प्रिय सोना …
त्यानंतर त्या दुकान मालकांच्या घरी आपले जाणे होऊ लागले त्यांना तुझा खूप लोभ होता तुझ्या गप्पा गोष्टीत काहीतरी शिकायला मिळते असे ते म्हणत आता तिथे त्यांच्या दुकानातच तुझ्याकडून तपासून घ्यायला पेशंट येऊ लागले चक्क तिथंच तुझा दवाखाना सुरु झाला तू पण त्यांना मामा असे प्रेमाने बोलावू लागला आता आपला मित्र परिवार वाढू लागला माझ्या लिखाणा मुळे मी परिचित झालेच होते अनेक ठिकाणी मला उद्घाटन, कार्यक्रम यासाठी बोलावणे येऊ लागले माझे काव्य वाचन सुद्धा होऊ लागले अशात तुझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली तिथला एक चालता दवाखाना चालवायची तुला ऑफर मिळाली दवाखाना मुख्य रस्त्यावर होता मला बरे वाटले तुला काहीतरी काम मिळावे असे मला ही वाटत होते जरी तू माझ्या साठी इकडे आलास तरी पूर्ण दिवस फक्त घरकाम आणि मोबाईल वर नाटके बघण्यात तुला गुंतवावे असे मला अजिबात पसंत नव्हते तुझे स्किल उपायगी यायला हवे होते आता मात्र मला वाटंबरे इथे बसने जाणे क्रमप्राप्त झाले तरी तू मला सकाळी स्टँड वर सोडायला यायचा मधल्या रस्त्यात भरपूर गावे असल्याने गाडीला गर्दी खूप असायची पण यापूर्वी ओळख झालेला एक वृत्तपत्र विक्रेता रोज रुमाल ठेवून माझी जागा धरायचा मी बँक ऑफिसर आहे या व्यतिरीक्त त्याची ओळख नव्हती पण कुठले नाते कोण जाणे तो माझ्याशी ताई म्हणून मोकळेपणाने बोलायचा घरचे प्रॉब्लेम सांगून मन मोकळे करायचाआपण ज्या घरात रहात होतो त्या मालकिणीचे माझे खूप जमले होते तिला माझे पदार्थ, कपडे, वागणे आवडायचे रोज बँकेत निघाले की ती मला टाटा करायला बाहेर यायची कधी कधी आपण बँकेतून घरी आलो की वरती गरम चहा पाठवून द्यायची कोल्हापूर तसे मोठे शहर असल्याने काही वस्तू ज्या तिथे मिळत नाहीत त्या ती आपल्याला कोल्हापूरहून येताना आणायला सांगत असे मी तिच्यावर “शेजीबाई” असे व्यक्तिचित्र पण लिहिले होते असे असले तरी काही दिवसांनी ती जागा आपल्याला सोडणे भाग पडले आणि नव्या जागेत आपण गेलो इथे शिक्षक नवरा बायकोही शिक्षक वरती रहात खाली फक्त दोन खोल्या होत्या ही जागा गावाच्या पार टोकाला होती आपण तिथेही रुळायला लागलो आता आपण सकाळी फिरायला गावाबाहेर जाऊ लागलो छान मोकळे वातावरण, हिरवाई नसली तरी हवा छान तिकडे अनेक भाज्यांचे मळे होते त्यांचे मालक सुद्धा रोजच्या पहाण्यातून ओळखीचे झालेत्यांच्याकडील ताज्या भाज्या ते रोज आपल्याला देऊ लागले पैसे विचारल्यावर प्रेमाने दिल्यात असे म्हणत असे इथे मनमिळावू प्रेमळ लोक भेटत होते त्या वर्षी गणपतीला घरमालकांनी त्यांच्या नव्या घरात पहिला गणपती तुझ्या हस्ते आणला त्याची रीतसर पूजा तुझ्या सांगण्यानुसार केली आपण सर्व रोज सकाळ संध्याकाळ आरती करीत होतो अखेर पाच दिवसांनी विसर्जन पण त्यांनी तुझ्याच हस्ते केले होते आता गावात येऊन आठ महिने होत आले होते मधल्या काळात आपल्याला ती जागा सोडावी लागली आता आपले घर एका तीन मजली इमारतीत झाले पहिला मजला हॉल दुसरा मजला किचन तिसरा मजला बेडरूम असे अगदी टीव्ही, फ्रिज ,सकट सर्व सोयींनी युक्त असे हे घर होते घरमालक नगरपालिकेचे सदस्य होते त्या घरी राहायला गेल्यावर त्यांच्या बायकोची माझी गट्टी जमली खरे म्हणजे मला फार वेळ मिळत नव्हता पण तिला मात्र माझे कौतुक वाटायचे आपल्या लग्नाचा वाढदिवस तिने तिच्या घरी अगदी हौसेन साजरा केला सारखे वर खाली करायला लागत असले तरी आपल्याला ते घर आवडले तिसऱ्या मजल्या वरून सगळा सांगोला दर्शन होत असे काही दिवसांनी अचानक आमच्या येथील एका ऑफिसरला रुरल टर्म पूर्ण करण्या साठी वाटंबरे शाखा हवी होती मग माझी बदली सांगोल्यात झाली मी पण यापूर्वीच बदली मागितली होती.ती संधी आता आली..आता तर खूपच छान झाले माझी शाखा घरापासून फक्त पाच मिनिटांवर होती तरीही तू मला शाखेत सोडायला येतच होतास या शाखेचा कारभार मोठा होता माझ्या शिवाय दोन ऑफिसर होते तीन क्लार्क, साहेब, शेती अधिकारी..साहेब स्वतः कोल्हापूरचे होते स्वभावाने अतिशय रॉयल लिबरल होते तेव्हा फक्त चौथ्या शनिवारी बँका बंद असत पण मी इतर कोणत्याही शनिवार रविवार घरी जाणार आहे म्हणण्यावर.ते मला दोन दिवस रजा देत असत त्यांना भजी खुप आवडत मीही त्यांना अधूनमधून आपल्या छोट्याशा संसारात भजी खायला घरी बोलावू लागले येथपर्यंत अनेक लोक आपण जोडले होते त्या छोट्या गावात आपला व्यवसाय आणि स्वभाव यामुळे आपण लोकांचे आवडते झालो होतो तिथल्याच एका मेस मालकांना एक दुर्धर आजार होता अनेक डॉक्टर झाले होते पण त्यांना फरक नव्हता कोणीतरी त्यांना तुझे नाव सुचविले आणि तुझ्या आयुर्वेदिक औषधाने त्यांना चक्क बरे वाटले आता तिथे तुझा मान आणखीन वाढला आता आपण सुट्टीत गाडी घेऊन जवळपास छोट्या ट्रिप काढू लागलो दोन तीन वेळ पंढरपूर पण झाले अंबिका उत्सव तिथे मोठा साजरा होत असे त्यातही आपण भाग घेतला होता याच काळात आपल्या वाटंबरे येथील स्नेह्यांच्या सोबत बनाळी इथे बनशंकरी देवीचे दर्शन घेऊन आलो जी आपली कुलदेवता होती एकदा बँकेच्या मीटिंग साठी आपण सोलापूर येथे पण जाऊन आलो याच काळात आपण थोड्या ट्रिप पण केल्या एकदा हंपी बदामी करून आलो पासपोर्ट होताच मग सिंगापूर थायलंड मलेशिया करून आलो थोड्या दिवसांनी दुबई ट्रिप पण घडली दुबई हून आपण सर्वांसाठी चॉकलेट आणली होती सर्वांना खूप कौतुक वाटले होते आपली वृत्तपत्र संपादक साहेबांशी पण खूप घसट झाली होती कधी कधी संध्याकाळी त्यांच्या घरी आपण जेवायला जात असू ऑफसमध्ये गप्पा मारत असू एकदा तर आपण कोल्हापूर येथे असताना ते घरची सर्व मंडळी घेऊन आपल्या घरी पण येऊन गेले त्यांच्या वर्तमानपत्रात माझ्या कविता पण छापून येत असत एकदा त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आपण गेलो असताना तिथे घडलेले सर्व मी माझ्या भाषेत "परीचा वाढदिवस".. असे नाव देऊन लिहिले होते ते त्यांना फार आवडले होते ते जेव्हा वृत्तपत्रात छापून आले तेव्हा तर पूर्ण गावात त्याचा चर्चेचा विषय झाला होता त्यांच्या त्या लहान मुलीचा माझ्यावर जीव होता यानंतर त्यांच्या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी माझ्या कविता संग्रहाचे प्रकाशन करायचे ठरविले मी केलेल्या अनेक कविता होत्या त्यातल्या उत्तमोत्तम कविता निवडून त्याचे पुस्तक छापायचे काम सुरू झाले प्रकाशन संस्था सोलापूरची होती मला बँकेच्या कामामुळे फार वेळ मिळत नसे तू स्वतः पुढाकार घेऊन त्याच्या आवृत्या तयार करून घेतल्यास त्याचे प्रकाशन थाटात पार पडले आपले कवितेचे पुस्तक असावे हे मी पाहिलेले स्वप्न पुरे झाले होते याचे श्रेय मी माझ्या आई वडीलांना आणि तुला बहाल केले होते माझ्या बँकेमुळे अनेक ओळखी असल्याने त्याच्या प्रति पण लवकर खपल्या थोड्या आपल्या जवळ ठेवून आपण शाळा, कॉलेज, लायब्ररी इथे बरीच पुस्तके देऊन टाकली