निकिता राजे चिटणीस - भाग १८ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग १८

 

निकिता राजे चिटणीस

भाग  १८

भाग १७   वरून  पुढे  वाचा .........

 

निकिता

नितीन एकदम हवालदिल झाला होता. समजत नव्हत त्याला कसं ताळ्यावर आणायच ते. बाबांच्या जाण्याचा खूप मोठा धक्का त्याला बसला होता. १५ दिवस होऊन गेलेत आता पर्यन्त सावरायला हवा होता. परवा इंस्पेक्टर पाटील आले होते तेंव्हाही हा गप्पच बसला होता. काही तरी करायला हव. पाटलांना माझ्यावर संशय आहे हे मात्र जाणवलं. आई तिथेच होत्या त्यांच्याशी यावर बोलायला हवं. दुपारी जेवणानंतर नितीन बद्दल पण बोलायला हव. काही तरी line of action  ठरवायला हवी. अस सोडून चालणार नव्हत.

“आई तुम्हाला काय वाटत काय करायला पाहिजे ?”

“कशा साठी ? नितीन बद्दल बोलतेयस का ?” – आई.

“हो. मला अस वाटत की मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी.”

“हं, माझी हरकत नाहीये. काही तरी करावच लागणार आहे. पण तो तयार होईल का ?” – आईंची शंका.

“तोच प्रश्न आहे पण तुम्ही जर त्याला पटवून दिल तर तो तयार होईल. त्या बाबतीत तुमचा हातखंडा आहे. मला जस नोकरीच्या वेळेस पटवून दिल तसंच आत्ताही कराल याची मला खात्री आहे. तो तयार होईलच. बघा तुम्ही.” 

“ओके. मी प्रयत्न करते, आणि त्याला तयार करते. पण मला अजून एक गोष्ट तुझ्याशी बोलायची होती. ती म्हणजे आपल्यावर १०० कुटुंब अवलंबून आहेत. त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. नितीन बसला तरी आपल्याला बसून चालणार नाही. म्हणून माझ्या मनात असा विचार आहे की तू उद्यापासून ऑफिस मध्ये जायला सुरवात करावी. तुला तिथल्या वातावरणाची आता सवय झाली आहे त्यामुळे काही कठीण जाणार नाही. एवढा मोठा संसार आहे तो कोलमडून चालणार नाही.” – आईंनी त्यांचे विचार बोलून दाखवले.

“आई काय बोलताय तुम्ही. मी कसं सांभाळणार हे सगळ ? अहो मी अनुभवी नाही इंजीनियर पण नाही. मी एक छोटं प्रोजेक्ट केल, पण तेंव्हा बाबा आणि नितीन दोघेही होते. आज तशी परिस्थिति नाही. मी काय करणार आहे तिथे जाऊन ? त्या पेक्षा तुम्हीच सर्व सूत्र हातात घ्या. तुम्हाला सगळं माहीत आहेच वरुन तुम्ही कंपनी च्या डायरेक्टर पण आहात. मी वाटल्यास तुम्हाला असिस्टंट म्हणून मदत करीन.”

“अग हे सगळ तात्पुरत आहे आज, उद्या, १५ दिवसांनी नितीन भानावर येईलच. मग तो सांभाळेल सर्व. पण त्या वेळी तू त्याच्या बरोबर असलीस तर मला वाटत तो कामावर लवकर पकड घेईल. मी अस करते उद्याच सर्व प्रमुखांची मीटिंग बोलावते. आणि सगळ्यांना परिस्थिति समजावून सांगते. ते सर्व तुला मदत करतील.  ही सर्व मंडळी आपल्याकडे १०-१५ वर्षांपासून आहेत त्यामुळे मी सगळ्यांना चांगलं ओळखते. मला खात्री आहे की काही तुला काही त्रास होणार नाही.” – आई.

दुसऱ्या दिवशी चार वाजता मीटिंग झाली. मी आणि आईंनी conference रूम मध्ये प्रवेश केला तेंव्हा वाघूळकर,वाटवे,चोरघडे,अंजिकर,फॅक्टरी चे सांखळकर, आणि G. M. शशांक दामले, A.G.M. शहा सर्व जमले होते.

जायच्या आधी आईंनी नितीनला विचारल की तो येतोय का म्हणून पण त्यानी नकारार्थी मान हलवली. तुम्ही जा मला आता कंपनी मध्ये काही इंट्रेस्ट नाही अस म्हणाला. आईंनी समजावण्याचा पुंहा एकदा प्रयत्न केला. पण पालथ्या घड्यावर पाणी. मग आम्ही दोघी निघालो. मीटिंग मध्ये आईंनी बोलायला सुरवात केली.

“मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही. पण तुमच्याशी संवाद साधणं गरजेचं होत. चिटणीस साहेबांच्या अकस्मात मृत्यूचा नितीनला फार धक्का बसला आहे. तो त्यातून सावरायचा आटोकाट प्रयत्न करतोय पण त्याच आणि बाबांच बॉंडिंग इतक जबरदस्त होत की त्याला त्यातून बाहेर पडायला जरा वेळच लागेल. आपल्या कंपनी वर १०० लोकांची कुटुंब अवलंबून आहेत, त्यामुळे कंपनी ला वाऱ्यावर सोडता येणार नाही. म्हणून नितीन कारभार हातात घेई पर्यन्त आम्हीच आता ऑफिस मध्ये यायच ठरवल आहे. तुम्हा सर्वांकडून निस्सीम सहकार्याची अपेक्षा आहे. यावर कोणाच काही मत किंवा सूचना असतील तर नी:संकोच बोला. आम्ही ऐकायला तयार आहोत.” – आईंनी परिस्थिति स्पष्ट केली.

सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. सर्वांनी एकसुरात आम्हाला welcome केल. एकंदरीत सर्वांनाच फार हायसं वाटलेल दिसत होत, मीटिंग च्या सुरवातीला दिसत असलेला मनावरचा ताण कुठल्या कुठे पळून गेला होता. आमच्याही मनावरच दडपण हलक झाल होत.

त्या दिवशी रात्री जेवतांना मी आईंना म्हंटलं की “तुम्ही ऑफिस मध्ये जा आणि मी फॅक्टरी मध्ये. तुम्ही अर्धा वेळ गेला तरी चालणार आहे. कारण तुम्हाला सर्व माहिती आहे. मी फॅक्टरी मध्ये जाऊन सर्व शिकून घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे दोन्ही कडे सांभाळल्या जाईल. त्यांनाही  ते पटल. हो म्हणाल्या. मग मी आईंना विचारल की

मी मागच्या वेळी जेंव्हा फॅक्टरीत गेले होते तेंव्हा परेरा GM होते. आज दामले म्हणून आलेले दिसले.

“परेरा साहेब दोन महिन्यांपूर्वीच निवृत्त झाले. त्यांना गोव्याला त्यांच्या गावी उर्वरित काळ व्यतीत करायचा होता म्हणून त्यानी एक्सटेन्शन नाकारल. दामले हुशार आहेत. इतकी वर्ष अमेरिकेत होते. इथे त्यांना आपली कंपनी आवडली आणि त्यांनी जॉइन केली. दोन महिन्यातच त्यांनी कारखान्यावर चांगली पकड बसवली आहे. माणूस सुस्वभावी आहे. कामाची चांगली माहिती आहे. सर्वांच्या सतत संपर्कात असतो.” – आई.

“नाही, पण शहा नाराज नाही होणार का ? पण त्यांनाही प्रमोशन ची आशा असणारच ना. त्यांना नाराज करून परिस्थिति बिघडणार तर नाही ?”

“अग ते पण वर्षभरातच रिटायर होणार आहेत आणि त्यांना पण त्यांच्या गावी भावनगरला जावून राहायच आहे. त्यामुळे त्यांनी पण त्यांची replacement शोधायला आगोदरच सांगितल आहे. अजून वर्ष आहे म्हणून आताच काही काळजीच कारण नाही.” – आई.  

“मला कस माहीत नाही ?”

“अग तू त्या वेळेस प्रोजेक्ट संपल म्हणून १५ दिवस माहेरी गेली होतीस. त्याच वेळेस ही सगळी घडामोड झाली. मी संचालक मंडळावर असल्याने मला सर्व बातम्या समजतात. नंतर विषय निघाला नाही म्हणून तुला कळल नाही. एवढंच.” नंतर आई म्हणाल्या की “आपण जो निर्णय घेतला ऑफिस मध्ये जाण्याचा तो अगदी परफेक्ट वेळेवर घेतला.”

“काय खास ?” मी विचारल.

“मघाशी वाटवे मॅडम म्हणाल्या की डोंगरे आणि मेहता ८-१० दिवसांपूर्वी येऊन गेलेत. म्हणत होते की आता नितीन साहेब काही सुधरणार  नाहीत. त्यामुळे आम्हीच आता पूर्ण लक्ष घालणार आहोत. तेंव्हा काय काय चालल आहे यांची सर्व माहिती द्या. वाघूळकरांनी सांगितल की कोणालाही काही माहिती देण्याचा आम्हाला आधिकारच नाही. तेंव्हा तुम्ही शशी मॅडमलाच जाऊन विचारा. किंवा बोर्ड मीटिंग बोलवा. तुम्हाला हवी ती माहिती मिळेल.” – आईंनी माहिती दिली.

“My god कंपनी चे डायरेक्टर असून नितीन ची अशी बदनामी, आणि अशी बॅक डोअर एंट्री, मग आता ?”

“आता काही नाही. माझ्या समोर यायची त्यांची हिम्मत नाही. अस झालं  म्हणूनच मी ऑफिस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आधी मी तुला म्हंटल होत की तूच जा म्हणून. पण आता तू म्हणालीस त्याप्रमाणे मी ऑफिस आणि तू फॅक्टरी. आता सर्व सुरळीत होईल.” – आई म्हणाल्या.

दुसऱ्या दिवसांपासून मी पंडित ला घेऊन फॅक्टरी मध्ये. मी लंच कॅंटीन मध्येच घ्यायच ठवरल. तेवढीच लोकांशी जवळीक. प्रत्यक्ष मालकाची बायकोच कॅंटीन मध्ये जेवते म्हंटल्यांवर वेगळाच इफेक्ट साधल्या जाईल अस मला वाटल. हळू हळू काम सुरू झाल. काम आवडायला लागल. दिवस  छान जात होते.

एक दिवस रात्री नितीन झोपायला गेल्यावर मी आईंना विचारल “आपल्याकडे चंदन नावाचं कोणीच नाही मग कंपनी च नाव चंदन इंजीनीरिंग कसं ?”

ही एक स्टोरीच आहे. सांगते तुला. आणि आईंनी सांगायला सुरवात केली.

“ही कंपनी माझ्या बाबांनी स्थापन केली. आधी नाव कारखानीस वर्कशॉप अस होत. पण माझा धाकटा भाऊ चंदन लहानपणीच न्यूमोनिया होऊन गेला. त्यांची स्मृति रहावी म्हणून बाबांनी नाव बदलल. चंदन इंजीनीरिंग ठेवल. त्या काळाच्या मानाने बराच मोठा कारभार होता. अविनाश इंजीनियर झाल्यावर कोणाच्या तरी ओळखीनी आमच्या कारखान्यात रुजू झाला. हुशार असल्याने कंपनी च्या प्रगतीत पण त्याचा हातभार लागला. बाबांना अविनाश आवडायचा. त्यांनीच त्याला एक दिवस विचारल माझ्या मुलीशी लग्न करतोस का म्हणून. मी पण नुकतीच ग्रॅजुएट झाले होते. मलाही तो आवडला होताच. आमच लग्न झाल. नंतर अविनाशच सर्व सांभाळायला लागला. त्यांच्या नेतृत्वा खाली कंपनी ची खूप भरभराट झाली. पांच वर्षांतच बाबा आणि तो धक्का सहन न होऊन नंतरच्या सहा महिन्यात आई पण गेली. मी M.Sc. केलच होत, त्यात कॉलेज मध्ये वेकन्सी निघाल्याच कळल. कॉलेजचे  प्राचार्य मला ओळखतच होते. लगेच  लेक्चरर म्हणून लागले. अशी आहे कहाणी.”

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.