पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ५ Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
  • मुक्ता....??️ - 6

             6.मला जगायचे आहे.....आ ssss विकास sss अरे विकास sss...

  • ऑपरेशन ब्लॅक ताज - 8

      पावसाचा जोर आता जीवघेणा झाला होता. मुंबईच्या कोस्टल रोडच्य...

  • Mr. Money - भाग 6

    जफर खान आणि शेट्टी भाईच्या अंतानंतर मुंबईच्या गुन्हेगारी जगत...

  • Ruthless Love - 7

    त्या पकडा पकडी मध्ये, तिचा लूज असलेला ड्रेस समोरून पूर्ण खाल...

  • तोतया वारसदार - भाग 59

     तोतया वारसदार पात्र रचना निशांत                      - शोधक...

श्रेणी
शेयर करा

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ५

प्रिय सोना


आपला दोघांचा स्वभाव सकारात्मक आणि उत्साही असल्यानेव आपली आवड एकसारखी असल्यानेआपल्या व्यस्त चक्रात सुद्धा आपण जास्तीत जास्त एकमेका साठी द्यायचोसंपूर्ण सांसारिक आयुष्यात आपण नोकरी व्यतिरीक्त कधीच एकमेकांना सोडून गेलो नाहीकाही वेळा असे काही कुणाला सांगितले की त्यांना थोडी असूया वाटेमग तुच म्हणायचा.. कशाला लोकांना आपले काही सांगत असतेस?आपले आपल्या पाशी ठेवायचेकुणाची कधी असूया नाहीकोणाचा राग द्वेष नाहीसरळ साधा "अजातशत्रू"होतास तूआपले कायम एकत्र असणे पाहून आपल्या घरच्या कार्यक्रमात सुद्धा जरी पुरुष बायकांच्या पंगती वेगळ्या असल्या तरीघरचे लोक आपल्याला शेजारी शेजारी जेवायला वाढायचेअगदी दोन वेगवेगळ्या खोल्यात सुद्धा आपण कधी बसलो नाहीतुला फिरायची खूप आवड होतीआपण वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी जात असू   आपला मुलगा मोठा होत होतात्याचे तुझे खूप संघटन होतेलहान असल्यापासून त्याला अंघोळ घालणंमाझ्या अनुपस्थितीत त्याला भरवणे कपडे घालणंशिवाय त्याचा रोज अभ्यास घेणं त्याला शिकवणे या जबाबदाऱ्या सुद्धा तू अंगावर घेतल्या होत्यामितभाषी सरळ साधा असा तोही तुझ्या सारखाच हुशार होताआणि तुझ्या सारखाच एकपाठी होता शिवाय त्याच्याकडे साहित्य, कला, गायन, लेखन ही सुद्धा आवड होती जी माझ्या वडिलांकडून माझ्याकडे अनेक मग त्याच्याकडे आली होती .😊दहावी परीक्षा जवळ आली तेव्हा शेवटचा महिना मात्र तो अगदी निवांत होता मस्त बागेत झुल्यावर बसून फोन मधली गाणी ऐकत असायचा विचारलं की माझा अभ्यास झालाय म्हणायचा मी तुझ्याकडे तक्रार केली की तु म्हणायचा तो लंबी रेस चा घोडा आहे दहावी ऐवजी तो बारावीच्या उत्तम तयारी च्या तयारी कडे लक्ष ठेवून होता हे मला समजायला थोडा वेळ लागला पण तू मात्र त्याची कुवत ओळखून होतास बारावीला उत्तम यश मिळवून त्याला पुण्यातले त्याने ठरवून ठेवलेले कॉलेज हवे होते त्यासाठी कट ऑफ लिस्ट ला किती आणि कसे मार्क घ्यायला हवेत याचा अभ्यास त्याने दहावी पासून सुरू केला होता.   आणि त्याला बारावी अभ्यासा साठी कोणते कोचिंग द्यायचे याचा अभ्यास तूही आत्तापासून करीत होतास अत्यंत बुद्धिमान होती तुम्हा बाप लेकांची जोडी ❤️मी सुद्धा बरीच हुशार होते दोन तीन विषयात बोर्ड टॉपर होते पण तुमच्या दोघांच्या हुशारी पुढें मी नगण्य होते     तू मला सांगायचा डॉक्टरी शिकताना तू काही गोष्टी मित्रांना इतक्या परफेक्ट सांगत होताकी मित्रांना पेपर सोपे जात..तोंडी परीक्षेत सुद्धा आडनावाच्या अल्फा बेट नुसार तुझा नंबर आधी असल्याने परीक्षक तुला जास्ती वेळ प्रश्न विचारततुझी सगळी उत्तरे परफेक्ट तयार असल्याने परीक्षक खुश होत असतआणि मग उरलेल्या मुलांना परीक्षेत जास्त प्रश्न विचारले जात नसततुझा त्या त्या गोष्टीचा एक विशिष्ट अभ्यास होतात्यामुळे मित्रांच्या कंपू मध्ये तुझे खूप महत्त्व होतेअखेर अनेक अडचणी असून सुद्धा तू चांगल्या मार्क्सने डॉक्टरी पास झाला होतास पण तुझे ते यश पहायला तुझे वडील नव्हते तुझ्या आयुष्यात वडिलांचे खूप महत्वाचे स्थान होते त्यांना सर्व तात्या म्हणत निरपेक्ष स्वभाव, शांत वागणे, भावंडा साठी काहीही त्याग करणारे असे ते एक आदर्श पुरुष होते तूही त्यांचीच कार्बन कॉपी होतास तुझे वागणे बोलणे स्वभाव सर्व तात्यांसारखे आहे असे घरचे सर्व म्हणत तुझ्या वडिलांचे तुझ्यावर आणि तुझे त्यांच्यावर फार प्रेम होते त्यामुळे त्यांची उणीव तुला नेहेमी जाणवत असे   आपल्या घरात तुझे आजोबा, काका डॉक्टर होतेतुमच्या घरची ही डॉक्टरीची ही तिसरी पिढी होतीसर्वांना तुझा अभिमान होतातुला डॉक्टरी पूर्ण करून पोस्ट graduation करायचे होतेपण शेवटच्या वर्षात तुझ्या वडिलांचे निधन झाल्यावर अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागलेमग तो विषय बाजूला ठेवूनतू स्वतःचा दवाखाना काढला होतासतुझा पहिला दवाखाना लांब होता..शिवाय अर्थिक परिस्थिती बिकट असल्याने वाहन काय बसने जाणे सुद्धा परवडणार नव्हतेतुझ्याकडे चिकाटी होतीच..त्यामुळे जवळ जवळ वर्षभर चार वेळ चालत जाऊन तू दवाखाना चालवला होतासआणि नंतर एक लुना आणि नवीन दवाखाना काढण्या साठी भाड्याने जागा घेतली होतीसआपल्या गप्पात हे सगळे ऐकले की मला तुझे कौतुक वाटायचेकारण माझ्या माहेरी आम्ही सर्वसामान्य जरी असलो तरी तुझ्या मानाने मी खूपच सुखात वाढले होतेशिवाय घरातही मी लाडकी असल्याने माझा शब्द वडील खाली पडू देत नसततू मात्र खुप कठीण परिस्थितीतून  गेला होतासतुझ्याकडे हुशारी, प्लॅनिंग,दूरदर्शीपणा, चिकाटी असे अनेक गुण होतेहे सगळे गुण आपल्या मुलात सुद्धा होतेत्याच्या अभ्यासात तू विशेष कष्ट घेत होतासमधल्या काळात माझी आई आणि वडील दोघेही वेगवेगळ्या कारणाने आजारी पडलेमाझ्या घरात मी त्या दोघांची खूप लाडकी होते माझा शब्द घरात कधीही पडू दिला जाऊ नसे माझ्या जन्मानंतर मी वडिलांसाठी खूप लकी ठरले होते त्यामुळे ते तर मला एखाद्या राजकन्ये सारखी जपत..मी मोठी असल्याने घरात बरीच जबाबदारीची कामे मी अंगावर घेऊन करीत असे त्यांच्या आजारपणात माझा भाऊ  पुण्यात होतात्यामुळे त्यांची काळजी आपण दोघेच घेत असूत्या दोघांना तुझा तुझ्या वागण्याचा खूप अभिमान होताप्रत्येक गोष्टीत ते तुझा सल्ला घेत असतसख्खा मुलगा काय करेल अशी तू त्यांची सेवा केली होतीसदोघेही शुगर बीपी चे पेशंट होते तरीही आपल्या तब्येती सांभाळून होते तरीही बारीक सारीक कारणाने त्यांची आजारपणे चालू असत आईच्या डोक्याच्या ऑपरेशन मध्ये तिची शुगर लो होऊन ती कोमात गेली त्यातच तिचे निधन झालेवडील यापूर्वीच शुगर मुळे एका पायाने अपंग होते.त्यांची सगळी सेवा आई आनंदाने करीत असे घरात बेड वर असल्याने ते तिच्यावर बरेचसे अवलंबून होते आई  खरी पतीव्रता होती संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या सोबत सावली सारखी राहिली होती वडिलांनी तोंडावर काही दाखविले नाही पण तिच्या मृत्यूचा त्यांना धक्का बसला होता आई गेली पाठोपाठ वडिलांनी सगळ्यांशी संपर्क कमी करत अल्झायमर ला जवळ केले आणि अखेर सव्वा वर्षातच तिची साथ केलीत्या काळात तुला माझी चिंता वाटेआई वडिलांच्या आजारपणाचा माझ्यावर परिणाम होऊ नये याची काळजी तू घेत होतासदोघांच्या दुःखद निधना नंतर मला सावरण्याचे बळ तू मला दिलेसमाझ्या आयुष्यात आपल्या माणसांचे मृत्यू मी प्रथमच पाहिले होतेत्या कठीण काळात तू माझी फार काळजी घेत होतास