करावे तसे भरावे Vrishali Gotkhindikar द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

करावे तसे भरावे

“करावे तसे भरावे ...
रिनी आणी मिनी ..दोन जुळ्या बहिणी

आई बाबाना मुलीची हौस ..त्यामुळे खूप ‘ लाडक्या’.होत्या घरात ..आजी आजोबांचा तर पंचप्राण म्हणा ना !!

दोघी होत्या जुळ्या ..पण सर्वच बाबतीत कमालीच्या” वेगळ्या “.कोणत्याच बाबतीत त्यांच्यात साम्य नव्हते .

रिनी सावळी पण नाकी डोळी निटस् .आणी खूप हुशार समंजस ..!मिनी गोरी पान ..जरा अपर्या नाकाची खूप अवखळ आणी खोडकर ..!
लहान असताना दोघींचे पण कौतुक होत असे .
पण जशा जशा मोठ्या होवू लागल्या तसे शहाण्या समजूतदार रीनीचे कौतुक जास्त होवू लागले

कारण मिनीला फक्त नाचाची आवड ..उरलेला वेळ दंगा
रिनी ..मिनी पेक्षा हुशार आणी अभ्यासू असल्याने शाळेत पण ती चमकू लागली
आणी मग मिनीला वाटू लागले अरे आपले तर महत्व कमी होवू लागलेय !!
आई बाबा पण म्हणू लागले
.”.मीने नुसता नाच आणी दंगां नको ग थोडा अभ्यास पण
कर ना रिनी सारखा “..
सारखे सारखे असे ऐकून मिनीचे तर डोकेच फिरले !
अगदी राग राग यायला लागला तीला रीनीचा .मग तीला त्रास द्यायची एकही संधी ती सोडेना .

रिनी मात्र सोशिक होती काही बोलायची नाही
आजीला हे मिनीचे नसते उद्योग समजायचे ती नेहेमी तीला समजावून सांगायची
पण मिनी ..दिवसेदिवस जास्त “आक्रमक” होवू लागली ..दोघी चौथ्या इयत्तेत गेल्या ..आता अभ्यास वाढला रिनी पण अभ्यासात गर्क होवू लागली

मिनी मात्र जास्त लक्ष अभ्यासात न देता ..नाचात रमत होती ..नाचात मात्र शाळेत पहिला नंबर होता तिचा ..
रिनी गणितात खूप हुशार!!
पैकी च्या पैकी मार्क असत ..सर् खूप कौतुक करीत तीचे

सर् म्हणत “.पहा मिनुबाई .रीनीला शंभर ..तु मात्र त्यातला भोपळा आहेस “
मिनीला प्रचंड राग येत असे ..सरांचा ..रीनिचा आणी सर्वांचाच ..!!!!
सहामाही परीक्षेसाठी रिनीने आपली
गृहपाठाची वही तयार करायला घेतली सारी गणिते सुबक पद्धतीने सोडवून
अचूक उत्तरे काढून ,,वही दप्तरात ठेवली .उद्या सकाळी शाळेत सरांना दाखवायची होती
तीला माहीत होते की तीला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत .ती मिनीला म्हणाली
“मिनू तुझी कीती गणिते झाली आण बरे मी पाहते ..”मिनी रागावून म्हणाली” काही नको जास्त शहाणपणा दाखवायला” ..!!
रिनी काही बोलली नाही

तिच्या पण हल्ली लक्षात येत होते मिनी मुद्दाम तीला त्रास देते ते ..!दुसऱ्या दिवशी दोघी शाळेत गेल्या गणिताच्या तासाला सरानी सर्वांच्या वह्या मागितल्या

मिनीने आपली वही दिली .रिनीने दप्तर उघडले तर काय तिच्या वहीवर पेनातली सारी शाई सांडली होती ...ती चकित झाली कारण तीला आठवत होते पेन तर तीने रात्री व्यवस्थित

कम्पासात ठेवले होते .

तीचे डोळे भरून आले .सरांनी वही पाहताच डोक्याला हात लावला

“रिनी कीती हा अजागळ पणां?..अग पेन नीट ठेवायला काय झाले ?..आता या गृह्पाठा साठी काय मार्क देणार मी तुला ?
तरी पण तुझा एकंदर अभ्यास पाहता पास मात्र करेन मी तुला .”
रिनी खुपच खजील झाली ..सारा अभ्यास नीट असून पण मार्क तर नाहीच सरांचे बोलून

घ्यावे लागले आणी वर्गात अपमान झाला तो वेगळाच
मिनीची वही पण पाहिली सरांनी ..ती पास होणार होतीच ..वरकरणी रीनीची समजूत काढत होती मिनी ..पण मनात मात्र खुष झाली ..
“बरी खोड मोडली या रिनीची .फार हुश्शार..आहे ना ..”!!
घरी हे सारे समजले तेव्हा सर्वाना खूप नवल वाटले कारण रिनी तशी व्यवस्थित मुलगी होती

आई बाबांनी रिनीची समजूत काढली ..आजीच्या मात्र मनाला नाही बरा वाटला तो प्रकार !! परीक्षा झाली आणी संमेलनाचे दिवस आले ..शाळेत तयारी सुरु झाली

मिनी रिनी दोघींनी पण भाग घेतला होता रिनी एक छोटे नाटक करणार होती
मिनी च्या बाईनी मात्र एक सुंदर नाच खास मिनी साठी बसवला होता
मिनी नाचात खूप पारंगत होती शिवाय दिसायला छान असल्याने सर्वात उठून दिसत असे .या वेळी बाईनी तिच्या साठी खास सिंड्रेला चा नाच बसवला होता

तो नाच म्हणजे संमेलनाचे आकर्षण होते .त्याच्या तालमी पण “खास” चालू होत्या ..
.........संमेलना दिवशी सकाळी घरी तयारी सुरु झाली दोघींची ..मेकअप कपडे वगैरे
कपडे इस्त्री पण करायचे होते .आई म्हणाली अग सुलभा दीदी येईल ना ती करेल तुमचे
कपडे इस्त्री
..एवढ्यात सुलभा आलीच ..रिनी म्हणाली दीदी माझा हा फ्रॉक आधी इस्त्री कर
मग मिनीचा ड्रेस घे ..सुलभा बर म्हणाली एवढ्यात आईने तीला हाक मारली म्हणून
इस्त्रीलावून ती गडबडीत आत गेली ..अजून तीने स्वीच चालू करायचा होता ..मिनीच्या ते लक्षात आले ..आता करुया रीनीची फजिती .असे ठरवून तिने पळत जावून

खोलीतला स्वीच सुरु केला ..तेव्हा सुलभा दीदी आई आणी आजीशी गप्पा मारत बसली होती आणी चहा पण

पिणे चालु होते ..
पाच एक मिनिटात तीचा चहा झाला ..आणी ती खोलीकडे गेली
तेवढ्यात तिची एक जोरदार किंचाळी साऱ्या घरात .घुमली ..रिनी मिनी आई आजी सार्या धावली ..पाहतात तर काय .मिनीचा सिंड्रेला ड्रेस जाळून खाक

झाला होता ...मिनी तर ते पाहून ..थक्क झाली कारण तीला वाटत होते रीनीचा फ्रॉक जळेल

हे तर काही अजबच झाले ..!!!!झाले होते असे सुलभा दीदी ने रिनीचा फ्रॉक घेतला होता इस्त्रीला ..
पण तेवढ्यात तीला मिनीचा गुलाबी सिंड्रेला ड्रेस दिसला ..तीला इतका आवडला .की
तीने पाहायला म्हणून तो हातात घेतला ..आणी आईने हाक मारली म्हणून रिनीच्या

फ्रॉक वर तो ठेवला ..आणी वरती इस्त्री ठेवून ती चहा प्यायला गेली ..इतक्यात मिनीने पळत येवून स्वीच चालू केला ..गडबडीत तिच्या लक्षात पण नाही आले

की इस्त्री तीच्या ड्रेस वर आहे ...
झाला ड्रेसचा ..कोळसा !!..मग काय आईने पटकन स्वीच बंद केला ..सुलभा दीदी तर घाबरून रडू लागली ..
रिनीला पण कळेना हे काय झाले ..आणी मिनी ..तिची अवस्था बिकट झाली अगदी..
आजीने फक्त मिनी कडे पाहिले ..बस !!

ड्रेस जळल्या मुळे संमेलनात मिनीचा नाच होवू शकला नाही ..रीनीचे छोटे नाटक मात्र छान रंगले ..
मिनीच्या मैत्रिणी नी तीची चांगलीच चेष्टा केली ..
अगदी “विरस “झाला तीचा ....

आणी मग तीला आजीचे “बोल “आठवले ..“करावे तसे भरावे “...!!