दर्शन Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दर्शन

दर्शन

काही दिवसापूर्वी लय भारी हा मराठी सिनेमा पहिला

संपुर्ण सिनेमाचे चित्रण पंढरपूर आणी त्या परिसरात चीत्रीत केलेले ..

सिनेमाचा विषय पण विठोबा आणी वारी या आसपास असणारा ..

आणी अचानक आठवले ते “दर्शन “

काही वर्षापुर्वी माझ्या पुतण्याचे लग्न पंढरपुरला होते .

घरचे लग्न शिवाय त्या निमित्ताने पंढरपुर दर्शन आणी निवांत मुक्काम पण होणार होता तिथे

आमचे सारे नातेवाईक खुप खुष होते

आम्ही पण जाणार असे ठरले .पण फक्त त्यांच्या बरोबर बस मधुन जाता येणार नव्हते

कारण माझ्या पतींचे थोडे काम राहिले होते

त्यामुळे आम्ही आमच्या गाडीने संध्याकाळी तिकडे पोचलो

गेल्या वर सामान हॉटेल मध्ये टाकून थोडे फ्रेश झालो .

मग ठरवले चला कार्यालयात कोण कोण आले आहेत पाहुन येऊ

बाहेर पडुन कार्यालयात पोचलो पण तिथे पण साऱ्या लोकांची पांगापांग झाली होती

अजून संध्याकाळच्या मुख्य सीमांत पुजन कार्यक्रमाला चांगला दोन तास अवकाश होता

त्यामुळे कोणी मित्र अथवा नातेवाईकांना भेटायला ..

तर कोणी विठ्ठल आणी चंद्रभागा दर्शन या साठी बाहेर पडले होते

मग आम्ही पण दोघांनी ठरवले चला फिरून येवुया

आम्ही दोघे ही फारसे कर्मठ किंवा देवभोळे नाही .

आपले काम प्रामाणिक पणे करणे यातच आमचा “देव “ असतो .

बाकी कर्म कांडा वर आमचा फारसा विश्वास नाही ..

त्यामुळे विठ्ठलाचे दर्शन घेतलेच पाहिजे असे काही डोक्यात नव्हते

देव तर आपल्या मनात च असतो ना !!!

सहज मिळाले तर घेवु दर्शन असे ..ठरवले होते

ते दिवस जुन् महिन्यातले होते

अजून शाळांच्या सुट्ट्या वगैरे चालूच होत्या

त्यामुळे संपूर्ण गाव गर्दीने नुसते फुलुन गेले होते

विठ्ठल दर्शनालासुद्धा देवळात खुपच गर्दी होती .

आम्ही चंद्रभागा नदीपाशी फिरत फिरत आलो ..

पाहतो तर काय देवळापाशी ही भली मोठ्ठी लाईन होती मंदिरात जाण्या साठी

आमचे सर्व नातेवाईक देवळा पाशीच होते .

कुणाचे दर्शन तास दोन तास थांबून झाले होते.

तर कुणी दर्शनाच्या लाईनीत उभे होते ..

वाटत होते इथ पर्यंत आलोय तर घ्यावे दर्शन .

पण लाईन पाहताच आम्हाला समजले की ते केवळ अशक्य होते ..

आणी मला स्वताला इतक्या गर्दीत देवळात जावून धक्का बुक्की करीत दर्शन घेणे पसंत नाही

मला असे वाट्ते आपण देवळात गेले की फक्त आपण आणी देव या दोघातच संभाषण व्हावे

पण प्रत्येक वेळेस ते शक्य होत नाही न ..!!!

मग आम्ही कळसाला मनापासुन नमस्कार केला ..

आणी तिथे जवळच आमच्या दर्शन घेवून आलेल्या नातेवाइका बरोबर गप्पा करीत उभे राहिलो

एक माणूस दरवाजा पाशी उभा राहून लोकांना आत सोडत होता

एका लाईन मधले वीस तीस लोक आत सोडले की मग पुढील लोकाना आत जायला बंदी होती

आतले लोक बाहेर आले की पुन्हा बाहेरच वीस पंचवीस आत जात होते ..

असा शिस्तशीर कारभार चालु होता ..

लाईन तर वाढत च होती

देवळात गेलेली एक लाईन बाहेर आली .

दारात उभ्या असलेल्या माणसाने दुसरी लोक आत सोडायच्या आत अचानक

पावसाचे एक भले मोठे सरवट आले .आणी जोरदार सरी बरसु लागल्या

रांगेत उभ्या असलेल्या लोकांची चांगलीच पांगापांग झाली

कारण छत्र्या कोणाकडेच नव्हत्या ..ना !!!

या गडबडीत आम्ही दोघे मात्र अचानक पणे पळत देवळात गेलो .

आणी पाहतो तो काय देऊळ पूर्ण रिकामे

देवळात फक्त एक दोन माणसे ..पुजारी आणी आम्ही दोघेच .,!

आम्हाला खुप आनंद झाला .अगदी जवळून त्या विठू माऊलीचे दर्शन आम्हाला मिळाले

तो गाभाऱ्यात भरलेला ..धुप उदबत्ती फुलांचा सुवास .

देवळात असलेले ते .अस्पर्श पावित्र्य ..!

“भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची

उभी पंढरी आज नादावली

जरी बाप साऱ्या जगाचा च तु

आम्हा लेकरांची विठू माउली “

विटेवर उभी असलेली विठू माऊलीची मूर्ती पाहताना अचानक डोळे भरून आले

आम्ही दोघे अगदी मंत्रमुग्ध झालो माऊलींच्या दर्शनाने ..

“घालुनी तुळशी माळा गळा

मस्तकी चंदनाचा टीळा

आज हरपले “देहभान .

जीव झाला खुळा बावळा ..”

विठ्ठल .विठ्ठल ..विठ्ठल विठ्ठल ..

अगदी अशीच अवस्था झाली

आता बाहेर पावसाचा जोर आणखीन च वाढला होता ..

आणी मग जवळ जवळ पंधरा मिनिटे ..फक्त आमचा आणी माऊलींचा सुसंवाद घडला

अचानक आत आल्याने आमच्या जवळ पूजा साहित्य तर काहीच नव्हते

पण डोळ्यांचे दिवे आणी प्राणांची फुलवात तर होतीच ना..

अगदी मन भरेपर्यंत पुजा घडली

अचानक दर्शन झाले तर आमची ही अवस्था .,.मग ज्यांची “भेटी लागी जीवा लागलीसे आस “

असे असेल ..त्यांची काय अवस्था होत असेल माऊलींच्या दर्शनाने !

“चालला गजर जाहलो अधीर

लागली नजर कळसाला

पंच प्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला

भेदिला कळस डोईला तुळस

समीप ही दिसे माउली “.....

घे कुशीत या माउली आता पायी ठेवितो माथा

सारे वारकरी मैलो मैल चालून वारी पुरी करताना खरेच शेवटी त्यांना असेच वाटत असेल ना

हा सारा प्रकार पाहुन पुजारी पण चकित झाला .

“राव लयी पुण्यवान असणार बगा तुमी म्हणुन माऊलीने अगदी बोलावून घेतले

आणी इतक्या वेळ तुम्हाला जवळ ..ठेवले !

माझ्या आयुष्यात मी असले पुण्यवान लोक नाय पहिले

आम्ही पुण्यवान होतो का नाही हे नाही माहीत ..

पण घडलेला प्रकार केवळ अतर्क्य ..आणी आकस्मित होता हे नक्की ..

त्यानंतर पाऊस थांबला .,पुन्हा गर्दी ओसंडली .आम्ही पण गर्दीतून वाट काढून बाहेर आलो

अजुन् ही पंढरपुर चा विषय निघाला की आम्ही हे सारे सांगतो ..

ऐकणारी व्यक्ती पण चकित होते .,

खरच ते “दर्शन “...अविस्मरणीय होते हे नक्की !!!!