स्पर्श पावसाचा ?️ - 15 Akash द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श पावसाचा ?️ - 15

जीवनामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. त्या विधात्याने आपल्या नशिबात काय आणि कशा साठी हे असे लिहून ठेवलेला आहे. आपण कधीच नाही समजू शकत. ते आपल्याला कधीच नाही कळत पण जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं हे मात्र नक्की
राजला तिथे बघून मी थोडा सरप्राईज झालो होतो तो तिथे का आला असेल.? असा मला प्रश्न पडला मला बघितल्या वर त्याला पण तोच प्रश्न पडला असावा, तो कॉफी घेऊन माजा कडे आला आणि मी जो प्रश्न त्याला विचारणार तोच त्याने मला विचारला. "तू akash ना.? तू इथे काय करतोय .? मी जा कामासाठी आलो होतो,ते सर्व त्याला सागितले, आणि त्याला तोच प्रश्न केला," तू इथे कसे काय ..? तो लगेच बोला " तेजु साठी आलो आहे " 
"तेजी साठी.? , ती इथे आहे ? " मी बोलो " हो " राजने उत्तर दिलं , त्याने कॉफी धरलेल्या हातानी एक टेबल दाखवला , त्या टेबलवर तेजी बसली होती , कोणता तर पुस्तक खूप मन लाऊन वाचत बसली होती. तेवढ्यात राज बोला " तेजू चा पण आज इथे exam आहे, त्या साठीच तिचा सोबत आलो आहे , मला वाटलं तू तिलाच भेटायला आला आहे " मी  नाही म्हणून मान हलवली. त्यांनी त्यांच्या दोघांसाठी घेतलेली कॉफी माजा कडे दिली आणि बोला, " तू ही कॉफी घे आणि तेजू कडे जा , मी तुझा साठी पण एक घेऊन येतो"
मी ती कॉफी घेऊन तेजी कडे निघालो,
मी तिचा कडे निघालो पण मना मध्ये अनेक प्रश्नांनी घेराव घातला , तिला काय बोलावे ? ती मला काय बोलेल ? सुर्वात कुठून करावी ? मोठे झालो तसे किती बदले आहे ना सर्व, लहान असतो तर इथूनच आवाज दिला असता मी , पण मोठे पणी किती फॉर्मलिटी वाढतात, शिस्तीचा बोलणं वाढता  
मी तिचा जवळ पोहोचलो कॉफी टेबलवर ठेवली , ती त्या वाचण्या मध्येच गुंग होती , आणि अचानक तिने माजा हात पकडला आणि मला तिचा शेजारचा खुर्ची वर बसवली आणि माजा कडे न बघताच मला बोली , "हे बघ इथे काय लिहिले आहे" मी तिचा कडेच बघत होतो.तिला कदाचित मी राज वाटलो, किती क्यूट दिसत होती एका हरणीच्या लहान पिल्ला सारखे तिचे ते मोठे काळे डोळे , तसेच त्या डोळ्यांना शोभतील असे तिचे काळे मुलायम केस . त्या क्षणाला तिचा कडे पाहताना मी सारे जग विसरून गेलो होतो , खाली मान करून पुस्तक वाचत असल्या मुळे ती तिचा केसांची एक बट तिचा डोळ्या समोर येत होती , ती तिच्या गोऱ्या गालावर वाऱ्याच्या हलक्या झुळका बरोबर झोका खेळत होती, तेजी वर असणाऱ्या माजा प्रेमा मुळे ती मला एवढी सुंदर दिसत होती की खरंच तेवढी सुदंर आहे ती, तेच मला समजत न्हवते.  ती केसांची बट तिने गालावरून काना माघे घेत माजा कडे बघत बोली " तुला वाठे असे होऊ शकेल ? " आणि ती माजा कडे बघता एकदम दचकून शांत झाली आणि घाबरलेल्या आवाजात बोलली 
"Akya तू " तिला थोडा गोंधळलेला बघून तिला शांत करणाता साठी मी मजाक करत बोलो " नाही मी तेच भूत आहे " ती थोडी हसली आणि बोली " मग हे भूत इथे काय करताय.? " मी पुढे काही बोलणार येवढ्या मध्ये राज माझी coffee घेऊन आला , राजला बघताच तेजी बोली ," कुठे गेला होतास ? " " रे बाळा , तूच तर बोलेली तुझे डोकं दुखत आहे. म्हणून तुझा साठी  कॉफी आणायला गेलो होतो, तेवढ्या मध्ये हा तुझा मित्र akash दिसला म्हणून त्याचा साठी पण एक घेऊ आलो " राज बोला 
" हा का .? , माझी खूप काळजी आहे तुला " तेजी थोडा टोमणे दिल्या सारखा बोली " हो आहे बाळा " राज बोला 
"मग मी बोललेला ते कधी करायचा आपण ? " तेजी बोली  राज थोडा गंभीर होत बोला " तो विषय आता इथे नको " 
"तू नेहमी असेच करतोय आता,हे बोलणे टाळतो आहे " असे बोलून तेजी शांत झाली   2.3 मिनिट सर्व जण शत होते , मला तर याचा दोघा मध्ये काय बोलणे चालू आहे काहीच समजत न्हवते , मी आपला कॉफी पित त्याचे बोलणे एकात होतो,
कोणीच काही बोलत नाही म्हणून राजने बोलायला  सूर्वात केली, "akash तुझी गरलफ्रेंड पण असेच करते का ?"
राज असे बोलताच तेजी माजा कडे आणि मी तेजी कडे पाहिले, ती माजा कडे असे बघत होती की जणू तिला पण जाणून घ्याचे की माझी gf पण असे करते का ? "माझी कोणी गर्लफ्रेण्ड नाही" असे बोलून मी माझी कॉफी संपवली आणि cup टेबल वर ठेवत मी बोलो " काय करायचे आहे तेजीला ? करूदेना, का अडवत आहे" मला वाटले काही तरी class किवा course करायचा आहे तेजीला 
पण राज माजा कडे बघत बोला 
" तिला लग्न करायचे आहे "