निकिता राजे चिटणीस - भाग २८ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग २८

निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

21.    साटोरे                  बबन चे वडील.

22.    चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

23.    वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

24.  चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ

25.    विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको

26.    निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा

27.    शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

28.    पाटील                  पोलिस इंस्पेक्टर

29.    परब                   सब इंस्पेक्टर

30.    गवळी                  कॉन्स्टेबल

31.    मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

32.    देसाई                   आर्किटेक्ट

33.  सारंग                   काँट्रॅक्टर

भाग  २८  

भाग २७   वरून  पुढे  वाचा .........

निकिता

“आई अस कस ? सर्वच गोष्टींना डन म्हणताय?”

“अग मग काय म्हणू. तुझी इच्छा आहे ना मग हो नाही चा प्रश्न येतोच कुठे ? तू न एक अजब मुलगी आहेस. एवढी संपत्ति तीही विनासायास मिळालेली तू लोकांवर लुटवते आहेस मला तर नवलच वाटतंय. अभिमानही वाटतोय.” – आई म्हणाल्या.

“आई पैसा पैसा करून काय करायच ? आपल्या दोघींचे नवरे गेले. पैसा असूनही आपण काहीच करू शकलो नाही. मग निदान लोकांचे आशीर्वाद तर घ्यावे. पैसा सत्कारणी तरी लागेल.”

“खरंय  तुझं म्हणण. म्हणूनच  म्हणते go ahed. हम तुम्हारे  साथ है.” – आई.

आईंची कमाल आहे त्या कशालाच विरोध करत नाहीयेत. म्हणजे त्यांना पण माझ्या कल्पना पटताहेत. मग आजवर कश्या काही बोलल्या नाही ते ?

“आई हे सगळं तुमच्याही मनात होतं, तर आजवर कधी बोलल्या नाहीत ते?”

“हे तू मला विचारू नकोस. सर्वच दिवस सारखे नसतात. तुझे आणि माझे विचार जुळतात हेच खरं. नाही तर एवढा पैसा काहीही कष्ट न करता मिळाल्यावर लोकांची बुद्धी आस्मानात जाते. अहंकार प्रचंड वाढून जातो. सगळे आपले नोकर आहेत असं वाटायला लागत. सगळे दुर्गुण जमा होतात. तू तशी नाहीयेस केवढ भाग्य आहे माझ. तुझे माझे विचार जुळताहेत त्या  मुळे मलाच फार आनंद झाला आहे. you are on the right track निकिता.” -  आईंनी फूल पाठिंबा दिला.

का कोण काणे पण मला अस वाटल की त्यांच्या जीवनातला एक कोपरा माझ्यापासून त्यांनी आत्ता लपवला, असो योग्य वेळ आल्यावर सांगतीलच.

दुसऱ्या दिवशी सारंग आणि देसाई आलेत. देसाई येणार हे मला माहीत नव्हत. मी शशांक ला विचारल तर तो ही माहीत नाही म्हणाला. मीटिंग आईंच्या साठी होती म्हणजे आईच बोलणार होत्या. आम्हाला विचारल तरच आम्ही बोलणार. त्यामुळे आम्ही गप्पच होतो.

“नमस्कार आम्ही वेळेत आलो ना?” – देसाई.

“हो हो” आई म्हणाल्या.

“मला अस वाटलं की देसाई पण बरोबर मीटिंग मध्ये असले तर बर होईल म्हणून त्यांना पण घेऊन आलो.” – सारंग.  

मीटिंग बऱ्याच वेळ चालली. आईंनी माझे सर्व मुद्दे त्यांना सांगितले. त्यांनीही ते लिहून घेतले. म्हणाले की

“एवढ्या सामानाची जागेची सोय करण्यासाठी एरिया थोडा थोडा वाढवावा लागेल. चालेल का ?” – सारंग.

“हो हो चालेल कारण एवढ सगळ करायच आणि हिंडा फिरायला अडचण करायची हे काही बरोबर नाही. बर जमिनीच काम पण तुम्हालाच करायच आहे. त्यांची काय पोजिशन आहे त्या माणसाशी बोलणं झाल का ?” – आई.

“हो मॅडम preliminary बोलून झाल आहे. तो तयार आहे. एकरी एक कोटी म्हणतो आहे negotiate करून बघूया किती उतरतो ते.” – सारंग.  

“ते बघा पण जमीन हातची जाऊ देऊ नका. बर इमारती कशा  होणार काही सांगू शकता का ?” – आई.

“5 मजली बिल्डिंग करू एका माजल्यावर 4 फ्लॅट्स अश्या 5 इमारती. आता पार्किंग ची व्यवस्था वेगळी करावी लागणार कारण एका बिल्डिंग च्या खाली 20 गाड्या मावणार नाहीत.” – सारंग.  

“ओके. आता मी काय सांगते ते नीट ऐका. माझ्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. इमारती 5 माजल्यांच्याच बांधा पण फाऊंडेशन 11 मजल्यांच घ्या. म्हणजे जर आपली स्ट्रेन्थ वाढली तर मजले चढवता येतील.”

“दुसरी गोष्ट बिल्डिंग ची एक भिंत मोकळी ठेवा. म्हणजे त्या भिंतीवर खिडक्या नकोत. त्या भिंतीची बाजू सूर्याकडची असली पाहिजे त्यावर पूर्ण solar panels बसवा.” आई त्यांचे विचार सांगत होत्या. त्या पुढे म्हणाल्या-

“जितक्या गाड्या estimated आहेत तेवढ multi floor पार्किंग बनवा. आणि पार्किंग च्या सूर्याच्या बाजूने panels लावा. इमारती आणि पार्किंगच्या गच्ची वर पण panels लावायचे आहेत. कॉलनी मध्ये ज्या ज्या इमारती बांधाल त्या, त्या सर्व ठिकाणी जिथे शक्य तिथे panels लावा. मेन गेट पासून बिल्डिंग पर्यन्त जो अप्रोच रोड असेल तो डबल लेन चा करा. आणि वरुन  पूर्ण cover करा. म्हणजे कोणालाही उन्हाचा, पावसाचा त्रास होणार नाही. या कवर वर सुद्धा solar panels लावा. म्हणजे, वीज गेली तरी लोकांकडे लाइट आणि पंखे चालू राहतील. बाकी नेहमीच तुमचं जे काही असत ते करा.” 

सगळे मंत्र मुग्ध. आईंच हे रूप मी प्रथमच पाहत होते. आयडियाज एकदम क्लियर.

थोडा वेळ तसंच गेला. मग देसाईच बोलले.

“मॅडम तुम्ही ग्रेट आहात. मी तुम्हाला सलाम करतो. पण मॅडम एवढ करायच म्हणजे बराच खर्च येईल.”

“येऊ द्या. नो प्रॉब्लेम. हे सर्व करायचंच आहे. शशांक दामले तुमच्याशी coordinate करतील. आता फायनल झाल आहे तेंव्हा वेळ न घालवता सुरवात करा. आपल्याला हे लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे.” आईंनी फायनल सांगितलं.  

मीटिंग संपली. मी आणि शशांक माझ्या केबिन मध्ये गेलो.

“आईंना कसं काय सुचत सगळं देव जाणे.”

“अग म्हणूनच त्या बॉस आहेत.” – शशांकचं उत्तर. “पण निकिता हे सगळं करता करता तुमच्या सेविंग्स ची वाट लागणार आहे.”

“काय करतोस पैसे साठवून ? माणसं महत्वाची. relationship महत्वाची. मला नाती जपायला आवडतात. तुझ् तसं नाहीये तुला माणसं आवडत नाहीत.”

“हे तू काय बोलते आहेस ? मला माणसं आवडत नाहीत ? हा आरोप आहे बिन बुडाचा.” – शशांक.

“मग तू माझ्याशी फटकून वागतोस. यांची संगती कशी लावायची?”

“निकिता This is too much. उगाच काहीतरी बोलू नकोस.” – शशांक.  

“मग माझ्या प्रश्नाच उत्तर दिल नाहीस ते.”

“हरदासाची कथा मूळ पदावर. बोल कुठला प्रश्न?” – शशांक.

“जाऊ दे मला बोलायचंच नाही. मी मान फिरवली.”

“निकिता तुला खरं उत्तर हवय? आणि तेही आत्ताच?” – शशांक.

“होय.”

“आणि जर ते तुला आवडलं नाही तर?” – शशांक

“मग मी तसं सांगीन त्याच्यात काय?”

“ओके. तुझ्या सारखी असेल तर चालेल. किंवा अस म्हणूया की तूच करतेस का माझ्याशी लग्न?” – शशांक म्हणाला, पण दुसरीकडे बघून.

किती दिवस या प्रश्नांची मी वाट पाहात होते. कशी बशी हिम्मत करून बोलला. पण बोलला हे खरं.

“किती रूक्ष आहेस रे तू. अरे लग्नाची मागणी अशी घालतात?”

“ते जावू दे. आता तुझी पाळी आहे उत्तर देण्याची.” – शशांक

मी त्यांच्या जवळ गेली आणि डोळ्यात डोळे घालून विचारल

“तुला काय वाटत?” आणि तो विरघळूनच गेला. आणि त्यांच्याबरोबर मी पण.

प्रोजेक्ट ची काम संपता संपायची  नाहीत. दोन वर्ष कशी निघून गेलीत कळल पण नाही.

एक दिवस शशांक म्हणाला

“निकिता तू आईशी बोललीस?” – शशांकने विचारलं.

“नाही हिम्मतच होत नाही. तू बोललास?”

“आई रोज हा विषय काढते पण तू बोलल्याशिवाय मी कसा बोलणार ? पण आता वेळ निघून जायच्या आत तुला बोलायला हवं. अस किती दिवस चालणार?”-शशांक

त्या दिवशी रात्री आईंनीच विषयाला वाचा फोडली.

“निकिता तू भविष्याचा काही विचार केला आहेस का ? अशी किती दिवस राहणार आहेस?”

“म्हणजे काय आई?”

“तुला शशांक आवडतो हे माझ्या लक्षात आल आहे. त्यांच्या कडून जर होकार असेल तर त्यांच्या आई वडि‍लांशी बोलू का?” – आई.  

“तुम्हाला चालेल ?”

“न चालायला काय झालं, चांगलाच मुलगा आहे. सर्वच दृष्टिनी तुला अनुरूप आहे मग प्रश्न येतो कुठे. पण त्यांच्या आई वडिलांना हे पसंत पडेल का हाच प्रश्न आहे. पण काही असलं, तरी बोलाव तर लागणारच. तू शशांक ला विचारलस का ? त्यांची तयारी असेल तर पुढे जाऊ.

“त्यांची तयारी आहे. माझीच हिम्मत होत नव्हती तुम्हाला विचारायची.”

“ठीक आहे शशांकला फोन करून कळव आणि उद्या केंव्हा भेटायला येऊ अस विचार.” – आई.  

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४ वाजता भेटायचं ठरलं. शशांक म्हणाला की “त्यानी सर्व कल्पना त्याच्या आई बाबांना दिली, आणि त्यांची काही हरकत नाही असं ते म्हणाले.”

दुसऱ्या दिवशी आम्ही जरा लवकरच घरी गेलो. आणि तयार होऊन ४ च्या ठोक्याला त्यांच्या घरी पोचलो. आणि आश्चर्याचा धक्काच बसला. समोर दामले काका आणि काकू स्वागताला उभे होते.

दोन महिन्यातच आमच लग्न झाल. मी निकिता चिटणीस ची निकिता दामले झाले.

वर्षभरातच  प्रोजेक्ट जवळ जवळ पूर्ण झाल. आता शशांक आणि मी दोघंही ऑफिस मध्येच बसत होतो. शशांकनी नितीनची जागा घेतली होती आणि कंपनी उत्तम प्रकारे सांभाळत होता. आईंनी त्यांच्या शेअर्स पैकी फक्त ५ टक्के स्वत: कडे ठेऊन बाकी ४० टक्के शशांक ला दिले. लग्नाची भेट म्हणून. सगळ कसं छान सुरळीत झाल होत. जीवन पुन्हा ट्रॅक वर आल होत.

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.