सकारात्मक विचारांची जादू... Anuja Kulkarni द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सकारात्मक विचारांची जादू...

सकारात्मक विचारांची जादू... -

* दिवसाची सुरवात करा सकारात्मक विचारांनी-

सकारात्मक विचारांचं महत्व सगळ्यांनाच माहिती असत. आणि तुम्हाला अनुभव असेलच, तुम्ही जे विचार सकाळी उठल्या उठल्या करता त्या विचारांचा परिणाम पूर्ण दिवसावर होतो.. म्हणजेच जसे विचार तसे परिणाम! जर तुम्ही असा विचार केला 'कसला कंटाळवाणा दिवस आहे..' तर तुमचा दिवस नक्कीच कंटाळवाणा होईल. याउलट जर तुम्ही असा विचार केला, 'आजचा दिवस किती मस्त आहे. खूप फ्रेश वाटत आहे. आणि दिवस सुंदर जाईल.' तर कोणत्याही परिस्थितीत तुमचा दिवस आनंदी आणि उत्तम जाईल हे हि अगदी नक्की. जसे विचार करता तसेच परिणाम तुम्हाला दिसून येतात. त्यामुळे दिवस जर चांगला घालवायचा असेल तर सकाळी उठल्या उठल्या सकारात्मक विचार आणि सकारात्मक अफर्मेशंस नी दिवसाची सुरवात करा. तुमचे विचार एकदम चांगले आणि सकारात्मक आहेत ह्याची काळजी करा. चुकूनही नकारार्थी शब्द उच्चारू नका किंवा नकारात्मक विचार मनातही आणू नका. कारण त्याचा परिणाम तुमच्या पूर्ण दिवसावर पडण्याची शक्यता असते. त्याचबरोबर, दुःखी प्रसंग, झालेली भांडण, कोणतातरी टेन्शन इत्यादींचे विचार सकाळी करूच नका. त्यापेक्षा एखादी खूप पोझीटीव्ह गोष्ट जी तुमच्या आयुष्यात झाली असेल ती आठवा. म्हणजे तुमचा मूड फ्रेश राहण्यास मदत होते. तुम्ही विचार करत असाल मा उठल्या उठल्या इतका वेळ कुठे असतो कि मी ह्या सगळ्या चा विचार करू? तर एक मिनिट थांबा... तुम्ही प्रत्येक वेळी एका जागी बसून मोठ्यांदी सकारात्मक अफर्मेशंस म्हणाली पाहिजेत अस नाही. मुख्य म्हणजे हे सगळ तुम्ही बोलाल पाहिजे अस अजिबातच नाहीये. हे सकारात्मक शब्द,वाक्य तुम्ही दात घासातांना, स्वयपाक करतांना किंवा अगदी अंघोळ करतांना सुद्धा मनातल्या मनात म्हणू शकता. त्याचा योग्य परिणाम तुम्हला दिसून येईलच! सकारात्मक विचार केल्यानी सकारात्मक बोलण्याइतकाच प्रभाव होतो. म्हणजेच काय, सकारात्मक गोष्टी अंतर्मनात म्हणजेच, सुप्त मनात साठल्या पाहिजेत. ते तुम्ही मोठ्यांनी म्हणा किंवा मनातल्या मात आठवा! त्याचा प्रभाव सेम राहणारे! स्वताशी जर सकारात्क संवाद केला तर त्याचा खूप चांगला प्रभाव पूर्ण दिवसावर झालेला दिसून येईल.

* सकारात्मक विचार तुमचा दिवस मस्त बनवेल-

१. आजचा दिवस एक ब्रॅन्ड न्यू दिवस आहे-

समजा तुमचा कालचा दिवस खूप खराब गेला असेल. तुमच्या मनासारखी एकही गोष्ट काळ झाली नसेल. तर तुमच्या मनात उठल्या उठल्या त्याच गोष्टीचे विचार येण साहजिकच आहे. आणि ह्या विचारांमुळे येणारा दिवस सुद्धा खराब जायची शक्यता दाट असते. पण कालचा दिवस खराब गेला असेल आणि त्याचा तुम्हाला फार त्रास झाला असेल तरी सुद्धा येणारा दिवस तुम्ही चांगला घालवू शकता. त्यासाठी एक करा. सकाळी उठल्या उठल्या कालच्या दिवसाचा विचार अजिबात करू नका. त्या ऐवजी, जर असा विचार करून बघ.. 'कालचा दिवस खराब गेला म्हणून काय झाल? मला त्याची अजिबात चिंता नाही. कारण काहीच शाश्वत नसत. सगळ बदलत असत. तसाच कालचा खराब दिवस आता गेला आहे. आणि येणारा दिवस नवीन दिवस आहे. दिवस नवीन आहे, सकाळ नवीन आहेत आणि आयडिया सुद्धा नवीन आहेत. आजचा दिवस ब्रॅन्ड न्यू दिवस आहे. आणि आजचा दिवस खूप मस्त जाणार आहे.' असा विचार सातत्यानी सकाळी उठल्या उठल्या केला तर कालच्या खराब प्रसंग आठवणार सुद्धा नाहीत आणि त्याचा काहीही परिणाम येणाऱ्या दिवसावर होणार नाही.

२. आजचा दिवस येतांना आपल्या बरोबर चमत्कार घेऊन आला आहे-

आयुष्य आशेवर चालत अस म्हणतात. त्याचप्रमाणे आजचा दिवस नवीन आहे आणि आजचा दिवस काहीतरी नवीन घेऊन येणार आहे अशी खात्री मनाशी बाळगा. तुम्हाला कल्पना सुद्धा नसेल, पण आयुष्य रोजच चमत्कार घेऊन येत असत. त्यामुळे झालेला गोष्टीचा विचार थांबवा आणि स्वताला फक्त म्हणा, 'आज काहीतरी चांगल माझी वाट पाहत आहे. आज आधी न झालेलं काहीतरी अद्भुत माझ्या आयुष्यात होणार आहे.' अस नुसता विचार सुद्धा दिवस उत्तम तर घालवेलच पण त्याचबरोबर,कोण जाणे खरच काहीतरी वेगळे अनुभव नक्की मिळतील.

३. आनंदी राहाण हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे-

सकाळी उठ्या उठल्या हे नक्की म्हणा, 'कोणतीही गोष्ट मला आनंदी राहण्यापासून मागे ओढू शकत नाही. मी नेहमीच आनंदी असते आणि इतरांना सुद्धा आनंदी करते. मी नेहमीच आनंदी असते.' कधी लो वाटल तरी त्यातून बाहेर पडायला ह्या विचारांची नक्की मदत होते.

४. मी हे नक्की करू शकते.-

काळ एखादी गोष्ट जमली नाही कि नकारात्मकता येण साहजिकच आहे. पण अश्या वेळी तुम्ही पुढच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या म्हणालात, 'मी जे हव ते करू शकते. मी करू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट नाहीये. मी खूप स्ट्रॉग आहे. अपयश मला कशीच खाली खेचू शकत नाही.' हि वाक्य किती सहज आणि सोप्पी आहेत. तसाच हाच विचार करून दिवसाची सुरवात केली तरी नक्कीच त्याचा परिणाम तुम्ही करता त्या कामावर नक्की दिसून येईल.

५. अश्यक्य काहीच नाही-

जर आपण असा विचार केला कि 'मला हे जमण अवघड वाटतंय..' तर साहजिकच एकदम साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला जमणार नाही. त्या विरुद्ध, तुम्ही जर म्हणालात, 'मी काहीही करू शकते. माझ्यासाठी काहीच अवघड नाही.' तर कोणताही काम करतांना तुमच मागे ओढले जाणार नाही. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या हे विचार नक्की करा आणि तुमच्या दिवसाची सुरवात तर च्नागली कराच पण येणारा दिवस सुद्धा यशस्वी बनवा.

६. मी कोणत्याही गोष्टीला कश्याला घाबरू? त्यापेक्षा मी त्याला लढा देईन-

कधी कधी कामाबद्दल किंवा परीष्टीतीबद्दल आपल्याला भीती वाटत असेते. त्यावेळी घाबरून जाऊन ते काम करण टाळण्या ऐवजी ते समोरून फेस करा. हे करण्याची हिम्मत येण्यासाठी मनात सारख घोका, 'मी नाही घाबरत काश्यालाही. मी कोणतीही परिस्थिती आली तरी त्याला सामोर जायला तयार आहे.' असे विचार तुम्हाला सकारात्मक उर्जा देऊन जातात आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीला समोर जायला आणि सगळी आव्हान स्वीकारायला सज्ज राहता.

७. आयुष्य थांबत नाही-

अचानक काहीतरी भयाकार घटना आयुष्यात होते. त्याक्षणी वाटत आता सगळ आयुष्य थांबल आहे. पण त्यावेळी जर असा विचार केला, 'आयुष्य कधीच थांबत नसत. ते पुढे जाताच असत तर मी का थांबू?' तर मनावरची सगळी ओझी आपोआप उतरतात. मन नवीन च्या शोधात जायला सज्ज होत.

८. माझ आयुष्य, माझे रुल्स-

जेव्हा आपण आपल आयुष्य स्वताच्या टर्म्स आणि रुल्स वर जगतो तेव्हा स्वताला मनाप्रमाणे जगण्याची मुभा मिळते. आपल आयुष्य सुंदर करायचं असेल आणि मनासारखं जगायचं असेल तर हा विचार नक्की करा, 'माझ आयुष्य, माझे रुल्स! मी जे करेन ते माझ्या मर्जीने.. कोणाच्याही दबावाखाली मी येणार नाही! आणि मी जे करेन त्याची पूर्ण जबाबदारी पूर्ण पणे माझीच असेल.' अश्या विचारांमुळे आत्मविश्वास वाढतो. आणि साहजिकच आयुष्य सुंदर होण्यास मदत होते.

९. मी नेहमीच 'बेस्ट' आहे-

सकाळी उठल्या उठल्या जर मनाशी असा विचार करा.. 'मी नेहमीच बेस्ट आहे आणि मी जे करतो ते सुद्धा बेस्टच करतो. माझ वागण सुद्धा बेस्ट आहे..' असा विचार केल्यामुळे मनातील न्यूनगंड कमी होण्यास नक्की मदत होईल. आणि हे विचार सकारात्मकता आणतात आणि त्याचा सरळ परिणाम तुम्ही करता त्या कामावर दिसून येतो. तुम्ही जे चांगल ठरवलं ते सत्यात यायला फार वेळ लागणार नाही.

१०. मी स्वतः ची स्वप्न पूर्ण करायला सक्शम आहे-

कधी कधी आपण खूप स्वप्न उराशी बाळगून असतो. पण काही कारणांनी ती स्वप्न पूर्ण व्ह्यायला अडचण येत असेल तर साहजिकच स्वतः बद्दलचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. अश्या वेळी फक्त असे विचार करा, 'मी माझी स्वप्न पूर्ण करायला सक्शम आहे. कोणतीही परिस्थिती मला माझी स्वप्न पूर्ण करण्यापासून मागे ओढू शकत नाही.' मनाशी जिद्द असली आणि त्याला चांगल्या विचारांची साथ मिळाली कि काहीही अशक्य नाही.

हि झाली काही उदाहरण ज्यामुळे तुमचा दिवस एका सकारात्मक नोट वर चालू होईल. ह्याच पद्धतीनी तुम्हाला हव त्या पद्धतीनी तुम्ही सकारात्मक पद्धतीनी विचार करू शकता ज्यामुळे येणारा दिवस तुमच्या साठी रोजच खास होईल. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मनात चुकूनही नकारात्मक विचार येऊ देऊ नका. कारण जसे विचार तसा त्याचा परिणाम.. म्हणजेच काय, तुमच काम करता करता सुद्धा तुम्ही सकारात्मक विचारांनी तुमचा येणारा दिवस आनंदी आणि यशस्वी बनवू शकता.

* सकारात्मक विचारांबरोबरच पॉझीटीव्ह अफर्मेशंस अर्थात सकारात्मक वाक्य- स्वतःमधली नकारात्मकता काढा.

सकारात्मक विचारांबरोबरच सकारात्मक अफर्मेशन्स चा प्रभावी परिणाम आयुष्यावर झाला दिसून येईल. अस म्हणल जात कि आपण जसे विचार करतो तसे रिझल्ट्स आपल्याला मिळतात. चांगले विचार करणारी लोकं नेहमी आनंदी असल्याच दिसून येत आणि त्याच विरुद्ध नकारात्मक विचार असलेले सदा वैतागलेले किंवा असमाधानी असल्याच दिसून येत. बऱ्याच वेळा कळत नकळत, आपल्या मेंदूच प्रोग्रामिंग होत असत. कधी नकारात्मक गोष्टींचा आपल्या मनावर इतका प्रभाव पडतो कि आपली विचार सरणीच नकारात्मक होऊ शकते. प्रत्येक गोष्टीत होणार नाही,मला हे जमणार नाही अशीच सुरवात होऊ शकते. त्यानी तुमच मनोधैर्य तर खचतच पण त्याचबरोबर तुम्हाला वारंवार अपयशाला सामोर जायला लागू शकत. कधी कधी पूर्वानुभवावरून मनात नकारात्मक विचार साठून राहतात. आपल्या मनावर लहानपणापासून वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. त्या आठवणी किंवा ते विचार सुप्त मनात घर करून राहतात. बऱ्याच वेळा मनाच आणि मेंदू च प्रोग्रामिंग आपोआप होत असत. त्यावेळी अर्थातच कोणताही काम पूर्ण होतांना अडथळे येतात.कधी कधी कळत असत कि आपले विचार नकारात्मक आहे पण ते बदलता येत नाहीत त्यावेळी गरज असते ते मेंदूच परत प्रोग्रामिंग करण्याची!! आणि त्यासाठी नकारात्मक प्रोग्रामिंग काढायची गरज असते. तेही सोप्पा आहे. आयुष्यात काय नको वाटत त्याची यादी बना. आणि त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक साईड लिहून काढा. त्यावेळी तुमचाच तुम्हाला जाणवेल कि तुम्हाला नकारात्मक का वाटत. ते कळल कि मदत घ्या सकारात्मक अफर्मेशंस ची... आपल्याला खरच गरज असते त्यावेळी आपल्या मदतीला सकारात्मक अफर्मेशंस येतात. सकारात्मक अफर्मेशंस हि आयुष्य बदलायला खूप गरजेची असतात. पण जर आपल्याला आयुष्य बदलायचे असेल तर आयुष्यात काय हव आहे त्याचा विचार कारण अत्यंत गरजेच आहे. आयुष्यात काही मिळवायला किंवा चांगल्या सवयी लावायला विचार बदलान गरजेच असत. पण फक्त विचार बदलून उपयोग नसतो. बऱ्याच वेळा नकारात्मक विचार मनात घर करून बसलेले असतात त्याचा प्रभाव आयुष्य जगतांना होतांना दिसतो. वागण्यात बोलण्यात सारखी नकारात्मकता आली कि समजा तुम्हाला तुमच ब्रेन प्रोग्रामिंग परत करायची गरज आहे. आता प्रश्न आहे, हे चुकलेल ब्रेन प्रोग्रामिंग कस बदलायचं? काळजी करू नका... चुकलेल ब्रेन प्रोग्रामिंग आपल्याला बदलता येत. आणि तेही कोणाच्या मदतीशिवाय! हे खरच शक्य आहे. पण त्यासाठी काय कराव लागेल असा साहजिक प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला कळतंय कि आपल्या वागण्यात आणि मनात जे चुकीचे विचार घर करून बसले आहेत ते काढायचे असतात. पण ते सहजासहजी काढण शक्य नसत. त्यासाठी एक करा.. कागद आणि पेन घ्या. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको आहेत किंवा जे तुम्हाला बदलून टाकायचं आहे अश्या गोष्टी एका कागदावर लिहून काढा. हे स्वताच्या मनाशी विचार करून आणि स्वतःला न फसवता करा. कारण हे कोणाला दाखवण्यासाठी तुम्ही करणार नाही आहात. तुम्ही तुमचे नकारात्मक विचार काढण्यासाठी हे करताय हे लक्षात ठेवा. आपली ध्येय डोळ्यासमोर ठेऊन योग्य यादी तयार करा. यादी तयार झाली कि त्याचा वारंवार वाचन करा. जर ते नकारात्मक विचार सकारात्मक मध्ये बदलायचे असतील तर काही अफर्मेशंस अर्थात काही सकारात्मक वाक्य वारंवार मनाशी घोकल्या जाण अत्यंत गरजेच होत. वारंवार सकारात्मक वाक्य म्हणाल्यावर आपोआपच मनातले नकारात्मक विचार बाजूला होईल ब्रेन नवीन रित्या प्रोग्रेम होतो. एकदा का मेंदू सकारात्मकते कडे वळला कि तुम्हाला मागे पहायची गरज लागणार सुद्धा नाही. तुचे विचार आपोआप बदलतील आणि त्याचा प्रभाव संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसून येईल. खूप वेळा सकारात्मक गोष्टी वाचल्यामुळे त्या गोष्टी आपोआप सुप्त मन आपोआप त्या गोष्टींचा स्वीकार करत. एकदा का सुप्त मनानी स्वीकार केला कि आपसूकच आपले विचार बदलतात. सकारात्मक विचार केले कि गोष्टी आपोआप मनाप्रमाणे घडायला लागतात. * खरच मेंदू च प्रोग्रामिंग करून नकारात्मक विचार सकारात्मक करण शक्य आहे. त्यासाठी सकारात्मक वाक्य किंवा शब्द वारंवार मनात आठवण किंवा मोठ्यांनी म्हणन गरजेच असत. सकारात्मक विचारांमुळे तुमच्या ध्येय सध्या तर होतीलच पण त्याचबरोबर तुमची प्रगती सुद्धा होईल हे निश्चित! सकारात्मक ब्रेन प्रोग्रामिंग मुळे मानारुद्ध गोष्टी झाल्या तरी त्यातून मार्ग काढता येतो. आणि आयुष्यात झालेला बदल पाहता येईल.

* नकारात्मक विचार जे तुम्ही सकारात्मक बनवू शकता. त्याची काही उदाहरण-

हि झाली काही विधान. अशी बरीच विधान आपण कळत नकळत मनावर बिंबवत असतो. जर नकारात्मक बोलत राहिलो तर त्याचा प्रभाव मनावर आणि वागणुकीवर लगेच पडतो. त्यामुळे आपल्या आयुष्यातले सगळ्या नकारात्मक गोष्टी आपणच काढून टाकायची गरज असते. सकारात्मक बोलण्यानी व्यक्तिमत्व खुलण्यास मदत होते. आजूबाजूच्या लोकांना सुद्धा तुमच्या जवळ रहावस वाटत राहत. काही पोझीटीव्ह अफर्मेशंस ज्यामुळे तुम्ही तुमच आयुष्य एकदम बदलून टाकू शकता-

१. मी कधीही हार मनात नाही.

२. मी सत्यपरिस्थिती चा नेहमीच स्वीकार करते.

३. मी आत्ताच्या क्षणात राहते आणि प्रत्येक क्षण पूर्ण पणे जगते.

४. मी माझ आयुष्य पूर्णपणे एन्जॉय करते.

५. मी संकटांना घाबरत नाही तर त्यापासून काहीतरी शिकून बाहेर येते.

६. माझ आयुष्य खूप सुंदर आहे.

७. मी नियमित व्यायाम करते आणि मी एकदम निरोगी,तंदुरुस्त आहे.

हि अजून काही उदाहरण. तुम्ही तुम्हाला योग्य वाटतील अशी सकारात्मक वाक्य बनवू शकता. आणि त्याची जादू अनुभवू शकता. मनातले नकारात्मक विचार सकारात्मक बनवून त्याचा उत्तम परिणाम आयुष्यावर नक्की पाहू शकाल.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुजा कुलकर्णी.