पडला नव्हता. ती सतत हसत होती आणि अन्वयच्या चेहऱ्यावर प्रेमाचे नवीन रंग उधळवू लागली होती.

पाहता- पाहता महिना गेला. दिवाळीचे सुरुवातीचे दोन दिवस सुद्धा गेले होते. स्वराची ही पहिलीच दिवाळी असल्याने ती आज घरात उत्साहाने सर्व काम करत होती. दिवाळीच्या दिव्यांनी जणू तिच तन, मन सुद्धा उज्वल झाल होत इतका उत्साह तिच्या त्या वागण्यात दिसत होता. घरासमोर रांगोळी काढण्याचा उत्साह असो की घराला सजविण्याचा उत्साह असो ती हिरहिरीने सर्व करत होती. अन्वय तर ह्या दोन दिवसात स्वराच हे रूप बघून आणखीच तिच्या प्रेमात बुडाला होता. तिला त्या घरात कशीही वागणूक मिळाली तरीही तिने कायमच ते घर आपलं मानलं आणि त्या घरासाठी तिला जमेल तेवढ करायची म्हणून त्यालाही तिचा क्षणिक अभिमान वाटत होता. खऱ्या अर्थाने आज ह्या घराला लक्ष्मी मिळाली होती.

आज लक्ष्मीपूजन. स्वराने अगदी पहाटे- पहाटे उठुनच अंघोळ केली होती. तुळशीची पूजा करून तुळशीसमोर दिवा ठेवला होता. अन्वयही नेहमीच्या वेळेवर उठला आणि स्वराला रूममध्ये शोधू लागला. ती रूममध्ये कुठेच दिसत नाहीये म्हणून जिकडे- तिकडे शोधाशोध करू लागला. ती कुठेच दिसत नाहीये हे बघून तो शेवटी अंगणात आला आणि काही क्षण बाहेर तिच्याकडे बघतच राहिला. स्वरा सकाळी-सकाळी अंगणात रांगोळी काढत होती. रांगोळी काढत असतानाही तिच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचं तेज होत. अन्वय स्वराकडे नेहमीप्रमाणे एकटक बघत होता पण स्वराच त्याच्याकडे लक्ष नव्हतं म्हणून अन्वय हळूच तिच्या बाजूला बसत म्हणाला," मॅडम इथे ना लाल रंग शोभून दिसतो. दुसरा कुठलाच नाही. लाल रंग आपल्या प्रेमाचं प्रतीक. आठवत ना अस का म्हणालो तर??"

स्वराही त्याच्याकडे बघून म्हणाली," अच्छा जी!! मग तुम्हीच का भरत नाहीत त्यात रंग. सांगणं सोपं असत आणि करणं कठीण. तेव्हा आता करूनच दाखवा. बघू तरी साहेबांची चॉइस कशी आहे."

स्वरा त्याच्याकडे बघून हसत होती. मुळात ती त्याची खेचत होती हे अन्वयला समजलं म्हणून त्याने तिच्या हातातले रंग घेऊन रांगोळी सजवू लागला. हसणारी स्वरा आता अचानक त्याच्याकडे बघू लागली आणि अन्वय तिच्याकडे क्षणिकही लक्ष न देता शांतपणे आपलं काम करू लागला. केवळ लाल रंगच नाही तर त्याने आता पूर्ण रांगोळीच वेगवेगळ्या रंगाने भरून काढली. त्याच काम पूर्ण होताच स्वरा त्याची स्तुती करत उत्तरली," मला वाटलं तुम्हाला येत नाही म्हणून तुमची खेचत होते पण ह्याबाबतीत तर तुमची चॉइस माझ्यापेक्ष्या पण सुंदर आहे. ही कला तुमच्यात आहे मला माहिती नव्हतं सर."

अन्वय जरा मिश्किल हसत उत्तरला," ही आमच्या मातोश्रीची जादू. निहूला त्रास यायचा या सर्वाचा म्हणून मतोश्रीने मलाच शिकविल. मला जबरीने बसवायची ती बाजूला आणि करायला लावायची. दर वर्षी आम्ही दोघेच मिळून रांगोळी करतो. ह्यावर्षी त्या जरा फुगल्या आहेत ना म्हणून तुला ही संधी मिळाली. तशी मी तुझी स्तुती नेहमी करतो पण ह्याबाबतीत आईची सर तुला नाही. तिला ह्या सर्व गोष्टी फार आवडतात आणि ती उत्तम रांगोळी काढते. तू काढतेस छान पण आईसारखी नाही. तिची वेगळीच जादू आहे. ते सोड पण मला नव्हतं वाटलं की तू इतकी मॉडर्न असून ह्यात आवड असेल तुला. आज कालच्या मुलींना ह्यात अजिबात आवड नाहीये. तशी संस्कृती वगैरे मीही मानत नाही पण काही कला अंगी असल्या तरी त्या वाया जात नाही. सो बघून जरा बर वाटल मॅडम."

अन्वयने उत्तर देताच स्वरा उत्तरली," मॉडर्न असण्याचा कलेशी काय संबंध बर? आवड असते हो ही. आता सासरी आहे तर करायला नको का सर्व. तस पण मला आवडेल माझ्या घरासाठी सर्व करायला. माझं घर मीच नाही सजवणार तर आणखी कोण सजवणार बर?"

अन्वय गोड हसत उत्तरला," हाऊ स्वीट ना!! बायको किती गोड आहात हो तुम्ही. तुम्ही इतक्या गोड आहात म्हणूनच मला कितीतरी प्रेम येत तुमच्यावर आणि तू विचारतेस इतकं प्रेम कोण करत म्हणून. बायको इतकी गोड आहे तर प्रेमही त्याच पातळीच असनार ना?"

अन्वय तिच्या बाजूने येत आहे बघून स्वरा मोठ्याने ओरडत उत्तरली," पुरे हा!! तुम्हाला फक्त संधी हवी असते माझ्याबद्दल बोलायची. झाले ना आता रंग भरून सो जा अंघोळ करा. मी आवरते सर्व मग तुम्हाला ओवाळायचं आहे मला. लक्ष्मीने इतका सुंदर नवरा दिला तर ह्यादिवशी धन्यवाद नको मांगु का? चला चावटपणा सोडा आणि तयार व्हा. तुम्हाला नसतील काम पण मला आज खूप काम आहेत सो माझे काम वाढवू नका."

स्वरा बोलून गेली तर अन्वय अजूनही तिला हसूनच बघत होता. तो जात नाहीये म्हणून तिने त्याला धक्का मारतच अंघोळीला पाठवले आणि स्वता मात्र त्याच्या वेडेपणावर हसत राहिली. तो जात असतानाही तिच्याकडे बघत होता स्वरा त्याच्या स्वभावावर हसत होती. इतक्या सुंदर क्षणाची सुरुवात इतकी खास झाली आहे तर शेवट कसा असेल ह्या विचाराने स्वराच्या चेहऱ्यावरच हसू जसच्या तस होत.

तो प्रसंग होऊन जवळपास अर्धा तास झाला होता. अन्वय तयार झाला तसेच स्वराने त्याच्या समोर पाट मांडले. अन्वय त्यावर विराजमान झाला आणि स्वरा त्याला ओवाळू लागली. आरती ओवळताना सुद्धा तिच्या नजरेत एक चमक दिसत होती जी त्याला ह्याआधी कधीच दिसली नव्हती. स्वरा त्याला ओवाळत होती तर अन्वय तिच्याकडे एकटक बघत होता. स्वराने त्याला टिळा लावला आणि किचनकडे जाऊ लागली. ती जाणारच की अन्वयने तिचा हात पकडला. स्वराने त्याला हसतच विचारले," आता काय?"

अन्वय हळूच पाटावरून उठला आणि तिच्या हातातली थाळी घेत उत्तरला," आता तू बस, मी ओवळेन. मलाही हवी आहेस तू कायम आणि तू आयुष्यात आहेस ह्यासाठी देवाचे आभार मानेन. मुळात मी आज ह्या घराच्या खऱ्या लक्ष्मीचे पूजन करतोय सो बस. पूजा आज लक्ष्मीची व्हायला हवी. त्या लक्ष्मीची होईल नंतर पण आधी माझ्या लक्ष्मीची करू दे."

स्वरा त्याला अडवतच उत्तरली," अन्वय सर अशी प्रथा तर नाही ना आपल्यात मग देवी नाराज होईल ना?"

अन्वय क्षणभर हसतच म्हणाला," काही प्रथा कालानुरूप बदलायल्या हव्या. तशी पण ती नाही होणार नाराज कारण तिचा अंश तुझ्या सारख्या प्रत्येक बायकोत आहे.प्रत्येक स्त्रीची पूजा, आदर म्हणजे तिचा आदर. खऱ्या अर्थाने तुमची पूजा झाली तर तिचीच पूजा होईल. सो मला आता वाद नकोत बस गुपचूप."

त्याने तिला हात पकडतच बसविले. ती त्याच्या बोलण्याकडे, त्याच्या वागण्याकडे बघत होती आणि तो आरती घेऊन ओवाळत होता. क्षणभर तिला तिच्या निवडीच कौतूक वाटत होतं. त्याच ओवाळून झालं तरीही ती त्याच्याकडे बघत होती. तिची नजर त्याच्यावरून हटत नव्हती आणि अन्वय हसतच म्हणाला," चला आजच्या दिवसाची गोड सुरुवात करा. मला माझ्या हक्काच गिफ्ट द्या."

त्याचे शब्द येताच ती क्षणभर हसली. त्याच्या गालाकडे आपले ओठ नेत हळूच म्हणाली नवरोबा गोड खायच आहेच, मी लिस्ट देतेय ती मिठाई घेऊन ह्या मग हवं तेवढं खा. मी नाही अडवणार."

ती हळूच हसत पळू लागली तर अन्वय तिच्याकडे क्षणभर बघू लागला. ती पळता- पळता थांबली आणि हळूच हसत उत्तरली," नवरोबा आज काहिच मिळणार नाही, मी ती चिट्ठी ठेवली आहे टेबलवर ती घेऊन ह्या पूजेसाठी सर्व लागतील आणि हो मला त्रास द्यायचा नाही हा आज, मी फराळ बनवणार आहे सो चला लागा आपल्या कामाला. मी येते. बाय बाय हा नवरोबा."

स्वरा हसत-हसतच किचनकडे पळाली तर अन्वयही हसूनच तिच्याकडे बघत होता.

हर एक सुबहँ मेरी
तेरी हसी के साथ हो
तेरी हसी नही तो लगता है
मेरा दिन अधुरासा है...

***********

ती सायंकाळची वेळ होती. बाहेर हलका हलका अंधार पडला होता. अन्वय स्वराने लिहून दिलेलं सर्व समान घेऊन बाहेरच्या गेटवर पोहोचला आणि काही क्षण बाहेर वातावरण बघतच राहिला. आज अंगणाची प्रत्येक जागा दिव्याच्या प्रकाशाने बहरून निघाली होती. तो दिव्यांचा प्रकाशच जणू आज घराला घरपण देत होता. स्वराने आधी त्याच्या आयुष्यात प्रकाश आणला होता आणि आज ह्या घराला घरपण दिलं होतं. तो आजूबाजूचा वातावरण डोळ्यात साठवून घेत समोर चालू लागला. आज घराच्या समोर असलेली तुळस सुद्धा प्रकाशमान दिसत होती. बाजूला काढलेली रांगोळी त्यांच्या सुंदरतेत आणखीच भर घालत होती. ते सर्व बघून अन्वयला क्षणभर स्वराच कौतुकच वाटलं होतं कारण त्या घरात तिला कुणीच आपलं मानत नव्हतं तरीही तिने त्या घराला सहज आपलं बनविल होत. तो ते सर्व दृश्य बघत बेडरूममध्ये गेला आणि पुन्हा एकदा त्याचे पाय स्वराला बघून थबकले. स्वरा आज नखशिखान्त खालून ते वरपर्यंत सजली होती. हिरव्या रंगाची पैठणी परिधान केलेली ती आज खूपच सुंदर दिसत होती. गळ्यात घातलेल लांब मंगळसूत्र असो की कुंकवाने भरलेली भांग, नाकात नथ असो की पायात पैंजन, तिचे ते लांबसडक मोकळे सोडलेले केस असो की ती मनमोहक नजर. आज स्वरासारख कुणिच नव्हतं. आज कितीतरी दिवसाने त्याने तीच हे रूप बघितलं आणि बघतच राहिला. स्वराने त्याच्याकडे क्षणभर बघितले आणि हळुवार हसत विचारले," काय बघत आहात नवरोबा?"

अन्वयने हळूच बेडरूमचे दार बंद केले आणि तिला मागून मिठी मारत म्हणाला," माझ्या सुंदर बायकोला. ह्या रुपात तिला फार कमी बघायला मिळत ना? आज बघतोय तर सतत बघत राहावस वाटतंय. आज माझ्या बायकोची गोष्टच काहीतरी वेगळी आहे. आय मस्ट से जे बघतील ते बघतच राहणार आहेत. आज कुणीच म्हणणार नाही की माझी बायको सुंदर नाही ते. आज जळणार आहेत हे त्या. तुला बघून म्हणतील आम्हाला हिची सुंदरता आजपर्यंत कशी काय दिसली नाही. कठीण आहे बाबा आज सर्वाच."

स्वराने त्याच्या हातामध्ये आपला हात देत म्हटले," मलाही आज तुमची बायको, ह्या घराची सून म्हणून मिरवायच आहे म्हणून आज सजले आहे. आज नवऱ्याच नाव घेऊन मिरवायला, फोटो काढायला मला खूप आवडेल म्हणून हा आज साजो शृंगार. माझ्या नवर्याला अस सजलेलं फार आवडत ना म्हणून आज स्वता आवडीने केलंय हे सर्व."

अन्वय मिठी घट्ट करतच म्हणाला," क्या बात है!! बायकोने माझ्यासाठी केलं हे सर्व. किती भारी ना!! लव्ह यु बायको."

स्वरा काही क्षण त्याच्या मिठीतच राहिली आणि हळूच हसत म्हणाली," नवरोबा पूर्ण रात्रभर बघा मला हवं तर पण आता जा फ्रेश व्हा. मला लक्ष्मीपूजनाची तयारी करायची आहे. आईने बहुतेक बाजूच्या सर्व स्त्रियांना बोलावलं आहे सो उशीर नको व्हायला. तुम्हीही तयार व्हा म्हणजे मिळून पूजा करू."

अन्वयने हळूच तिच्या गालावर किस्सी केली आणि वॉशरूमकडे पळाला. स्वरा क्षणभर त्याच्यावर हसून पुन्हा आपल्या कामाला लागली.

अन्वय छान तयार होऊन बाहेर आला तेव्हा जवळपास अर्धा तास होऊन गेला होता. तो बेडरूममधून हॉल मध्ये आला. त्याने क्षणभर एक नजर पूर्ण रूमवर टाकली. आज बाबांपासून आई सर्व छान तयार झाले होते. दिवाळीचा उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. स्वरा पूजेसाठी घट मांडत होती तर आज आई देखील तिला मदत करत होती. त्यांच्यात बोलणं सुरू नव्हतं पण दोघेही एकत्र काम करत आहेत बघून अन्वय जरा सुखावला होता. त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू अवतरलं आणि अन्वयचे बाबा हसत उत्तरले," अन्वय मिठाई वगैरे आणलीस ना? इथे सर्वाना एक एक पॉकेट द्यायचा आहे बर. नाही तर उगाच म्हणतील बोलावलं पण काहीच दिलं नाही. तुला माहिती आहे ना लोक एक संधि सोडत नाही बोलायची."

अन्वय बाबांना हसतच म्हणाला," हो बाबा सर्वच आनल आहे. तुम्ही कसली काळजी करू नका. कुणाला बोलायची संधी आज मिळणार नाही. आज फक्त आनंदी आनंद राहील सर्विकडे."

अन्वयच्या उत्तराने बाबा निशिंत झाले एव्हाना पूजेची सर्व तयारी देखील पूर्ण झाली होती पण आईने त्यांच्या काही मैत्रिणींना बोलावलं असल्याने त्या अजूनही वाट बघत होत्या. त्यांची पूजा आधीच होत असे त्या अनुषंगाने अन्वयच्या आईने आपली पूजा ठरवली होती. वाट पाहून जवळपास १५ मिनिटे झाली होती. आईच्या सर्व मैत्रिणी आल्या. त्यानुसार अन्वयची आई पूजा करायला समोर जाणारच की स्वराने पूजेची थाळी धरली. स्वराच्या लक्षातही आलं नाही की आई मागून पूजा कारायला समोर येत आहेत. स्वराला समोर जाताना बघून आईने आपले पाय जागीच आवरले. स्वराने पूजेची थाळी हातातच धरलीच होती की द्विवेदी काकू उत्तरल्या," लता लक्ष्मी की पूजा इसके हाथोसे करणे वाली हो? इसके हाथो से अगर पूजा करोगी ना तो लक्ष्मी बाहरसेही चली जायेगी. कुछ तो लिहाज करती यार लता आज के दिन."

त्यांचा आवाज येताच अन्वयचा पारा क्षणात वाढला, डोळे मोठे झाले पण तो काहीच बोलला नाही. द्विवेदी काकूंच बोलणं झालंच होत की मेहता काकू म्हणाल्या," लता तुझे पता है ना हमे इसे देखकर ही डर लगता है फिर भी आजके दिन तुम इसें हमारे सामने लाई हो. आज का दिन भी सुख शांतीसे जिने नही दोगे क्या? हमे बेइज्जत करणे बुलाया है तुमने? इतने दिनो का बदला निकालना चाहती हो?"

तिवारी काकू पण लगेच म्हणाल्या," लता लोगोने तेरी बेइज्जती की थि इस वजहसे इसके हाथो पूजा कराके हमारी बेइज्जती करा रही हो ना? तुमसे इस दिन ये उम्मीद नही थि लता. पेहले तो इसे बहु मानने को तैयार नही थि और अब आज लक्ष्मीजी कोही इसके चेहरे का अंधकार दिखाकर नाराज कर रही हो. इसका चेहरा देखकरही कही लक्ष्मी रुठ ना जाये. सिर्फ तुम्हारे घर की ही क्यू हमारे घर की भी चली गयी तो?? तुम्हारे वजहसे हम क्यू तकलीफ सहन करे. चलो बहनो, यहा रुकने से कोई मतलब नही."

त्या जाणारच होत्या की स्वरा हळुवार आवाजात उत्तरली," सॉरी मेरी गलती है उन्हे कुछ मत कहिये. उनहोणें अभिभी मुझे अपनी बहू नही माना है बस मेही आवेश मे आकर सब कुछ करणे लगी. प्लिज आज रुठकर लक्ष्मी माता का अपमान मत किजीए. मै नही करूंगी आज पूजा. ना ही आपकी लक्ष्मी आपसे रुठेगी."

तिने क्षणात आपल्या हातातली थाळी आईच्या हातात दिली आणि स्वता मागे सरकली. लक्ष्मीच नाव घेताच त्याही जाग्यावरच थांबल्या होत्या. थोडा वेळ सर्व गोंधळ झाला पण आईने पूजा सुरू करताच पुन्हा सर्व शांत झाल पण अन्वय शांत झाला नव्हता. स्वराच्या चेहऱ्यावर सकाळपासून असलेला आनंद आता कुठेतरी हरवला होता म्हणून तो स्वतःवरच चिडला होता तरीही त्याने कुणाला काहिच म्हटले नाही. काही क्षण सर्व शांत होत. पूजा झाली आणि आईने त्यांना फराळ आणून दिला. अगदी काही मिनिटे झाली होती. त्यांचं खाऊन झालं आणि त्या जाऊ लागल्या. स्वराला काहीतरी आठवलं आणि ती मिठाईचे बॉक्स घेऊन धावत आली. ती त्यांच्या हातात बॉक्स देणारच की द्विवेदी काकू म्हणाल्या," तुम्हे कितनी बार कहा है की मेरे नजदिक मत आया करो. तुमसे डर लगता है मुझे. समझती क्यू नही?"

त्यानी तिच्या हातातला बॉक्स घेण्यास मनाई केली आणि आतापर्यंत शांत असलेला अन्वय मोठ्याने म्हणाला," हा नही समझती वो. मैने कहा था उसे की अगर तुम्हे कोई कुछ बोले तो झटसे जवाब दिया करो. नही सूनती ये क्यूकी इसे बडो का सम्मान करणा आता है. किसीं दुसरे को दुःख मे देखणा इसे आता नही इसलीये समझती नही वो. किसीं और की मदत करणा इसे अच्छा लगता है इसलीये समझती नही वो. पर क्या आप बडे होंकर समझ सकते है. क्या आपको बोलणे की तमीज है? किसीं के घर आकस किसीं को सुनाना क्या आपणे यही सिखा है? दुसरो को हर दम पाठ पढाने वालो कभी खुदपर भी ध्यान दिया करो. आपणे आज एक लक्ष्मीको उसकेही घर आकर दुखाया है ऐसा नही लगता आपको?"

अन्वयचे शब्द वाढताच आई मोठ्याने म्हणाल्या," अन्वय जिभेवर ताबा ठेव, आपले पाहुणे आहेत ते, तुला समजायला हवं, तुझी बायको तशी आहे त्यात ते काय करणार? वाटत तर आपल्या बायकोला घरात बंद करून ठेव पण पुन्हा माझ्या पाहुण्यांशी अस बोलू नकोस. नसेल पटत तर ह्या घरातून निघ. तुला कुणी अडवलं नाही पण माझ्या घरातल्या माणसासोबत तू अस वागलेलं खपवून घेणार नाही. याद राख पुन्हा एकही शब्द काढलास तर??"

आई रागात बोलत होती तर अन्वयही पुन्हा एकदा मोठ्याने म्हणाला," मोठे आहेत हे लोक? कोणत्या गोष्टीवरून मोठे वाटतात? ज्या लक्ष्मीने स्वराला जन्म दिला ती तिच्यात भेदभाव करत नाही मग हे कोण ठरवणारे? क्या बोल रहे थे आप सब लोग की स्वराने पूजा की तो देवी बुरा मान जायेगी पर मै केहता हु देवी तो आपके शब्दो से बुरा मान रही है. उनहोणें कभी भेद नही किया फिर आप क्यू कर रहे हो? आप सच मे इंसान ही है ह्या फिर.."

अन्वय बोलत होता तेव्हाच त्याच्या कानावर त्याच्या आईचा हात पडला. क्षणात रूममध्ये शांतता पसरली. त्या एका आवाजाणे सर्व क्षणात गायब झाले. अन्वय काही क्षण शांत होता. तो आईकडे एकटक बघत होता. स्वराने त्याला पकडून ठेवले होते पण त्याला आज स्वतःला कंट्रोल करणे शक्य नव्हते म्हणून हळुवार तिचा हात बाजूला करत तो मोठ्याने म्हणाला," आई तुला माहिती आहे मी तुला देव मानत होतो आजपर्यंत पण आजच्या प्रसंगानंतर तू त्या जागेवरून नाहीशी झालीस. तू देव तर सोड एक मनुष्य म्हणवून घेण्याच्या लायकीची नाहीस. मला त्या स्वराला बोलल्या त्याच जितक वाईट वाटलं नाही ना त्यापेक्षा जास्त वाईट, तुम्ही गप्प राहून सर्व ऐकत होतात ह्याच वाटलं. कुठल्या जगाची पर्वा आहे ग तुला? त्या लोकांना झालेला त्रास तुला दिसला म्हणून मला कानाखाली मारलीस पण ज्या मुलीची काहीही चूक नव्हती तरीही तिला ऐकवत होतीस तेव्हा का नाही फुटला तुझ्या मनाला पाझर? त्यांनी ऐकवलं म्हणून मी त्यांना ऐकवलं पण स्वराने तुला कधी ऐकवलं नाही मग तू का सतत तिला ऐकवतेस? लोक तुला बोलतात तरीही त्यांची बाजू घेतेस आणि ही काहीच बोलत नाही म्हणून तिला सतत ऐकवतेस. हाच का तुमचा मोठेपणा?"

अन्वयच्या डोळ्यातून आज अश्रू वाहत होते आणि बाकी सर्व शांत बसले होते. अन्वय पुढे म्हणाला," सतत मला किती त्रास झाला मला किती त्रास झाला म्हटल्याने होत नाही आई, कधी तिच्या जागी स्वतःला ठेवून बघ मग कळेल त्रास नक्की काय असतो? तिने जे अनुभवलं ना ते तू कितीही जन्म घेतलेस ना तरीही अनुभवू शकत नाहीस. गेले कित्येक दिवस मी स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवलं होतं पण आज नाही. माझ्या बायकोचा कुणीही अपमान केलेला मला अजिबात आवडणार नाही आणि हे त्यांना नाही तुम्हाला पण सांगतोय. तुला त्रास होतो न ग माझ्या बायकोच्या चेहऱ्याचा, तुझ्या समाजाला पण होतो मग आज ओरडून सांगतो की ज्या समाजाला स्वरा मान्य नाही तो समाज मला मान्य नाही. बाबा- आई आज मी तुमची माफी मागणार नाही. मी चूक केली होती हे मान्यच पण एका मुलीला सतत त्रास देऊन तुम्हीही माझ्यापेक्षा मोठी चूक केली आहे. आई तू मला विचारलं होतस ना की ती सोडून गेली तर दुसर लग्न करशील का? तर आज उत्तर ऐक. मी फक्त स्वराचा आहे आणि स्वराचा राहील पण हेदेखील सांगतो की ह्यापुढे माझ्यामुळे तुला त्रास होणार नाही. आज माझ्या लक्ष्मीचा ह्या घरात जो अपमान झाला आहे तो मी कधीच विसरणार नाही म्हणून आज तुमचं हे सो कॉल्ड संस्कारी घर कायमच सोडतोय. तुझा राग मी समजू शकत होतो म्हणून गप्प होतो पण एखाद्याप्रति इतकी घृणा एक आई असून कशी करू शकतेस? खरच तुझ्यात आईच काळीज आहे ना? मला नाही वाटत आई. तू तर एक स्त्री म्हणवून घेण्याच्या पण लायकीची नाहीस. लज्जा वाटतेय मला हा विचार करून की मी ह्या मुलीला तुमचं मन वळवायला घरी घेऊन आलो. चुकलोच मी पण आता ही चूक सुधारणार आहे. नाही राहणार ही आणि मी तुमच्या घरी. आता मेलो तरीही तुला तिचा आणि माझा चेहरा दाखवणार नाही. आजपासून तुमचा मुलगा खरच तुमच्यासाठी मेला. नाहीये तुमचा कुणी मुलगा. श्राद्ध करून घ्या माझ."

अन्वय रडत- रडतच बाहेर पडला. त्याला आपल्या भावना अनावर झाल्या होत्या म्हणून त्याने पटकन कार काढली आणि तो कुठेतरी निघाला. स्वरा त्याला अडवत होती पण आज अन्वय कुणाचंच ऐकणार नव्हता. अगदी कुणाचंच नाही.

अन्वय बोलून गेला आणि सर्व काही शांत झाल. त्याचे आई-बाबा शून्यात हरवले होते. अन्वयने इतकं बोलायच तर दूरच पण कधी त्यांच्यासमोर आवाजही वाढविला नव्हता, त्याला रडताना बघितलं नव्हतं म्हणून ते त्याचे शब्द आठवत तसेच उभे होते. तर स्वरा आताही गेटवर उभी राहून त्याच्या येण्याकडे वाट बघत होती. आता कुणीच कुणाशी बोलत नव्हते किंबहुना अन्वयच्या बोलण्यातुन ते बाहेरच येऊ शकले नव्हते.

अन्वय जाऊन आता बराच वेळ झाला होता. रात्र सरत होती, अन्वयचा अजूनही घरी यायचा पत्ता नव्हता. कॉल करावं तर अन्वयने सोबत फोन घेतला नव्हता त्यामुळे स्वराचा जीव वर खाली होत होता. जवळपास १० वाजून गेले होते, आता स्वराला जास्तच भीती वाटत होती. तिने त्याला अस कधीच बघितलं नव्हतं म्हणूनही असेल पण त्याने फोन नेलाच नव्हता त्यामुळे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. स्वरा इकडे-तिकडे चकरा मारत होती पण तीच मन काही जाग्यावर नव्हतं. तेवढ्यात तिला काहीतरी सुचल आणि तिने सौरभला फोन लावला. सौरभने कॉल उचलताच तिने त्याला सर्व सांगितलं आणि सौरभ फोन ठेवून पटकन तिच्या घरी यायला निघाला.

सौरभ जसजसा यायला उशीर करत होता तसतशी तिला आणखीच भीती वाटत होती. अंगात त्रान नव्हतं तरीही तिने चकरा मारण काही बंद केले नव्हते. तीच डोकं विचार करून करून चक्रावून गेलं होतं. अन्वय अशा अवस्थेत तिला शांत करत होता पण आज तो स्वतःच नव्हता म्हणून स्वरा आणखीच घाबरली. काही वेळ आणखी गेला. ती विचार करतच होती की सौरभची गाडी समोर येऊन थांबली. सौरभची गाडी समोर थांबताच स्वरा धावतच त्याच्याकडे गेली. सौरभने तिला पटकन गाडीत बसायला सांगितले आणि त्याने क्षणात गाडी सुरू केली. सौरभ काहीच बोलत नव्हता म्हणून स्वराच बोलून गेली," सौरभ सर मुझे बहोत डर लग रहा है. कहा गये होगे सर? फोन भि नही है उनके पास. पता नही कैसे होगे? कुछ होगा तो नही ना?"

तिची अवस्था बघून सौरभ जरा शांत आवाजात म्हणाला," डोन्ट वरी स्वरा मुझे पता है वो कहा मिलेगा. वो जब भी शांत रेहता है एक चर्चे के सामने घंटो बैठे रेहता है. वो आज भी वही होगा. पेहले तुम ये रोना बंद करो वरणा उसे और तकलीफ होगी. तुम उसे तकलीफ मे देखणा चाहती हो?? तुम शांत रहोगे तो ही वो शांत हो पायेगा वरणा तुम्हे तकलीफ हुयी ये सोचकर वो जिंदगी भर खुदको माफ नही कर पायेगा. क्या तुम ऐसा चाहती हो? "

सौरभचे शब्द येताच स्वराने स्वतःचे अश्रू पुसून घेतले. तिची नजर आताही बाहेर होती आणि त्याची चिंता तिला अधिकच सतावत होती. त्याला बघितल्याशिवाय तिला आता चैन पडणार नव्हतं पण तिला ती भीती कुणाला दाखवायची नव्हती म्हणून आपली भीती लपविण्याचा निरागस प्रयत्न ती करू लागली. सौरभ अधून मधून तिच्याकडे बघत होता. त्याला तिची अवस्था बघवत नव्हती म्हणून तो लवकर लवकर गाडी चालवत होता. आज स्वराला जणू सेकंद सेकंद तासासारखा वाटत होता तरीही ती खंबीर असल्याचं दाखवत होती पण ती मनातून काय फिल करते आहे हे फक्त तिला माहिती होत.

कारमध्ये बसून किती वेळ झाला माहिती नाही पण कार अचानक थांबली आणि ती कारच्या बाहेर पडली. ती उत्तरली आणि ती त्याला इकडे- तिकडे शोधू लागली पण तो तिला कुठेच दिसत नव्हता. ती वेड्यासारखं त्याला शोधत होती त्याचवेळी सौरभ गाडीतून उतरला आणि त्याने लांब बोट दाखवले. अन्वय दूर एका जागी एकटाच बसून होता. तिला अन्वय दिसताच ती धावतच त्याच्याकडे पळाली तर सौरभ कार जवळच वाट बघत होता. स्वरा धावत- पळत त्याच्याजवळ गेली. त्याच अजूनही लक्ष्य नव्हतं. ती त्याच्याकडे पोहोचत म्हणाली," कुठे गेला होतात तुम्ही? किती काळजी वाटत होती सर्वाना?"

त्याने मान वर केली. त्याच्या डोळ्यातुन सतत अश्रू वाहत होते हे दिसताच ती त्याच्याजवळ गेली. ती डेस्कवर बसली आणि अन्वय हळूच तिच्या मिठीत शिरला. तो फक्त रडत होता तर स्वरा त्याच्या केसांवरून हात फिरवत होती. कितीतरी वेळ असच सुरू होत. अन्वयचे अश्रू आज थांबायचं नाव घेतन नव्हते तर स्वराला त्याला अस बघवत नव्हतं. दोघेही शांतच होते की अन्वय म्हणाला," स्वरा मी हरलो. खूप स्वप्न दाखवले होते ना तुला पण त्यातल एकही पूर्ण करू शकलो नाही. तू त्या घराला त्या माणसाना आपलं म्हणून सर्व करत राहिलीस आणि त्यांनी तुला कधीच आपलं मानलं नाही. एवढं तर सोड पण त्यांनी आजच्या दिवशी पण तुझा अपमान करणे सोडले नाही. स्वरा मी तुला नाही देऊ शकलो स्थान, आदर ह्या जगात. शेवटी मी हरलोच. जगाशी लढायला निघालो होतो पण इथे मला माझ्याच घरच्यांनी हरवल. सॉरी स्वरा. खूप खूप सॉरी."

अन्वय आज भावुक होऊन रडत होता तर स्वरा काहीच बोलत नव्हती. तिला नक्की काय बोलू तेच समजत नव्हतं. त्या वेळात ना अन्वयचे अश्रू थांबले होते ना त्याला बघून स्वरा शांत झाली होती पण आज अन्वय पूर्णता तुटला होता हे त्याच्या वागण्यावरून दिसत होतं आणि अन्वयच अस तुटन म्हणजे???

बहोत कुछ दिलं मे होंकर
मै शांत बैठी हु
हारे तुम नही हो
तेरी हार की वजहँ मै खुदभी हु...