निकिता राजे चिटणीस - भाग ३० Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग ३०

 निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

21.    साटोरे                  बबन चे वडील.

22.    चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

23.    वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

24.  चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ

25.    विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको

26.    निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा

27.    शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

28.    पाटील                  पोलिस इंस्पेक्टर

29.    परब                   सब इंस्पेक्टर

30.    गवळी                  कॉन्स्टेबल

31.    मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

32.    देसाई                   आर्किटेक्ट

33.  सारंग                   काँट्रॅक्टर

 भाग ३०     

भाग २९  वरून  पुढे  वाचा .........

इंस्पेक्टर मळेकर

“हेच तर शोधून काढायच आहे गवळी. एक शक्यता अशी असू शकते की डोक्यावर एक सवत जन्मभर आणून बसवली म्हणून शशिकलाबाई अविनाशला मारायला उद्युक्त झाल्या. त्यांनी कुठूनतरी जालीम विश मिळवलं आणि कार्यभाग साधला. निकिताशी संगनमत करून कार्तिक कडून ते मिळवलं असण्याची संभावना पण नाकारता येत नाही. त्यासाठी कॉलेजला भेट द्यायला हवी.”

आणि दुसरी शक्यता म्हणजे राधाबाईंना आयुष्यभर फक्त मोलकरणीचा  दर्जा मिळाला त्या पत्नी कधीच बनू शकल्या नाहीत. त्यामुळे  त्यांच्याकडे पण motive आहेच. त्यांनाही बस्तर मधून विष मागवणं सहज शक्य होत. आदिवासी लोकच ते. तसेही हे लोक निरनिराळ्या लॅब ना पुरवठा करतच असतील. कदाचित ही एक मोठी साखळी पण असू शकेल. त्यांच्यापैकीच कोणीतरी, एक सॅम्पल  राधाबाईंना आणून दिलं असेल. अर्थात हे सगळे अंदाज आहेत. प्रॉब्लेम हा आहे की १०-१२ वर्षांपूर्वी हे सगळ घडून गेलं आहे. गवळी त्यावेळी बस्तर मध्ये तुम्ही स्वत: गेला नव्हता. आता तुम्ही जा. त्या मामाचा शोध घ्या. तो नसेल तर त्याचा मुलगा किंवा कोणी जातवाला असेल तर बघा, विषाच्या हस्तांतरणा बद्दल काही डिटेल्स मिळतात का? आणि मी उद्या औरंगाबादला जातो.”

“साहेब, तुम्ही म्हणता तसं जर झालं असेल म्हणजे राधाबाईंना विष हस्तगत करण्यात जर यश मिळालं असेल, तर त्यांनी विष आणायचं आणि शशिकलाबाईंनी इंजेक्शन द्यायच असा प्लॅन पण असू शकेल. त्या दोघींचं आपसातलं सूत पाहता हे पण शक्य असू शकतं. तुम्हाला काय वाटत ?” – गवळी

.”Exactly. मलाही तसंच वाटतंय. त्यामूळे तुम्ही ताबडतोब उद्याच निघा.”

“ठीक आहे साहेब उद्याच निघतो. पण तुम्ही औरंगाबादला कशाला ? ती सगळी चौकशी त्या वेळेस मीच केली होती.” – गवळी.  

“तुम्ही निकीताच्या मित्र, मैत्रिणींची चौकशी केलीत. उद्या मी कॉलेज च्या लॅब मध्ये जाणार आहे. लॅब मध्ये असलेल्या मटेरियल च्या बद्दल जाणून घ्यायचं आहे. तुम्ही जावून या मग सविस्तर बोलू.”

“पण साहेब हे झालं अविनाश च्या मृत्यू बद्दल. नितीन च्या बद्दल काय ? त्याला मारण्यासाठी काय कारण असाव ?” गवळींनी मूलभूत प्रश्न उपस्थित केला. 

“हा एक तिढा आहेच. आपल्याकडे असलेल्या माहितीवरून त्याच्या वाइटावर कोणी असण्याची शक्यता दिसत नाहीये. पण काहीतरी कारण असलंच पाहिजे. गवळी, त्या बबनला पुन्हा एकदा खेचला पाहिजे. तुम्ही बस्तर वरुन आला की त्याच्या मागे लागा त्याचाही इतिहास खणून काढा. नितीन च्या वेळेस तो एकटाच तिथे होता. त्याचे काय connections आहेत ते बघायला हवेत.”

“साहेब मला बस्तर मध्ये थोडा वेळ लागेल. जायच्या आधी सोमनाथला या कामगिरीवर लावून जातो. मी आल्यावर त्याला जॉइन होईन.” - गवळी

“चालेल.”

दोन दिवस औरंगाबादला जायला जमलंच नाही. पण तिसऱ्या दिवशी सकाळीच निघालो. आधी प्रिन्सिपल सरांना भेटून मग लॅब मध्ये जायचं असा विचार होता. पण त्यांनीच लॅब इन्चार्ज ला बोलावून घेतलं. म्हणाले विचारा काय माहिती पाहिजे ती. हे तुम्हाला सर्व सांगतील. मग मीच म्हंटलं की, आम्ही लॅब मध्येच जाऊन बोलतो मला लॅब पण बघता येईल. त्यांची परवानगी घेऊन आम्ही लॅब मध्ये गेलो. जरा निरीक्षण केल्यावर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या.

“वा: लॅब तर छानच आहे की. १०-१२ वर्षांपूर्वी अशीच होती का?”

नाही साहेब, बराच बदल झाला आहे. arrangement सगळी बदलली आहे. आधी जरा छोटी होती पण ५ वर्षांपूर्वी हॉल मोठा केला, स्टोर मोठं  केलं. गॅस ची  पाइप लाइन  करून घेतली.  असंच जवळ जवळ सगळंच बदललं.” - लॅब इन्चार्ज

“रसायन शास्त्राचे सगळेच  लेक्चरर  इथे येतात का ?”

“नाही साहेब, फक्त मोठे साहेब आणि जे प्रॅक्टिकल्स घेतात तेच येतात. बाकीचे  प्रोफेसर  जर काही काम असलंच तर येतात.” –  लॅब इन्चार्ज

“मग इथे प्रमुख म्हणून कोण काम बघतं?”

“मीच बघतो इथलं सर्व. मी आणि माझे दोन असिस्टंट मिळून सांभाळतो.” - लॅब इन्चार्ज

“म्हणजे काय काय बघता ? कामाची व्याप्ती काय आहे ते सांगाल का?”

“माझ्याकडे लॅब मधे दोन मदतनीस आहेत. जेंव्हा प्रॅक्टिकल्स सुरू असतात, तेंव्हा आम्ही तिघं मुलांवर लक्ष ठेवतो. कोणी चुकत असेल तर नेमकं काय करायचं ते सांगतो. कोण कोणती केमिकल्स खर्च झाले त्यांची नोंद करतो. आणि रीप्लेस करतो. बाकी स्टोअर ची काम असतात ती करतो.” - लॅब इन्चार्ज

“खर्च झालेल्या केमिकल्स ची प्रत्येक प्रॅक्टिकल नंतर नोंद करता का?”

“नाही पण साधारण आम्हाला कल्पना असते, बाटल्या कधी रिकाम्या होतील त्याची, त्यामुळे  त्याप्रमाणे आम्ही अॅक्शन घेतो.” - लॅब इन्चार्ज

“मग यांची नोंद कशी ठेवता? म्हणजे प्रत्येक प्रॅक्टिकल नंतर रजिस्टर भरता का?”

“नाही स्टोअर मधलं केमिकल संपलं की आम्ही इश्यू दाखवतो, आणि संपायच्या आधीच नवीन मागवतो आणि तशी नोंद करतो.” - लॅब इन्चार्ज

“मधल्या काळात जर काही कारणाने एखाद केमिकल नेहमी पेक्षा लवकर संपलं तर कशी नोंद करता? म्हणजे एखादी बाटली पडली, फुटली, रसायन वाया गेल तर काय करता?”

“नाही थोडं फार वाया गेल तर त्यांची काही खास अशी नोंद नसते.” - लॅब इन्चार्ज

“म्हणजे समजा कोणी छोटी बाटली आणून रोज वेगवेगळे रसायनं चमचा चमचा नेले तर तुमच्या लक्षात येणार नाही. आणि नोंदही होणार नाही.”

“हो काही काही पोरांना घरी काही करायची हौस असते त्यामुळे अस अधून मधून घडतं. पण ती पोरं पकडल्या जातात. आणि त्यांना दंडही होतो.”- लॅब इन्चार्ज

“हे पोरांबद्दल सांगता आहात. जर कोणी लेक्चरर अस करत असेल तर तो पण पकडल्या जातो का, आणि दंड ही होतो? अगदी १०० टक्के पकडल्या जातात?”

“साहेब, सर लोक अस का करतील? पण अस ठाम पणे काही सांगता येणार नाही. पण आमच बारीक लक्ष असतं.” - लॅब इन्चार्ज

“ओके. तुम्ही चांगली माहिती दिलीत. अहो आम्हाला त्यातलं काही कळत नाही म्हणून विचाराव लागतं. धन्यवाद.”

प्रिन्सिपल च्या ऑफिस मध्ये जाऊन त्यांना थॅंक्स दिलेत. आणि कार्तिक जो पर्यन्त नोकरीला होता त्या संपूर्ण काळातले स्टोअर्स चे रेकॉर्ड कॉपी करून आठवड्या भरात पाठवायला सांगितले. आता रेकॉर्ड आल्यावर त्यांची छाननी करून ठरवता येईल की कार्तिकचा संबंध किती आहे ते.

कॉलेज मधून बाहेर पडल्यावर मी परतीची वाट पकडली, पण विचार डोक्यात घोळत असल्याने, लक्षात आलं की निकीताचे मामा औरंगाबादलाच राहतात, त्यांच्याशी बोलणं झालच नव्हतं. मग काही माहिती मिळते का ते बघावं म्हणून  निकीता च्या मामा च्या घराकडे मोर्चा वळवला. मामा मामी घरीच होते. मी त्यांना आपली ओळख दिली आणि सांगितलं की जुनी फाइल ओपन झाली आहे आणि पुन्हा तपास चालू झाला आहे. नितीन आणि अविनाशच्या खूनात निकिता चा किती सहभाग आहे हे शोधून काढणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर निकिता कायम संशयाच्या घेऱ्यात राहील. मामांनी मग थोडा विचार केला आणि सहकार्य करायचं कबूल केलं.

“मग आता मला सांगा की कार्तिक आणि निकीताचे संबंध कसे होते?”

“ते दोघं एकाच कॉलेज मध्ये होते आणि चांगले मित्र होते.” – मामा  

“बस एवढंच? अजून काही नाही? आम्ही तर ऐकलं आहे की त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं म्हणून.”

मामा थोडे घोटाळले पण मग म्हणाले की

“होय. खरं आहे. तुमचं म्हणण.”

“मग अस असतांना तुम्ही त्यांच्या लग्नाला नकार का दिला. तुम्हाला त्यांची जवळीक मान्य नव्हती का?”

“नाही हे खरं नाहीये. आम्हालाही त्यांची मैत्री किती पुढे गेली आहे ते  दिसत होतं. म्हणून आम्ही एक दिवस सरळच तिला विचारलं. मामांच्या नजरेसमोर त्या दिवशीचा प्रसंग तरळला.

........

“काय ग निकिता, तुझ्या आणि कार्तिक बद्दल ऐकतो आहे ते खरं आहे ?” -मामा

“तुम्ही काय ऐकलं आहे, ते मला माहीत नाही. पण कार्तिक मला आवडतो हे खरं आहे. आणि मामा तो खूप चांगला मुलगा आहे हे तुम्हाला पण माहीत आहे. नेहमी तुम्हीच त्याची किती तारीफ करता.” – निकिता.  

“हो बाळा बरोबर आहे. पण लग्न म्हणजे आयुष्य भराचा प्रश्न असतो. त्यामुळे आपल्याला त्यांची सर्व माहिती असणं आवश्यक आहे अस मला वाटतं. कोण आहे, कसा आहे, घर घराणं कसं आहे हे सगळं बघाव  लागणार आहेच न.” – मामा.  

“मामा आम्ही अजून या विषयावर बोललो नाहीये. मला तो आवडतो पण त्याच माझ्या विषयी काय मत आहे हे मला माहीत नाही. पण अंदाज आहे.” – निकिता.  

“ठीक आहे मग मी वेळ पाहून त्यांच्याशी बोलतो. मुलगा चांगला आहे यात वादच नाहीये. पण चौकशी केलेली बरी अस मला वाटतं. मागाहून वाईट वाटायला नको.” मामा म्हणाले.  

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com