निकिता राजे चिटणीस - भाग ३५ (अंतिम) Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग ३५ (अंतिम)

निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

21.    साटोरे                  बबन चे वडील.

22.    चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

23.    वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

24.  चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ

25.    विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको

26.    निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा

27.    शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

28.    पाटील                  पोलिस इंस्पेक्टर

29.    परब                   सब इंस्पेक्टर

30.    गवळी                  कॉन्स्टेबल

31.    मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

32.    देसाई                   आर्किटेक्ट

33.  सारंग                   काँट्रॅक्टर

भाग ३५  (अंतिम )     

भाग ३४ वरून  पुढे  वाचा .........

इंस्पेक्टर मळेकर

“ठीक आहे. आता वेळ आलीच आहे तर सांगते.” – शशिकलाबाई.  

“राधाबाई, एखादा बॉक्स घेऊन या.” राधाबाईंनी बॉक्स आणल्यावर, शशिकलाबाई म्हणाल्या की

“तुमच्या खिशात जे काही असेल ते या बॉक्स मधे ठेवा.” आम्ही आमच्या वस्तु बॉक्स मधे ठेवल्या. शशिकलाबाई हुशार होत्या, सावधगिरी म्हणून त्यांनी आमचे मोबाइल बॉक्स मधे ठेवायला सांगीतले आणि बॉक्स उचलून दूर डायनिंग टेबल वर ठेवला “हं आता तुम्ही एवढी मेहनत घेतली आहे तेंव्हा तुमच्या कष्टाला मान द्यायलाच पाहिजे. म्हणून सांगते.” – शशिकलाबाई

“हो, मीच बबनला पाठवलं होतं. राधाबाईंना यातलं काहीच माहीत नाही.” शशिकलाबाईंनी आता सांगायला सुरवात केली. “बबन ने फक्त पोस्टमन च काम केलं. पार्सल मध्ये काय आहे हे त्याला माहीत नव्हतं. बबन ला सुट्टी घ्यायला लावली त्यामुळे अविनाश ला काहीच कळलं नाही. मी इंजेक्शन तयार करून संधीची वाट बघत होते. सोयीस्कर वेळ पाहून मीच इंजेक्शन दिलं. जन्मभर डोक्यावर सवत आणून बसवली, म्हणून मला त्याचा सुड घ्यायचा होता. तो घेतला. त्याबद्दल मला अजिबात खेद नाही. राधाबाई आणि माझं छान जमलं म्हणून, नाहीतर आयुष्य वैराणच झालं असतं. राधाबाईंना  सुद्धा अविनाशने फार त्रास दिला. आयुष्यभर बिचारीला स्वयंपाकीण म्हणूनच वावराव लागलं. पण हे सगळं मी एकटीनेच प्लॅन केलं आणि शेवटाला नेलं. त्यात राधाबाईंचा काहीच  सहभाग नाहीये. त्या साध्या आहेत बिचाऱ्या. त्यांना यातलं काहीच माहीत नाहीये. त्यांच्या मामेभावाशी मी सरळ संपर्क केला होता, राधाबाईंना या बद्दल काहीच माहिती नाहीये.  त्या बद्दल मी भरपूर पैसे मोजले आहेत.”

“नितीन चा खून का केलात? तो तर तुमचा मुलगा होता.”

“त्याबद्दल मी स्वत:ला कधीच माफ करू शकणार नाही. तो एक अपघात होता साहेब.” – शशिकलाबाई

“अपघात? नितीनचा मृत्यू विषप्रयोगाने झाला. त्याला तुम्ही अपघात म्हणता?”

“हो साहेब, अविनाशला संपवण्याचा प्लॅन मी फार फार विचार करून ठरवला होता . अन्नातून विषप्रयोग करणं सोपं होत पण माझ्यापर्यंत पोलिस पाचच मिनिटांत पोचले असते. मग अविनाश रोज डबा न्यायचा. त्याचा विचार केला. पण त्यात सुद्धा मी अडकलेच असते. मग चमच्याची आयडिया आली. अविनाशच्या डब्यात रोज चमचा जायचा. त्याला विष लाऊन पाठवणार होते. पण लक्षात आलं की हा सुद्धा सुरक्षित मार्ग नाहीये. मग एकदमच १२ साधे चमचे टिशू पेपर मध्ये वेगवेगळे गुंडाळून ऑफिस मध्ये ठेवायला सुरवात केली. यांची सवय झाल्यावर एका चमच्याला  थोड विष लाऊन १२ चमच्याचा सेट पाठवला. विषाच्या चमच्याचा उपयोग आधी झाला असता तर इंजेक्शन ची जरूरच पडली नसती आणि ऑफिस मध्ये मृत्यू झाल्यामुळे मी तशीच नामानिराळी राहिले असते. दोन्ही पर्याय मी खुले ठेवले होते. पण त्या चमच्याचा नंबर यायच्या आधीच मला इंजेक्शन देण्याची संधि मिळाली. अविनाशच्या मृत्यू नंतर मी  चमचे घरी आणायला हवे होते. पण मी विसरून गेले की ऑफिस मधले चमचे आणायला हवेत म्हणून. एक वर्ष मधे गेलं आणि नंतर थोडा सावरल्यावर, नितीन ऑफिस मध्ये जायला लागला. त्याचा डबा निकीताच भरत होती. ती चमचा पण द्यायची म्हणून बरेच दिवस काहीच झालं नाही. पण हा क्रम आम्ही नर्मदा टूर ला गेलो तेंव्हा तुटला आणि नितीनने त्यातलाच एक चमचा घेतला आणि तो नेमका विषाचा निघाला. साहेब, नशीबानेच माझा सूड घेतला. संपलं सगळं. देवानेच मला जबरदस्त शिक्षा केली. त्यामुळे आता फक्त निकिता कशी सुखी होईल एवढाच विचार मी करते आहे. पापक्षालनासाठी हा एकच मार्ग मला दिसतो आहे.”

“तुम्ही सगळं कबूल केलत हे बर केलत. अर्थात दोन दोन खुनाच्या आरोपामुळे तुमची शिक्षा कमी होण्याची अजिबात शक्यता नाही. तरी पण तुमच्या वया कडे बघून मी तसा प्रयत्न करीन. आत्ता तुम्ही जो काही कबुलीजबाब दिला आहे तो लिहून आणि सही करून मला द्या.”

“इंस्पेक्टर साहेब मला सांगा तुम्ही माझ्यावर चार्ज शीट दाखल करणार आणि मग मला पकडून माझ्यावर खटला चालवणार बरोबर न?” – शशिकलाबाई

“हो”

“पण हा खटला उभा कशाच्या जोरावर करणार तुम्ही? कुठलाही पुरावा तुमच्याजवळ नाहीये. मी कबुली जबाब नक्कीच देणार नाही.” आता शशिकलाबाई आक्रमक झाल्या होत्या. “आणि तुम्ही म्हणता तसा राधाबाईंचा मामेभाऊ पण साक्ष द्यायला तयार होईल अस वाटतंय तुम्हाला? शक्यच नाही. आता तुम्हाला तो सापडणार पण नाही. आदिवासी आहे तो, जंगलात कसं विरघळून जायचं, हे त्याला कोणी  शिकवण्याची जरूर नाही. रायगडच्या दवाखान्याचं पत्र तुमच्या जवळ आहे म्हणता, पण त्याचा आणि खूनाचा कसा काय संबंध लावणार तुम्ही ? बबन ला जेंव्हा कळेल की त्याच्या आईला अविनाशने फसवलं आणि त्यामुळे त्याची आणि आईची समोरा समोर असूनही, जन्म भर, भेट होऊ शकली नाही, तेंव्हा तो साक्ष देईल? तुम्ही म्हणता की साटोरे  दर सहा महिन्यांनी बस्तर  मधे जात होते  पण माझा आणि त्यांचा काहीच संबंध नाही. त्यांचा आणि अविनाश चा संबंध होता. ते पण साक्ष देतील असं वाटतं तुम्हाला? अहो, ही सगळी आमची जिवाभावाची माणसं आहेत. ते काहीच बोलणार नाहीत. ते इंजेक्शन तुमच्या जवळ  आहे पण साधी इंसुलिन देण्याची सुई आहे ती. तुम्हाला आत्ता सापडली, १२ वर्षा पूर्वी याच सुइने मी अविनाश चा मृत्यू घडवून आणला हे कसं सिद्ध करणार तुम्ही. ऑफिस मध्ये चमचे ठेवले आणि नितीनचा मृत्यू झाला अस मीच तुम्हाला सांगितलं. तुमच्याजवळ काय प्रमाण आहे ? आमच्या घराची झडती  आधी घेऊन झाली आहे. विषाचा मागमूस तरी कोणाला सापडला का? आजही तुम्ही सर्च वॉरंट घेऊन या आणि शोधा, नो प्रॉब्लेम.” शशिकलाबाई थांबल्या, दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाल्या.

“अस बघा इंस्पेक्टर साहेब. जे काही मी केलं त्याचा मला फार त्रास होतो आहे आणि पाप केल्यावर त्याचं प्रायश्चित्त घेणं हा एक मार्ग आहे. आणि मी तोच अनुसरते आहे. माझी सगळी पुंजी मी आमच्या लोकांच्या वेलफेअर साठी खर्च करते आहे. माझ्यासाठी मी काहीही ठेवत नाहीये. ही सर्व कामं पूर्ण झाली की दूर कुठे तरी हरिद्वार किंवा अशाच ठिकाणी जाऊन संन्यास घेणार आहे. साहेब आता आयुष्यात काहीच उरलं नाहीये. या उप्पर सुद्धा तुम्हाला मला अडकवायचं असेल तर तस करा. तुमची ड्यूटि आहे ती. पण साध्य काहीही होणार नाही हे पक्कं.”

“या संगळ्यांमद्धे फक्त माझी आणि आमच्या कंपनी ची बदनामी होईल. सिद्ध काहीच होणार नाहीये. निकिता ला जेंव्हा कळेल की मीच सूत्रधार आहे, तेंव्हा निकिता आणि शशांक च आयुष्य काळवंडून जाईल. १०० लोक काम करतात आमच्याकडे. त्यांच्या सुखा करता आम्ही आम्ही काय काय करतोय हे जरा जाऊन बघा. मी तर माझी सगळी गंगाजळी संपवली त्यांच्यासाठी, त्यांना हे पटेल का? आणि कंपनीची बदनामी झाली तर व्यवसायावर परिणाम होईल. कंपनी जर बंद पडली तर हे १०० कुटुंब बेघर आणि बेरोजगार होतील. आणि अस जर झालं, तर मी तर, अडकणारच नाहीये पण विनाकारण मानहानि  केल्याबद्दल तुमची सुटका होईल का? सरकारला आमच्यामुळे जो करोडो रुपयांचा महसूल मिळतो तो बंद होईल. त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला देता येईल का? माझं ऐका सोडून द्या हे सर्व. फाइल बंद करा. पहा विचार करा.”

आम्ही हात हलवतच पोलिस स्टेशन ला आलो. चिटणीस बाई म्हणाल्या त्यातला एक एक शब्द खरा  होता. आमच्या जवळ आमच्या अंदाजाशिवाय काहींच नव्हतं.  आणि चिटणीस बाई खरंच पापक्षालनासाठी आपल्या जवळची गंगाजळी लोकांसाठी उधळत होत्या. आणि हे आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघितलं पण होतं. “गवळी तुम्ही काय म्हणताय?”

“साहेब फाइल पूर्वीच बंद झाली आहे. रीओपन  करणार होतो, ती न करता तशीच ठेऊन देऊ. अजून काय सांगू.” – गवळी.  

“हं. बरोबर आहे. तसंच करावं लागणार, अस दिसतंय. काय करणार ?” ****समाप्त******

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com