गुलाबजाम Vrishali Gotkhindikar द्वारा अन्न आणि कृती मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुलाबजाम

🥀गुलाबजाम🥀


🥀गुलाबजाम करताना आईची आठवण होतेचआईच्या हातचे गुलाबजाम "कमाल" असायचे तसा मी कोणताच पदार्थ आईकडून असा शिकले नाहीकारण मी स्वयंपाक घरात काम केलेले आईला आवडत नसेतिचे म्हणणे... लग्नानंतर करायचेच आहे कीआत्ता अभ्यास करा, खेळा, निवांत रहा🥀पण आई प्रत्येक पदार्थ करताना मी बघत असेकदाचित त्या वेळेस ते मनात झिरपत गेले असावे  तिने गुलाबजाम करायला घेतले की मात्र माझी गडबड चालू व्हायची..आई मला दे करायला..मी करणार.. अशी मी भुणभुण करीत असे🥀शेवटीं आई मला त्यात सामील करीत असेखवा.मैद्याचा डबा, चारोळे, पाकाचे साहित्य सगळे गोळा करून ती गॅस जवळ बसे आधी हात धुवून स्वच्छ पुसुन ये बघू...मी लगेच हात धुवून पुसून येत असे......घे आता हा खवा परातीत...मी पिशवीतला खवा परातीत घेतलाकी ती सांगे  ..🥀छान हाताने तो आधी मऊ करून घेखरेतर कोल्हापूरला आमच्याकडे मऊसूत खवा मिळतोतरीही ती तिची पद्धत असे 🥀आता मी घालते वरून मैदा तो हळूहळू खव्यात मिसळ..ती मैदा नक्की किती घालतं असे तीलाच माहीत...🙂धसमुसळपणाने नको करुस😀हलक्या हाताने कर.. परत तीची सुचना येईहा पदार्थ शांतपणें आणि निगुतीने झाला पाहिजे...🥀आई आणखीन थोडा घाल ना मैदा...नको इतका पुरे आहे..."गुलाबजाम कसे ओठाने खाण्या सारखे मुलायम व्हायला हवेत...."❤️हे तिचे आवडीचे वाक्य होते🥀आता ठेव तो गोळा झाकून तोवर मी पाक करतेती पाक करीत असतानामी तिला वेलदोडे कुटून देत असे(तेव्हा केशर ही चैन परवडणारी नव्हती)पाक उकळू लागणार असे दिसल्यावर ती मला गुलाबजाम मिश्रणाचे गोळे करायला सांगेमध्यम आकाराच्या गोळ्यात छोटा खड्डा  करून तीन चार चारोळी भरायला सांगे(गुलाबजाम मध्ये चारोळी भरणे ही खास तिची स्टाईल होती.(. तेंव्हा काजु प्रकार खुप महाग असायचा)🥀चारोळी भरुन परत मी त्या गोळ्यांचे तोंड मिटवून गोल करून ताटात ठेवत असेआता आईने कढई ठेवलेली असे मंद आचेवर ती गुलाबजाम तळायला घेई🥀गुलाबजाम तांबूस तपकिरी झाला की ती लगेच तो घाणा बाहेर काढून एका पातेल्यावर चाळणी ठेवून ते गुलाबजाम तेल निथळत  ठेवत असे🥀असे सगळे गुलाबजाम करून झाले की दुसऱ्या एका मोठया पसरट वाडग्यात ते गुलाबजाम अलगद ठेवून ती वरून वेलदोडे पुड घातलेला गरम पाक हलकेच ओतत असेज्यामुळे गुलाबजाम पाक चांगला शोषतात व पाक ही कमी लागतो ... असे ती म्हणे 🙂(मलाही हीच सवय आहे)ईतके सगळे झाले की ती पातेल्यावर ताट झाकुन ठेवत असे🥀तास भर तरी इकडे फिरकायचे नाहींअशी मला ताकीद असे😀😀मी तिथच घोटाळत असे...कसातरी तास भर वेळ काढल्यावर ती पातेले उघडत असे🥀एव्हाना गुलाबजाम फुलून दुप्पट झालेले असायचेएक गुलाबजाम आणि थोडा पाक वाटीत ती मला देत असेती वाटी घेउन खिडकीत बसून तो मखमली चविष्ट गुलाबजाम चमच्याने खाताना माझी ब्रम्हानंदी टाळी लागत असे..❤️🥀त्या वेळी घरी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ती नमुना म्हणून एखादा तरी गुलाबजाम खाऊ घालतच असे🥀सगळी खुप तारीफ करीत त्या गुलाबजाम ची...❤️मला मात्र... हे गुलाबजाम  असे तिने जर असे सगळ्यांना वाटले तर ते संपून जातील ना.... अशा विचाराने तेव्हा खुप राग येत असे..😀😀 🥀ड्राय फ्रुट भरलेले गुलाबजाम🥀🥀सगळ्यांच्या घरी गुलाबजाम करतातपण प्रत्येकीची एक पद्धत असतेघटक पदार्थ वापरण्याची..आणि गुलाबजाम बनवायचीहे मी केलेले माझ्या आईच्या स्टाईलचे गुलाबजाम 🥀साहित्य अर्धा किलो खवापाव वाटी मैदाएक वाटी साखरएक वाटी पाणीवेलदोडे केशर.. पाका साठीकाजू, पिस्ता, बदाम, मनुकेअसे कसलेही ड्राय फ्रूट चे तुकडे अथवा चारोळ्या आत स्टफ करण्यासाठी 🥀कृती🥀 प्रथम वेलदोडे केशर घालून एकतारी पाक करणे 🥀कोल्हापूरला खवा अगदी मऊ आणि ताजा मिळतोहातानेच थोडा एकजीव करावा 🥀खव्यात पाव वाटी मैदा घालून चांगलं मळून घेणेदहा मिनिटे मिश्रण झाकून ठेवणेनंतर याची वाटी करून मध्यभागी ड्राय फ्रुट भरुन पुर्ण गोल गोळे तयार करणे 🥀मंद आचेवर तेलात अथवा तुपात तळूनघेणे तेल निथळले की एका पसरट भांड्यात ठेवून त्यावर केलेला साखरेचा गरम पाक ओतावा व झाकून ठेवावे 🥀तासाभरात छान फुगतात आणि मुरतात ड्राय फ्रुट भरल्याने एक वेगळी चव लागते🥀टीपकित्येक वेळा गुलाबजाम संपतात पण पाक शिल्लक राहतो..तो पुन्हा संपवावा लागतो😀अशा वेळेस नेहमीपेक्षा थोडा पाक कमी करावा व माझ्या आईच्या कृती प्रमाणे गुलाबजाम वर पाक ओतावा🙂