पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १८ Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १८

 प्रिय सोना..

आता विमानाने हैदराबादला जायचे तू ठरवले हे ही ठिकाण यापूर्वी पाहून झाले होते पण जस्ट थ्रील आणि मजा यासाठीच जायचे होते हैदराबाद विमान बुकिंग केले त्याआधीच चार दिवस हॉटेल पण बुक केले होते तिकडे गेल्यावर पहिल्या दिवशी गाडी भाड्याची करून एक पूर्ण दिवस रामोजी सिटी फिरून आलो भरपूर फोटो काढलेव्हिडिओ केले यापूर्वी आपण रामोजी सिटी पहिली होती पण त्याला चिकार वर्षे झाली होती त्यात अनेक नवीन गोष्टी ऍड झाल्या होत्या पुढील तीन दिवस भरपूर भटकलो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बिर्याणी खाल्ली आपल्या हॉटेल जवळच एक स्वीट मार्ट होते आपण रोज सकाळ संध्याकाळ तिकडे जाऊन नवीन प्रकारचे स्वीट ट्राय करीत होतो तिथे शॉपिंगसाठी फारसा वाव नाही मिळाला बस खाणे, पिणे ,फिरणे .. इतकेच यानंतर तू ठरवलं होत विमानाने तिरुपती ला जायचे.आपण दोघेही फारसे देव देव किंवा कर्मकांड करणारे नव्हतो तरीही तू इंटरनेट वरून तिथली काही प्रसिद्ध स्थळे काढली जी बघण्यात आपले दोन चार दिवस नक्कीच गेले असते आता आपल्या दृष्टीने भारतातील बघण्या सारखी दोनच ठिकाणं राहिली होती ती म्हणजे अमृतसर, वाघा बॉर्डर आणि पोंडेचारी..बाकी "महाराष्ट्र माझा" तर सगळाच पिंजून झाला होता..याच वेळेस आपल्या पुतण्याच्या लग्नाचे आमंत्रण आले त्याने राजस्थानी मुलगी पसंत केली होतीलग्न राजस्थान येथे होणार होतेआपल्या घरची सगळी रेल्वे बुकिंग करून तिकडे जाणार होती मला खूप आनंद झाला एकतर इतक्या लांब जाऊन राजस्थानी पद्धतीचे लग्न पाहायला मिळणार होते तिकडची लग्ने खूप एन्जॉय करण्या सारखी असतात माझ्या दृष्टीने ते एक आकर्षण होतेच नेट वर नेहेमीप्रमाणे तू सगळा सर्च केलास तिथे "त्रिपुरसुंदरी" म्हणून एक शक्तिपीठ सुद्धा होते त्याचेही दर्शन घडले असते पण खूप excitement या दृष्टीने विचार करता तू अती भावनाप्रधान कधीच नव्हताप्रत्येक गोष्टीचा साधक बाधक विचार करून पूर्ण विचाराअंती तुझे निर्णय असत आणि अर्थात तुझ्या कोणत्याच निर्णयाला माझी कधीच ना नसायची कारण ते कायमच योग्य असायचे तुझा अप्रोच कायम प्रॅक्टिकल होता आपल्या नातेवाईकासोबत  रेल्वेने जायचा थ्री टायर प्रवास जवळ जवळ ३३ तासांचा होता प्रवासात बऱ्यापैकी हाल होणार होते  दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता हा प्रवास संपणार होता ही सगळी कटकट तुला झेपणारी नव्हती मुळात रेल्वे प्रवास तुला कधीच आवडत नव्हता तुझे नशीब इतके चांगले होते की तू कायम स्वतःच्या अथवा भाड्याच्या कार मधून फिरला होतास बस प्रवास तुला कधी माहितच नव्हता फार क्वचित रेल्वे प्रवास तू केला होतास शिवाय एकदा तुझी झोप disturb झाली की पूर्ण दिवस खराब जात असे म्हणून मग विचाराअंती त्यांना कळवून टाकले आम्ही नाही येऊ शकणार तुमच्या सोबत असे हा नकार देताना थोडी थापाथापी करावी लागली.. त्याला इलाज नव्हता तुझे एक महत्वाचे काम निघाले आहे असे सांगितले त्या लग्नाचे रिसेप्शन इथे पण होणारच होतेचतेव्हा आपण असणारच होतो खरेतर मला मनातून थोडे खट्टू वाटले खूप इच्छा होती जायची पण नाईलाज झाला होता नंतर एक आठवडा गेला असेल आणि आपल्याला एक मित्र भेटायला आला ज्याची travel कंपनी होती तो दुबईला टूर घेऊन निघाला होता आपल्याला विचारायला आला होता तुम्ही येता का असे..आपल्यालाही दुबई बघून दहा वर्षे झाली होती दर पाच वर्षांनी दुबईत नवीन काहीतरी घडत असते त्यामुळे आपण त्या टूरला जायचे असे ठरवले हे टूर बुकिंग करताना लक्षात आले आपण जेव्हा दुबईतून मुंबईत परत येतोय त्यानंतर चार दिवसात आपल्या पुतण्याचे लग्न आहे.तुला जाणीव होती की मला या लग्नाला जावेसे वाटते आहे मग तुच म्हणालास आपण तिकडे जायला मुंबईतून बुकिंग मिळते आहे का बघूया लगेच आपण दोघे ट्रॅव्हल ऑफिस मध्ये जाऊन बसलो त्यांनी सर्च करून सांगितले की आपल्याला मुंबईतून राजस्थानला जायला फर्स्ट AC चे बुकिंग मिळू शकते फक्त येताना रत्नागिरी येथे उतरायला लागेल तू म्हणाला ठीक आहे आपण तिथून कॅब करून येऊया कोल्हापूरला हा प्लान मस्त जमला लगेच बुकिंग केले सुद्धा तू म्हणाला झाले ना तुझ्या मनासारखे?मी खुशीने मान डोलावली खरेच नेहेमीच तू माझे मन जपत आला होतास आणि आताही आता विषय राहिला मधल्या चार दिवसाचा मी म्हणले मी प्रयत्न करते आपल्याला चार दिवस बँकेचे हॉलिडे होम मिळते का बघूया मी माझ्या मैत्रिणीला सांगितले आणि चक्क बुकिंग कन्फर्म झाले आता दुबईतून आल्यावर चार दिवस आपण मुंबईत राहणार होतो आणि नंतर ट्रेनने  राजस्थानला  लग्नघरी जाणार होतो तीन दिवस तिकडे राहिल्यावर चौथ्या दिवशी आपण दुपारी रत्नागिरी साठी मार्गस्थ होणार होतो आपल्या घरच्या वऱ्हाडी लोकांची ट्रेन त्या दिवशी रात्री होती ताबडतोब तू भावाला कळवून टाकले की तुझे असणारे काम पुढे गेले आहे त्यामुळे आम्ही लग्नासाठी उपस्थित रहात आहोत इथेही अनुभव आला माझ्या जबरदस्त इच्छा शक्तीचा..मला तिकडे जायचेच होते आणि आई "त्रिपुरसुंदरी" ने सुद्धा बोलावून घेतले होते ताबडतोब तू देवी साठी ऍमेझॉन वरून एक छान लाल साडी मागवली अजून महिनाभर होता दुबई साठी पण बॅग भरणे तयारी तू लगेच सुरू केलीस तुला सगळे वेळेपूर्वी तयार लागायचे त्यात आता दुबईची एक बॅग आणि लग्नासाठी एक अशा दोन बॅग करायला लागणार होत्या तुझं पॅकिंग चे प्लॅनिंग नेहेमीच भारी असायचे.मला त्यात फार काही करण्यासारखे नसायचे महिनाभर चुटकी सरशी पळाला..आणि आपण दुबई टूर वर निघालो दहा वर्षापूर्वी पाहिलेली दुबई आणि आत्ताची दुबई यात भरपूर फरक होता दुबई फ्रेम Future museum Miracle garden Global Village अशा काही गोष्टी त्यात वाढल्या होत्या मरीना क्रुझ वर आपण भरपूर एन्जॉय केले नेहेमीप्रमाणेच असंख्य फोटो व्हिडिओ काढले आपण गेलो त्याच दिवशीव्हॅलेंटाईन डे होता विमान तळावर व्हॅलेंटाईन डे साठी सेल्फी स्पॉट केले होते दुबईत उतरल्यावर लगेच तिथेच फोटो काढणे सुरू झाले योगायोगाची गोष्ट म्हणजेत्याच दिवशी मरीना बीच वर गेल्यावर व्हॅलेंटाईन डे साठी प्रेयसीला द्यायला एक मोठा गुच्छ घेऊन एकजण आला होता त्या जोडीने आपले फोटो सेशन केले आणि ते दोघे परत निघाले जाताना आपल्या ग्रुप कडे तो गुच्छ देऊन गेले.त्यांच्या दृष्टीने गुच्छाचे काम संपले होते असा अचानक असा गुच्छ मिळाल्यावर आपल्या ग्रुपची सगळी जण एक्साईट झाली.आणि सगळ्यांनीच व्हॅलेंटाईन डे चे फोटो काढून घेतले खरेच खूप भारी आणि lifetime मेमरेबल क्षण होते ते दुबई मॉल ला भरपूर फिरलो सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट घेतली अशी मस्त मजा करून मुंबई एअरपोर्ट वर परत आलो तिथून आपण राजस्थानला लग्नाला जायची एक बॅग घेऊन हॉलिडे होम वर गेलो एक बॅग कोल्हापूरला मित्रासोबत पाठवून दिली हॉलिडे होम वर चार दिवस राहिलो परत शॉपिंग भरपूर भटकलो खानपान केले राजस्थान हून येताना असणाऱ्या वाढीव सामाना साठी आणि परत केलेल्या खरेदी साठी खास एक नवीन बॅग विकत घ्यावी लागली