झपाटलेला वाडा - भाग 14: मातीची देवी आणि परत आलेला वाडा
सोन्याची मूर्ती गोदावरीत वितळली. दहा आत्मे तारे झाले. गाव वाचलं. असं सगळ्यांना वाटलं. पण आर्यनला झोप येत नव्हती.
कारण त्या रात्री त्याला परत स्वप्न पडलं. तोच वाडा. दोन मजली, कौलारू, लाकडी खांब असलेला भोसले वाडा. तसाच उभा, जसा पडण्याआधी होता. पण आता वाडा नवीन होता. आणि गच्चीवर कोणीतरी उभं होतं. सोन्याची देवी. पण आता तिचं रूप बदललं होतं. अर्धा चेहरा देवीचा, अर्धा हडळीचा. अर्धं अंग सोन्याचं, अर्धं मातीचं. ती म्हणाली -
तू मला वितळवलंस... पाण्यात टाकलंस... पण मी संपले नाही... मी परत येणार... कारण माझं सोनं गोदावरीत आहे... मातीत आहे... पाण्यात आहे... जोपर्यंत एक कण पण सोन्याचा या पृथ्वीवर आहे, तोपर्यंत मी आहे... आणि मी परत वाडा बांधणार...
आर्यन घामाने जागा झाला. सकाळी गोदावरीवर गेला. पाणी निळं होतं. पण तळात... काहीतरी चमकत होतं. सोनेरी चमक. पाण्याच्या तळाशी, वाळूत. जणू सोनं अजूनही तिथेच आहे. वितळलं नाही, फक्त वाळू झाली.
त्याने गावकऱ्यांना सांगितलं. गावकरी म्हणाले, सोनं परत काढू नका साहेब. तिथेच राहू द्या. नाहीतर परत हडळ येईल.
आर्यनने मंदिरात दगडाची देवी बसवली. काळ्या दगडाची. साधी, हात जोडलेली. हातात त्रिशूळ नाही, सोनं नाही. पुजारी म्हणाला, "आता ही खरी देवी. ही कोणाला मारणार नाही. ही मातीची देवी.
पूजा झाली. घंटा वाजली. गावकरी आले. पण संध्याकाळी... मंदिरातून परत तोच आवाज आला.
छुन... छुन... छुन... पैंजणाचा आवाज. तोच जो पहिल्या दिवशी वाड्यात आला होता.
आर्यन धावत मंदिरात गेला. दगडाची देवी जागेवर होती. पण तिच्या पायात... सोन्याचे पैंजण होते. आपोआप आलेले. नवीन. चमकणारे. आणि आपोआप वाजत होते.
हे पैंजण कुठून आले आर्यन ओरडला.
तेवढ्यात देवीच्या मागून एक बाई बाहेर आली. सुनिता. तिच्या हातात श्रुती. पण आता श्रुतीचं मुंडकं जोडलेलं होतं. दोघी हसत होत्या, पण डोळ्यात रक्त.
आम्ही परत आलो आर्यन. सोनं आम्हाला सोडत नाही. गोदावरीत पण सोनं आहे. वाळूत. तिथे पण आम्ही अडकलो आहोत. आम्हाला तिथे पण शांती नाही. आम्हाला वाटलं आम्ही तारे झालो, पण ते सोन्याने आम्हाला दाखवलेलं स्वप्न होतं.
आर्यन म्हणाला, पण तुम्ही तर मुक्त झाला होतात
जोपर्यंत सोन्याचा एक कण पण या पृथ्वीवर आहे, तोपर्यंत आम्ही मुक्त होणार नाही. आम्हाला पूर्ण नष्ट करावं लागेल. सोन्याला पूर्ण नष्ट. आणि त्यासाठी एकच उपाय..."
कोणता?
या मंदिराच्या जागी परत वाडा बांधावा लागेल. तोच वाडा. आणि त्या वाड्यात आम्हाला परत पुरावं लागेल. जिथे आम्ही होतो तिथेच. भिंतीत, विहिरीत, खांबात, शेतात. तरच हे चक्र पूर्ण होईल. आणि मग वाड्यासकट आम्हाला जाळावं लागेल. पूर्ण वाडा पेटवावा लागेल. तरच सोनं जळेल. सोन्याचा शाप जळेल.
आर्यन म्हणाला, परत वाडा बांधायचा तोच झपाटलेला वाडा
हो. कारण शाप वाड्यापासून सुरु झाला, वाड्यातच संपेल.
आर्यनने गावकऱ्यांना सांगितलं. गावकरी घाबरले. म्हणाले, परत वाडा? परत भुताटकी नको मंदिरच राहू द्या वाडा नको
पण त्या रात्रीपासून गावात परत माणसं मरायला लागली. एका माणसाला झोपेत कोणीतरी गळा दाबून मारलं. दुसऱ्याला विहिरीत ढकललं. तिसऱ्याच्या भिंतीतून हात आला आणि त्याला आत ओढलं. रोज एक मृत्यू. जसा आधी वाड्यात व्हायचा तसाच. मंदिरातही.
गावकरी ओरडले, वाडा परत आला वाड्याचा आत्मा मंदिरात शिरला तो परत बांधला जातोय
आर्यनने ठरवलं - वाडा परत बांधायचा. त्याने जुन्या फोटोवरून नकाशा काढला. दोन मजली, मध्ये अंगण, मागे विहीर, खाली तळघर. सगळं तसंच.
गावकऱ्यांनी मदत केली नाही. आर्यन एकटाच विटा, लाकूड, कौलं आणू लागला. दगडाच्या देवीच्या मंदिराभोवती भिंती बांधायला सुरुवात केली. मंदिर मध्ये राहील, भोवती वाडा.
एक महिन्यात वाडा अर्धा बांधला गेला. पण मजुरांना रात्री आवाज यायचा. कोणीतरी विटा पाडतंय. कोणीतरी हसते. एका मजुराला भिंतीतून हात आला आणि आत ओढलं. तो ओरडला, वाचवा! सकाळी पाहिलं तर तो भिंतीत गाडला गेला होता. फक्त हात बाहेर. तसाच जसा कमला गाडली होती.
आर्यन म्हणाला, हा वाडा स्वतःच बनतोय. भुतांनी बनवतोय.
आणि खरंच, रात्री वाडा आपोआप बनू लागला. विटा आपोआप रचल्या जात होत्या. लाकूड आपोआप लागत होतं. कोण दिसत नव्हतं, पण काम चालू होतं. टप... टप... ठक... ठक... सकाळी पाहिलं तर एक मजला पूर्ण. दुसऱ्या रात्री दुसरा मजला. तिसऱ्या रात्री कौलं. सात दिवसात पूर्ण वाडा उभा. तसाच जसा शंभर वर्षांपूर्वी होता. अगदी तसाच. नवीन वाडा. पण जुन्या आत्म्यांसह. मध्ये दगडाची देवी - वाड्याच्या अंगणात.
वाडा पूर्ण झाला तेव्हा मुख्य दार आपोआप उघडलं. आतून आवाज आला -
ये आर्यन... आत ये... तुझीच वाट पाहतोय... तूच या वाड्याचा नवा मालक... अकरावा मालक...
आर्यन आत गेला. वाडा थंड, ओलसर वास, भिंतीतून रक्त ओघळत होतं. तसंच सगळं. जणू जुना वाडाच परत आला.
अंगणात दहा सांगाडे बसले होते. मांडी घालून. हातात माळा. वाट पाहत. मध्ये एक रिकामी जागा.
सावित्री म्हणाली, ये... बस... तू अकरावा... आमच्यात बस... तरच हा वाडा पूर्ण होईल... अकरा आत्म्यांचा वाडा... शंभर वर्षांसाठी...
आर्यन म्हणाला, मी तुमच्यात नाही बसणार. मी तुम्हाला जाळणार. वाड्यासकट जाळणार.
सावित्री हसली. तिचं अर्धं तोंड देवीचं, अर्धं हडळीचं झालं.
तू आम्हाला जाळू शकत नाहीस. कारण तू पण आता आमच्यातलाच आहेस. तू या वाड्यात आलास, तू या वाड्याची कथा लिहिलीस, तू या वाड्याचा झालास. तुझं नाव पण या वाड्याच्या भिंतीवर लिहिलं आहे. बघ...
आर्यनने भिंतीवर पाहिलं. रक्ताने, ताज्या रक्ताने लिहिलं होतं -
अकरावा मालक - आर्यन. मृत्यू - आज रात्री बारा वाजता. कारण - अकरावा बळी.
आर्यन घाबरला. हे काय माझं नाव
भैरवनाथ म्हणाला, हो. तुझं नाव. आज रात्री बारा वाजता तुझा बळी. तरच हा वाडा कायमचा राहील.
आर्यन पळायला लागला. दाराकडे. पण दार बंद झालं. धाड खिडक्या बंद झाल्या. वाडा बंद झाला. आतून आवाज आला, तू नाही जाऊ शकत. तू या वाड्याचा आहेस. तूच या वाड्याची शेवटची कथा.
बारा वाजले. वाड्याची घंटा वाजली. दहा आत्मे उठले. हातात खंजीर, त्रिशूळ, दोर. आर्यनकडे येऊ लागले. म्हणाले, ये... अकरावा बळी... ये... आमच्यात ये... कायमचा...
आर्यन ओरडला, वाचवा कोणीतरी वाचवा पण बाहेर कोणीच नव्हतं. गावकरी लांब होते. वाड्याजवळ कोणीच येत नव्हतं. वाडा परत झपाटलेला झाला होता. आणि आत आर्यन एकटा. अकरावा बळी म्हणून.
क्रमश: