मिनू Nisha Gaikwad द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मिनू


"ए मामी .. बघ ना हे काय " ..छोट्या मिनूचा आवाज बागेतून येत होता...

3 वर्षाची मिनू गोगलगायी समोर बसली होती ...

"ए मामी .. अग इकडे ये ना लवकर" मिनू पुन्हा ओरडली.

"काय कटकट आहे" जया तिच्या लॅपटॉप वर काहीतरी काम करत होती . तिने अजिबात प्रतिसाद दिला नाही...
मिनू तिच्या इवल्या हातांवर ती गोगलगाय घेऊन थेट जयाच्या बेडरूम मध्ये आली.. तिचे हात पाय सर्व मातीने भरले होते..तिच्या त्या अवताराकडे पाहून जयाला खूप संताप आला.

" अग कार्टे मघाशीच मी तुला स्वच्छ अंघोळ घातली ना .. तू पुन्हा घाण झालीस." असं म्हणून तिला खेचतच तिने बाथरूम मध्ये न्हेलं.

"पुन्हा जर घाण झालीस ना ..तर तुला तुझ्या घरी सोडून येईल मी"

घरच नाव काढतच मिनूचा चेहरा उतरला .. बिच्चारी गप्प होऊन आपल्या बाहुलीशी खेळत बसली.

जया धुसपूसतच किचन मध्ये गेली..आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी करू लागली..

मालतीबाई सर्व काही ऐकत होत्या .. त्यांना फार वाईट वाटत होत..पण त्या काहीच बोलल्या नाहीत.निमूटपणे देवासमोर माळ जपत बसल्या ..

तितक्यात दाराची बेल वाजली. मिनूची कळी खुल्ली.." एss मामा आला "

पण जयाचे वटारलेले डोळे पाहताच ती पुन्हा शांत झाली,...

जयाने दार उघडलं , आणि काहीच न बोलता किचन मध्ये निघून गेली.

प्रशांत घरात येताच जयाचा रागावलेला चेहरा पाहताच .. मिनुला इशार्यानेच आपण नंतर खेळू असं बोलून तो किचन मध्ये गेला...

"तुम्ही घरी कधी पाठवणार आहात तिला ? " जयाने चहाच आधण ठेवत विचारलं

“कुणाला तुला .. तुला माहेरी जाऊन यायचंय का" प्रशांत मुद्दामच बोल्ला, पण त्याचा काही फायदा झाला नाही.
जया आणखीन चिडली "तुम्हाला चांगलंच माहितीये मी कुणा बद्दल बोलतेय .. प्लिज तिला पाठवुन द्या हो तिच्या घरी माझी खूप चिडचिड होतेय तिच्यामुळे.. सारखं आपलं मामी ..मामी..मला काय माझी काम नाहीत का, सकाळी हिला अंघोळ घालण्यापासून तिचा चहा, नाश्ता , शाळा सर्व करते ना मी.. मग ह्यापलीकडे पण तिच्याकडे लक्ष देत बसू का ..एकतर तुमच्या आई मला थोडी देखील मदत करत नाही .. ना त्या मिनूकडे लक्ष देत .. आणि हे दुसऱ्याच मुल मी का सांभाळायचं .. मला अजून मुल नाही झालं म्हणून..तुमच्या बहिणाला आजच्या आज फोन करून सांगा म्हणावं हे बघ बाई नवरोबाची मर्जी राखण बास कर आणि स्वतःच्या मुली कडे जरा बघ..तिला घेऊन जा म्हणावं इथून" तीरासारखी जया एकसुरात सर्व बडबडत होती...

प्रशांतला सर्व कळत होत पण तो हतबल होता ..बहिणी समोर आणि आई समोर तो काहीच बोलत न्हवता .. त्याला कुणाला दुखवायचं न्हवत ...पण तरीही त्याने आज रात्री आईशी बोलायचं ठरवलं ...

रात्री मालतीबाई मिनुला पांघरून घालत होत्या ..मिनू आज्जी जवळ झोपायची…

"आई झोपली नाहीस अजून"

"नाही रे .. बोल काय बोलायचंय माझ्याशी" मालती बाई ना कळल होत , प्रशांतला काहीतरी बोलायचं आहे  

"काही नाही आई, अग सहज आलो मी" प्रशांत जरासा गडबडला.    

कळतय मला प्रशांत जया नक्की काहीतरी म्हणाली असेल..पण मी तरी काय करू मिनुचे आई वडील त्याचे वाद संपत नाही ... हिचा बाप तर हिला डोळ्यासमोर पण नको म्हणतो... मारायला धावतो..म्हणून मी तिला इथं ठेऊन घेतलंय.. आणि माझी जयाकडून देखील काही तक्रार नाही ,ती सर्व करते रे मिनूचं, पण मिनू अजून लहान आहे...ती खोड्या करते .दंगा घालते...ते मात्र जयाला खपत नाही.. "

"आई जयाचा स्वभाव तुला माहित आहे ना …जया बोलते .. मी मिनुला सांभाळते...माझं कर्तव्य मी करते...पण, मिनु माझी जबाबदारी नाहीये...मिनुच्या आई वडिलांना त्याच्या कर्तव्याची जाणीव नाही .. . आणि जयाने का करावं मिनूचं ती जर तीच सर्वच करत बसली ना.. तर ज्योतीला आणि महेशला बरच आहे ते तिला कधीच घेऊन जायचे नाहीत..

"मग तुम्ही दोघे मिनुला दत्तक का नाही घेत" मालती ताई अधीरतेने म्हणाल्या.

"इतकं सोप्प नाहीये आई ते..मिनुचे आईवडील जिवंत असताना आम्ही तिला का दत्तक घ्यावं..त्याची जबाबदारी आम्ही का स्वीकारावी.... ज्योतीला देखील काहीच वाटत नाही का ग...आपलं 3 वर्षाचं लेकरू गेलं 2 वर्ष आपल्या जवळ नाहीये .. वर्षाची असताना आली होती ना ग ती मिनुला घेऊन ,...किती रडत होती मिनू त्या दिवशी ..तरीही ज्योती तशीच निघून गेली.. चार दिवसातून एकदा फोन करायचा फक्त चौकशी करायची ...तीच आजारपण तीच दुखंणखूपण काहीच अगदी कशाचीच पर्वा नाही का अशी असते का कधी आई. आपल्या मुलीसोबत राहावंस नाही वाटत तीला”

“तीला लाख वाटेल रे पण तिच्या नवऱ्याचं काय… तो कसा आहे माहितीये ना तुला.. तीला तिच्या नवऱ्याची मर्जी जास्त महत्वाची वाटते… तिच्या नवऱ्याला ज्योतिषाने तुला मुलगाच होईल असं सांगितलं होत..पण झाली मिनू तेव्हा पासून सर्व बिनसलं .. मिनूला ना कधी त्याने जवळ घेतलं ...ना कधी तिचे लाड केले...रडायला लागली कि तीला फेकून दे कुठे तरी असं म्हणायचा.. एकदा तर मिनू रडत असताना रागाच्या भरात तोच तिला फेकून देणार होता गॅलरीतून …. त्यानंतरच ज्योतीने मिनुला इथे आणून ठेवली.. पण मिनुला अजून पण तिचा बाबा आठवतो ..घरच नाव काढलं कि गप्प होते पोरगी.." " मालतीबाई हताशपणे म्हणाल्या..

"ज्योती कशाला अशा माणसा सोबत राहते, द्यावं ना सोडून, अश्या मूर्ख माणसाला”

"आणि काय करावं...तिने पण इथे येऊन राहावं,,,चालेल तुम्हा दोघांना"

प्रशांत गप्प बसला .निमूट आपल्या खोलीत निघून गेला...

असेच दिवस जात होते.. कधी मिनू जयाच्या वस्तुंना हात लावायची ... नाहीतर कधी कुठे पसारा करायची... कुठे सांडलवंड ...तिचे बालउद्योग चालूच असायचे..

जयाची कटकट ...तिची चिडचिड वाढत होती...आणि ह्याला कुणीच काही करू शकत न्हवत.

एक दिवस मिनूने जया घरात नसताना तिच्या ड्रॉवर मधली लिपस्टिक काढून पूर्ण घरात भिंतींवर, फरशीवर आडव्यातिडव्या रेघोट्या ओढून ठेवल्या होत्या...

जया जेव्हा घरी आली...तेव्हा साहजिकच तिला मिनूचा प्रचंड संताप आला...

तिने ह्यावेळी मिनुला फटके द्यायचे तेवढे बाकी ठेवले होते..

तिच्या आईवडिलांना नको नको ते बोल्ली.. मालती बाईशी देखील भांडली...तुमच्यामुळे माझ्या घराची संसाराची वाट लागली.. ह्या कार्टीला इथे ठेऊन घेतली..हिच्या मुळे मी नीट जगू पण शकत नाही ..कुठे जाऊ शकत नाही.. मी आता इथे राहणार नाही ....असं बरच काही...

मालती बाईंनी तिची माफी मागितली ..पुन्हा असं नाही घडणार , माझा जरा डोळा लागला होता म्हणून ..पुन्हा नाही करणार ती असं …तू घर सोडून जाऊ नकोस खूप विनवण्या केल्या... काहीवेळाने जया गप्प झाली पण त्या दिवस नंतर जयाने मिनूशी बोलणंच बंद केलं .... तिची सगळी काम ती करत होती पण तिच्याशी एकही शब्द न बोलता..पण मिनूची मात्र पोपटपंची चालूच होती..तिच्या खोड्या करणं…..सारखं मामी, मामी चा जप चालूच असायचा... पण जया कटाक्षाने तिच्याशी बोलणं टाळायची ...

एकदा मात्र .....मालतीबाई देवळात गेल्या होत्या.. जया लॅपटॉपवर काहीतरी वाचत बसली होती.... घरात कुणीच न्हवत...तेवढ्यात "मामी अगं हे बघ ना काय" मिनूचा बागेतून आवाज आला...

"दिसली असेल पुन्हा गोगलगाय,, काम काय कार्टीला मला त्रास देण्यावाचून" जयाने लक्ष नाही दिल..

पण तेवढ्यात जयाला मिनुची किंकाळी ऐकू आली..

जया धावत बागेत गेली...मिनू बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती...

गवतातून सळसळत काहीतरी गेल्याच जयाने पाहिलं ...काय होत ते तिला नीट समजलं नाही ..

जयाने मिनुला लगेच उचलून हॉस्पिटल गाठलं...प्रशांतला आणि ज्योती-महेश दोघांना फोन करून बोलावून घेतलं..

डॉक्टरांनी निदान केलं..हार्ट अटॅक ….. मिनूचा जागीच मृत्यू झाला होता..

ज्योतीला सावरणं कठीण झालं होत..ती खूप मोठं मोठ्याने रडत होती..प्रशांत आणि महेश तिला कसेबसे सावरत होते..मालतीबाई..देखील सुन्न झाल्या होत्या...

आणि जया.. ती तर कुणाशीच काहीच बोलत न्हवती... एकटीच एका कोपऱ्यात बसून होती....तिला कसलीच संवेदना राहिली न्हवती...बधिर झाली होती ती..

मिनुचे सर्व सोपस्कार आटोपून ज्योती आणि महेश निघून गेले...पण जया मात्र खूप शांत झाली होती,,

ना कुणाशी बोलत होती...ना तीच स्वतःकडे लक्ष होत ...तासंतास दिवसभर आणि कधीकधी तर रात्री पण ती बागेतच बसून राहायची ..

मिनू पडली होती त्या जागेकडे एकटक पाहत बसायची.

मालतीबाई आणि प्रशांत ने तिला बोलत करायचा खूप खटाटोप केला पण जया कुणाचंच ऐकत न्हवती.. कशालाच प्रतिसाद देत न्हवती…

मालतीबाईंना आपल्या सुनेचं फार वाईट वाटत होत ...काही झाल तरी जया त्यांच्या मुलाची बायको होती ... त्यांच्या घराचा आधार होती...तिला काही झाल तर सार घर कोलमडून पडणार होत ..त्यांना काहीच सुचत न्हवत आणि अशातच ज्योतीचा फोन आला ...मालतीबाईनी तीला जयाची परिस्थिती सांगितली ..

ज्योतीला देखील फार वाईट वाटलं...मिनू आपली मुलगी असून पण आपण केलं नाही तितकं जयाने मिनूचं केलं होत.. आणि आता मिनुच्या जाण्यामुळे जयाचं असं कोलमडून पडणं...तिने मालतीबाईंना मी जयाला भेटायला येऊन तिला समजावते …असं आश्वासन दिल ....

“जया अग काय झालंय तुला...कसला इतका विचार करत राहतेस ..मी समजू शकते.. मिनू.. गेली कित्तेक दिवस तुझ्या डोळ्यासमोर होती..आणि अचानक तीच असं जाण.. अग मी तर तिची आई आहे मी नाही का दुःख पचवलं.. जगावं तर लागतच ना ...तूच जर अशी हारून बसलीस तर आई ने आणि प्रशांत ने काय करायचं ...काढून टाक सर्व दुःख बाहेर ...एकदाच रडून घे.. मोकळी हो... जया तू ऐकतेस ना मी काय बोलतेय मिनू नाहीये .. मिनू नाहीये ह्या जगात ...मिनू सोडून गेली आपल्याला ...ज्योती जयाला गदागदा हलून सर्व बोलत होती...

मिनू मिनू हे नाव सतत कानावर पडताच जया भानावर आली..आणि मोठ्याने रडायला लागली..स्वतःचा उर बडवून घ्यायला लागली..माझ्यामुळेच गेली मिनू...मी आहे जबाबदार तिच्या मृत्यूची ...असं रडत रडत बोलायला लागली...

"जया शांत हो..तू का असं म्हणत्येस.. अग तुझी काहीच चूक नाहीये...तू का स्वतःला दोष देतेस "

"नाही ताई .. तुम्हाला नाही माहित तुम्हाला काय कुणालाच नाही माहित ... त्या दिवशी मिनू अशीच नाही तर ...सापाला बघून बेशुद्ध पडली.."

"काय साप... ती सापाला बघून घाबरली." ज्योतीने आश्च्यर्याने विचारलं ..

" हो ताई ..माझ्या मनात हे साठून राहिलंय गेले कित्तेक दिवस....मी जर त्या दिवशी तीने हाक मारल्या बरोबर जर गेले असते तर पुढचा अनर्थ टळला असता... मी नाही गेले ... मीच जबाबदार आहे”

तरीही ज्योती गप्पच होती..

तीने जयाला शांत केलं .."शांत तो जया मिनू सापाला बघून नाही तर तीच्या बाबाला बघून बेशुद्ध पडली..."

काय?" आता आश्यर्य करायची पाळी जयाची होती...

"पण महेश… ते कधी आले होते...मी तर नाही पाहिलं"

"जया तू न्हवत पाहिलंस पण मिनूने पाहिलं होत तीने सापाला पाहिलं असेल.. तीने तुला आवाज दिला...पण त्याच वेळी महेश देखील आला होता...त्याला मिनुला भेटायचं होत...तिला बघायचं होत..पण त्याला काय माहित आपली मुलगी आपल्याला इतकी घाबरेल आणि जीवानिशी जाईल...माहित असत तर त्याने असं कधीच केलं नसत.. त्याचा राग होता मिनूवर तीला फेकून द्यायला पण निघाला होता..पण ते सर्व रागाच्या भरात.. आता तर आमची मिनू आम्हाला कायमची सोडून निघून गेली... आणि त्याची शिक्षा म्हणून कि काय महेश आता पुन्हा बाबा होऊ शकत नाही असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलंय ...का झालं .. कस झालं... ह्याचा विचार करत बसले ना तर डोकं सुन्न होऊन जात .. मिनुला वाचवायला मी तिला तुझ्याकडे ठेवलं...आणि तरी देखील मिनू ..." असं म्हणून ज्योती रडायला लागली....

"ताई..तुम्ही तिला माझ्याकडे ठेवलंत पण तरी कुठे तिला नीट सांभाळत होते...मी तरी कुठे तिच्या कडे लक्ष दिल"जया पण रडायला लागली

"नाही जया उलट मिनुला माझ्या पेक्षा जास्त तूच आवडत होती...ती मला म्हणाली देखील "मम्मा.. मी आता मामीला मम्मा म्हणू का ग .. ती माझं सगळं करते.. माझ्या स्कूल मधल्या फ्रेंड्सच्या मम्मा करतात अगदी तस सगळं करते ती माझं"

जयाला खूप वाईट वाटत होत.... मिनू जेव्हा आपल्या जवळ होती तेव्हा तिची जरापण किंमत न्हवती मला ....मिनू परत ये ग...तुझे मला खूप लाड करायचेत .. तुझी खरी मम्मा मला बनायचंय .. मला तुझी खूप आठवण येतेय...

दोघी रडत होत्या आणि एकमेकींचं सांत्वन देखील करत होत्या...

आणि अचानक एक दिवस जयाला दिवस गेल्याच तिच्या लक्षात आलं...सर्वाना खूप आनंद झाला..

जयाला मुलगी झाली...मिनू परत आली होती...

मायेची नाळ जी नशिबाने तुटली होती...तीच पुनर्रमिलन झालं होत...

समाप्त