निकिता राजे चिटणीस - भाग १७ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग १७

निकिता राजे  चिटणीस

भाग  १७

भाग १६  वरून  पुढे  वाचा .........

इंस्पेक्टर   पाटील

“काय गवळी काय खबर आणली आहे ?”

“साहेब खबर भरपूर आहे पण आपल्या उपयोगाची नाही.” – गवळी.

“सांग बाबा जे काही असेल ते सांग.

तू बोल.”

“साहेब प्राध्यापकांशी बोललो. सर्वानुमते निकिता ही सरळ वळणाची, हुशार, अभ्यासू आणि hard working विद्यार्थिनी होती. प्राचार्य म्हणाल्या की ती एक outstanding student होती. बस. तिच्या मित्रांची पण माहिती मिळाली. चित्रा बंगलोर ला रिसर्च करते आहे. विशाखा, बांगलोरलाच एका खासगी कंपनीत नोकरी करते आहे. दिनेश काही दिवसांपूर्वीच आर्मी ऑफिसर म्हणून जॉइन झाला आहे. तो चंडीगढ ला असतो. विशाखा आणि दिनेश च लग्न ठरल आहे. वसंत, हैदराबाद ला असतो एका खासगी कंपनीत तो आहे. कार्तिक ला अमेरिकेत जॉब मिळाला आहे तो तिकडेच गेला आहे.” – गावळींनी गोळा  केलेली माहिती दिली.

“घ्या, यातून काय मिळणार आहे ? परब सगळंच कठीण आहे. dead end.”

“साहेब नितीन ला आणि निकिता ला इथे बोलाऊ. इथे आल्यावर भले भले पोपटांसारखे बोलायला लागतात.” परबांची सूचना.  

“सबुत, परब आपल्याजवळ काहीच प्रूफ नाहीये. आहेत ते फक्त अनुमान, अंदाज. अशा स्थितीत त्यांना इथे बोलावून काही साधणार नाही. उलट मीडिया ला कळल तर ते रान उठवतील. नको.”

“मग आता काय करायच ? फाइल बंद करायची ?” – परब.

“No ofcourse not. बघू विचार करा काही तरी सुचेल.”

 

आठ दिवसांनी पोस्ट मार्टेम चा रीपोर्ट आला. रीपोर्ट मधे काहीच नवीन नव्हत. मृत्यू विषबाधेने झाला एवढच. विषाची माहिती काही मिळाली नाही. चिकट  पट्टीचा पण काही उल्लेख नव्हता. मी मेडिकल ऑफिसर ला फोन लावला.

“साहेब रीपोर्ट मिळाला. विषा बद्दल काहीच तपशील नाहीये.”

“नाही. कदाचित अनॅलिसिस करायला लागते तेवढी मात्रा नसेल मिळाली.” – डॉक्टर.

“चिकट पट्टी बद्दल पण काही नाही.”

“अहो पाटील, मी शक्यता वर्तवली होती. तो केवळ माझा अंदाज होता. सर्टिफिकेट मध्ये अंदाज कसा लिहिणार ? फॉरेन्सिक वाल्यांना या बद्दल काही माहीत नाहीये.” डॉक्टर म्हणाले.  

“म्हणजे शेवटी हातात ठोस अस काहीच नाही. परब तपास कसा करायचा ? वाघांची शिकार करायची आहे आणि हातात साधा दंडुका पण नाही. कसं ?” परब काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने म्हणाले की “आपण रीपोर्ट ची माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ. आणि मग जस जमेल तसा टॉपिक काढू. आणि विचारपुस करू.”

दुपारी चिटणीसांचाच फोन आला. परब नी उचलला. काही प्रगती झाली का विचारत होते. परब म्हणाले “तपास चालू आहे. पण रीपोर्ट आला आहे आणि तो दाखवायला यायच आहे. केंव्हा येऊ ?”

“केंव्हाही या आम्ही घरीच आहोत.” – नितीन चिटणीस.

आम्ही लगेचच चिटणीसांच्या घरी निघालो.

“या या पाटील साहेब या. बसा. कुठवर तपास आला आहे ?” – नितीन.

“तपास चालू आहे काही, काही गोष्टी लक्षात आल्या आहेत. पण त्या उघड करता येणार नाहीत. पण तुम्ही विश्वास ठेवा की आम्ही गुन्हेगाराला शोधून काढूच.”

मी मग त्यांना रीपोर्ट दाखवला.

“रीपोर्ट मध्ये काहीच दिशा निर्देश नाहीये. मग आता ?” – नितीन.

“साहेब पोलिसांच काम असच असत. सुतावरूनच स्वर्ग गाठायचा प्रयत्न करायचा असतो आम्हाला. तुम्हाला रीपोर्ट ची माहिती द्यायची होती इतकंच. नेमक त्या दिवशी काय घडल हे निकिता ताई तुमच्या तोंडून ऐकायच आहे. त्या वेळी तुम्ही प्रत्यक्ष हजर होतात त्यामुळे तुमच्या निवेदानाला फार महत्व आहे. सविस्तर सांगता का ?”

“हो सांगते ना.” निकीताने सांगायला सुरवात केली.

“साहेब, नितीन सकाळीच मुंबईला निघून गेला. बाबा साडे आठच्या सुमारास खाली चहा नाश्ता करायला आले. त्या दिवशी गुरवार होता. हा त्यांचा साखर चेक करायचा दिवस असतो. टेबल वर बसून साखर चेक केली. त्यांना रक्त पातळ होण्या साठी औषध चालू आहे. त्यामुळे रक्त थांबण्यासाठी मी त्यांना पट्टी लावली. म्हणजे हे नेहमीचच माझ काम आहे. मग मी चहा आणि नाश्ता घेऊन आले, ट्रे टेबलावर ठेवला, साहेबांना सांगितल, आणि आईंच्या शेजारी चहा घ्यायला सोफ्यावर बसले. पण थोड्या वेळाने आईंना काही संशय आला म्हणून त्या आणि मी  साहेबांच्या जवळ गेलो. बाबा बेशुद्ध झाले होते. मला सहन झाल नाही म्हणून माझ्या तोंडून किंचाळी निघाली. किंचाळी ऐकून रघुवीर धावतच आत आला. प्रसंगाचं  गांभीर्य ओळखून त्याने लगेच अॅम्ब्युलन्स ला फोन केला आणि आम्ही बाबांना हॉस्पिटलला नेल.” 

“साखर साहेब चेक करतात की तुम्ही करून देता ?”

“बाबाच करतात. नेहमी तेच करतात.” – निकिता.

“मग तुम्ही काय करता ?”

“मी फक्त चिकट पट्टी लावते. कारण एका हाताने त्यांना लावता येत नाही.” – निकिता  

“हे काम नेहमीच तुम्ही करता का ? म्हणजे शशी ताई पण अधून मधून लावत असतील ना”

“नाही खास अस काही कारण नाही पण नेहमी मीच लावते.” – निकिता.  

“एकदा लावता की दोनदा ?”

“अं ? दोनदा कशाला लावायची ?” – निकिताने विचारले.

“नाही म्हणजे कधी कधी पट्टी चुकते, मग ती काढून दुसरी लावली जाते या अर्थाने म्हणालो.”

“एखाद्या वेळेला होऊ शकत.” – निकिता.

“मग त्या दिवशी पण अस झाल होत का ?”

“नाही. पण तुम्ही अस का विचारता आहात ?” – निकिता.

“सहजच मनात आल म्हणून. पण कधी दोन पट्ट्या लावल्याचं, आठवत का केंव्हा लावल्या असतील ?”

तेवढ्यात चहा आला. निकिता ताईंनी विचारल “साहेब साखर किती घालू ?”

“एक चमचा”

“नेहमी एकच चमचा घेता ?” – निकिता.

“हो. साखरेशी लढाई करायची मुळीच इच्छा नाहीये.”

“साहेब एक विचारू ?” – निकिता.

“काय ?”

“जर एखाद्या दिवशी पत्नी साखर घालायला विसरली,” निकीताने विचारले. “तर तुम्ही घालून घेता का ?”

“हो त्यात काय.”

“असं  कधी झाल होत, ते आठवतंय का ?” – निकिता

शांतता

“बराय, निकिता ताई चहा छानच झाला होता. येतो आम्ही. जरूर लागली तर  फोन करा. बाकी updates आम्ही देतच राहू.”

बाहेर आल्यावर मी परबाणणा म्हणालो “परब बाई हुशार आहे ताकास तूर लागू देत नाही. नितीन साहेब अजून धक्क्यातून सावरलेले दिसत नाहीत ते काहीच बोलत नव्हते. किंवा बोलण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. म्हणजे सुई पुन्हा निकिता कडेच वळते.”

“हो साहेब कुठलीही lead मिळत नाहीये. प्रकरण अवघड आहे. ज्या चतुराईने तिने तुमच्या प्रश्नाला बगल दिली ते बघता आपली गांठ एका अत्यंत हुशार व्यक्तीशी आहे हे लक्षात ठेवाव लागेल.” – परब.

“तुम्ही म्हणता ते खरंय पण आज S.P. साहेबांना काय सांगणार ? ते सोलणार आपल्याला पहा.”

“साहेब मला अजूनही अस वाटत की तिला बोलवाव. कानाखाली आवाज निघाल्यावर आपोआप बोलायला लागेल. अट्टल बादमाश सुद्धा इथे आल्यावर बोलणं पसंत करतात.” परब तोच मुद्दा उगाळत होते.  

“परब, किती वेळा सांगायच, ही बादमाशांची केस नाहीये. ही लेबर कॅम्प ची केस सुद्धा नाहीये ही अशा एका उद्योगपतीची केस आहे ज्यांच्या कारखान्यात १०० लोक काम करतात. नुसत्या संशया वर एका उद्योगपतीच्या बायकोला हात नाही लावता येणार. उद्या पेपर मध्ये मथळा येईल की उद्योगपतीला आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांकडून विनाकारण कुठलाही सबळ पुरावा नसतांना मार हाण, मग काय कराल. गडचिरोलीला आदिवासी आणि नक्षल पीडित लोकांचे प्रश्न सोडवायला जाणार का ?”

“अरे बापरे,” परब आता विचार करत होते. म्हणाले “साहेब माझ्या हे लक्षातच आल नाही. पण मग आता काय करायच ?”

“कसही करून तिला बोलतं करायला पाहिजे. पण त्या साठी एक तरी दुवा मिळायला पाहिजे. तोच शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. परब त्या दिशेने काम चालू ठेवा. अजून काय ? एखादा जरी ठोस दुवा हाताशी आला की मग आपण तिच्या चिंध्या चिंध्या करू. बघाच तुम्ही.”

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.