निकिता राजे चिटणीस - भाग २७ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग २७

निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

21.    साटोरे                  बबन चे वडील.

22.    चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

23.    वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

24.  चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ

25.    विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको

26.    निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा

27.    शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

28.    पाटील                  पोलिस इंस्पेक्टर

29.    परब                   सब इंस्पेक्टर

30.    गवळी                  कॉन्स्टेबल

31.    मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

32.    देसाई                   आर्किटेक्ट

33.  सारंग                   काँट्रॅक्टर

भाग  २७   

भाग २६   वरून  पुढे  वाचा .........

शशांक दामले

शशी मॅडम ला फोन केला विचारलं की त्यांना केंव्हा वेळ आहे तर म्हणाल्या उद्या दुपारी 12 वाजता हरकत नाही. सारंग पण हो म्हणाला. ओके मग उद्या 12 वाजता आपण ऑफिस मध्ये भेटू. बाय.

त्या नंतर मी उद्याच्या मीटिंग मध्ये काय होईल यांचा विचार करत होतो. शशी मॅडम चे काय प्रश्न असू शकतात ह्या विचारात गढून गेलो होतो. आणि खरं तर आता निकीताशी बोलायच धाडस पण होत नव्हत. गप्प राहण हेच श्रेयस्कर.

“शशांक, हॅलोss, शशांक मी तुझ्याशी बोलतेय.” – निकिता

“अं काय?”

“कसल्या गहन विचारात गढून गेला होतास?” – निकिता.

“नाही काही नाही असच.”

“असंच म्हणजे?” – निकिता.

“म्हणजे काही नाही असच.”

“माझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही असं वाटत ?” – निकिता.

“My god तस नाही अगदी खरंच नाही.”

“मग कस आहे? – निकिता.

“बापरे या मुलीला थातुर मातुर उत्तर देण कठीण आहे. काय उत्तर द्यावं, जावू दे खरं काय ते सांगून टाकू. उगाच गैरसमज नको. तसंही खोट बोलण आपल्याला काही जमत नाही.”

“अरे बोल ना काहीतरी.” – निकिता.  

“निकिता खरं सांगायच तर ..”

“खरं तेच सांग. उगाच इकडच तीकडच बोलूच  नकोस.” – निकिता.

“खरं सांगायच तर मला फार अवघडल्या सारखं होतय. मी अजाणते पणे  का असेना तुला त्रास होईल असं बोललो.”

“ते जाऊ दे. तो विचार मनातून काढून टाक. Relax. बर मला सांग इतकी वर्ष अमेरिकेत होतास, सगळे तिकडचीच मुलगी शोधून ग्रीन कार्डची सोय करतात. तू कोणाशी सूत जमवलं नाही हे कस?” – निकिता.

“मी अमेरिकेत गेलो पण ते शिकायला. पण मला अमेरिका नाही आवडली. तिकडची संस्कृति वेगळीच आहे. माझ्या पचनी नाही पडली. म्हणून वापस आलो. अचानक चंदन इंजीनीरिंग मध्ये selection झाल. आणि कामाला सुरवात केल्यावर वाटल हीच जागा आपली. आता इथून हलायच नाही. मला इथलं मन मोकळं वातावरण एकदम भावलं.  इथे खूप छान वाटतंय.”

“मग आता?”

“आता काय?”

“अरे आता इथे settle झाला आहेस मग लग्नाचा विचार केंव्हा करणार?”-निकिता.

“तसे तर आई बाबा पण मागे लागले आहेत. पण अजून माझं ठरत नाहीये.”

“काय कारण? सगळ तर ठीक आहे मग?” – निकिता.

“काय सांगू तुला, काय कारण आहे ते. माझं मलाच काळात नाहीये.”

“मी तुला एक सांगू?” – निकिता.

“काय?”

“मी एक course केला आणि इथेच ट्रेनी म्हणून काम केल, ती सगळी कहाणी तुला माहितीच आहे. होय ना?” – निकिता.

“हो मला नंतर कळलं. आणि आश्चर्य पण वाटलं.”

“त्या वेळेला मी नोकरी करायचा विचार करत होते तेंव्हा नितीननि मला विचारल की काशाकरता म्हणजे पैशा करता, टाइम पास करता की identity करता. मी जाम confused होते. तेंव्हा आईंनी मला विचारल की मी मदत करू का निर्णय घेण्यासाठी,  आणि मग आमची प्रश्नोत्तर सुरू झाली आणि मग निर्णय घेऊन मी ही सगळी काम केलीत.” – निकिता.

“त्याचा इथे काय संबंध?”

“तेच तर. तू आत्ता म्हणालास की तुलाच कळत नाहीये, मग मी तुला मदत करते कारण शोधायला.” – निकिता.  

“तुझी गोष्ट वेगळी माझी वेगळी.”

“असू दे. पण मी विचारते आणि तू उत्तर दे. सुटका नाही.” – निकिता.  

“ही जबरदस्ती आहे अस नाही तुला वाटत?”

“अरे मी एवढ्या प्रेमाने विचारते आहे आणि तू केवढे आढे  वेढे घेतोयस. पण सांग ना. काय प्रॉब्लेम आहे. आपण सोल्यूशन काढू त्यावर”.

“अग मी मित्रांचे संसार बघतो आहे सुरवातीला बर असत. पण नंतर हट्टीपणा  सुरू होतो. मला झेपणार नाही हे. म्हणून मी ठरवल की लग्नच  नाही करायचं.”

“हे तुझे मित्र इथले की अमेरिकेतले? म्हणजे ज्यांनी अमेरिकेत संसार थाटले त्यांच्या बद्दल बोलतो आहेस का तू ?” – निकिता.

“हो. पण त्यानी काय फरक पडतो? इथे काय किंवा तिथे काय?”

“पडतो. वातावरणाचा, संस्कृतीचा आणि देशाचा फरक पडतो. तिथे स्वकेन्द्रित लोक आहेत इथे आधी दुसऱ्याचा विचार करणारी माणसे आहेत. काही अपवाद सोडून दे पण बहुतांश असेच आहेत.” – निकिता.  

“तुझी गोष्ट वेगळी आहे तू सगळ्यांचा विचार करते आहेस पण म्हणून सगळेच तसे असत नाहीत.”

“ओके म्हणजे माझ्यासारखा विचार करणारी मुलगी मिळाली तर तू लग्नाचा विचार करशील. बरोबर न?” – निकिता.

“अं? हे बघ तू मला trap करते आहेस. माझ मत बदलणार नाहीये. कारण अशी माणस लाखा मध्ये एक असतात. अशी मला कुठून मिळणार ? आणि मिळाली तरी स्वभाव कसा कळणार?”

“माझा स्वभाव कळतो आहे?” – निकिता.

“तुला काय म्हणायचं आहे?”

“जावू दे. आपण नंतर बोलू या विषयावर. संध्याकाळ झाली आहे तेंव्हा Let us call it a day. भेटू उद्या ऑफिस मधे. बाय.” – निकिता.  

निकिता गेली. संभाषण अर्धवटच सोडून गेली. काय म्हणायच होत तिला ? तिच्या शेवटच्या वाक्याचा काय अर्थ काढायचा ? मला जो वाटतोय तोच असेल का ? की ती, सहजच ओघा ओघात बोलून गेली असेल ? मग दुपारी जे घडल त्याचा काय अर्थ लावायचा ? विचार कर करून डोक फिरायची वेळ आली. मग सर्व पॅक अप करून घरी जायला निघालो.

घरी गेलो तर आईने विचारलं “काय रे काय झाल ? फॅक्टरी मधे काही प्रॉब्लेम झाला का?”

घ्या, आता आईला काय सांगणार? “नाही, आज इतक काम होत, मिटिंगा होत्या म्हणून थकवा दिसत असेल चेहऱ्यावर. फ्रेश होऊन येतो मग चहा घेईन.”

चहाच्या वेळी आईने लग्नाचा विषय काढला. आजकाल आईचा हा आवडता सब्जेक्ट होता. हो म्हण रे बाबा म्हणजे नाव नोंदवता येईल. अरे बघता बघता वर्ष निघून जात. वेळेवर सर्व गोष्टी झाल्या की बरं असतं.

आता आईला काय सांगू की तिच्या मुलाला एक मुलगी आवडली आहे पण तिचा विचार काय आहे हे कळल नाही म्हणून. मी काहीच बोललो नाही. नुसताच हसलो. आई हताश. काय करणार.

निकिता

काल जे काही झाल ते अचानकच झाल, पण एक गोष्ट जाणवली. की शशांकशी मला जवळीक हवी आहे. त्याचा सहवास हवा हवासा वाटतोय. आणि हे पण त्यांच्या स्पर्शा वरूनच कळत होत की त्याला पण मी आवडते आहे. तो जेंव्हा डोक्यावरून हात फिरवत होता तेंव्हा एक मोरपिस फिरताय अस वाटत होत आणि सुखाची चाहूल लागली होती. मी डोळे मिटून घेतले होते. सुखच सुख, तो काय बोलतो आहे याकडे लक्षच नव्हत.

नंतर आमच्यामधे जो संवाद झाला त्यावरून तर स्पष्टच झाल की तो माझ्यात पूर्ण गुरफटला आहे. नंतर तर मला त्याला चिडवण्यात गंमत वाटायला लागली. तो अवघडला होता, कळत होतं, पण बोलण्याची हिम्मत होत नव्हती त्याला. आता त्याला बोलत करायला पाहिजे. मलाच पुढाकार घ्या लागणार आहे अस दिसतंय. बघू.

रात्री नेहमीच्या शिरसत्याप्रमाणे चर्चे दरम्यान मी आईंना म्हंटलं की “सारंग च्या estimate मध्ये बरीच कपात आहे. म्हणजे आपल्याला अजून खर्च करायला स्कोप दिसतो आहे.”

“आता आणिक काय तुझ्या डोक्यात शिजत आहे ? बोलून टाक.” – आई.

“मला वाटत की घरच्या बाईच विश्वच किचन मध्ये बांधल्या गेल असतं. म्हणून जर आपण किचन मध्ये सर्व सोयी करून दिल्या तर त्या बाईला खूप आनंद होईल आणि पर्यायाने कुटुंब आनंदात राहील.”

“म्हणजे मोडूलर किचन, चिमणी, जास्तीची कपाटं वगैरे ?” – आई.

“हो bedroom wardrobe आणि fans, lights  सुद्धा. आणि safety door”

“डन अजून ?” – आई.

“त्यांच्या वरच्या लेवल ला, वॉशिंग मशीन, फ्रीज, गॅस कूकिंग रेंज, टीव्ही वगैरे.”

“डन.” – आई.  

“आणि त्यांच्या वरच्या level ला, AC आणि dishwasher आणि पूर्ण घर fully furnished.”

“डन.” – आई.  

“आई अस कस ? सर्वच गोष्टींना डन म्हणताय?”

“अग मग काय म्हणू. तुझी इच्छा आहे ना मग हो नाही चा प्रश्न येतोच कुठे ? तू न एक अजब मुलगी आहेस. एवढी संपत्ति तीही विनासायास मिळालेली तू लोकांवर लुटवते आहेस मला तर नवलच वाटतंय. अभिमानही वाटतोय.” – आई म्हणाल्या.

“आई पैसा पैसा करून काय करायच ? आपल्या दोघींचे नवरे गेले. पैसा असूनही आपण काहीच करू शकलो नाही. मग निदान लोकांचे आशीर्वाद तर घ्यावे. पैसा सत्कारणी तरी लागेल.”

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.