देवी अन्नपूर्णा आणि आणि आठवणी मध्यंतरी एका हॉटेलमध्ये गेले तेव्हा अन्नपूर्णेची एक दुर्मिळ तस्वीर दिसली फोटो पाहून मन अतिशय प्रसन्न झाले😊लगेच तो मोबाईल मध्ये कैद केला अन्नपूर्णा याचा (शब्दशः अर्थ - अन्नाने भरलेली) ही एक हिंदू देवता आहे. हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे देवी अन्नपूर्णा ही एक लोकप्रिय देवता मानली जाते. अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे, असे मानले जाते.स्वतः ,ज्याला पाच मुखे आहेत असा शंकर; गजमुख विनायक, आणि सहा मुख असणारा स्कंद, हे त्याचे दोन मुलगे अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे कारण त्याच्या घरी साक्षात अन्नपूर्णा (पार्वती) आहे.जिवाची प्रवृत्ती ऐहिक असो वा आध्यात्मिक, स्वार्थी असो वा परोपकारी, अन्न ही त्याची प्राथमिक आणि अपरिहार्य आवश्यकता आहे. अशा या जीवनहेतू अन्नाची अधिष्ठात्री देवता म्हणजेच अन्नपूर्णा. घरोघरीच्या देवतायनांत प्रतिष्ठित झालेली ही देवी, कधी चैत्र-वैशाखात झोपाळ्यावर बसून झोके घेते, तर कधी नवरात्राच्या घटात विराजमान होते. अन्नपूर्णा हे शिवपत्नी गौरीचेच रूप असल्याचे मानले जाते. 🙏दैवतशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास सावित्री, सरस्वती, लक्ष्मी आणि भूमी या देवीरूपांशीही ते संबंधित असल्याचे जाणवते. पू ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली मधील "हरितात्या"या व्यक्तिचित्रात म्हणतात "माझी आजी “अन्नपुर्णा “होती तिने तिच्या हाताने पाणी जरी वाढले तरी ते अधिक गोड लागत असे"आपल्या अवती भवती सुध्दा खाणाऱ्याच्या मनाची तृप्ती करणाऱ्या अनेक अन्नपुर्णा असतात 😊आई,आजी ,सासूबाई ,कधी मावशी कधी आत्या तर कधी शेजारीण अशा अनेक ..सर्वात प्रथम आपल्या आयुष्यात अन्नपूर्णेचे रूपात येते आपली आजी ..😊आपल्याला आवडत असतात आपल्या आजीने केलेले सर्व पदार्थआपण सुद्धा तिची “दुधावरची साय “असतो .तिच्या हातचा प्रत्येक पदार्थ एवढा फेवरेट असतो की मोठे झाल्यावर आपल्याला आजीसारखा स्वयंपाक यायला हवा असे आपण पक्के केलेले असते .आजीच्या सोबत राहून तिने केलेला स्वयंपाक आपण लहानपणापासून पाहिलेला असल्याने आजीच्या पाककृती बेस्ट असतात हे आपल अगदी पक्क मत असत!असेच माझ्या आजीच्या बाबतीत सुध्दा होतें😊आजी खुप छान पदार्थ करीत असे.तिला पंचक्रोशीत सगळे सुगरण मामी म्हणत .मामी हे तिचे गावातले नाव होते अगदी कोंड्याचा मांडा करणारी ती स्त्री होतीयाचे कारण होते घरातली गरिबी...घरचा कर्ता पुरुष (माझे आजोबा) दहा वर्षे अंथरुणाला खिळून..😥तुटपुंजी शेती, पैशाची आवक काहीच नाही घरात एक रामाचे देउळ होतेंगावचे भाविक थोडे तांदुळ, घरची काहीं फळे, भाजी वगैरे देवापुढे ठेवतकधीतरी पैसे ठेवत ...त्या काळी कुठं लोकांकडे तरी जास्त पैसा होता ?घरचे थोडे म्हशीचे दुध ..त्याचे रतीब घालून उरलेले ताक करून विकणेलोकांच्या घरी कधी मोठ्या कार्यात मदतीला जाऊन जे काय थोडेफार मिळेल त्यासहीत कसेतरी संसाराचा गाडा ढकलणे...आला गेला पाहुणा असेल तर त्याचे आहे त्यातच आतिथ्य करणे .भरीत भर माझी मावशी दोन मुलींना घेउन नवऱ्याने सोडल्याने परत माहेरी आलेली ..परंतु आजीने केलेला प्रत्येक पदार्थ अपुऱ्या साहित्यातला जरी असला तरी चविष्ट असे😋सगळ्यात हातखंडा गोड वड्या करण्यात होताकुठल्याही गोष्टीच्या वड्या दुधाच्या, दह्याच्या, सुंठीच्या, आल्याच्या,खोबऱ्याच्या अशा अनेक... ती उत्तम आणि चविष्ट करीत असे😊कुठलीही गोष्ट टाकायची नाही हा तिचा कटाक्ष असे .भाताच्या कोंड्यात सुद्धा ती दही तिखट मीठ घालून छोट्या छोट्या वड्या करून उन्हात वाळवत असेत्या तळल्या की खुप चवीष्ट लागतं😋त्याला ती कोंडवड्या म्हणत असे.तशा कोंडवड्या मी परत कधी खाल्ल्या नाहीत आजीच्या सर्वच आठवणी कायम स्मरणात राहतीलवंदन त्या अन्नपूर्णेला 🙏यानंतर अन्नपुर्णा म्हणून आठवते ती आपली आईजीने आपल्याला आपल्या आवडीचे अनेक चविष्ट पदार्थ करून घातलेले असतात😋तिच्या हाताखाली आपण मुळ स्वयंपाकाचे धडे घेतलेले असतात.माझी आई शिक्षिका होती यामुळे नोकरी, घरकाम, स्वयंपाक व घरचे शिवण यात ती अतिशय व्यस्त असे.तिच्या हातची कांदा भजी, थालिपीठ,मसालेभात खायला घरचे बाहेरचे सर्वच इच्छुक असत.अगदी ऐन वेळा येऊन तिला कोणी कांदा भजी मागितली तरी ती झटपट करून घालत असे.तिला सगळे "सुगरण" म्हणत..तसे ती कोणताच पदार्थ कधीं प्रमाण घेऊन करीत नसेतरीहि पदार्थ चविष्ट असेकित्येकदा वेळेअभावी किंवा गडबडीत केलेला एखादा पदार्थ फसत असेतरीहि तो चवीला सरसच असे 😊तिला भरतकाम विणकाम याचीही आवड होतीवेळ मिळेल तेव्हा ती क्रोशाचे ,विणकामाचे अनेक प्रकार करीत असेतिने उरलेल्या लोकरीत विणलेला एक रुमाल माझ्या संग्रही आहे असे अनेक प्रकारचे क्रोशाचे रुमाल ती करीत असे आईने तिच्या लग्नाच्या आधी करायला घेतलेला तिच्या हातचा क्रोशाचा पडदा..💗अजूनही संग्रही आहे आईला तिच्या स्वयंपाक घराच्या संपूर्ण दरवाजाला हा पडदा करायचा होतापण नोकरी...स्वयंपाक...घरचे शिवण....आला गेला पाहुणा..अशा अनेक व्यापात तो तसाच अर्धा राहिला होतातिच्या मृत्यू नंतरमी तो घरी आणला होता तिची आठवण म्हणून काही वर्ष आम्हीं तो पडदा टीव्ही वर टाकत होतो.आता माञ हा पडदा गणपती च्या सजावटी साठी एक मैत्रीण घेऊन गेली 😊आईच्या इतक्या छान कलाकारी लागणपतीच्या पायाशी जागा मिळालीयाचे खुप समाधान वाटले 💗तसेच तिने वेलदोड्याच्या सालीपासून फांदीवर बसलेली चिमणीची जोडी केली होती .खाली स्वतचे नाव सौ निर्मला ल देव असे अभिमानाने लिहिले होते 😊अनेक वर्षे तिला त्यासाठी साधी फ्रेम करायला ही जमले नव्हते. नंतर मात्र मीच ती अडगळीच्या कपाटातून बाहेर काढली आणि फ्रेम करून आईच्या घरी बाहेरच्या खोलीत लावली .तेव्हा तिला खूप आनंद झाला होता आपल्या व्यग्र दिनक्रमात सुद्धा अनेकांचे आतिथ्य करणाऱ्या आणि त्यांचा दुवा घेणाऱ्या नमन त्या अन्नपूर्णेला 🙏..या माहेरपणाच्या पर्वानंतर आपल्या आयुष्यात आगमन होते आपल्या सासुबाईंचे ज्यांच्याकडून आपल्याला आणखी स्वयंपाकातील कर्तब ,स्वयंपाकातील छोट्या छोट्या क्लुप्ती शिकायला मिळतात नवीन नवीन पदार्थ खायला आणि शिकायला मिळतात .माझ्या सासुबाई सुद्धा खूप सुगरण होत्या😊 सासरच्या त्या मोठ्या कुटुंबात अनेक बायकांच्या गोतावळ्यात त्या "एक नंबर सुगरण "म्हणून नावाजल्या जात😊 त्यांच्या हातचा प्रत्येक पदार्थ दिसायला आणि चवीला सुबक असे .त्यांचे करणे सुद्धा अगदी निगुतीने असे शांतपणे ,व्यवस्थित तयारी करून ,कुठेही गडबड गोंधळ नाही योग्य ती चव आणि पोत त्या त्या पदार्थाला आलाच पाहीजे असा कटाक्ष त्यांच्या स्वयंपाकात असे.त्यांच्या हातच्या लुसलुशीत पुरणपोळ्या ,अत्यंत पातळ गुळपोळ्या , मऊसुत सांज्याच्या पोळ्या ..घडीव देखणे चविष्ट मोदक,विविध प्रकारचे लाडू याला तर तोडच नसायची अनेक प्रकारची लोणची त्या अप्रतिम करीत असत 😊ती सुद्धा भल्या मोठ्या बरण्या भरून ..अनेक लोकांना प्रेमाने चविष्ट पदार्थ खाऊ घालणाऱ्या..नमन त्या अन्नपूर्णेला 🙏अशा अन्नपूर्णेच्या सहवासात जीवन समृद्ध झाले आहे .❤️कितीही छान पदार्थ कितीही निगुतीने केले तरी त्यांच्या नखाची सुद्धा सर आपल्याला येणार नाही .आता त्या तिघीना या जगातून जाऊन कित्येक वर्षे झालीत आज देवी अन्नपूर्णे च्या निमित्ताने या सर्वांना अभिवादन करायची संधी मिळाली 🙏तुमच्याही आयुष्यात अशा अन्नपूर्णा नक्कीच आल्या असतील