प्रेमाची गोष्ट Vrishali Gotkhindikar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमाची गोष्ट

गोष्ट ..प्रेमाची !!! yes

ती एक कविमनाची आणी रसिक.... हसत खेळत राहणारी मुलगी होती

रुप आणी गुण दोन्ही असल्याने ती स्वताबद्दल एक अभिमान होता तिच्यापाशी

सोशल नेट वर्किंग साईट विषयी ती थोडे फार जाणून होती

पण असे वाटे कुठे वेळ असतो ..नोकरी इतर घरकाम वाचन सगळा वेळ उडून जातो

पण मैत्रिणीने खुपच आग्रह केला

अग ये ना खूप मजा असते त्यात तुला लीखांणाची पण आवड आहे

तीचे खाते पण तिनेच उघडून तीला घेतले नेट वर्किंग ला

मग मात्र तीला हळू हळु गोडी लागली त्याची

आणी तिथेच झाली ओळख तिची आणी त्याची ..एका खेड्यात सरकारी नोकरी करीत होता तो

पण कविता चारोळ्या यात फार “रुची ..आधी दोघे एका ग्रुप वर उशीर पर्यंत भेटत

नंतर हळू हळू गप्पा गोष्टी सुरु झाल्या ..

त्याचा आग्रह असे रात्री तीने त्याच्याशी बोलावे पण ठराविक मर्यादे पलीकडे ती थांबत नसे

मग तो खूप नाराज होई ..पण तीचे त्या गोष्टीकडे इतके लक्ष नसे

ती स्वतात जास्त रममाण असे ..!!

असे एक दीड वर्षे त्यांची ओळख वाढली आणी अचानक एका गेट टुगेदर साठी

तीला ज्या गावी जायचे होते.

..तिथे जवळच तो ही राहत होता ..

ती तिकडे जाणार असे समजल्या बरोबर त्याने अगदी तिच्या मागे लागून तीचा फोन नंबर

पण घेतला

मी तुला भेटायला नक्की येणार खुप आतुर आहे मी ..

असे म्हणाला तेव्हा तीला थोडे नवल वाटले त्याच्या या आतुरतेचे ..

आणी खरेच ती गेली त्या कार्यक्रमाला..

तो सकाळीच आला तीला भेटायला

तसेही ग्रुप चे बरेच मित्र मैत्रिणी तेथे होत्या एकच धांदल उडाली होती !!

आल्या आल्या तो तीला पाहून म्हणाला

ओळखलेस का मला .?

.ती काही वेळ बुचकळ्यात पडली कारण फोटो आणी तो हे खूप वेगळे होते

अरे मी तुला ओळखले नाहीस ...असे ती एकदम बोलून गेली

त्याने पटकन तीचा हात ओढून हातात घेतला हस्तांदोलना साठी ..

आणी म्हणाला ..हे काय ग तुझे?.... मी आपली वाट पाहतोय तुझी

आणी तु म्हणते ..मला ओळखलेच नाही ....हे बरे नाही हं ..!

ती हलकेच हसली आणी त्याच्या हातून आपला हात काढून घेतला .

आणी मग त्यानंतर सुरु झाला “सिलसिला फोन चा !!

कधी सकाळ आणी कधी संध्याकाळ चे मेसेज ..कधी चुकून गप्पा पण ..

ती कधीच त्याच्या बाबतीत फार सिरीयस नव्हती ..जसे इतर काही मित्र तसाच तो ..

बऱ्याचदा तो तीला म्हणे मला बोलायचे आहे तुझ्याशी कधी करू फोन ..?

तीला वाटे असे काय आहे बोलायचे सगळे तर मेसेज करून बोलत असतोच

पण एकदा मात्र निकराने त्याने विचारले तु कधी फ्री आहेस ?

तेव्हा मात्र तीला त्याच्याशी फोन वर बोलावेच लागले ..तो म्हणाला ..

मला तुझ्या बरोबर काही क्षण घालवायचे आहेत ..जे फक्त माझे आणी तुझे असतील “

त्याचा हा प्रस्ताव ऐकून ती एकदम चकीत झाली

“म्हणजे काय रें ..?काय म्हणायचे आहे तुला ..?

प्रेमात पडलोय मी तुझ्या ..

काय सांगतोस ..काही पण नको हं बोलू ..

“खरेच गेले वर्षभर तुला भेटल्या पासून फक्त प्रेमच करतोय “

मग बोलला नाहीस कधी ..

तुला नेहेमी सुचवत होतो पण ..तुला कळेल तेव्हा ना !!

तीला काय बोलावे काहीच सुचेना .

असा विचार पण कधी नव्हता डोक्यात तीच्या .

मी तुला सांगायला इतका वेळ घेतला हे कबुल आहे मला

पण प्लीज ..तु आता लौकर दे निर्णय ..

सारे तुझ्या पसंतीने आणी तुझ्या मना प्रमाणे घडेल “

आता मात्र काय करावे ते तीला समजेना ..

फक्त एकदा भेटले की झाले का ..असे विचारता तो म्हणाला अग खूप लांब आहे ना पल्ला

सारखे सारखे नाही भेटता येणार

आणखी काही दिवस गेल्या वर मात्र त्याने ओळखले वाट्ते की

निर्णय त्याच्या बाजूने नसावा ..

आणी मग तीच्या लक्षात आले

तो आपल्याला टाळू लागला आहे ..

साधे सुधे मैत्रीतले असे काही बोलायचेच नाही आहे त्याला आपल्याशी

त्याला फक्त त्याच्या “प्रेमाच्या मतलबाशी..देणे घेणे आहे

तसे काही बोलले तरच फक्त तो ऐकणार होता

ती खूप दिवस त्याच्या ..लहरी चंचल स्वभावाचा अनुभव घेतच होती .

पण जावू दे असतो एकेकाचा “स्वभाव “..असे म्हणून दुर्लक्ष पण करत होती ..

आता मात्र तो तिच्या “डोक्यात “..जायला लागला

असे वाटले जावून बोलावे तडतडा .,. .

प्रेम म्हणजे काय वाट्ते रें तुला ?

इतक्या नाजूक सुंदर भावनेशी खेळायचा हक्क तुला दिला कोणी ?

तुझ्या मनाप्रमाणे असले की प्रेम का ?

काय समजतोस कोण स्वताला तु ?

मैत्री म्हणून जवळीकीने वागायला गेले तर ..हे काय ?

आणी हो आता हे “प्रेम दाखवून तु प्रेमाचा आणी माझा पण अपमान केलायस .

आता प्लीज परत कुणाचा अपमान नको करूस ..

पण मग तीच शांत झाली ..

कारण कुणाला सुनावणार होती ती हे सगळे ?

ज्याला तिच्याशी संपर्क पण ठेवायचा नाहीये ..त्याला ?

अशीच ती अगदी उदास उदास होवून गेली

प्रश्न हा नव्हता की त्याने तिच्यावर प्रेम का केले ..

ती तर प्रेम ही एक सुंदर भावना आहे असे समजत होती .

भलेही त्याचे प्रेम एकतर्फी होते ..कारण प्रेम ही मागून करण्याची गोष्ट च नाही

तिने अजून त्याचे प्रेम स्वीकारावे की नाकारावे ..हे काहीच नव्हते ठरवले ..

पण त्या पूर्वीच त्याने तीला दूर सारले होते

अगदी तिचा होकार नकार न विचारता आणी तिच्या भावना न समजून घेता

त्याने असे का करावे ..हे तीला समजत नव्हते

ह्या प्रेमा बिमा पेक्षा आपली पूर्वी नुसतीच मैत्री होती ते कीती बरे होते ..असे तीला वाटले

नंतर नंतर फोन बुक मधला नंबर पण काढावा असे वाटूलागले कारण संपर्क

तुटलाच होता ना आता तर येणारे सकाळचे संध्याकाळचे मेसेज पण बंद झाले होते

सध्या तरी ती सुन्न ..होती !!

आणी अचानक एक दिवस त्याचा फोन आला ..प्रथम नंबर पाहून ती चमकली

फोन घ्यावा की नाही अशी द्विधा मनस्थिती झाली तिची

वाटले सरळ कट ..करून टाकावा ..मरू दे ..

पण स्वभाव नाही ना असा ..तिने विचार केला पाहू तरी काय म्हणतो

उचलला फोन तिने ..

तिकडून आवाज आला त्याचा ..भरदार असा .हेल्लो

इकडे शांतता ..मग तोच म्हणाला बोलणार नाही का माझ्याशी ?

माहीत आहे तु खूप रुसली आहेंस् पण ऐकून तरी घे माझे ..

आणी आधी त्या साठी .तुझ्या गोड आवाजात हेल्लो ऐकू दे ना ..

अजूनही तिचा मूड नव्हताच ..ती म्हणली हं ..बोल काय ते ..

मला माहीत आहे तुझ्या रागाचे कारण ..

आता मात्र तिचा पण रागाचा स्फोट झाला ..

मला सांग का नाही रागावणार ,.?.माझी काही चुक होती का ?

अचानक तु म्हणजे मला एखाद्या कस्पटासमान वागणूक दिलीस ..

प्लीज प्लीज शांत हो ना राणी ..त्याचा आश्वासक आवाज आला

आधी माझे ऐक तरी ..माहीत आहे ग मी थोडा विचित्र वागलो ..

पण डिअर तुला माहीत आहेच मै तो सिर्फ तेरा हु ना ..

आता काय तुला चेष्टेचा मूड का ...जर इतकी मी जवळची आहे

तर मग तुझ्या वागण्याचा काय अर्थ लावू मी ..?

डार्लिंग तुझ्या माझ्या एकत्र पणाचा लोक वेगळा अर्थ काढू लागले

काही जण तर तुला मी दूर करण्यासाठी काही क्लुप्प्त्या पण करू लागले

अशा वेळी मला सांग हे सारे सिक्रेट रहावे या साठी मी काय करायला हवे होते

मला त्या वेळी जे सुचले ते केले ग .

पण मनात मात्र फक्त तुझे ..आणी तुझेच प्रेम होते ..

पण खुप मुश्कील होते तुझ्या पासुन दूर राहणे ..हे तेव्हा मला जाणवले ग ..

अरे पण मग मला तु विश्वासात का नाही घेतले ??

काय हा विचित्रपणा ..ती खुपच रागावली

तो म्हणाला अग तूच मला म्हणतेस ना कायम विचित्र वागतोस

त्यात च हे ...एक !!

ती संयमित राहिली आणी म्हणाली

“बर आता बोल काय आहे तुझी अपेक्षा ?

अग मी खरेच निस्वार्थी प्रेम करतो ग तुझ्यावर ..

अपेक्षा वगैरे काहीच नाही ...

अगदी तु मला दूर ठेवलेस तरीही इतकेच प्रेम करीत राहीन तुझ्यावर तुझी शप्पथ

फक्त मला फोन वर तरी तुझे गोड शब्द ऐकवशील ना ?

ती काहीच नाही बोलली ..पण असे वाटले त्याच्या विषयी आपला गैरसमज झाला की काय

.......................आता अधून मधून परत फोन मेसेज सुरु झाले त्याचे

एकदा तर आपले मन खरेच त्याने मोकळे केले

म्हणाला ..काय करू ग मला आयुष्यात प्रेम असे कधी मिळालेच नाही

एक तर भावंडात धाकटा त्यामुळे मोठ्या बहिणी कधीच लग्न होवून गेल्या

कॉलेज ला होतो पण कधी कुठली प्रेम करणारी मैत्रीण भेटलीच नाही

लग्न केले तर ..बायको पण एकदम थंड स्वभावाची ..

तीला ती आणी तीचे करियर यापलीकडे काही दिसतच नाही ..

प्रेमाच्या सुंदर कविता करणारा मी ..स्वत मात्र प्रेमात अपयशी ठरलो आहे !!

आणी आता कित्येक वर्षांनी तु भेटली आहेस ..प्रेम करावी अशी ..तर दुर्दैव बघ माझे

तुझा विश्वास च नाहीय माझ्या प्रेमावर ...काय करू ग मी ..?

त्याचे शांतवन कसे कराव हे तीला पण समजेना ..

मग तिनेच ठरवले प्रतिसाद द्यायचा त्याला ..पाहू काय होते ते ...

आणी मग मनाचा निर्धार करून तिने सांगितले त्याला ..

मी तयार आहे तुझ्या साठी माझ्या आयुष्यातला एक पूर्ण दिवस् द्यायला

आणी तुझे हितगुज ऐकायला ...

तिचा असा रुकार ऐकून ...जणु वेडा झाला तो ..

एक पूर्ण दिवस फक्त धुंदीत होता तो ..तीला पण खूप गम्मत वाटली .

असेच दिवस आपल्या गतीने पुढे सरकत होते .तसे काही खास घडले नाही आणी नव्हते

ती पण आपली नोकरी इतर काही छंद जोपासण्यात मग्न होती खूप दिवस त्याचा फोन आणी मेसेज पण

नव्हता सध्या तिने ठरवले होते स्वत हून कोणताच पुढाकार नाही घ्यायचा कारण मागील अनुभवाचा बराच

“चटका “बसला होता तीला

तिच्या वाढदिवसाला तीला वाटले येईल कदाचित फोन किंवा मेसेज ..पण छे

काहीच नाही ..नाही म्हणले तरी थोडी वाट पाहत होती ती त्याच्या शुभेच्छा ची ..पण जावू दे नाही तर नाही

कोण कुणाला फोर्स थोडेच करू शकतो ?

आणी अचानक पाच सहा दिवसांनी ती शनिवारी दुपारी घरी आली पाहते तो काय

एक कुरियर वाला वाट पाहत होता ..म्हणाला “म्याडम दोन दिवस झाले मी येवून जातोय तुम्ही तर भेटत नाय

....कुठले कुरियर पार्सल आले आहे आपल्याला ..तीला काहीच समजेना

..

पण न बोलता तिने सही करून ते ताब्यात घेतले आणी उलट सुलट करून पाहिले मागे काहीच पत्ता वगैरे नव्हता ..

घरात येवून तीने ते उघडले ..पाहते तर काय त्यात एक चिट्ठी आणी एक छोटी डबी ..आधी तीने

ती चीठ्ठी उघडली ..कुणी पाठवले आहे ते पाहायला ..

प्रिये ...

तुझ्या वाढ दिवसाला मी फोन वगैरे नाही केला म्हणून रुसली आहेस ना?

..पण खरे सांगू आपला नाही तसल्या गोष्टीवर विश्वास ..

खरे तर सरळ येवून तुला भेटून माझ्या शुभेच्छा डायरेक्ट”.... ...”वर ..द्यायचा विचार होता

पण काय करू ग ....ही मजबुरी ..हे अंतर ..ही नोकरी ..!!!!

सारे सारे काही असल्याने नाही जमू शकले

पण आता हे बघ ही भेट दिलीय ना तुला

आणी हो थोडी उशिरा पाठवली कारण जनरल लोकांनी तुला त्या दिवशी “विश केले असेल

मला “स्पेशल ...राहाय्चेय तुझ्या साठी ..म्हणून हा सारा ...खटाटोप !

आणखी एक...सांगू ही जी भेट तुला दिलीय ना

ती मी जेव्हा तुला प्रथम भेटलो ना

तेव्हाच घेवून ठेवली होती बर का ....खास तुझ्या आगामी वाढदिवसासाठी !!!

आता प्लीज ..राणी तुझ्या गोड आवाजात मला फोन करून सांग ना ..ही भेट तुला मिळाली ते

सारे वाचून ती ..चकित झाली आणी तीला हसू पण आले

खरेच त्याच्या प्रेमाची तऱ्हा ..”वेगळीच “..होती

डबी उघडून पहिली तर सोन्याचे ..झगमगते सुंदर कानातले झुमके होते त्यात

फार महागाचे वाटत होते ...पण खरेच “अप्रतिम “..होते

तिने फोन लावला त्याला ..

एरवी फोन उचलायला उशीर लागत असे

पण आता मात्र लागलीच उचलला ..आणी भरदार आवाज आला “हाय डिअर ..

मिळाली का आमची ...”प्रेम भेट “?

ती हसली आणी म्हणाली ..काय वाट च पाहत होतास वाट्ते फोनची ..?

का नाही पाहणार? आमच्या राणीला ..हा “तोहफा “..आवडला का नाही नको विचारायला ?

अरे पण इतका डीटेल पत्ता कुणाला विचारलास ..?

कुणाला म्हणजे ..या वाऱ्याला ..या ताऱ्यांना ..या गुलाबाच्या सुगंधाला ..आणी चंद्राला

पण माहीत आहे ..तुझा पत्ता त्यानीच सांगितला मला ....

तीला हसूच आले ..तरी पण ..

ती लटक्या रागाने म्हणाली ..”काय रें हा तुझा “विचित्रपणा ?आणी इतकी महाग भेट ?

अग तुझ्या पुढे जगातली कोणती ही भेट “..महाग नाही ..

तुझ्या साठी चंद्र आणी सूर्य पाठवलेत ..कानात घालायला ..

आणी त्यांची “शोभा ..फक्त तुझ्या कानात आहे बर का ...!!

काहीतरीच तुझे ..खरा “कवी आहेस बघ ...!!

मग आहेच मुळी ...आणी आता ही एक “लावण्यवती कविता भेटलीय ना मला ..

हम् तो ऐसेच है ...तुम्हारे ..और सिर्फ तुम्हारे ,,

ए गप ना इतकी नको तारीफ करू ...ती संकोचून म्हणाली

खुप सुंदर आहे तुझी भेट ...मला भेट आणी ती देण्याचा “अंदाज दोन्ही आवडले

ये हुवी ना बात ....मला माहीत होते ..तु पण तीतकीच “रसिक आहेस !!!

आता मी भेटल्या वर मला पण मी मागेन ती रिटर्न गिफ्ट हवी बर का ..

ती मुक्त हसली ....म्हणाली “चावट आहेस् अगदी ...

तो अगदीच सात मजली हसला आणी म्हणाला ती तर मी वसूल करेनच ..

खरे तर तुला एक

अंगठी द्यायची होती ..”प्रेमाची ....भेट म्हणून ..

पण ती आता प्रत्यक्ष ...भेटीत देईन...!

इतके दिवस नाही वाट्ते आली माझी आठवण ?तिने विचारले ..

कशी नाही येणार ?..माझ्या श्वासात ..माझ्या कवितेत माझ्या लेखनात सगळीकडे तर तूच असतेस

आणी तुला पण हे माहीत आहे ...तुझ्या शिवाय माझे आस्तित्व ..शक्यच नाही ..

ती हसली ..आणी म्हणाली

बरे ठीक आहे ...विचित्र प्रियकरा “..ठेवू फोन ? तिने विचारले

“तथास्तु राणी ...अशीच आनंदी आणी फक्त माझी “.राहा

आणी तिकडून फोन कट झाला ...

त्यानंतर मात्र फोन येत राहिले

आणी मग एक दिवस् त्याचा प्रस्ताव आला ..

ऐक राणी .

आता होकार तर तु दिलाच आहेस

आता त्या दिवशीचा सगळा कार्यक्रम मात्र मी ठरवणार हं ..

खरे सांगू तुला खूप दिवस झाले ....इतका आनंद मला होवून ..

किंबहुना मला मी स्वताच कधी इतका आनंदी होवू शकलो नाही ..

तु मला दिलेले हे एक खूप मोठ्ठे “सरप्राईज आहे ग ...

तुझे कीती आणी कसे आभार मानू समजत नाही ग ...

आता जवळ असतीस ना ..तर ...........

तर काय ..काहीतरी नको बोलू ..ती अशीच कृतक कोपाने म्हणाली ..!!

.................. आता सुरु झाले रोजचे त्याचे प्लान ..हे करू ते करू

त्याचा आनंद पाहून ती पण का कोण जाणे पण सुखावून जात असे ..

तो इतका गुंतला आहे आपल्यात काही वेळा तीला पण ही गोष्ट ..खरी वाट नसे

पण आता हे घोडा मैदान अगदी ..जवळच आले होते म्हणा ..!!

तीने त्याला होकार तर दिला होता भेटायला

पण मनात मात्र थोडीशी धास्तावली होती ती ..खरेच काय असेल मनात त्याच्या ..काय बोलेल आणी

काय व्यक्त करील तो त्यावेळी ..खरे तर प्रेम बिम सारे बोलून झाले होते ..

आता आणखी काय असेल बरे ..?तो तर म्हणत होता ..या पलीकडे ही बरेच आहे जे मला

तुझ्या पाशी व्यक्त करायचे आहे ..काय असेल ?..

चुकून वाईट साईट विचार पण मनात येत असत .

पण आता बाण तर भात्यातून निसटून गेला होता ..!!

अखेर आला तो दिवस त्याने सांगितल्या प्रमाणे तोच तिच्या गावी गाडी

घेवून येणार होता आणी मग त्याच्या प्लान प्रमाणे दिवस घालवायचा होता ..

सकाळी उठून तीने आवरायला सुरवात केली तो काल संध्या काळी तिथे आला होता

गावा बाहेर एका लांब असणाऱ्या हॉटेल मध्ये उतरला होता तो

सकाळची त्यांची भेट प्रथम एका देवळात ठरली होती

तो म्हणाला दोन देवींचे दर्शन घेवून

मग आपला दिवस सुरु होईल (म्हणजे एक तीचे दर्शन आणी एक देवीचे ).

एक सुंदर गुलाबी साडी नेसून हलकसा .. मेक अप करून ती बाहेर पडली .

तीला पाहून त्याचे डोळे चमकले .कित्ती सुंदर दिसतेस ग मलाच हेवा वाटतो माझ्या भाग्याचा !

ती हसली ..मग तिच्या हातात एक सुंदर सुवासिक गजरा देवून तो म्हणाला असाच तुझ्या प्रीतीचा

सुवास माझ्या जीवनात पसरू दे

देव दर्शन झाल्यावर ती म्हणाली आता सांग काय प्लान तुझा ?

आता काय माझ्या लॉज वर दिवस घालवायच ..तो सहज म्हणाला

ती चमकली ..पण आता असे दाखवून उपयोग नव्हता कारण तिनेच दिले होते हे आमंत्रण

एक क्षण तीला वाटले ..पळून जावे मागच्या पावली ..पण

मनात भीती घेवून ती त्याच्या बरोबर गाडीत बसली गाडी वेगाने धावू लागली

त्याने अलगद तिचा हात हातात घेतला ..तीला त्याचा स्पर्श आश्वासक वाटत होता

पण पुढे काय होईल ही पण धाक धुक होती ..

तो खूप आनंदाने गप्पा मारत होता बरेच काही सांगत होता .ती पण अगदी रममाण झाली होती

भरपूर फिरून झाल्यावर गाडी हॉटेल पाशी थांबली ..

त्याने हात देवून आदबीने तीला खाली उतरवले ..तिच्या हाताचा एक हलकासा किस घेतला ..

ती अगदी मोहरून गेली ..

नंतर आत जावून त्याने जेवणाची ऑर्डर दिली ..

तीला म्हणाला बस आता निवांत जेवण येईपर्यंत गप्पा करू ..

मग खरेच मस्त रुचकर जेवण दोघांनी आनंदात घेतले

जेवण झाले की तीला मसाला पान लागते ..त्याला माहीत होतेच ..

असेच चालत चालत जावून दोघांनी ..मसाला पान ठेल्या वर जावून खाल्ले ..

मग सुरु झाले शॉपिंग ..निरनिराळी दुकाने पाहत त्याने तीला एक सुंदर ड्रेस घेवून दिला

मग रमत गमत गावातील तळ्यां काठी जावून बसले दोघे

संध्याकाळ कशी सरत आली समजलेच नाही

परत दोघे हॉटेल वर आले ..

ए आता मात्र निरोप घ्यायची वेळ आली बरका

तुझ्या म्हणण्या प्रमाणे मी सारा दिवस तुला दिला आता जावू दे मला

तो म्हणाला ठीक आहे पण ...काही वेळ शेवटी माझ्या रूम मध्ये बसूया ना ..

ती थोडी साशंक मनाने त्याच्या बरोबर खोलीत गेली

लगेच त्याने दरवाजा लावून घेतला आणी तीला पटकन जवळ घेतले

तिने आपली सुटका करून घ्यायचा प्रयत्न केला म्हणाली ..सोड ना मला

हो ग राणी ..काही वेळ तरी थांब ना मिठीत जरा सुखाचा अनुभव तरी घेवू दे मला

तीला पण त्याच्या मिठीत विरघळून जायला झाले ..पाच एक मिनिटाने ती भानावर आली

सावर स्वताला ..असे म्हणून ती बाजूला झाली

नको ग काळजी करू खरेच तुला वाटले तसे मी वेडे वाकडे नाही काही करणार

त्याने परत तिचा हात हातात घेतला आणी आपल्या डोळ्या वर ठेवला

आणी एका हाताने परत तीला जवळ ओढले ..

मला फक्त तुझ्या बरोबर काही क्षण घालवायचे होते जे फक्त माझे आणी तुझे असतील ..

आणी तसे हे सारे क्षण तु मला ..दिलेस खूप ऋणी राहीन तुझा

आता परत गाठ भेट कधी होईल माहीत नाही ..पण तोवर हे क्षण सोन्या सारखे माझ्या हृदयाच्या

कोंदणात जपून ठेवेन ..तु माझ्या प्रेमाचा स्वीकार केलास आता मी भरून पावलो

मला बाकी काही नको तुझ्या कडून ..

त्याच्या मिठीत च ती अगदी कानकोंडी झाली ..कीती वाईट विचार करती होतो आपण ..

पण हे याचे अमुल्य प्रेम ....खरेच आपण कीती भाग्यवान ..!!!

एकदम तिच्या लक्षात आले की त्याने डोळ्या वर ठेवलेला तिचा हात ओला झाला आहे

आत्यंतिक प्रेमाने भरलेले त्याच्या अश्रुंचे मोती ..तिच्या हातात होते ..

आणी आता ही “प्रेमाची गोष्ट “तिच्या हृदयात राहणार होती ..!

वृषाली गोटखिंडीकर