Mr. Money - भाग 4 Shivraj Bhokare द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Mr. Money - भाग 4

 मिस्टर मनी  - भाग ४: 

वर्षे वेगाने सरकत होती आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डचे समीकरण बदलत होते. मनी आता बावीस वर्षांचा झाला होता. त्याचे शरीर आता केवळ मजबूत राहिले नव्हते, तर ते एखाद्या ग्रीक देवतेसारखे रेखीव आणि पोलादी बनले होते. ८ अ‍ॅब्स, रुंद खांदे, गोरा रंग आणि ते संमोहन करणारे निळे डोळे यांमुळे त्याचे व्यक्तिमत्त्व अत्यंत करारी दिसत होते. पण त्याहूनही भयानक होता त्याचा तीक्ष्ण मेंदू. दुसरीकडे, त्याला अंडरवर्ल्डचा उंबरठा दाखवणारा भास्कर भाई आता म्हातारा झाला होता. वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे अंडरवर्ल्डवरची त्याची पकड ढिली होत चालली होती.
याच संधीचा फायदा घेण्यासाठी मुंबईच्या गुन्हेगारी जगतातील दोन सर्वात मोठे आणि क्रूर डॉन टपून बसले होते – एक होता 'जफर खान' आणि दुसरा 'शेट्टी भाई'. जफर खान हा सोन्याची आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करायचा, तर शेट्टी भाईचे अंमली पदार्थांचे मोठे जाळे होते. या दोघांनी मिळून भास्कर भाईचे साम्राज्य मुळासकट उपटून टाकण्याचा आणि गोवंडी, मानखुर्दसह संपूर्ण पूर्व उपनगरावर ताबा मिळवण्याचा एक भयानक कट रचला.
एक दिवस रात्रीच्या वेळी, जेव्हा भास्कर भाई त्याच्या काही मोजक्या रक्षकांसह दक्षिण मुंबईतील एका गुप्त बैठकीवरून परतत होता, तेव्हा जफर खानच्या पाशवी शूटरनी त्याच्या गाडीवर एकाएकी अंधाधुंद गोळीबार केला. एके-४७ च्या गोळ्यांनी गाडीची चाळण झाली. भास्कर भाईचे रक्षक जागीच ठार झाले, तर भास्कर भाईच्या छातीत आणि पोटात तीन गोळ्या घुसल्या. कसाबसा जीव वाचवून त्याचा चालक त्याला मुंबईच्या एका अतिशय गुप्त आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन आला.
हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्याशुभ्र, शांत रूममध्ये भास्कर भाई मृत्यूच्या दारात उभा होता. त्याचे श्वास अंतिम घटका मोजत होते. मशीनचा बीप-बीप आवाज वातावरणातील तणाव वाढवत होता. मनी तिथे पोहोचला. त्याच्या मागे अभिनव अत्यंत गंभीर चेहऱ्याने उभा होता. मनी शांतपणे भास्कर भाईच्या बेडजवळ गेला. त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा एकही सुगावा नव्हता, त्याचे निळे डोळे नेहमीसारखेच भावनाविरहित आणि थंड होते.
भास्कर भाईने थरथरत्या आणि रक्ताने माखलेल्या हाताने मनीचा हात घट्ट पकडला. "मनी... मी आता वाचत नाही रे. माझा खेळ संपला. हे साम्राज्य... हे साम्राज्य मी खूप रक्ताचं पाणी करून उभं केलंय. जफर आणि शेट्टी... त्या कुत्र्यांनी मला पाठीमागून वार करून संपवलं. ते आता माझं सगळं बळकावणार आहेत. मला वचन दे मनी... तू त्यांना सोडणार नाहीस. या साम्राज्याला वाचव..." भास्कर भाईचे डोळे पांढरे होऊ लागले.
मनीने आपला हात काढला नाही. त्याने भास्करच्या हातावर दुसरा हात ठेवला आणि अतिशय संथ, खंबीर आवाजात म्हणाला, "भाई, तुम्ही शांतपणे जा. काळजी करू नका. तुमचे हे साम्राज्य कुठेही जाणार नाही. आज, याच क्षणापासून या साम्राज्याचा नवा राजा मी आहे. आणि जफर-शेट्टी? त्यांनी तुमच्यावर गोळ्या झाडल्या नाहीत, तर स्वतःच्या मृत्यूच्या वॉरंटवर सह्या केल्या आहेत. उद्या सकाळी मुंबईच्या इतिहासातून त्यांची नावं आणि नामोनिशान दोन्ही पुसली जातील."
हे ऐकताच भास्कर भाईच्या चेहऱ्यावर एक समाधानाचा भाव आला, त्याचा हात सैल पडला आणि त्याची प्राणज्योत मालवली.
भास्कर भाईच्या मृत्यूनंतर गँगमध्ये अंतर्गत बंडखोरी सुरू झाली. गँगचे काही जुने आणि वयोवृद्ध गुंड, जे स्वतःला खूप मोठे समजत होते, त्यांनी मनीच्या नेतृत्वाला उघड विरोध केला. "हा कालचा आलेला बावीस वर्षांचा पोरगा आमचा राजा बनणार? आम्ही याच्या हाताखाली काम करायचं का?" एका जुन्या गुंडाने बैठकीत टेबलवर हात आपटत विचारले.
बैठकीची ही खोली गोदामाच्या वरच्या भागात होती. मनी तिथे एका मोठ्या लेदरच्या खुर्चीवर शांतपणे बसला होता. त्याच्या उजव्या बाजूला त्याचा वैयक्तिक बॉडीगार्ड 'विक्रम' उभा होता. विक्रम हा सात फूट उंच, अवाढव्य शरीरयष्टी असलेला आणि कोणत्याही भावनेशिवाय लोकांचे गळे घोटणारा नरराक्षस होता. डाव्या बाजूला मनीचा नवीन पी.ए. (Personal Assistant) 'रोहित' सर्व फायली आणि माहिती घेऊन सज्ज उभा होता.
मनीने त्या विरोध करणाऱ्या गुंडाकडे पाहिले. त्याने टेबलवर ठेवलेला एक कागद उचलला. "तुमच्या सगळ्यांकडे फक्त दोन पर्याय आहेत," मनी अत्यंत शांत आणि जरब असलेल्या आवाजात बोलू लागला. "पहिला पर्याय – माझ्या हाताखाली काम करा, मी सांगेल ते ऐका आणि पुढच्या सहा महिन्यांत करोडपती व्हा. दुसरा पर्याय – आत्ताच्या आत्ता या खोलीतून बाहेर पडा. पण बाहेर पडल्यानंतर या इमारतीच्या पायऱ्या उतरण्यापूर्वी तुम्ही जिवंत राहाल की नाही, याची गॅरंटी मी देणार नाही."
मनीचे वाक्य संपताच विक्रमने आपल्या हातातील अद्ययावत मशीनगनचा सेफ्टी लॉक काढला. तो धातूचा आवाज त्या बंद खोलीत एवढा भयानक घुमला की, विरोध करणाऱ्या सर्व गुंडांचे अवसान गळाले. मनीच्या डोळ्यांतील ती क्रूर शांतता पाहून सगळ्यांना समजले की हा मुलगा बोलतो ते करतो. सगळ्यांनी मुकाट्याने आपली मान खाली घातली आणि मनीचे नेतृत्व स्वीकारले. मनी अधिकृतपणे अंडरवर्ल्डचा नवा 'किंग' झाला होता.
राजा बनल्यानंतर मनीने जुन्या पद्धतीचे गुन्हेगारी जग सोडून दिले. त्याला त्याचे साम्राज्य कॉर्पोरेट स्टाईलने आणि अत्याधुनिक पद्धतीने चालवायचे होते. त्याने सर्वात आधी स्वतःची एक अत्यंत गुप्त, निष्ठावंत आणि शक्तिशाली यंत्रणा तयार करण्यास सुरुवात केली.
त्याने पैशाचा पाऊस पाडून जगभरातून सर्वोत्कृष्ट कॉम्प्युटर तज्ज्ञ आणि हॅकर्स शोधून काढले. डार्क वेबवरून गुन्हेगारांचा डेटा गोळा करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय स्तराच्या हॅकरला त्याने आपले प्रमुख बनवले आणि एक 'हॅकर टीम' तयार केली. ही टीम जगभरातील बँका, पोलिसांचे सर्व्हर आणि शत्रूंच्या गुप्त हालचालींवर घरबसल्या लक्ष ठेवू शकत होती.
त्याचप्रमाणे, मनीने केवळ गल्लीबोळातील गुंड न बाळगता, लष्करातून निवृत्त झालेले ब्लॅक कॅट कमांडोज आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्नायपर्स (Snipers) यांना आपल्या गँगमध्ये सामील केले. त्यांना प्रचंड पगार देऊन त्याने स्वतःची एक 'पावरफुल स्नायपर स्क्वॉड' आणि 'कमांडो टीम' उभी केली. या टीमला त्याने जगातील सर्वात आधुनिक शस्त्रे, नाईट-व्हिजन गॉगल्स आणि कम्युनिकेशन सिस्टीम पुरवली.
पण या अथांग साम्राज्यात मनीचे एक कडक तत्त्व होते – तो मुलींची तस्करी (Girls Smuggling) किंवा त्यांच्यावरील अत्याचार सोडून जगातील सर्व बेकायदेशीर कामे करायचा. ड्रग्स, हत्यारे, आंतरराष्ट्रीय मनी लाँड्रिंग, कॅसिनो, खंडणी या सगळ्यात तो किंग होता. पण जर त्याच्या साम्राज्यात किंवा मुंबईत कोणत्याही गुंडाने मुलींची तस्करी करण्याचा प्रयत्न केला, तर मनी त्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट त्याच्या कपाळात गोळी झाडायचा. "स्त्री ही पैशाची निर्मिती करू शकते किंवा विनाश करू शकते, पण ती स्वतः विक्रीची वस्तू नाही," हे त्याचे ठाम मत होते. त्याचे ध्येय फक्त आणि फक्त 'पैसा' हेच होते.
तिकडे जफर खान आणि शेट्टी भाई विजयोत्सवात मग्न होते. त्यांना वाटले होते की भास्करच्या मृत्यूनंतर आता त्याचे साम्राज्य पोरके झाले आहे आणि त्या बावीस वर्षांच्या पोराला म्हणजेच 'मनी'ला चिरडणे फार सोपे जाईल. पण त्यांना या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती की, ते एका सामान्य गुंडाशी नाही, तर एका अत्याधुनिक, मानवरूपी मशिनीशी वैर पत्करून बसले आहेत.
मनीने आपल्या आलिशान आणि सुरक्षित केबिनमध्ये अभिनव, विक्रम आणि रोहितसोबत एक अत्यंत गुप्त बैठक बोलावली.
"रोहित, काय माहिती आहे आपल्याकडे?" मनीने विचारले.
रोहितने टॅब स्क्रीन मनीसमोर केली. "भाई, जफर खान आणि शेट्टी भाई उद्या रात्री अलिबागच्या एका अतिशय सुरक्षित आणि अथांग अशा समुद्राकाठच्या फार्महाऊसवर एकत्र येत आहेत. तिथे त्यांच्यात भास्कर भाईच्या जुन्या अड्ड्यांची वाटणी होणार आहे. त्यांच्यासोबत त्यांची वैयक्तिक १०० हून जास्त सशस्त्र सुरक्षा रक्षक असणार आहेत. त्यांना वाटतंय की त्यांची ही मीटिंग पूर्णपणे गुप्त आहे."
मनीच्या चेहऱ्यावर एक अत्यंत क्रूर, थंड पण विजयी स्माईल आली. त्याने आपले निळे डोळे रोखले. "त्यांना वाटू द्या की ते सुरक्षित आहेत. अभिनव, आपली हॅकर टीम सज्ज आहे का?"
अभिनवने हसत हसत उत्तर दिले, "एकदम सज्ज, माझ्या भाई! अलिबागच्या त्या फार्महाऊसची सॅटेलाईट लाईन्स, तिथली वीज ग्रीड आणि सुरक्षा यंत्रणा आपल्या हॅकर्सनी आधीच ट्रॅक केली आहे. तू फक्त हो म्हण, आपण त्यांचा खेळ एका सेकंदात जॅम करू."
मनी खुर्चीवरून उठला आणि खिडकीबाहेर पाहू लागला. "उद्या रात्री अलिबागमध्ये केवळ दोन डॉन मरणार नाहीत, तर मुंबईच्या अंडरवर्ल्डला त्यांचा खरा आणि एकमेव मालक मिळणार आहे. विक्रम, कमांडोज आणि स्नायपर्सना तयार राहण्यास सांग. गेम ऑन!"
------------------------------
To be Continued....