माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी

(198)
  • 165.8k
  • 32
  • 71.7k

१ सुरुवात! कुठल्यातरी हिंदी सिनेमात एकदा पाहिले, म्हणजे ऐकले होते.. दुसऱ्या कुणाच्या लग्नात अजून कुणाची लग्नं जमत असतात म्हणे! .. म्हणजे तिकडे बोहल्यावर पद्धतशीर लग्न सुरू असते.. नवरानवरी बोहोल्यावर हाती माळा घेऊन सलज्ज वगैरे उभे असतात. भटजीबुवा पुढच्या आयुष्यातील तारांबळ कळावी म्हणून चंद्रबलं आणि ताराबलं वगैरे घसा फोडून गात असतात.. नि इकडे कुणी होतकरू आयुष्यातले ते एकमेव ध्येय असल्यासारखा आपली लाइन जमवण्याच्या मागे लागलेला असतो. त्यात किती चूक की किती बरोबर हे नाही करायचे, पण एक आपले जनरल आॅब्झर्वेशन माझे. अजून एक निरीक्षण आहे माझे.. म्हणजे बघा हां.. आपल्याकडच्या लग्नांची ही एक गंमत असते. आपण मारे लगीनघाई वगैरे

Full Novel

1

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 1

१ सुरुवात! कुठल्यातरी हिंदी सिनेमात एकदा पाहिले, म्हणजे ऐकले होते.. दुसऱ्या कुणाच्या लग्नात अजून लग्नं जमत असतात म्हणे! .. म्हणजे तिकडे बोहल्यावर पद्धतशीर लग्न सुरू असते.. नवरानवरी बोहोल्यावर हाती माळा घेऊन सलज्ज वगैरे उभे असतात. भटजीबुवा पुढच्या आयुष्यातील तारांबळ कळावी म्हणून चंद्रबलं आणि ताराबलं वगैरे घसा फोडून गात असतात.. नि इकडे कुणी होतकरू आयुष्यातले ते एकमेव ध्येय असल्यासारखा आपली लाइन जमवण्याच्या मागे लागलेला असतो. त्यात किती चूक की किती बरोबर हे नाही करायचे, पण एक आपले जनरल आॅब्झर्वेशन माझे. अजून एक निरीक्षण आहे माझे.. म्हणजे बघा हां.. आपल्याकडच्या लग्नांची ही एक गंमत असते. आपण मारे लगीनघाई वगैरे ...अजून वाचा

2

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 2

२ योगायोगाची सुरुवात योगायोगाने! देव आपल्याला नातेवाईक का देतो? कुणी काहीबाही उत्तरे देईल याची. पण माझे उत्तर ठरले आहे. त्या लग्नगाठी विधात्याने ठरवल्याप्रमाणे बांधल्या जायला हव्या असतील तर अशा नातेवाईकांना पर्याय नसावा! अर्थात हे माझे फक्त स्वानुभवातून आलेले बोल आहेत. नातेवाईक, मग त्यांची मुलं, तुमचे भाऊ नि बहिण, त्यांची लग्नं, नि त्यातून निर्माण होणाऱ्या संधी .. म्हणजे माझ्या बाबतीत तरी झाले ते असे झाले. नाहीतर मी एकुलता. ना सख्खा भाऊ ना बहीण मला. पण चुलत नि मामे दोन्ही प्रकारच्या बहिणी मात्र आहेत मला. आणि माझ्याच या स्टोरीसाठी त्यांची योजना आहे की काय असा संशय तुम्हाला ही येईल माझी गोष्ट ...अजून वाचा

3

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 3

३ परिचयाचा इंट्रो एकेकाच्या काय सवयी असतात नाही? आपल्या सवयी ही नंतर सवयीने सवयीच्या होऊन हे माझे एक जनरल आॅब्झर्व्हेशन.. आणि काही नाही! तर माझी ही सवयच आहे.. माझ्या सवयीचा परिचय करून द्यायलाच हवा.. तर हीच ती सवय.. परिचय अर्थात इंट्रोडक्शन. म्हणजे लहानपणी निबंध लिहिताना माझी इंट्रोच मूळ मुद्द्याहून मोठी असायची. इंट्रो म्हणजे परिचय! मूळ विषयास येण्याआधी नमनास घडाभर तेल. पामोलिन नाही अगदी ऑलिव्ह ऑईल.. बोलाच्याच तेलात कशाला हवी कंजूसी.. घाला अगदी महागडे शेरभर ऑलिव्ह ऑईल आणि काय! पण ही लांबलचक इंट्रोची सवय इतकी महाग पडेलसे वाटले नव्हते. म्हणजे झाले असे होते की निबंधात माझी परिचयात्मक माहितीच ...अजून वाचा

4

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 4

४ नक्षत्राचे दर्शन तर मु.पो.काकाचे घर! हा काका म्हणजे दिन्या काका. माझ्या बाबांहून लहान. आम्ही एकेरीतच हाक मारायचो. दिन्या काका तसा लहान भाऊ असला तरी शिस्तीचा कडक. काकू म्हणजे रमाकाकू त्याच्याच सारखी. कडकलक्ष्मी! अर्थात दोघे तसे प्रेमळ होते. पण कर्मठ होते. आमच्या घरी बाबा असे नव्हते. देवधर्म वगैरे जेवढ्यास तेवढे. आई पण तशी धार्मिक नव्हती. पण काका मात्र अत्यंत काटेकोरपणे सारे देवधर्म पाळे आणि त्यातली चूक त्याला खपत नसे. त्यामुळे त्याच्या घरी मला त्याच्या शिस्तीचे टेन्शन असे. त्या शिस्तीच्या चिखलात माझ्या प्रेमकहाणीचे कमळ त्यामुळे अगदी उठून दिसते मला तरी आज मागे वळून पाहताना. काकाचे घर मोठे असले ...अजून वाचा

5

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 5

५ धागे आणि दोरे लुंगीत मी लुंगासुंगा वाटलो असेन का तिला? असेल.. जे व्हायचे ते गेलेले. त्यात करण्यासारखे आता काही नव्हते. आता फक्त स्मार्ट होणे आवश्यक. मी पटकन वर जाऊन कपडे बदलले. होता होईल तो स्मार्ट झालो नि बाहेर आलो. पण मी बाहेर येईतोवर नक्षत्रा निघून गेलेली. म्हणजे दरवाजा बाहेरच्या चपला नाहीशा झालेल्या. परत त्या येतील की नाही कुणास ठाऊक. आता करावे तर काय करावे? मी वाचलेली सारी डिटेक्टिव्ह पुस्तके मनात जागी झाली. माहिती काढण्याच्या पद्धती असतात. माहिती देणाऱ्यास आपण माहिती देत आहोत हेच माहिती नसावे अशा काही! एखादा डिटेक्टिव्ह धनंजय जणू संचारला माझ्यात. आता आईकडूनच मिळतील ...अजून वाचा

6

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 7

७ रूम फॉर द इंडियन ग्रूम! दिवसाची सुरूवात तर छानच झाली. चक्क तिच्यासमोर बसून आणि बोलणेही झालेले. अर्थात माझा वेंधळेपणा काही कमी झाला नव्हता.. पोहे खाताना मी ते थोडेफार सांडलेच. पण नेहमीच्या वेंधळेपणापेक्षा हा वेंधळेपणा वेगळा होता! एरव्ही वेंधळेपणा करत असे मी पण त्याला अंगभूत वेंधळेपणाच कारणीभूत होता. पण आताच्या या वेंधळेपणाला काही कारण होते.. खरेतर कार्यकारण भाव होता! कारण प्रत्यक्ष ती समोर बसून पाहात होती माझ्याकडे! पोहे सांडले खरे पण फक्त ते सांडताना वैदेहीचे लक्ष नसावे याचेच समाधान तेव्हा वाटले. तेव्हा म्हटले मी कारण पुढे तिने या पोहे सांडण्याचाही उल्लेख केव्हातरी केलाच. तिचे असे लक्ष होते ...अजून वाचा

7

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 6

६ 'ती'चे मराथी! रात्री खूप विचार करता करता डोळा लागला असणार माझा. कालचा पहिलाच दिवस तसा तो संमिश्र गेला. खरेतर संध्याकाळपर्यंत वायाच गेलेला तो. संध्याकाळ नंतर मात्र अचानक जीव आला जणू त्यात.. 'वो कौन थी?' चा विचार करत डोळा लागलेला माझा. आणि सकाळी उठलो तर माझ्या अंगावर कुणी शाल पांघरून टाकलेली. मी शाल बाजूला सारली.. नि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. चक्क एक मुलगी माझ्या समोर बसली होती. माझ्या आजूबाजूला अजून कुणी नव्हते. माझ्या छातीत धडधडू लागले.. ही कोण? ही ती नक्षत्रा नव्हती. मग ही कोण असेल? वैदेही की कृत्तिका? त्यापैकीच असणार कुणी. कारण अजून कुणी पाहुणे ...अजून वाचा

8

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 8

८ देवाची करणी आणि बागेत पाणी कविता करणे संपवून मी उठलो नि काहीतरी करावे म्हणून लागलो इकडे तिकडे. पण आज किंवा आजवर जे झालंय त्याचा विचार काही मनातून जाईना. एक दोन दिवसात एवढा बदल होऊ शकतो? दुनिया बदल गई वगैरे गाणे गातात ना, त्याचा अनुभव घेत होतो. पण एकूण माझा विश्वास बसणार नाही असेच घडत होते आतापर्यंत. त्यात लग्नघरात लाडवांची कमतरता नसते. हवे तितके खा बुंदीचे लाडू. आजवर जे झाले त्यामुळे माझ्या मनातही असेच खूप सारे लाडू फुटत होते. सारे संकेत इथे अनुकूल दिसत होते. शेवटी काय योग म्हणावा! मी इथे येतो काय आणि ही वै भेटते ...अजून वाचा

9

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 9

९ सुंदर फुलाशी गप्पा तो अर्धा तास स्वप्नात रंगल्यासारखा होता. झाडांना पाणी घालता घालता गप्पा.. आणि मी. आमच्या गप्पा कशाबद्दल व्हाव्यात? आम्ही काहीबाही बोलत होतो.. पण त्यात तिला माझा वेंधळेपणाच जास्त दिसावा असे माझे बोलणे असावे असे माझे मलाच वाटत होते. पण मन ही मन में लड्डू फुटण्याचा आवाज येत असताना मी अजून करणार तरी काय होतो? उगाच विषय काढायचा म्हणून म्हणालो मी, "काय म्हणाले काल स्वामी?" "ओह! स्वामी! ही लुक्ड लाईक अ डिव्हाईन सोल. म्हंजे माला आवडला स्वामी अँड आश्रम. तशी माझा फेथ नाही स्वामी आणि बाबाजीवर. बट इट वाॅज नाईस टू बी विथ दिनकर." ही ...अजून वाचा

10

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 10

१० माझी होशील का? वै निघून गेली नि मी तसाच बसून राहिलो.. फुलांकडे पाहात. जवळ असते तर चिमटा काढून कन्फर्म केले असते.. हे सत्य आहे की भास.. आभास, माझ्या फुकाच्या वल्गना की मनीच्या कल्पना! कल्पना वरून आठवले.. काॅलेजात माझा मित्र होता दोडक्या.. म्हणजे दिनेश दोडके.. त्याला दोडक्या म्हणत असू आम्ही सारे. त्याची लाईन होती एक कल्पना नावाची. एकदा असाच संध्याकाळी कट्ट्यावर बसलेला काॅलेजच्या. तिकडून कल्पना आली. याच्याशी बोलली काहीतरी. दोडक्या आपला आ वासून बसलाय ती निघून गेल्यावर. थोड्यावेळाने आम्ही पोहोचलो. दोडक्या म्हणतोय, अरे कुणी चिमटा काढा, हे स्वप्न आहे की सत्य! अर्थात ही चिमटे काढण्याची संधी आम्ही ...अजून वाचा

11

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 11

११ वै चे गुडनाइट! मी घरात परत आलो.. संध्याकाळ सगळी बागेत फुलांमध्ये गेलेली. शेवटी सगळे संपवून नि ती कविता करून घरात शिरलो तर रात्र झालेली. घर भरलेले. सारी जेवायला बसली मंडळी. उद्याचा एक दिवस. मग हळदीचा समारंभ.. मग लग्न सोहळा.. हे अमेरिकन टूरिस्ट कधी जाणार परत ठाऊक नाही पण त्याच्या आत काही तरी केले पाहिजे.. पण करावे तर काय करावे? मला आमच्या लास्ट इयरच्या परिक्षेसारखे टेन्शन आले एकाएकी. दोन चार दिवसात एवढा सारा पोर्शन पूर्ण करायचा? तशा परीक्षा दिल्यात खूप. अभ्यास करूनही नि कित्येकदा अभ्यास न करता ही. मेडिकलचा अभ्यास म्हणजे हनुमानाचे शेपूट. संपता संपतोय थोडीच ...अजून वाचा

12

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 12

१२ स्वप्न सुंदरी! ती गेली नि मी पण माझ्या खोलीत आलो. वै म्हणाली, मी म्हणतोय जाते.. असे का म्हणाली ती? म्हणजे काय? आधी तीच खूप झोप येते म्हणालेली.. मी तिला आग्रहाने 'झोपतेस कसली? जागी रहा नि गप्पा मार' म्हणायला हवे होते? की अजून काही? आधीच माझी बोलण्याची गडबड, त्यात हा अजून गोंधळात गोंधळ! म्हणजे कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन आणि काय! यात माझी चूक होती.. बोलण्यात की समजण्यात? उद्या परत ही म्हणेल का.. व्हाय वेअर यू अव्हाॅयडिंग मी? काही असो. झोप तर मलाही येत होतीच. आणि आज काही ती आता येणार नाही तेव्हा झोपायला हरकत नाही. कालचा माझाच पुन्हा ...अजून वाचा

13

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 13

१३ तिचे वर संशोधन? कालच्या दिवसाने माझ्या अपेक्षा वाढवल्या होत्या. काही नाही तर 'मोडक म्हणत ती येईल.. मग गप्पा मारीत बसू. उगाच घाई नको म्हणून लवकर उठून तयार होऊन बसलेलो. सकाळी उठून मी गप्पांसाठी विषयही निवडून ठेवलेले! आयत्या वेळी काही सुचण्या न सुचण्याची चिंता नको. नको तेव्हा तोंडी परीक्षेत ब्लँक व्हायची सवय माझी मोडायलाच हवी. पण तोपर्यंत परीक्षेत काॅपी करावी तसे रेडिमेड गप्पांचे विषय शोधून ठेवावेत. आणि मग जमेल तसे बोलत सुटावे. म्हणजे उगाच ती नको म्हणायला, व्हाय आर यू अव्हाॅयडिंग वगैरे. तयार होऊन मी खाली आलो. आता मी कात टाकून अगदी टीपटाॅप झालेलो. लुंगीबिंगी कायमची ...अजून वाचा

14

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 14

१४ मेंदीच्या पानावर! एकूणच चित्र जुन्या जमान्यातल्या कुठल्याशा कृष्णधवल सिनेमासारखे धूसर होते. मी उदास झालो. कंटाळून शेजारच्या घरात येऊन बसलो. तरी लग्नघरात कुणी साधे उदास पण बसू देत नाहीत.. डॉक्टरला तर नाहीच नाही. माझ्या मागोमाग कालचे ते हाय नि लो बीपी आणि स्पांडिलायटीस नि डायबिटीस वाले वरती आले. कालचे अर्धवट राहिलेले संभाषण ते पुढे चालवू इच्छुक होते. आणि आता या सकाळच्या वेळी झोपेची सबब सांगणे पण शक्य नव्हते. आता आज मोबाईलच्या युगात हे किती सोपे झालेय.. रस्त्यात कुणी येताना दिसतोय.. लावा मोबाईल आपल्या कानास आणि टाळा त्याला पद्धतशीर. ते तेव्हा मात्र शक्य नव्हते. मग नाईलाजाने मला बसावेच ...अजून वाचा

15

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 15

१५ हाऊ टू स्पीक! सारे काही अकल्पित घडले. मी येऊन बसलो आपल्या खोलीत. कसला तरी करत बसलेलो. तर हळूच वैदेही आत आली. माझ्यापुढे हात दोन्ही पसरून म्हणाली, "मोडक, बघ ना, आय हॅव कम.." मी पाहिले तर तिच्या दोन्ही हातांवर मेंदी रंगलेली मस्त. "छान आहे हां. मस्तच!" "अजून काही?" "काही नाही. बाकीच्या सर्वांची झाली?" "हुं.." ती फणकाऱ्यात म्हणाली नि गप्प झाली एकाएकी. ती जायला निघणार इतक्यात कृत्तिका आली पाठोपाठ. "मोदका.. तुला इतकेही नाही कळत? नीट बघ ती मेंदी.." कृत्तिकाने वैदेहीचे हात समोर माझ्या समोर धरले. मी निरखून पाहिली मेंदी तर त्यात माझे नाव लिहिलेले. त्यानंतर जे झाले.. ...अजून वाचा

16

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 16

१६ डिलिव्हरी बाॅय! नंतर मला झोप लागली असावी. स्वप्न पडलेले ते विसरून मी मनसोक्त झोपून अंधार झालेला. पाहुणे अजून काही पोहोचले असावेत. आवाज येत होता खालून. मी आळस दिला. किती वाजलेत त्याचा अंदाज घेतला. बहुधा रात्र झाली असावी. आई खोलीत आली नि म्हणाली,"आज बागेत नाही गेलास.. पाणी टाकायला?” “अगं झोप लागली..” “हुं.. परत स्वप्न बिप्न काही..?” मी उगाच तिच्या ट्रॅपमध्ये अडकू नये म्हणून विचारले.. “वाजले किती?” “तेच.. तुला उठवायला पाठवलेय. उठ. काकू बोलावतेय..” “मला? कशाला?” “मदतीसाठी. आणि काय.” “आलो. मी? आणि कसली मदत करणार?" "तूच बघ जाऊन." मी उठून किचन मध्ये गेलो तर काकू ताटं तयार ...अजून वाचा

17

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 17

१७ मौनं सर्वार्थ? दोघांचा ससेमिरा टळावा म्हणून मग गुपचुप मग गच्चीवरच्या झोपाळ्यावर जाऊन बसलो. आकाशात चंद्र होता. टिपूर चांदणे पडलेले. दुपारच्या झोपेनंतर आता कसली झोप येतेय. दिवसभरात आज हार्डली काही वेळ भेटली वै. सगळ्या दिवसाचा हिशेब.. त्यापेक्षा गेल्या दोन दिवसांचा हिशेब लावत लोळून राहिलो. नशिब कोणी नवीन पाहुणे मंडळीपैकी वैद्यकीय सल्ल्यासाठी पाठोपाठ आली नाहीत. बहुधा उद्या विचारतील.. आज ही काही ओळी सुचल्या. मेंदीवरून.. हातावर तुझ्या नक्षी गं मेंदीची तू सखी माझ्या खास गं प्रीतीची.. माझ्या मनीची प्रीत तू गं लाजरी माझ्याच मनी तू दिसशील गं साजरी.. वाटते अर्थहीन आणिक गं उदास तुजविण सखये सारे गं जग ...अजून वाचा

18

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 18

१८ हळदीचा दिवस.. दुसरा दिवस उगवला तोच मुळी उत्साहात. म्हणजे मी ठरवून टाकले. आता कात हवी. काहीतरी छान बोलायलाच हवे. वै ला काल रात्री आला तसा राग जन्मभरात कधी म्हणून येऊ द्यायचा नाही.. मी तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला. म्हटले दिवसाची सुरुवातच अशी करावी ना त्याने पुढचा मूडच बदलून जावा. आज संध्याकाळी हळद. तर सकाळी सगळे तसे मोकळे असणार. त्यात काही संधी मिळते का ते पाहिले पाहिजे. जमले तर कालची चूक सुधारली पाहिजे. बोलण्यात तसा मी हुशार. आई तर म्हणते, नुसता बोलण्यातच हुशार .. अर्थात याबरोबर ती 'अगदी बापासारखा' हे म्हणून आपले कर्तव्य पार पाडते.. तर ही वै ...अजून वाचा

19

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 19

१९ समरभूमीकडे कूच! काही असो, कालच्या पातकाचे प्रायश्चित्त झाले म्हणून मी निश्वास सोडला. खरे सांगू वायफळ आणि निरर्थक बोलण्यात माझ्याशी स्पर्धा करणारे कोणी नसेल पण इथे आल्यावर हिला बघून मी आतापर्यंत ब्लॅंकच होत आलो होतो. बहुधा ते आता संपले. मग मी माझ्या भाग्याचा हेवा करत बसलो. काय सुंदर दिवसाची सुंदर सुरूवात अशा सुंदर साथीने.. हे क्षण असेच फ्रीझ करून ठेवावेत.. लेखक वगैरे असतो तर मनाच्या कुपीत बंदिस्त करून ठेवावेत असे म्हटले असते.. असा विचार करत बसलो आणि तिथेच परत फसलो. कारण पुढे काय बोलावे सुचेना मला. मी तिच्या हातावरल्या मेंदीकडे पाहात बसलो.. काही वेळ गेला असावा. मग ...अजून वाचा

20

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 20

२० विरहाग्नी! काकाने मला सगळ्या कामाला लावून माझा मामा केला. कामाचे काही नाही पण आधीच वेळात वै शी बोलू कधी आणि पुढे करावे तरी काय? रात्र थोडी सोंगे फार म्हणतात तसा आधीच वेळ थोडा आणि त्यात आता ती भेटणारही नाही विशेष. लग्न लागले की झटकन् उडून जाईल अमेरिकेत. नि मग तिचा काॅन्टॅक्टही नाही. आणि मी स्वत:ला ओळखून तर आहेच. मी काही जास्त हातपाय हलवणार नाही. मग पुढचे काय? तिच्याशी बोलायला हवे. त्यासाठी ती भेटायला हवी. त्याकरता वेळ हवा. वेळ मिळाला तरी अर्थात पुढच्या दोन दिवसांत होणारे काम नाहीच ते. पण किमान एक आयडिया .. जो जिंदगी बदल ...अजून वाचा

21

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 21

२१ वाजवा रे वाजवा! केव्हातरी लागली असावी झोप.. सकाळी जाग आली कशीतरी. आज लग्न. उशीरा चालायचे नाही. काकाच्या शिस्तीत सारे काही त्याच्या आॅर्डरप्रमाणेच व्हायला हवे. सारी जबाबदारी माझ्यावर. काकाचे काम ही कसे.. फुलवाल्याकडून सकाळी साडेसातास फुले घेऊन येणे.. गुलाबाची फुले शंभर मोजून घेणे.. नशीब प्रत्येक फुलाच्या पाकळ्या मोजून घेणे नाही लिहिले! वाजंत्रीवाल्यांना आठ वाजून वीस मिनिटानी फोन करून आठवण करून देणे .. सनई वादकांस कोणकोणते राग वाजवणे याची यादी देणे.. भटजीबुवांना सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी फोन करून आठवण करून देणे.. आणि नऊ पंचावन्नला घेऊन येणे.. भटजीबुवा मंत्र विसरले नाहीत याची खात्री निघण्यापूर्वी करून मगच त्यांना घेऊन ...अजून वाचा

22

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 22

२२ वैदेही गमन! कृत्तिका उभी समोर नि मी जांभई देत बसलोय. आजूबाजूचे काही समजेना मला. कुठे असेल? निघून तर गेली नसेल ना? मी डोळे चोळत कृत्तिकाकडे पाहात म्हणालो, “बाकी कोणी दिसत नाहीत?” “बाकी म्हणजे? आहेत ना.. सगळे आहेत.. काकू आहे.. काका.. आई.. बाबा सगळे आहेत..मी आहे, तू ही आहेस.” का कोणास ठाऊक मला तिचा आवाज थोडा कडवट वाटला. न राहवून मी विचारले .. “आपण सगळे आहोतच पण बाकीचे गेस्ट..?” अजूनही मी वै बद्दल थेट विचारू धजत नव्हतो.. “आहेत की.. ते मंगू मामा नि तात्या आहेत. झालेच तर रत्नागिरीच्या मावशी आहेत. राजापूरच्या आत्याबाई आहेत. सगळे आहेत. बाजूच्या घरात. ...अजून वाचा

23

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 23

२३ विसरली हार ती का घरी? बाईकवर टांग मारून, प्यार का संदेसा घेऊन, एका ध्येयाने होऊन, वेडात दौडल्यासारखा निघालो मी. वै चा तो सोन्याचा हार नि माझे ते पहिलेवहिले प्रेमपत्र किंवा प्रेमचित्रपत्र घेऊन. आज विचार करून वाटते की तेव्हा आजच्या सारखे मोबाईल असते तर .. सारे किती सोपे झाले असते. टाकले दोन मेसेजेस की झाले काम! पण तरीही हे असले 'हार्ट टू हार्ट' संदेश पाठवणे कठीण कामच नाही का? तरीही हे होतच आले आहे. अगदी मोबाईलच काय .. पत्रे टाकणारे पोस्टखाते नव्हते तरीदेखील ही प्रेमपत्रांची देवाणघेवाण होतच होती ना! कबुतरे पण या कामी जुंपली जायची. आणि त्याही ...अजून वाचा

24

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 24

२४ पुन्हा वाजवा रे वाजवा! मग व्हायचे ते झाले. तिच्या नि माझ्या घरी बातमी फुटली. हरकत फक्त वै इतकी वर्षे तिथे राहिल्यानंतर इकडे कशी ॲडजस्ट होईल यावरच होती. म्हणजे पत्रातून वै ने कळवले मला.. 'डिअर स्टुपिडेस्ट मंकी आॅफ माईन, डॅड ॲंड मॉम आर वरीड.. इट्स सो डिफरन्ट देअर इन इंडिया.. हाऊ आय विल ॲडजेस्ट.. बट दे आर इम्प्रेस्ड बाय यू .. आय डोन्ट नो व्हाय अँड हाऊ..' मी कळवले तिला.. 'व्हाॅट एव्हर इट इज.. डोन्ट अंडरेस्टिमेट द पाॅवर आॅफ काॅमन स्टुपिड.. अँड एनी वे आय हॅव पास्ड द एक्झाम .. थ्यांक्स..' यावर तिचे उत्तर आले.. “नो नो ...अजून वाचा

25

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 25 - अंतिम भाग

२५ धक्कादायक धक्का! लग्नानंतर एखादा महिना झाला असेल नसेल.. आम्ही हनिमूनवरून परतलेलो. वै आणि माझी नवलाई होतीच. माझे मूलभूत चिंतन मला आजही सांगते.. हनिमूनला फार दूर किंवा महागड्या ठिकाणाची नसते गरज.. नव्या नवऱ्या नि नवरीच्या नवलाईची नशाच पुरेशी असताना अगदी छोटेशी जागाही पुरेशी असते.. पण अर्थात आम्ही दूर मॉरिशसला जाऊन आल्यावर हे मी सांगतोय! असो.. तर आम्ही परतलो होतो.. वै मराठी अगदी आवडीने शिकत होती. आईच्या माहेराशी कनेक्शनमुळे की कोणास ठाऊक पण तिच्या भाषेबद्दल आईने उदार धोरण ठेवले होते. वै च्या मोडक्या मराठीला आई आपल्या तोडक्या इंग्रजीत उत्तर देई. सगळे कसे मजेशीर होते. रोज वै आता ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय