निकिता राजे चिटणीस - भाग २४ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग २४

निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

21.    साटोरे                  बबन चे वडील.

22.    चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

23.    वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

24.  चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ

25.    विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको

26.    निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा

27.    शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

28.    पाटील                  पोलिस इंस्पेक्टर

29.    परब                   सब इंस्पेक्टर

30.    गवळी                  कॉन्स्टेबल

31.    मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

32.    देसाई                   आर्किटेक्ट

33.    सारंग                   काँट्रॅक्टर

भाग  2४

भाग २३ वरुन पुढे वाचा .......

शशिकला

चार वाजता सगळे जमले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत.

“एका नवीन विषयावर डिसकस करण्यासाठी आज मीटिंग बोलावली आहे. जी काही चर्चा होईल ती सध्या तरी फक्त आपल्या चौघा मध्येच राहायला पाहिजे, हे आवश्यक आहे. प्रथम माझ्या मनात काय आहे ते मी आधी  सांगते” आईंनी संबोधनाला सुरवात केली. “निकीताच्या  असं मनांत आहे की आपण सर्व स्टाफ, वर्कर सर्वांना फ्री क्वार्टरस् बांधून द्यावेत. मलाही ही योजना आवडली. याला खर्च खूप येणार  हे तर स्पष्टच आहे. पण जर निकीताची ही इच्छा आहे तेंव्हा त्यावर सर्वकष चर्चा व्हायला हवी अस मला वाटत. आता तुमची मतं यावर काय आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे.”

वाघूळकरच बोलले “अच्छा म्हणजे याकरिता तुम्ही मला सकाळी बोलावून financial पोजिशन ची माहिती घेतलीत ओह आता माझ्या लक्षात आल.”

“आलं ना मग आता बोला.”

“मॅडम, मी यातला तज्ञ नाही. सर्व स्कीम तयार झाल्यावर त्यांची financial viability चेक करता येईल पण ते नंतर, आत्ता कस शक्य आहे ?” – वाघूळकर.

“दामले तुम्हाला काय वाटत?”

“मॅडम, मी मेकॅनिकल इंजीनियर, यातलं मला पण फारसं कळत नाही. पण माहिती नक्कीच करून घेता येईल. थोडा वेळ लागेल पण माहिती मिळेल. आत्ताच्या घडीला मला काय वाटत ते सांगू का?” दामले बोलले.

“शशांक, अरे सांग न. त्यांच्या साठीच तर हा मिटिंगचा प्रपंच केला आहे.  हातच काही न राखता बोल.”

“आपण म्हणता आहात की, सर्व लोकांसाठी घर बांधायची तर ती कशी, हे आधी ठरवाव लागेल. म्हणजे सर्वांना सारखीच घरं देता येणार नाहीत. आधी लोकांचे गट तयार करावे लागतील, आणि त्या प्रमाणे  १ BHK, २ BHK, ३ BHK अश्या पद्धतीने अलॉटमेंट करावं लागेल. आणि त्या संख्ये प्रमाणे घरं बांधावी लागतील. प्लस सर्वांचा एरिया ठरवावा लागेल बाल्कनी, टेरेस, ड्राय बाल्कनी, रूम चा एरिया वगैरे या सर्वांचा विचार करावा लागेल आणि प्रत्येक गटाचा वेगळा विचार करावा लागेल. या साठी १०० घरांसाठी किती जमीन घ्यावी लागेल हे ठरवाव लागेल. या सर्वा साठी आपल्याला एखादा चांगला आर्किटेक्ट हायर करावा लागेल.” – शशांक  

तू म्हणतोस ते बरोबर आहे पटतंय मला. वाघूळकर तुम्हाला काय वाटतंय?”

“बरोबरच दिसतंय. आत्ता या वेळेस मी अजून काही प्रकाश टाकू शकेन अस मला वाटत नाही.” - वाघूळकर.

“निकिता? तुझंच प्रोजेक्ट आहे हे. तू सांग.”

“मला अस वाटत की शशांक म्हणतोय ते बरोबर आहे. ही सर्व माहिती गोळा  झाल्या शिवाय आपल्याला प्रोजेक्ट ला किती गुंतवणूक करावी लागणार आहे, ते कळणार नाही. आणि त्याचा अंदाज आल्या शिवाय काहीच करता येणार नाही. तेंव्हा प्रथम आर्किटेक्ट ला हायर करून सुरवात करावी. वाघूळकर साहेब, तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतंय?” – निकिता.

“बरोबरच आहे. आणि मला असं वाटत की शशांक इंजीनियर आहे, त्यामुळे तो ही जबाबदारी चांगल्या रीतीने हॅंडल करू शकेल. त्यालाच कळेल की कोणत्या आर्किटेक्ट ला घ्यायचं ते.” वाघूळकर म्हणाले.  

“शशांक, आपले नवीन AGM देशमुख कसे आहेत? एक वर्ष झालं न त्यांना, ते सांभाळू शकतील का? तुला जर ह्या प्रोजेक्ट मुळे फॅक्टरी कडे लक्ष द्यायला वेळ कमी मिळाला तर ते सांभाळू शकतील न?”

“मॅडम चिंताच नको. एक्स्पर्ट आणि अनुभवी आहेत ते कामा मध्ये. मला पूर्ण खात्री आहे. आपण त्यांच्यावर फॅक्टरीची जबाबदारी, नक्कीच सोपवू शकतो.  अगदी १०० टक्के.” – शशांक   

“ठीक तर मग तू आणि निकिता मिळून उद्या पासूनच सुरवात करा. आर्किटेक्ट शोधा, त्यांना सर्व कल्पना समजावून सांगा, त्यांची काय फी आहे ते बघा, सगळ्यांची प्रोफाइल, अनुभव, फी, कामाला किती वेळ घेणार हे सर्व गोळा करा आणि मग आपण बसून फायनल करू. ही जास्तीची जबाबदारी तुझ्या वर टाकते आहे, जमेल ना? कारण कितीही झाले तरी फॅक्टरी कडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही.”

“जमेल मॅडम. चिंता करू नका.  पण मॅडम, देशमुखांना जरा कल्पना द्यावी लागेल. नाही तर त्यांना वाटायचं की मी सोडून चाललो म्हणून.” – शशांक.

“जेवढी आवश्यक तेवढीच द्या आणि सांगा की हे कॉनफिडेंशीयल  आहे म्हणून. ही बातमी आत्ताच पसरायला नको. कारण हे प्रोजेक्ट जर डब्यात घालायची वेळ आली तर अडचणी यायल्या नको. योग्य वेळ आल्यावरच जाहीर करू.”

 

निकिता

दुसऱ्या दिवसांपासून आमच्या कामाला सुरवात केली. बॉस अर्थातच शशांक. “काय करायचं, कुठून सुरवात करायची?” मी विचारल.

“सर्वात आधी देशमुखांना बोलावून नीट कल्पना देवू. मग आपण बसू.” – शशांक.

देशमुखांना बोलावून सर्व कल्पना दिली. ते आ वासून पहातच राहिले.

“अशी योजना आहे?” – देशमुख.

“नाही, करायची इच्छा आहे निकीताची, पण सर्व बाबी तपासून पाहिल्या शिवाय निर्णय नाही घेता येणार. आर्थिक बाबी पण बघाव्या लागतील. जर सर्व गणितात बसत असेल तर हे प्रोजेक्ट नक्की. पण आत्ता मौन बाळगण जरुरीचं आहे. नाही तर प्रॉब्लेम्स उभे राहतील. तेंव्हा गुप्तता  पाळा अगदी १०० टक्के.” – शशांक  

“हो साहेब आणि फॅक्टरी ची काळजी करू नका ते माझ्याकडे लागल. तुमची उणीव भासू देणार नाही.” – देशमुखांनी विश्वास दिला.  

“Good. माझी हीच अपेक्षा होती. बर आता कामाला लागू आम्ही ?” – शशांक.  

“निकिता आता yellow  pages वरुन पुण्याच्या सर्व architects ची लिस्ट बनव मी मुंबई बघतो.” – शशांक.

दिवस भर खपून दोन्ही लिस्ट तयार झाल्या. “आता काय ? आपल्याला shortlisting  कराव लागेल.”

“बरोबर पण आता ते काम आपण उद्या करू, कारण बरीच डोके फोड झाली आज, तू बरीच दमलेली दिसतेस.” – शशांक

रात्री नेहेमी प्रमाणे आईंना दिवस भरायचा प्रोग्रेस सांगितला. “आता उद्या बसून यातले ५-६ निवडू आणि त्यांना फोन करून वेळ घेऊ आणि त्यांच्याशी बोलू. मग बघू. पण आई मला यातला अनुभव काहीच नाहीये तेंव्हा जसं शशांक म्हणतोय तसंच मी करतेय.”

“ठीकच आहे. शशांक हुशार आहे तो जे काही करेल ते विचारपूर्वकच करेल. तू त्यांच्या बरोबर काम करशील तर तू सुद्धा लवकरच एक्स्पर्ट होशील. मला खात्री आहे.” – आई म्हणाल्या.

दुसऱ्या दिवशी तासभर मी शॉर्ट लिस्टिंग चा प्रयत्न करत होते पण काहीच जमेना. मला या विषयातली काहीच माहिती नसल्याने काही कळत नव्हत. शेवटी शशांकच्या केबिन मध्ये गेले. तो फोन वर बोलत होता. मला बसायची खूण केली. बोलणं चालूच. १५-२० मिनिटे तशीच गेली. मग म्हणाला

“सकाळपासून मी माझ्या सिविल इंजीनियर मित्रांना फोन करून चांगला आर्किटेक्ट कोण याबद्दल चौकशी करतोय. तीन नावांबद्दल सर्वांनी खात्री दिली आहे की ते आपल्या मनात जे आहे ते साकार करतील म्हणून. आता त्यांच्याशी बोलून मीटिंग च्या वेळा ठरवून घेऊ. तिघांशीही बोलणं  झाल्यावर मग शशी मॅडम ला सांगू.”

“म्हणजे आपण काल दिवसभर जे केल ते वाया गेल.”

“असंच काही म्हणता येणार नाही. ते आपल्या रेकॉर्ड वर राहील. जर या तिघाबद्दल काही फायनल झाल नाही तर आपल्याला ती लिस्ट रेफर करावीच लागेल. आणि दुसर म्हणजे सुरवात करण्यासाठी काही तरी पाऊल उचलाव लागतच ना.” शशांक म्हणाला.  

मग शशांक ने तिन्ही लोकांना फोन करून त्यांच्याशी मीटिंग ठरवली. ते सगळेच त्याच्या मित्रांना ओळखत होते त्यामुळे लगेच तयार झाले. आज एक मीटिंग, उद्या सकाळी दुसरी आणि संध्याकाळी तिसरी अशी वेळ ठरवून शहरातल्या ऑफिस मध्येच यायला सांगितल.

“चला निकिता बाई आज जेवण घरी. तिथूनच दुपारी ऑफिस. मग मीटिंग.” – शशांकने प्लॅन  सांगीतला.

“मला अस वाटतं शशांक की नाही तरी मीटिंग ऑफिस मध्येच होणार आहे तर आईंना पण सामील करूया. म्हणजे तेवढीच वेळेची बचत.”

“बरोबर आहे तुझं निकिता. आत्ताच फोन करून मॅडमना विचारतो की वेळ आहे का आणि असेल तर मीटिंग ला येता येईल का म्हणून.” – शशांक

शशांक नी तिघा आर्किटेक्ट ची नावे फायनल करून ऑफिस मध्येच मीटिंग ठरवली होती. एक आज संध्याकाळी, एक उद्या सकाळी आणि एक उद्या संध्याकाळी. आम्ही आईंना पण बोलावलं होतं. त्या पण होत्याच.

त्या दिवशीची मीटिंग काही खास झाली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळचीही मनासारखी झाली नाही. संध्याकाळच्या मीटिंग मध्ये मात्र बरंच काही ठरलं.

“या देसाई या तुमचीच वाट पहाट होतो.” आई म्हणाल्या.

“थोडा उशीर झाला यायला कारण एक पार्टी येऊन बसली होती, ती जाई पर्यन्त निघता आल नाही. सॉरी.” - देसाई आर्किटेक्ट

“इट्स ओके. मला वाटत की वेळ न घालवता आपण लगेच सुरवात करूया. प्रथम आमचे शशांक दामले तुम्हाला आमच्या मनात काय आहे ते सांगतील मग त्यानंतर तुम्हीच बोलायचं आहे.” – आई म्हणाल्या.  

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.