मला स्पेस हवी पर्व २ भाग ३२ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३२


मला स्पेस हवी पर्व २ भाग ३२

या भागात नेहा खूप दिवसांनी माहेरी जाणार होती.तिथे काय घडेल बघू.


नेहा, सुधीर, ऋषी ,आणि सुधीरचे आई-बाबा नेहाच्या माहेरी जेवायला गेले होते. तिथे आपली आई काहीतरी कुरबुर काढेल याची शंका नेहाला होती आणि झालंही तसंच. नेहाची आहे तिला म्हणाली ,


"काय ग काय गरज होती इतक्या लांब जायची? आणि तुला काय ती स्पेस हवी होती ती तिथे मिळाली का? एकट राहण्यात काय मजा असते ? कुटुंब हवं की नको? तुझा लहान मुलाचा सुद्धा तू विचार केला नाहीस आणि इतक्या लांब गेलीस. आम्ही बायकांनी इतक्या वर्ष संसार केला आम्हाला नाही वाटलं कधी की स्पेस हवी म्हणून. आम्ही नाही गेलो घर सोडून."

तिने असं म्हणतात नेहा काही बोलली नाही पण अक्षय बोलला ,

"आई अग आता ह्या विषय कशाला कितीतरी दिवसांनी नेहा आली आहे. आपण तिचा स्वागत करूया आनंदाने. जेवूया."

" अरे तुझं म्हणणं ठीक आहे पण जे मला बोलायचं आहे ते मी बोलणारच. कारण ती कधीच स्वतःच्या मनातल्या गोष्टी सांगत नाही. काय गरज होती खरच सांग? तिथे आजारी पडलीस तेव्हा ऑफिसमधल्या लोकांनीच तुला साथ दिली म्हणजे मातीचे किल्ले लावावे लागले ना? स्वतःचे नातेवाईक इथे सोडून तिकडे गेली रागा रागात आणि तिकडल्या दोन्ही बायकांना नातेवाईक बनवावं लागलं. राहू शकली असती का आजारी असताना ?"

नेहाच्या आईचा चेहरा पण रागीट झाला होता सुधीरच्या आई-बाबांना काही कळेना काय करावं. सुधीर सुद्धा अक्षय कडे बघत होता. अक्षयने शेवटी आईला सांगितलं
"आई आता हा विषय बंद .आता जेवायचं आहे का की नाही ?आम्ही बाहेर जाऊ का हॉटेलला जेवायला ?"

कशाला? केलंय ना स्वयंपाक .स्वागत करायचंय ना नेहाचं? केलं सगळं तिच्या आवडीचं ."

तेव्हा प्रणाली म्हणाली ,

"आई आता जाऊ द्याना जुना विषय झाला. चला आपण जेवायची तयारी करूया."

प्रणाली जबरदस्ती सासूला आत घेऊन गेली. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा सुधीर नेहाचा हात पकडून बसला पण काय बोलावं ते त्याला कळलं नाही.अक्षय म्हणाला,
" नेहा लक्ष देऊ नकोस. तुला माहितीये ना आपल्या आईचा स्वभाव ."

यावर सुधीरच्या आईने नेहाच्या पाठीवर हात ठेवत म्हटलं,
" नेहा आई म्हटलं ना की ती अशीच असते. तू आलीस म्हणून तिने लगेच असं बोललं म्हणून तुला वाईट वाटलं असेल पण इतके महिने त्यांच्या मनात दुःख साचलेलं होतं ते त्या बोलून गेल्या. लक्ष नको देऊस. तू पण आता आईस ना! आई झालं की ह्या गोष्टी होतात ."

यावर नेहा म्हणाली ,

"आई मला राग नाही आला हो पण वाईट वाटलं .माझ्या कुठल्याही निर्णय आला आई कधीच सपोर्ट करत नाही. आधी पण नव्हती करत म्हणूनच बंगलोरला जाण्याचा निर्णय घेताना मी तिला सांगितलं नाही.या पाच महिन्यात मी तिथे राहिले आणि अनुभव घेतला त्यातनं मला जे स्पेस हवी होती ती मिळाली. मी तिथे तुम्हाला सोडून गेली नव्हती. मला माझ्या कुटुंबाचा कंटाळा आला होता म्हणून गेली नव्हती .मला प्रियंकाच्या आजारपणा नंतर आणि तिच्या जाणानंतर जो नातेवाईकांचा अनुभव आला त्याने काताऊन गेले होते.म्हणून मला कुठेतरी जावं असं वाटत होतं. आई मला असं वाटलं हे चुकीचं आहे का ?"

यावर सुधीर ची आई म्हणाली ,

"नेहा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघते. तिचे विचार वेगळे असतात. त्यानुसार ती आपलं मत तयार करत असते. त्यामुळे तुझं चुकलं नाही तसंच तुझ्या आईचं पण चुकलं नाही तू जाताना कोणाशीच मन मोकळेपणाने बोलले नाही पण आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला. तुझ्या निर्णयावर विश्वास ठेवला आणि तुला जाऊ दिलं .कदाचित आई म्हणून त्यांना ते पटलं नसेल .आईचं मन हळवं असतं. हे लक्षात ठेव."

यावर नेहा चूप बसली जेवण झाल्यानंतर सगळे घरी आले. घरी आल्यावर नेहाचा चेहरा पडलेला होता. सुधीरची आई म्हणाली,

"सुधीर ऋषी झोपला की आमच्याकडे आणून दे बर का. उद्या नेहा जायची आहे आज तिचा मूड ठीक कर."

हो म्हणून सुधीर खोलीत गेला कृषी तर आधीच आईच्या मागे मागे खोलीत गेला होता आणि त्याची बडबड सुरू होती
"आई मला आज पण दोष्ट शांगणार आहे नं?तू उद्या चालली ना?"

पण नेहाने पटकन त्याला उचलून घेतलं आणि म्हणाली,
"हो रे बाळा तुला मी गोष्ट सांगणार आहे .पटकन हात पाय धुऊन घे .नाईट ड्रेस घाल. मग तुला गोष्ट सांगते."

यावर ऋषी हो म्हणून हात पाय धुवायला बाथरूम मध्ये पळाला.नेहाचा चेहरा अजूनही पडलेलाच होता. त्यावर सुधीरने नेहाचा हात पकडून म्हटलं,
" नेहा फार विचार करू नको .तुझी आई आहे.तिला समजून घे आणि त्यांचं बोलणं सोडून दे.,"

यावर तिने फक्त मान हलवली. गोष्ट ऐकता ऐकता ऋषी झोपून गेला .त्यावर सुधीरने हळूच ऋषीला उचललं आणि आपल्या आई-बाबांच्या खोलीत नेऊन दिलं. आज नेहा फारच डिस्टर्ब झाली होती. जितकी ती काल आनंदात होती .तितकी ती आज डिस्टर्ब होती.

सुधीरला ती म्हणाली,

" सुधीर माझ्या घरी जायचं ठरल्यावरच मला या सगळ्या गोष्टींची कल्पना होती. आई प्रत्येक वेळेला मला माझ्या चुकाच दाखवायचा प्रयत्न करते. मला कधीच कुठला विचार करता येत नाही आणि माझा निर्णय कधीच बरोबर नसतो. हेच सतत ते दाखवत आली आहे लहान पणापासून. त्यामुळे मला त चीड आहे . ती तिचे निर्णय घेते आणि ती तशी वागते. मी का नाही वागू शकत?"

सुधीर म्हणाला,

' नेहा अगं आईचं मन हे फार विचित्र असतं."

" कसलं रे तुझं हे बोलणं.तुझी आई मला एवढी सपोर्ट करते. तुझ्या आईने मला नाही अडवलं. कधी विचारलं किंवा कधी मला इतक सुनावलं. माझ्या प्रत्येक निर्णयावर विश्वास ठेवला आणि ती मी घरी आल्यावर किती आनंदाने माझं स्वागत केलां आणि आज माझ्या आईचं वागणं बघ."

यावर सुधीर म्हणाला ,

" हे बघ माझी आई म्हणालीनं‌ तुला की प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे तू विचार करू नकोस उद्या बंगलोरला जाताना फ्रेश मूडमध्ये जा. कळलं का? आणि आता दर संडेला यायचं असेल तर ये .तुला जर जमणार नसेल तर मला सांग मी येईल कळलं? पण आता मधले पाच महिने पुन्हा येऊ द्यायचे नाहीत."