Divsachi survaat kara hepi hepi books and stories free download online pdf in Marathi

दिवसाची सुरवात करा हॅपी हॅपी

दिवसाची सुरवात करा हॅपी हॅपी!!!

***

जशी दिवसाची सुरवात होते तसा येणारा दिवस जातो. त्यामुळे पूर्ण दिवस चांगला जाण्यासाठी दिवसाची चांगली सुरुवात होण अत्यंत महत्वाच असत. आपली रोजची सकाळ फ्रेश असावी अस बरेच जण ठरवतो पण प्रत्येक वेळी ते शक्य होताच अस नाही. बऱ्याच वेळा आदल्या दिवशीचा ताण, अनेक समस्या, कोणाशी झालेली भांडण इत्यादी गोष्टींचे विचार सतत डोक्यामध्ये असतात. आणि साहजिकच त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या सुद्धा तेच तेच विचार मनात येण्याची शक्यता असते. आणि येणारा दिवस नकोसा होऊ शकतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर नकारात्मक विचार करणार नाही याची काळजी घ्या. रोजचा दिवस नवीन असतो तो नवेपणानी जगण्याची मजा अनुभवण्याची गरज असते. शक्यतो रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न महत्वाचा असतो. रात्री झोपतांना काहीतरी चांगल वाचून मग बिछान्यावर पडल तर त्याचा परिणाम झोपेवर तर पाहायला मिळेलच पण त्याचबरोबर, पुढचा दिवस चांगला जाण्यासाठी सुद्धा महत्वाचा ठरू शकतो. आपला मूड उठल्या उठल्या चांगला राहील ह्याकडे लक्ष देण्याची गरज असते. चांगल बोलून, च्नाग्ला विचार करून हे सहज शक्य होऊ शकत. आनंदी आणि उत्साही लोक मात्र सकाळ वेगळ्या पद्धतीनी चालू निरोगी आणि उत्साही राहतात. आनंदी राहील कि त्याचा परिणाम चेहऱ्यावर सुद्धा झालेला दिसून येतो. आणि तुमच्या बरोबर असलेली लोकं सुद्धा तुम्ह्च्याकडे पाहून तुमच्यासारखा आनंदी होण्याचा प्रयत्न करतील हे नक्की.. आपल मन कार्यक्षम ठेवण्याबरोबरच, सकाळी नित्यक्रमानी भरपूर व्यायाम आणि सकारात्मक विचारांच खाद्य दिल्यानी शारीरिक आणि मानसिक सशक्तता प्राप्त होते. सकाळ चांगल्या पद्धतीनी चालू कारण अत्यंत महत्वाच असत. आपला मूड खराब असेल तर त्याचे पडसाद आपल्या कुटुंबावर सुद्धा पडण्याची शक्यता असते. आणि विनाकारण सकाळी वादावादी, भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या घरच आणि घरातल्या लोकांच स्वास्थ उत्तम ठेवण हे घरातल्या प्रतेकानी पाहण गरजेच असत. रोजची सकाळ फ्रेश चालू करण्यासाठी आणि येणारा दिवस आनंदात घालवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स-

१. ध्यान करा-

सकाळी डोळे उघडले कि मनात विचारचक्र चालू होत. त्या विचारात बरेचदा येणाऱ्या दिवसात करायच्या कामाची यादी असते.. किंवा नको असलेले विचार जे तुमची पाठ सोडत नाहीत. नको असलेल्या विचार आल्यामुळे नकारात्मकता वाढू शकते.. आणि जाग आल्या आल्या मनावर ताण येण्याची क्रिया चालू झालेली असते. जर त्याच विचारांबरोबर उठलात तर साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या मूड वर होण्याची शक्यता असते आणि त्याचबरोबर येणारा दिवस नकारात्मकता आणू शकते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मन प्रसन्ना असण्याची गरज असते. त्यासाठी दिवसाची सुरुवात ध्यान करून केली तर पुढचा दिवस उत्साही जातो. ध्यान करायचं म्हणजे मन काही वेळ मन रिक्त ठेउवायचं.. अस केल्यानी आतून आनंदी वाटायला चालू होत.. त्याचबरोबर,बऱ्याच वेळा सवय असते. जाग आली कि पहिल्यांदी मोबाईल पहिला जातो. उठल्या उठल्या मेल चेक करण किंवा मोबाईल वरचे मेसेज बघून मूड खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे उठल्या उठल्या मोबाईल बघण्यापेक्षा उठल्या उठल्या थोडा वेळ ध्यान करा आणि मन शांत करून पूर्ण शांतता अनुभवा. ध्यान केल्यानी ताण तणाव निघून जातात आणि सकारात्मक उर्जा मिळते. दिवसभर भरपूर काम करायचं असत आणि जर दिवसाची सुरुवात ध्यानानी केली तर पूर्ण दिवस उत्साही जातो आणि सकारात्मकता येते. मनाला सतत योग्य दिशा दाखवली तर मन नेहमीच सकारात्मक पद्धतीनी विचार करायला लागण्यास मदत होईल.

2. हायड्रेट-

आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे दिवसाला २ ते २.५ लिटर पाणी पिण्याची गरज असते. आपली झोप किमान ६ तास असते आणि तितक्या वेळ शरीराला पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्याची कमी भरून काढण्याकरता रोज सकाळी उठल्या उठल्या १ ग्लास भरून पाणी पिल पाहिजे. तास पाहायला गेल तर रात्री झोपतांना सुद्धा पाणी कमी पिल जात. आणि रात्री झोपल्यावर पाणी क्वचितच पिल जात! त्यामुळे शरीर डीहायड्रेट होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन थकवा येऊ शकतो. म्हणून बिछान्यावरून उठल्यावर बाकी काही करायच्या आधी जर दिवसाची सुरवात ग्लास भर पाणी पिल्यानी केली कि दिवस ताजतवान राहून पूर्ण करण्यासाठी पहिलं यशस्वी पाऊल टाकलच अस समजा..

3. व्यायाम-

आयुष्य उत्तम राहण्यासाठी मन आणि शरीर दोन्ही निरोगी असण्याची गरज असते. चांगले आणि सकारात्मक विचार करून,सगळ्यांबद्दल नेहमीच चांगला विचार केल्यानी मन निरोगी राहाण्यास फायदा होतो.. मन निरोगी असेल तर शरीर सुद्धा निरोगी राहण्यास मदत होते पण त्याचबरोबर शरीर सुधृड ठेवायला महत्वाचा असतो तो नियमित व्यायाम. जॉगिंग, सकाळी फिरायला जाण किंवा जो योग्य वाटेल असा थोडा तरी व्यायाम नियमित केल्यामुळे शारीरक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. नियमित व्यायामाचा शरीर आणि मन सुधृद ठेवण्यात खूप मोठा वाटा आहे. त्यापेक्षा अजून काही चांगल आपण शरीराला देऊ शकत नाही. रोज न चुकता उठल्यावर व्यायाम केल्यानी रक्तप्रवाह सुधारतो आणि हॅपी इंडोर्फीन मेंदू मध्ये सोडले जातात. खूप हेवी व्यायाम करायचा नसेल तर स्ट्रेचिंग चे थोडे व्यायाम केले तर आखडलेले स्नायू रीलॅक्स होतात त्यामुळे सकाळ अजूनच उत्साही होते आणि शरीराबरोबरच मन निरोगी राहायला मदत होते. दिवसभराचे ताण यशस्वीपणे पेलण्यासाठी शरीर आणि मन निरोगी असण अत्यंत गरजेच असत. व्यायम केल्यानी मूड सुद्धा चांगला राहण्यास मदत होते आणि त्यामुळे येणारा दिवस सुद्धा आंनदी बनण्यासाठी फायदा होतो. आणि तुम्ही जे कराल त्यात उत्साह टिकून ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

४. काहीतरी नवीन शिका-

रोजची सकाळ नवीन रंग घेऊन येते. रोज काहीतरी नवीन शिकता येण्यासारखं असत. नेहमीच्या रुटीन पेक्षा जर काहीतरी नवीन अनुभवत सकाळ चालू केली तर त्याचा परिणाम पूर्ण दिवसावर दिसून येऊ शकतो. नवीन शिकायचं असेल तर त्यासाठी बरेच मार्ग असतात. बातम्या असो किंवा निसर्ग असो, किंवा परिवाराशी केलेली चर्चा.. ह्या सगळ्यांमुळे ध्यानात भर पडत असते. कधी जाणतेपणे कधी नकळत! रोज नवीन काही ना काही पहायला आणि शिकायला मिळणारच! अश्या वेगवेगळ्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आयुष्यात सतत शिकत राहिल्यामुळे आयुष्य कंटाळवाण बनत नाही! त्यामुळे नवीन गोष्टींकडे न चुकता लक्ष द्या आणि रोज सकाळी काहीतरी नवीन शिका. कितीही छोटी गोष्ट असली तरी काहीतरी शकल्याच आनंद हा खूप जास्ती असतो. त्यामुळे अस केल्यानी नवीन शिकलेल्याचा आनंद पूर्ण दिवसभर तुमच्या वागण्यातून रिफ्लेक्ट होत आणि नवीन शिकलेल्या गोष्टी तुम्ही दुसऱ्या कोणाला सांगू शकता.

५. तुमच्या मेंदूला चालना द्या-

बऱ्याच वेळा तेच तेच काम करून मेंदू दमून जातो. त्याचबरोबर कंटाळा सुद्धा येऊ शकतो. आणि मेंदूला चालना मिळाली नाही तर त्यामुळे डीमेंशिया होण्याचा धोका उद्भवू शकतो. डीमेंशिया म्हणजेच मेमरी लॉस! हे टाळायचं असेल तर तुम्ही तुमचा मेंदू नेहमी तल्लख राहील ह्याकडे लक्ष द्या. मेंदूला सुद्धा काहीतरी नवीन खाद्य देण्याची गरज असते. त्याच त्याच प्रकारच्या कामातून सवड काढून काहीतरी वेगळ करून मेंदूला चालना मिळण्यास मदत होऊ शकते. रोज पेपर मध्ये शब्दकोडी किंवा सुडोकू येतच. ते वेळ काढून सोडवा. काढला तर अगदी बिझी रुटीन मधून सुद्धा वेळ निघतोच.. तसा आपल्या रुटीन मधून थोडासा वेळ काढून मेंदूच काम वाढेल अस काहीतरी करा. तस केल्यानी मेंदू आणि मन तल्लख होण्यास मदत होते. शब्दकोडी सोडवण्याचे बरेच फायदे आहेत. शब्दकोडी सोडवल्यामुळे मेंदू तल्लख होतो. आपल्याकडच्या शब्दसंग्रहात वाढ सुद्धा होते. सुडोकू इत्यादी मुळे मेंदूला चालना मिळण्यास मदत होते. अल्झायमर असोसिअशन नुसार मेंदूचा वापर केल्यानी डीमेंशिया होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्ही अॅक्टीव होऊ शकता.

६. यशस्वी दिवसाची कल्पना करा-

"जसे विचार आणि कल्पना तसा त्याचा परिणाम.." अस नेहमीच म्हणल जात. त्यामुळे नकारात्मक विचार टाळून सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरवात करा. कधी कधी एखाद अवघड काम करतांना मनात ते काम जमणार नाही असेच विचार सतत येत राहतात.. अश्या विचारांमुळे काम पूर्ण करण्यात अधिकाधिक अडथळे येऊ शकतात. त्याउलट तुम्ही जे काम कराल ते पूर्ण होणार असा सतत विचार करा. त्याचा परिणाम नक्की झालेला दिसून येऊ शकतो. काम कोणताही असो...तुम्ही मॅरेथॉन मध्ये धावणार असाल किंवा दिवसभर भरपूर काम करणार असाल,दिवसाच्या सुरवातीला ठरवलेल्या कामात यशस्वी होण्याची कल्पना करा. जे कराल ते यशस्वीपणे पूर्ण केल अशीच कल्पना केल्यामुळे ते काम पूर्ण होण्यासाठी उर्जा मिळत राहते. आणि कल्पना प्रत्यक्षात उतरायला वेळ लागणार नाही..त्याचबरोबर सकारात्मक कल्पना मूड चांगला ठेवतात म्हणजेच दिवसाची सुरवात सकारात्मक मूड नी झाली कि येणारा दिवस तसाच पूर्ण होतो.. त्याचबरोबर चांगला विचार केल्यानी तुम्हाला सतत उर्जा मिळत राहते.

७. गाणी ऐका-

सकाळचा वेळ सुंदर असतो.. निसर्ग सुद्धा सुंदर असतो अश्यावेळी काही कारणांनी वाद वाडी होऊ शकते. पण ते टाळण कधीही उत्तम.. कारण सकाळच्या वाद वाढीमुळे पूर्ण दिवस खराब होण्याची शक्यता वाढू शकते. सकाळी सकाळी तुम्हाला आवडणारी गाणी किंवा श्लोक लावले तर सगळ वातावरण प्रसन्ना होण्यास मदत होते आणि वातावरणाबरोबर तुमचा मूड सुद्धा मस्त होण्यास मदत होतेच! शक्यतो मंद गाण्यांना प्रधांना द्या.. म्हणजे ते ऐकून मनावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही! आणि मन प्रसन्ना राहण्यास मदत होईल. सकाळ च्नागल्या नॉट वर चालू झाली कि आपोआप येणारा दिवस त्याचप्रमाणे उत्साही जाण्यास मदत होईल. सकाळी उठल्यापासून झालेली फ्रेश सुरवात दिवसभर सकारात्मक उर्जेच्या रुपात कार्यरत राहील. गाणी ऐकल्यामुळे मूड तर चांगला आणि फ्रेश होतोच पण त्याचबरोबर तुम्ही इतरानाही प्रेरणा देऊ शकता, तुमच काम सुधारत आणि दिवस चांगला गेला कि तुम्ही ताणापासून दूर राहाल आणि रात्रीची झोप सुद्धा मस्त लागण्यास मदत होईल.

८. सकारात्मक विचार करा-

झालेली भांडण किंवा वाद नकारात्मक विचार आणतात. नवीन दिवसाची नवीन सुरवात करत कोणाबद्दल ची नकारात्मक भावना मागे टाकत सकारात्मक पद्धतीनी नवीन दिवसाची सुरवात केल्यानी दिवसाची उत्तम सुरुवार होईल आणि त्याचा परिणाम दिवसाच्या प्रत्येक क्षणी जाणवेल. प्रत्येक दिवस नवीन असतो त्याचप्रमाणे काल झालेला वाद किंवा भांडण विसरून नवीन सकारात्मक सुरवात केली कि मूड फ्रेश राहतो. भांडण किंवा वाद हा आयुष्याचा शेवट नसतो..असा विचार केल्यानी तुम्हाला मस्त वाटेल आणि दिवसही चांगला जाईल. त्याचबरोबर परिस्थिती मान्य करून त्यावर उपाय शोधले तर कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची सवय लागेल. आणि तुमच्या प्रश्नांवर उपाय मिळाले कि स्वतावरच विश्वास वाढण्यास मदत होते.त्यामुळे न विसरता नकारात्मक विचारांना बाजूला टाकून सकारात्मक पद्धतीनी दिवसाची सुरुवात करा. हि गोष्ट सहज शक्य होत नसेल तर जाणीवपूर्वक या गोष्टीवर काम करून नकारात्मक विचार बाजूला काढा.. आणि सगळ मस्त आहे असा विचा करून दिवस चालू करा!! त्याचा पूर्ण दिवसावर चांगला परिणाम झालेला दिसून येईल आणि दिवस आनंदात जाण्यास मदत होईल.

९. ब्रेकफास्ट-

“अॅन अॅप्पल अ डे, किप्स डॉक्टर अवे !!!” हे म्हणतात ते काही चुकीच नाही! हेवी ब्रेकफास्ट केल्यानी येणारा दिवस फ्रेश झाण्यास फायदा मिळू शकतो. रोज सकाळी ब्रेकफास्ट मध्ये एक सफरचंद किंवा कोणताही फळ खाल्ल कि दिवसाची ताजीतवानी सुरवात होण्यास नक्की मदत होईल. फळ खाल्ल्यानी शरीराला खूप फायदा होतो. फळांबरोबर हेल्दी ब्रेकफास्ट न चुकता करा त्यानी रात्रभर पोट मोकळ राहिल्यामुळे शरीराला योग्य आहार मिळाला पाहिजे. पूर्ण दिवस फ्रेश जाण्यासाठी ते गरजेच आहे. त्याचबरोबर फळांचे जूस ब्रेकफास्ट मध्ये पिले तरी ते खूप हेल्दी असत. फ्रेश फळ खाल्ल्यानी शरीरात उर्जा तयार होते आणि निरोगी राहण्यास मदत होते. शरीर आणि मन दोन्ही सतत फ्रेश ठेवण्याची गरज असते आणि त्यासाठी थोडे प्रयत्न केले तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार असतो.. म्हणजेच काय, सकाळी घरातल्यांशी गप्पा गोष्टी करत ब्रेकफास्ट चा आनंद घेतला आणि त्या मूड मध्ये ऑफिस गाठून ऑफिस चा दिवस चालू केला तर तो दिवस नक्कीच मस्त जाईल हे अगदी नक्की...

शेवटच पण अत्यंत महत्वाच,

१०. हास्य-

भरपूर हसल्यामुळे शरीरावरचा ताण निघून जाण्यास मदत होते. कधी कधी विनोदावर, कधी कधी काही कारणाशिवाय हसल तर त्याचा फायदा तुम्ही नक्की अनुभवाल.. म्हणजेच काय,दिवसाची सुरवात हास्यानी केली कि त्याचा सकारात्मक परिणाम दिवसभर दिसून येईल हे वेगळ सांगण्याची गरज नाहीच!!! त्याचबरोबर बिझी आयुष्यात स्वत:कडे पहायलाही वेळ मिळत नाही. आपण सदा काहीतरी पूर्ण करण्याच्या मागे धावत असतो. त्याचा परिणाम चेहऱ्यावर सुद्धा दिसू शकतो. दिवसाची सुरवात फ्रेश मूड नी केली तर त्याचा परीनं तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसून येईल आणि तुम्ही स्वतःला आरश्यात पाहून खुश व्हाल हे नक्की.. आणि रोज सकाळी न चुकता आरश्यासमोर उभ राहून स्वत:कडे बघून हसा.. स्वत:च्या चेहऱ्यावरच छोट हसू जरी पाहिलं तरी त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवेल, त्याचबरोबर पूर्ण दिवस मस्त जाईल हे नक्की...सकाळ नेहमीच फ्रेश चालू होईल याकडे आवर्जून लक्ष दिल कि येणारा दिवस सुद्धा आनंदानी भरलेला जाण्यास मदत होईल

***

अनुजा कुलकर्णी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED