पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १ Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १


प्रिय सोना.

.आपल्या आयुष्याचा हा सुहाना सफर तुझ्यापुढे वाचते आहे

Made for each other....पासून सुरू झालेला हा आपला प्रवासअगदीMad for each other पर्यंत पोचला होता

आपल्या  लग्नापूर्वी आपण एकमेकांना भेटत होतो तेव्हाच आपले भावबंध ❤️ जुळले होते

शांत, संयमी, मितभाषी तूअणि धीट, थोडीशी उतावीळ ,आणि बडबडी मी😊आपली जोडी खरच देवाने छान जमवली होती

आपले लग्न ठरले हाही एक गमतीचा योगायोग होता

बरीच स्थळे बघून आणि नाकारून झाल्याने घरचे माझ्या लग्नाबाबत निराश झाले होते

तशात एक डॉक्टर स्थळ मला बघायला येते आहे ते मला कशाला पसंत करतील अशा विचाराने व काही महत्वाच्या कारणाने वडील घराबाहेर होते

आई आणि मी दोघीच घरात

संभाषण सूत्रे माझ्याकडेच होती

तू तर मला बघितल्या क्षणी आवडला होता

उंच शेलाटा बांधा

सोज्वळ चेहरा,साधा सरळ आणि मितभाषी

मुख्य म्हणजे नवऱ्या मुलाला मिशा हव्यातच ही माझी अट होती 😀त्यात तू छान फिट होत होतास😃

फक्त तुझा होकार येईल का नाही असे वाटत होते

पण दोन दिवसांनी तू स्वतःच घरी येऊन पसंतीची बातमी दिलीस..माझा आनंद गगनात मावेना..

हे लग्न ठरणार समजल्यावर वडील मला म्हणाले

बघ बरं का ताई सासरी तुझे इथल्या सारखे लाड होणार नाहीत हे विसरू नको

पण तसे घडले नाही

वडिलांच्या इतकेच प्रेमाने आणि लाडाने तू मला आयुष्य भर ठेवलेस

मला आठवते आपले लग्न ठरल्याची बातमी द्यायला आणि त्या काळात मुंबईला असलेल्या तुझ्या आईला मला दाखवायला अशा दोन कारणासाठी आपण दोघेच मुंबईला गेलो होतो

घरच्या कोणाला वेळ नव्हता म्हणून वडिलांनी मला एकटीला तुझ्या सोबत तुझ्या भावाच्या घरी मुंबईला जाण्यासाठी पाठविले होते

एखाद्या परक्या पुरुषा सोबत माझा पहिलाच प्रवास होता

मी खूप excited होते पण तू शांत होतास

तुझ्या मनात खुशी होती जी चेहेऱ्यावर दिसत होती😊रेल्वे मध्ये आपण खूप गप्पा केल्या तेव्हा मी तुझ्यासोबत प्रथमच लाइम ड्रिंक प्यायले संपूर्ण प्रवासात तू मला अगदी जपून नेलेसआणि जपून परत आणून माझ्या घरच्यांना सुपुर्द केलेस

यानंतर मग आपला साखरपुडा झाला आणि घरच्या लोकांच्या संमतीने आपले भेटणे ,एकमेका सोबत फिरणे सुरू झाले😊😊

तुझ्या घराजवळ तुझे दोन काका आणि त्यांची फॅमिली पण राहत असे अधून मधून मी तुझ्या घरी येत असे तेव्हा त्यांना पण भेटत असे. त्या सगळ्या चुलत सासूबाई आपल्या मैत्रिणींना माझी ओळख होणारी सुन म्हणून करून देत तेव्हा मला खूप छान वाटायचे. 

 त्या काळात माझी बँक दोन वेळेस आणि तुझा दवाखाना ही दोन वेळेस असायचा  रोज दुपारी तू आमच्या घरी यायचा मला भेटायला..

आपण दोघेच असायचो तेव्हा.     

खुप गप्पा करायचो

त्यावेळचे कोर्टिंग फक्त एकमेका सोबत गप्पा आणि एकमेकांची नजरा नजरचहा देताना बोटांचा होणारा स्पर्शइतकेच होते...पण त्यात सुद्धा एक वेगळा रोमान्स होता...

आपल्या दोघांच्या त्या वेळेस लुना मोपेड होत्या त्यामुळे एकत्र फिरता यायचे नाही ...

तरीही एकदा मुद्दाम डबल सीट फिरण्या साठी आपण तुझ्या भावाची टीव्हीएस फिफ्टी घेऊन लांब फिरायला गेलो होतो तुला धरून तुझ्या मागे बसून जाताना एक वेगळाच थरार शरीरावर उठला होता लांब एकांतात फिरायला गेलो तरी तू फक्त माझा हात हातात घेण्या व्यतिरीक्त काहीही केले नाहीस...

कारण तुझा स्वभाव संयमी होता ज्या गोष्टी लग्नानंतर व्हायला हव्यात त्या लग्नाआधी करायच्या नाहीत अशी तुझी ठाम मते होती एक वेगळ्याच धाटणीचा तू पुरुष आहेस हे मला त्या भेटीत जाणवलेआणि तुझा अभिमान वाटला.   

त्याच वेळेस तू मला लग्नानंतर नोकरी करणार की सोडणार हे विचारले मी सांगितले बँकेची नोकरी हे माझे स्वप्न होते जे मी कष्टानं पुरे केले आहे

शिवाय घरात आई शिक्षिका असल्याने तिचे बघून मलाही नोकरीची हौस आहे..मी ती सोडणार नाही मग तू मला सांगितलेहे बघ नुकतीच माझी प्रॅक्टिस सुरू झाली आहे..फक्त सहा महिने झालेतमी डॉक्टर आहे म्हणून तुला जर वाटत असेल की मी लवकरात लवकर घर घ्यावे, चारचाकी घ्यावीतर ते होऊ शकेल पण त्याचे मार्ग वेगळे असतील...तशा गैर मार्गाने पैसे घरात येतील..नाहीतर मग साधे आयुष्य जगावे लागेल

तेव्हाच मी तुला निक्षून सांगितले मला घर, गाडी याचा मोह नाहीते सर्व व्हायचे तेव्हा होईलगैर मार्गाने येणारा एकही पैसा मला घरात नकोय...

तुझी जरी कमी कमाई झाली तरी माझा पगार आहे तेवढ्यात आपला संसार आपण भागवू हे ऐकल्यावर तुझ्या चेहेऱ्यावर समाधान दाटून आले ..तुझ्या डोळ्यातले माझ्या बद्दलचे प्रेम आणखीन वाढले माझ्या सचोटीच्या विचारांचे तुला कौतुक वाटलेआणि तुझेही विचार तसेच होते हे मला माहित होते

समाजात आर्थिक कमाईचे गैरमार्ग हे बायकांना असलेली पैशाची, दागिन्यांची ,मोठेपणाची हाव यातून निर्माण होतात ...मला असले काही नको होते माझ्या आई वडिलांनी मला प्रामाणिक व सचोटीने वागण्याचे धडे दिले होते माझे हे तुला आवडलेले विचार तू आयुष्यभर अनेकाना बोलून दाखवले होतेस ज्यात माझे कौतुक ओतप्रोत भरलेले होते...

आपल्या दोघात मी जास्त भावना प्रधान होते मला वाटायचे माझ्या होणाऱ्या नवऱ्याने मला पत्र लिहावे 😊पण आपण तर एकाच गावात रहात होतो.. मग हे कसे शक्य होईल...

माझी ही इच्छा ऐकताच एका गावात असून  आणि रोज भेटत असून सुद्धा तू मला प्रेमपत्र लिहिलेस आणि मीही त्याला उत्तर दिले

आजही ती गोष्ट आठवली की अंगावर रोमांच उभे राहतात..

एकदा आपण पाणीपुरी खायला गेलो होतोपाणीपुरी खाताना मला ठसका लागला..तिखट खाताना मला नेहेमीच ठसका लागत असे मी खोकायला लागताच तू पटकन तुझ्या हातातील प्लेट ठेवली आणिमाझ्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आला...तेव्हाचा मी ओळखले तुझ्यासोबत माझे वैवाहिक जीवन सुखाचे जाणार आहे

आपल्या लग्नानंतर तू माझे नाव बदलायचे ठरवले होतेस पण काय ठेवणार हे नव्हते सांगितले..लग्नानंतर जेव्हा तू ठेवलेल्या"वृषाली "या नावाचा अर्थ मी विचारला..तेव्हा तू मला सांगितले महाभारतात कर्णाची बायको"वृषाली" ही सर्वात सुंदर स्त्री होती.. शिवाय ती सर्वांशी मिळून मिसळून वागत असे..

तू तशीच आहेस हे मी लग्न ठरल्या पासून पाहिले आहे. सुंदर तर तू आहेसच...

म्हणून ते मी हे नाव ठरविले

माझ्या दृष्टीने जगातील सर्वात सुंदर स्त्री तुच आहेस..हे ऐकून माझा मलाच हेवा वाटला होता..

लग्नाच्या वेळचा सत्यनारायण आटोपला आणि आपल्याला एकत्र झोपण्यासाठी नातेवाईकांच्या रिकाम्या घरी सोय केली गेलीतेव्हा मी खूप घाबरले होते...

सेक्स विषयी फक्त ऐकीव माहिती होतीपण त्या रात्री अगदी अलगद आणि हलक्या हाताने हळूहळू प्रेमाने बोलत तू माझ्यातल्या कळी ला हळुवार पणे जागविलेस..तुझ्या मिठीत मला प्रेमाचा खरा अर्थ गवसला

आपल्या लग्नानंतर चार दिवसांनी आपण हनिमूनसाठी महाबळेश्वर इथे गेलो होतो..तू डॉक्टरी शिकायला सातारा येथे होतास त्यामुळे हे जवळचे हे ठिकाण तुझे खूप आवडते होते..

आठवडाभर आपण तिथे होतो. आपली मनाची जवळीक तर झालीच होतीतिथे आपली शारीरिक जवळीक सुद्धा आणखी"रंगतदार" झाली❤️

आपण एकमेकांच्या आणखीन जवळ आलो..

सर्व प्रकारची "मजा" आपण तिथे अनुभवली तिकडून परतल्यावर आपला संसार खरा सुरू झाला..

माझी नोकरी, तुझा दवाखाना...खुप गडबडीचे दिवस होते ते.. नवीन संसार नवीन कामे..रोज एकमेकावर नव्याने प्रेम करायचे दिवस होते ते..

त्या वेळेस आपण एक गंमतशीर पायंडा पाडला होता.तो म्हणजे आपले लग्न बावीस मे रोजी झाले होते त्यामुळे वर्षभर दर महिन्याच्या बावीस तारखेला आपण गोड काहीतरी करीत असू आणि एखादा पिक्चर पहायला जात असू..

तुला तशी पिक्चरची फार आवड नव्हती पण माझ्या वडिलाच्या मुळे मला ती गोडी लागली होतीआणि माझ्या बरोबर मी तुझ्यात ती आवड ,ती गोडी जागवली .तू रसिक होतास.. प्रत्येक महिन्यातल्या त्या बावीस तारखेच्या रात्री बेड सजवायला तू वेगवेगळी फुले आणायचा

ती रात्र आपण" रंगीत संगीत जागवत" असू❤️