झपाटलेला वाडा - भाग 12 kalyan mhaslekar द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

झपाटलेला वाडा - भाग 12

झपाटलेला वाडा - भाग 12: अकराव्या बळी नंतर

सरपंच मेला होता. देवीच्या पायाजवळ. छातीत सोन्याचं त्रिशूळ. डोळे उघडे. तोंडातून काळा फेस. आणि सगळं रक्त... मूर्तीने प्यायलं होतं. मूर्तीच्या सोनेरी ओठांना ताजं रक्त लागलं होतं. जणू देवीने आत्ताच रक्त प्यायलं.

गावात गोंधळ उडाला होता जिकडे तिकडे आरडाओरड चालली होती. लोक म्हणाले, ही देवी नाही ही हडळ आहे सोन्याची हडळ  काल वाडा होता, आज मंदिरात हडळ बसलीय! रोज एक बळी घेणार

पोलीस आले. बॉडी पाहिली इन्स्पेक्टर म्हणाला, हा खून आहे. कोणीतरी त्रिशूळ मारलं. मंदिर बंद करा ही पन्नास कोटीची मूर्ती जप्त करा. सरकारी मालमत्ता.

चार पोलिसांनी मूर्तीला हात लावला. ओढायला लागले. पण मूर्ती हलली नाही. जणू जमिनीत मुळं गाडली होती. सोन्याची मुळं. एका पोलिसाने मूर्तीच्या पायाला हात लावला तर...

चट... त्याच्या हाताला चटका बसला. हातावर फोड आले. तो किंचाळला, आई गं ही मूर्ती तापली आहे आगीत ठेवल्यासारखी गरम आहे

आर्यन म्हणाला, साहेब हिला हात लावू नका ही शापित आहे हिला आज अमावस्येला गोदावरीत टाकावं लागेल आज नाही टाकली तर उद्या गावातलं एक घर रिकामं होईल!"

इन्स्पेक्टर हसला, अंधश्रद्धा मी नाही घाबरत भुताला 

तेवढ्यात मूर्तीच्या डोळ्यातून परत रक्त आलं. आणि मागच्या भिंतीवर रक्ताने आपोआप लिहिलं गेलं -

आज रात्री दुसरा बळी - पोलीस.

भिंतीवर रक्ताचे अक्षरं ओघळत होती. इन्स्पेक्टरचा चेहरा पांढरा पडला. हरिभाऊ म्हणाला, साहेब, ही लिहितेय. आज रात्री तुमच्यातला एक जण जाणार.

इन्स्पेक्टर म्हणाला, मी इथेच थांबतो बघतो कोण येतं

रात्र झाली. मंदिराला बाहेरून कुलूप. आत दोन पोलीस - इन्स्पेक्टर आणि हवालदार. बाहेर आर्यन, हरिभाऊ आणि वीस गावकरी. लांब.

बारा वाजले. मंदिरात घंटा वाजू लागली. आपोआप. टण... टण... टण...आतून बाईच्या हसण्याचा आवाज आणि लहान मुलाच्या रडण्याचा आवाज एकत्र.

हवालदार थरथरला, साहेब, चला बाहेर जाऊ इथे काहीतरी आहे

इन्स्पेक्टर म्हणाला बॅटरी चालू कर

बॅटरी चालू करून पहिली तर मूर्ती जागेवर नव्हती. सोन्याची चार फूट मूर्ती... चालत होती. तिच्या पायातले पैंजण वाजत होते. छुन... छुन... हातात त्रिशूळ. आणि ती हवालदाराकडे येत होती. डोळ्यातून रक्त, तोंडातून धूर.

हवालदार ओरडला, वाचवा ती माझ्याकडे येतेय तो दरवाजा ठोठावू लागला. दार उघडा उघडा मला वाचवा मला वाचवा .गावकरी दरवाजा उघडायला धावले पण तोपर्यंत

मूर्तीने त्रिशूळ उचललं आणि एका घावात हवालदाराच्या छातीत खुपसलं. आरपार. रक्ताचा फवारा मूर्तीच्या तोंडावर उडाला. मूर्तीने जीभ बाहेर काढून रक्त चाटलं.

इन्स्पेक्टरने बंदूक काढली. धाड! धाड! धाड! तीन गोळ्या मूर्तीवर. पण गोळ्या सोन्याला लागून खाली पडल्या. टण... टण... सोन्याला गोळी लागत नाही.

मूर्ती हसली. पुरुष, बाई, लहान मुलगा सगळ्यांच्या आवाजात.

तू मला जप्त करणार होतास ना? तू बारावा बळी.

त्रिशूळ फिरलं आणि इन्स्पेक्टरचा गळा कापला गेला. मुंडकं एका बाजूला, धड दुसऱ्या बाजूला. रक्ताने मंदिराची भिंत रंगली.

बाहेर आर्यनने कुदळीने कुलूप तोडलं. आत आले तर दोन बॉडी रक्तात. आणि मूर्ती परत जागेवर. शांत. जणू काहीच झालं नाही. फक्त तिच्या ओठांवर ताजं रक्त.

हरिभाऊ ओरडला, ही आता रोज मारणार! रोज एक! ही हडळ झालीय! हिला पाण्यात टाकावं लागेल!

गावकऱ्यांनी ठरवलं - आज अमावस्या, आजच विसर्जन. ट्रॅक्टर आणला, जाड साखळदंड, लोखंडी दोर.

रात्री अकरा वाजता वीस माणसं मंदिरात शिरली. मूर्तीला साखळदंड बांधले. एक... दोन... तीन... ओढा

मूर्ती हलत नव्हती. तेवढ्यात मूर्तीच्या आतून आवाज आला -

मला पाण्यात टाकू नका! मला पाण्यात टाकलं तर मी गोदावरीला पूर आणीन सगळं गाव बुडवेन तुमची पोरं वाहून जातील

आर्यन ओरडला, तू काहीच करणार नाहीस! तुझा शाप आज संपणार

हरिभाऊने हनुमान चालिसा सुरु केली. जय हनुमान ज्ञान गुन सागर..." गावकऱ्यांनी पण म्हटलं. जोरात.

मंत्र ऐकताच मूर्ती लाल झाली. गरम. धूर येऊ लागला. दोर तुटले. साखळदंड वितळू लागले. मूर्ती किंचाळली -

बंद करा! तो मंत्र बंद करा मला जळतंय

पण कोणीच बंद केलं नाही. आर्यनने ट्रॅक्टरला दोर बांधला. ट्रॅक्टरने ओढलं. मूर्ती जमिनीतून निघाली. खरंच, तिच्या पायाखाली सोन्याची मुळं होती, जमिनीत गाडलेली. ती तुटली. धाड मूर्ती खाली पडली. मंदिराचा कळस पडला. घंटा तुटली.

मूर्ती जमिनीवर पडून ओरडत होती, मी देवी आहे मला टाकू नका

हरिभाऊ म्हणाला, तू देवी नाहीस! तू लोभ आहेस! सोन्याचा लोभ 

वीस माणसांनी उचलून मूर्ती ट्रॉलीत टाकली. ट्रॅक्टर गोदावरीकडे निघाला. अमावस्येच्या काळोख्या रात्री. वाटेत मूर्ती ट्रॉलीतून उडी मारायचा प्रयत्न करत होती. हलत होती.

गोदावरी आली. काळं पाणी. पूर आलेलं. जोरात वाहत होतं.

टाका आर्यन ओरडला.

सगळ्यांनी मूर्ती उचलली आणि पाण्यात टाकली. चार फूट सोन्याची मूर्ती पाण्यात पडली. धपाक पाणी दहा फूट उडालं.

पाण्यात पडताच मूर्तीने किंकाळी मारली. इतकी मोठी की गोदावरीच्या दोन्ही काठांनी ऐकली. पाणी उकळू लागलं. बुडबुडे. धूर. जणू सोनं वितळत होतं. आणि मग... शांतता.

पाणी शांत झालं. मूर्ती तळाला गेली.

आणि पाण्यातून दहा प्रकाश वर आले. दहा आत्मे. सावित्री, भैरवनाथ, विठ्ठल, नथू, किसन, कमला, सुनिता, श्रुती, रघुनाथ, दत्ता. आणि त्यांच्यामागे दोन अजून - सरपंच आणि हवालदार, इन्स्पेक्टर. बारा आत्मे. सगळे हात जोडून.

धन्यवाद आर्यन... आज आम्ही खरंच मुक्त झालो... सोनं पाण्यात गेलं... शाप संपला...

आर्यनने हात जोडले. संपला. खरंच संपला.

पण तेवढ्यात पाण्यातून एक हात बाहेर आला. सोन्याचा. चमकणारा. मूर्तीचा हात. त्याने आर्यनचा पाय घट्ट पकडला. पाण्यात ओढू लागला.

तू पण ये... तू अकरावा नाही, तू तेरावा बळी... तू आमच्यात ये... कायमचा...

आर्यन पाण्यात ओढला जात होता. वाचवा काका वाचवा ती मला ओढतेय 

क्रमश: