निकिता राजे चिटणीस - भाग १२ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग १२

निकिता राजे चिटणीस   

पात्र रचना

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

भाग १२

भाग 11 वरून पुढे  वाचा .........

निकिता

त्या दिवशी मिटिंगच्या वेळी माझ्यावर चांगलंच दडपण आल होत. का कोण जाणे पण वाटवे मॅडम चा मूड अत्यंत खराब होता. त्या बारकाईने मीटिंगभर माझ्याकडे बघत होत्या. आवाजामधे जरा धारच होती. पण हळू हळू त्यांचा स्वर बदलत गेला. मीटिंग संपल्यावर मला माझ काम करायला पूर्ण मोकळीक दिली म्हंटल्यावर तर मला इतका आनंद झाला की केंव्हा एकदा घरी जाते आणि आईंना सर्व सांगते अस झाल. ऐकतांना आईंचा चेहराच सांगत होता की त्यांना पण हे सर्व काम आवडलं म्हणून. मला पण खूप छान वाटलं. कार्तिकला सांगितल्यावर तो म्हणाला की “करून दाखवलस ! I AM PROUD OF YOU. KEEP IT UP.”

आमच्या ग्रुप मधे तर सर्वांना आश्चर्य नाही तर विस्मयच वाटला. काय प्रतिक्रिया द्याव्यात हेच कोणाला सुचेना. कोणीही माझ्याकडून मी अस काही करेन अशी अपेक्षाच केली नव्हती. चित्रा तर म्हणाली सुद्धा “तू विज्ञानाची विद्यार्थिनी असल्याने हे सर्व वैज्ञानिक दृष्टी वापरुन पूर्णत्वाला नेलस हे ऐकून प्रचंड आनंद झाला. अप्रतिम.”

दुसऱ्या दिवसांपासून आमचा accounts चा अभ्यास सुरू झाला. तीन महीने कसे गेले हे कळलंच नाही. एकदम वेगळा विषय, आतापर्यन्त ज्याचा गंधही नाही अश्या विषयाचा अभ्यास म्हणजे माझ्यासाठी फार अवघड काम होत. पण चिकाटीने अभ्यास केल्यावर हळू हळू विषय सोपा  वाटायला लागला. तीन महीने पूर्ण झाले. आता प्रॅक्टिकल आणि ते ही पुन्हा चंदन इंजीनीरिंग मधेच.

 

 

चोरघडे

नवीन ट्रेनी मुलं म्हणजे एक तापच असतो. एक तर ८० टक्के पोर माठच असतात. त्यांच्या कडून काम करून घ्यायच म्हणजे सतत अवघड पेपर सोडवायला लागला की जशी अवस्था होईल तशी होते. परत आमच्या कंपनी ची पॉलिसी अशी की त्यांच्याकडून काम करून घ्यायचच, जेणेकरून काम शिकल्यावर त्यांना नोकरी मिळण्यास अडचण येऊ नये. एक प्रकारच सामाजिक कार्यच आहे पण आमची होरपळ होते. अर्थात ज्यांच्या हाताखाली ट्रेनी असतात त्यांना एक्स्ट्रा incentive पण मिळतो. ही जमेची बाजू.

पण ह्या वेळेची गोष्ट जरा वेगळी आहे. टीम चांगली आहे. अजिबात त्रास नाही. चट चट शिकताहेत. कामात पण चुका नाहीत. काही समजलं नाही तरी आमच्या कडे येत नाहीत. त्यांची टीम लीडर आहे मिस राजे म्हणून तिच्याच कडे जातात. ती तर कामं अशी करते, की १० वर्षांचा अनुभव घेऊन आली आहे अस वाटावं. काल ती माझ्याकडे आली vat टॅक्स च अॅन्युअल रिटर्न घेऊन. तिच्या हातात पाच वर्षांचे रिटर्न्स होते. मला वाटलं की ती रिटर्न समजून घ्यायला आली असेल. मी तिला म्हंटलं की “आत्ता मी कामात आहे आपण चार वाजता बसू. मी तुला सगळं सांगेन.”

बरोबर चार वाजता ती आली.

“हं हातात रिटर्न्स दिसताहेत काय अडचण आहे. सांग.” मी तिला म्हंटलं.

“नाही अडचण काहीच नाही. काही सांगायच होत. आणि एक परवानगी हवी होती.” राजे म्हणाली. मला जरा आश्चर्यच वाटलं.  

“अस ? काय सांगायच होत. आणि परवानगी कसली हवी होती ? लवकर घरी जायच आहे ?” मी आपलं सहज विचारलं.

“नाही नाही. मला पाच वर्षांपूर्वीचे रिटर्न्स हवे होते संजय म्हणाला की तुमची परवानगी घ्यावी लागेल म्हणून.” – राजे.

“तुला पाच वर्षांपूर्वीचे रिटर्न्स कशाला हवेत, स्टडी करायला एवढे पुरेसे आहेत की.” आता मी खरंच नवलाने विचारलं.

“मला लेटेस्ट रिटर्न मध्ये एक चूक आढळली. म्हणून मी मागे मागे जात जात पाच वर्षांचे रिटर्न्स स्टडी केलेत. सर्वांमध्ये कॅलक्युलेशन चा समान धागा दिसला जो की चूक आहे. त्यामुळे आपण जास्ती टॅक्स भरला आहे म्हणून मला अजून मागे जायच आहे.” – राजे म्हणाली.

“अग तुझ्या कॅलक्युलेशन मध्ये काही चूक असेल. कारण घोडे पेडणेकरांकडून अशी चूक होणार नाही ते शहरातले प्रथितयश चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. परत मी आणि वाघूळकर सरांनीही चेक केल आहे. तू पुनः एकदा बघ नाही कळल तर मी तुला समजावून सांगेन. ठीक आहे ?”

“नाही सर मला खात्री आहे की मी चूक करत नाहीये. प्रश्न साडे तीन कोटींचा आहे. म्हणून माझी अशी विनंती आहे की तुम्ही माझ म्हणणं पूर्ण ऐकून घ्याव. आपण साडे तीन कोटी जास्त भरले आहेत, आणि ते आता आपल्याला वापस मिळवावे लागतील.” राजे ठाम स्वरात म्हणाली.  तिनी आकडा सांगितल्यावर जरा हबकलोच. बर, मुलगी उथळ वाटत नव्हतीच, चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. मग ठरवल की काय सांगतेय ते बघू.

“ओके, लेटेस्ट रिटर्न घे आणि मला नीट सारं स्पष्ट करून सांग. तुझे सर्व calculations दाखव. त्यांचे वर्किंग पेपर्स आपल्याकडे नाहीत त्यामुळे क्रॉस चेक करण्यासाठी त्यांनाच बोलवाव लागेल. पण आत्ता मीच बघतो.” या नंतर ती एकेक सांगत होती आणि मी चकित होत होतो. एक ट्रेनी मुलगी एवढं ज्ञान इतक्या कमी वेळात आत्मसात करते ही गोष्ट काही केल्या गळी उतरत नव्हती. पण तिने जी calculations करून दाखवली त्यावरून ती जे म्हणते आहे ते बरोबरच आहे हे सिद्ध होत होतं माझच डोक फिरायची वेळ आली होती. आम्ही काय चेकिंग केल त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. मी संजय ला तिला हव ते दे म्हणून सांगितल. आणि तिला म्हंटलं की तुला हवं ते चेक कर आपण उद्या चार वाजता पुनः बसू. चालेल ?”

“चालेल.” राजे म्हणाली.

मी विचार करत होतो ही टीम चार महिन्या पूर्वी वाटवे मॅडम कडे येऊन गेली असली पाहिजे. त्यांनाच विचाराव. त्यांना फोन केला कॉनफरन्स  रूम मध्ये येता का, जरा बोलायच होत. त्यांनी विचारलं, का हो अस काय आहे की फोन वर बोलता येणार नाही. मी सांगितल, तुम्ही या मग सांगतो. त्यांनी  माझ्या आवाजाचा सुर ओळखला  आणि हो म्हणाल्या.

मी लगेचच पोचलो आणि त्याही पाठोपाठ आल्याच.

“काही तरी सिरियस दिसतंय. बोला.” – वाटवे मॅडम.

मी त्यांना काय झालंय त्यांची आधी पूर्ण कल्पना दिली.

“बापरे साडे तीन करोंड आणि कोणाच्याच लक्षात आल नाही? आश्चर्यच आहे. अशी चूक झाली तरी कशी ?” – वाटवे मॅडम.

“ही cumulative चूक आहे गेल्या पांच वर्षातली. आमच्याकडून झालेली ही मोठी चूक आहेच, ती आता आम्ही सुधारूच. रिफंड मागावा लागेल ते ही सर्व करूच. पण मला तुमच्याशी बोलायच होत ते कारण वेगळच आहे.”

“आत्ता तुम्ही जे सांगितल, त्यापेक्षा वेगळ अस काही आहे  की ज्याच्या करता  तुम्ही मला इथे बोलावलत ? आता मात्र कमाल झाली.” वाटवे मॅडम आता गोंधळल्या होत्या.   

“अहो कमालच आहे. ज्या मुलीनी हे शोधून काढलं ती केवळ B.Sc. आहे आणि तिचा कॉमर्स शी काही संबंध नाही. तरी तीन महिन्यांचा साधा कोर्स करून, ही मुलगी एका लिडिंग C.A. नी केलेल्या रिटर्न्स मधली चूक शोधून काढते. वर आणि हे रिटर्न्स आमच्या डोळ्यांखालून पण गेले होते. म्हणजे तिच्या हुषारीची प्रशंसा करायची का आम्हीच आम्हाला दोष द्यायचा हेच कळेनास झालंय.”

“ह्या मूलीचं नाव राजे आहे का ?” – वाटवे मॅडम.

“हो पण तुम्हाला कसं कळलं ?”

मग वाटवे बाईंनी सगळा इतिहास उलगडला. सगळं सांगितल्यावर म्हणाल्या की “तिचं  ट्रेनिंग संपल्यावर आम्ही, मी आणि अंजिकर तिने  तयार केलेले सर्व रिपोर्टस घेऊन बसलो आणि तिच काम बघून थक्कच झालो. तिने फॅक्टरी मधल्या ५० % लोकांशी संवाद साधला होता आणि माहितीची व्यअस्थित वर्गवारी केली होती आणि निष्कर्ष सुद्धा काढला होता. आम्ही फक्त संकलनाच काम केलं. जवळ जवळ २ दिवस सरांशी मीटिंग केली. त्यानंतर सर म्हणाले की गुड वर्क. नितीन सर म्हणाले की मॅडम तुम्ही तिला ऑफर लेटरच द्या. अशी हुशार मुलगी आपल्याकडे पाहिजे. पण अविनाश सरांच म्हणणं थोड वेगळं दिसल ते म्हणाले की एकदम तिला कंपनी मध्ये घेण्या पेक्षा तिला कन्सलटंट म्हणून बोलावून घ्या, आणि तिलाच हे प्रोजेक्ट करायला सांगा. एखादा अभ्यास करण वेगळ आणि जबाबदारी घेऊन प्रोजेक्ट पूर्ण करण  वेगळ. तिने जर हे यशस्वी रित्या पूर्ण करून दाखवल, तर मग ऑफर द्या. त्या परिस्थितीत आपल्याला एक समर्थ एक्झिक्युटिव मिळेल. तिच्या कडून खर्चाचा अंदाज घ्या. खर्च आपण करू आणि तिची प्रोफेशनल फी पण देवू. पण अगोदर खर्चाचा अंदाज घ्या. आपल्याला हे प्रोजेक्ट झेपतय  की नाही हे पण बघाव लागेल.”

“My god इतकं सगळं झालं ?”

“हो, आणि सुरवातीला तुम्हाला जे प्रश्न पडले, ते मला सुद्धा पडले होते. माझा सुद्धा विश्वास बसंत नव्हता. मला वेगळाच संशय येत होता. मला अस वाटत होत की कोणी तरी तिला फूल ट्रेनिंग देऊन आपल्याकडे पाठवल आहे आपल्याकडची माहिती चोरण्यासाठी. पण लवकरच माझ्या लक्षात आल की असं  काही नाहीये, पोरगी प्रामाणिक आहे. आणि आता तुमच्याकडून ऐकल्यावर तर तीच फक्त कौतुकच वाटतं.” – वाटवे मॅडम.  

मीटिंग संपली. आता पुढची स्टेप म्हणजे वाघूळकर सरांना भेटाव लागेल आणि त्यांना सांगाव लागेल. उद्याच. दुसऱ्या दिवशी दुपारी मिस राज्यांना विचारल की “आणखी काही सापडल का ?”

“नाही सर बाकी सर्व चेक केल ठीकच आहे.” – राजे.  

“मग मी आता वाघूळकर सरांना भेटून सर्व सांगतो. सांगू ना ? की पुनः एकदा बघायच आहे.”  

“नाही सर आता काही बघायच शिल्लक नाहीये.” – राजेचा आत्मविश्वास वाखाणण्या सारखा होता.  

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com