पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ४ Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ४

प्रिय सोना..

तुझ्या दवाखान्याच्या गावातले तुझे जवळचे पेशंट मात्र आपले काही एक न ऐकता आपल्या घरी दर वेळेस गुळाची भेलकी पाठवत असत

त्या गावात सर्वांकडे म्हशी होत्या 

मला खरवस खूप आवडत असे 

तुझे अनेक पेशंट म्हैस व्यायली की 

 खरवसाची पातेली आपल्या घरी नेहेमी आणून पोचवत 

शिवाय डॉक्टर ची बायको गुळ खात नसेल 😀 या समजुती पायी खरवस साखर घालून बनवत असत 

अगदी मागील वर्षी पर्यंत आपल्याकडे खरवस पोच होत होता 

त्यांच्या गुऱ्हाळ घरातील कडील सोलापूर कडून आलेल्या कामगारांना तू काही वेळ फुकट औषध देत होतास

तर काही वेळा त्यांनी उधारी पण ठेवलेली तुला चालत असे

जी ते पुढील सीझन मध्ये चुकती करत असत

त्यामुळे आपल्या संसारात आपल्याला गुळ कधीच विकत आणावा लागला नाही

त्या खेड्यातील माणसे फार मोठ्या आजारासाठी कोल्हापुरात दाखवण्या पूर्वी तुझा सल्ला घेत

तुझ्या सल्ल्याने ते पुढील निर्णय घेत

शहरातील डॉक्टर यासाठी तुझ्या संपर्कात असत

ते त्यांचे पी आर ओ तुझ्याकडे पाठवत

तू पाठवलेल्या पेशंट च्या बिलाच्या वीस टक्के तुला कमिशन मिळणार असे

त्याला "कट प्रॅक्टिस" असे गोंडस नाव होते

तुला हा प्रकार अजिबात मंजूर नव्हता

तू त्यांना नकार देत असे

तुझ्या बरोबरीचे सर्व मित्र तुला खुळ्यात काढत

त्यांचे म्हणणे पैशाची गरज आहे आपल्याला मिळतो तर का सोडायचा

तशी.. तर तेव्हा आपल्यालाही पैशाची गरज होतीच पण 

तू तुझ्या निश्चया वर ठाम होतास

मी म्हणत असे

कट प्रॅक्टिस न घेणारा तू एकटाच असशील. ..

तू म्हणत असे

अनावश्यक पैसा आपल्या घरात नको यायला

मला कमिशन देणार तो पैसा माझ्याच पेशंट च्या खिशातून जाणार ना.

अजिबात नकोय मला हे

याउलट जिथे तू पेशंट ला ऍडमिट व्हायला सांगायचा

तिथे स्वतः जाऊन तू पेशंट ची हालहवाल.. त्याची ट्रीटमेंट काय चालू आहे याची माहिती घेत होतास

पेशंट गरीब असेल तर त्याचे बिल कमी करून घेत होतास 

खरोखर डॉक्टरी पेशा प्रामाणिक वृत्तीने चालवणारा तू एक आदर्श व्यक्ती होतास

तुझ्या स्वतःच्या आजारपणाच्या काळात तुझा जवळचा पेशंट खुप आजारी पडला होता 

ICU मध्ये तो सारखे तुझेच नाव घेत होता 

आपण दोघेही त्यांना भेटून आलो ते बरे पण झाले 

घरी आले 

तेही काही खायला प्यायला तयार नव्हते त्यांना काय होतेय तेच त्यांना सांगता येत नव्हते 

पुन्हा आपण घरी जाऊन त्यांची समजूत घातली व खायचे वचन त्यांच्याकडून घेतले 

दुर्दैवाने पडल्याचे निमित्त होऊन ते हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले 

शेवटी कोमात गेले 

तुझी स्वतःची ट्रीटमेंट चालू असून सुद्धा तू त्यांना आटोक्या बाहेर मदत केली होतास 

तू आजारी आहेस असे समजले तर असंख्य लोक घरी येतील आम्ही दवाखान्यात हेलपाटे घालत होतो 

मग कसे त्यांना थोपवणार 

फार गोंधळ होऊ नये म्हणून तू ICU मध्ये आहेस  ही गोष्ट मी कोणालाच सांगितली नव्हती 

तेव्हा तुझ्या मोबाईल वर आलेले फोन मी घेत होते आणि तू कुठे बाहेरगावी गेलास असे सांगत होते कारण तुझ्या आजारपणात मला माणसांची येणी जाणी . चौकशा या गोष्टी झेपणाऱ्या नव्हत्या 

तेव्हा सुद्धा तुझे पेशंट तू परत कधी येणार हे विचारून तुझ्याकडे ट्रीटमेंट साठी यायची इच्छा व्यक्त करीत होते इतका तुझा हात गुण चांगला होता 

त्या गावाचे आणि तुझे लागेबांधे शेवट पर्यंत टिकले होते 

आपल्या घरात हळूहळू आपला मुलगा मोठा होऊ लागला

तुझे त्याच्यावर खूप प्रेम होते

त्यालाही तुझा जास्त लळा होता

मी संध्याकाळी बँकेतून येईपर्यंत त्याचे खाणे ,पिणे ,खेळ सगळे तू स्वतः पहायचा

मी बँकेतून घरी आले की माझ्याकडे त्याला सोपवून मगच तू दवाखान्यात जात होतास

माझी जशी घेत होतास तशीच काळजी तू मुलाची ही घेऊ लागलास

आम्हा दोघांना काही झालेले तुला चालायचे नाही

त्याचे खाणे अभ्यास तब्येत याकडे तू जातीने बारीक लक्ष द्यायचा 

तुझ्या अशा संगोपना मुळे तो फारसा कधी आजारी नाही पडला 

याचं काळात आपण स्वतःचे मोठे घर घ्यायचा विचार करू लागलो

तुला बागकामाची आवड होती

भोवती बाग असलेले घर असावे हे तुझे स्वप्न होते

अनेक खटपटी लटपटी करून मुलगा पाच वर्षाचा होण्यापूर्वी आपण घर घेतले

आता तुझी जबाबदारी आणखी वाढली

मुलगा शाळेत जात असल्याने व घर लांब असल्याने मी सकाळी त्याला माहेरी सोडत असे

माझे रिटायर वडील त्याला पोचवत

संध्याकाळी त्याला शाळेतून आणून परत माझ्या माहेरी सोडणे काम तुझे होते

शिवाय अर्थिक गणित सोडवण्या साठी तू आणखी एक दवाखाना चालू केलास

ते सगळे दिवस खुप धडपडीचे होते

आपल्या दोघातले भावबंध त्या वेळेस आणखी घट्ट होऊन प्रेमातली उत्कटता वाढत होती

याच वेळेस तुझ्या नावावर फोन आपल्याला मिळाला

त्या वेळेस दिवसातून तीन चार फोन आपले होत असत

मी बँकेतून घरी

व तू दवाखान्या जवळच्या सोसायटी मधून मला असे फोन चालत

एकमेकाशी किती बोलले तरी आपल्याला समाधान नसे

याच काळात मुलाला आवडीने ज्युडो व तबला असे क्लास आपण लावले होते

त्यात दोघांची धावपळ आणखीन वाढली

पण मुलाला त्यात आनंद असल्याने आपणही त्याची प्रगती पाहून खुश होत असू

याच वेळी आपल्या आयुष्यात आपला कुत्रा “जिमी “याचे आगमन झाले

आपल्या मुलाला कुत्रा खूप आवडत असे

पण आपले धावपळीचे आयुष्य त्यात हा कुत्रा कोण बघणार ?

त्याचे खाणे पिणे त्याला फिरवणे कसे जमणार 

या कारणा साठी आपण त्याला नकार दिला होता

तरीसुद्धा एक दिवस आपल्या मुलाने आपल्या भांडी घासणाऱ्या बाई कडून एक कुत्र्याचे पिल्लू आणून त्याला गच्चीत लपवले

रात्री ते ओरडू लागल्यावर आपल्याला समजलं

पण मुलाच्या आनंदा साठी आपण ते ठेवून घेतले

मुलाच्या पसंतीने त्याचे नाव “जिमी” ठेवले

आता त्याला दोन तीन वेळ फिरवणे, जेवायला देणं

त्याची आंघोळ, निगा ही सगळी जादाची कामे तुझ्याकडेच आली

दरमहा त्याला इंजेक्शन देणे त्यासाठी डॉक्टर बोलावणे

आठवड्याला आंघोळ ,कोंबिंग हे ही तुलाच करावे लागे

पूर्वी पण तुमच्या घरी “खंड्या” कुत्रा असल्याने तुला कुत्र्याची सवय होती त्यामुळे “जिमी” चा लळा लागला होता

मी आधी कुत्र्याला भ्यायची पण हळूहळू मलाही त्याची सवय झाली

आपला मुलगाही शाळेतून आला की त्याच्याशी खेळायचा

सुट्टी दिवशी त्याला फिरवायचा

जिमी खूप वांड होता पण तुला भ्यायचा तुझे सगळे ऐकायचा

त्याने दंगा केल्यास तू रागावला की माझ्यामागे लपायचा

त्याच्यामुळे आपल्या घराकडे वाकडी मान करून कोणी बघू शकत नव्हते

ह्या अशा आयुष्याच्या अती धावपळी मुळे तुला frozen shoulder चा त्रास सुरू झाला

खांद्यात असह्य कळा सुरू झाल्या

डॉक्टर नी तुला “डायबिटीस” चे निदान केले आणि हाता साठी फिजिओथेरपी सुरू केली

शुगर चे तुझे पथ्य पाणी गोळ्या तू सुरू केल्यास पण फिजिओथेरपी साठी तुझी वेळ जमेना

मग मी पुढे झाले आणि सगळे व्यायाम शिकून घेतले

व रोज घरी मीच तुला फिजिओथेरपी देऊ लागले

काही दिवसांनी तुला बराच आराम पडला

आता काही जुजबी व्यायाम तू स्वतः रोजच्या रोज सुरू केलेस

दिवस भरभर पळत होते

माझा स्वभाव बोलका असल्याने दिवसभर काहीना काही मी तुझ्याशी बोलत असायचे

शिवाय माझे गाणी गुणगुण करणे दिवसभर चालूच असायचे

तुला माझ्या आसपास असताना या गोष्टीची खूप सवय झाली होती 

जर काही कारणांनी विचारात असताना मी काही बोलले नाही तर लगेच तू विचारायचा..

काय झालं बोलणं का बंद आहे?

इतकी तुला माझ्या बडबडीची सवय होती

आणि तुला ती आवडायची 

एकदा मला थ्रोट इन्फेक्शन झाले होते

दोन तीन दिवस मी बोलू शकत नव्हते

औषधे चालू होती पण बरे व्हायला तेवढा वेळ लागणार होता

त्या काळात तू खूप अस्वस्थ झाला होतास

एक डॉक्टर असून सुद्धा

“काय हे औषध घेऊन सुद्धा तू बरी होत नाहीस?

कधी बरी होणार तू?

अशी चीड चिड करीत होतास😀

माझं अजिबात न बोलणं तुला सहन होत नव्हतं

आपल्या दोघांचे तसे मोठे आजार फारसे कधी नव्हते

आपण दोघेही नियमित व्यायाम , योग्य आहार ,आनंदी स्वभाव या त्रिसूत्री मधे फिट होतो

मधे एक वेळ तुला घरी उपचार होत नाहीत या कारणाने ऍडमिट करायची वेळ आली

पण तुझे सर्व रिपोर्ट ओके असल्याने दोन दिवसात तू घरी आलास

मी पण एकदा अंगणात घसरून पडले होते

डोक्यावर पडलेली डोळ्यावर बचावले होते

डोळ्याला दुखापत नाही झाली पण आजुबाजूला मुका मार लागला होता

बँकेत सुद्धा त्या काळात रजा मिळणे कठीण होते

डोळा सुजल्याने डोळ्यावर चष्मा बसत नव्हता

तशीच बँकेत मी आठवडा भर काम करीत होते

तू तेव्हा मी बँकेतून घरी येईपर्यंत अस्वस्थ असायचा

मला म्हणायचा तू आणि बाळराजे आजारी असलात की माझे दवाखान्यात लक्ष लागत नाही