झपाटलेला वाडा.

(2)
  • 84
  • 0
  • 1.5k

आर्यन जेव्हा आरशात बघायचा तेव्हा त्याला लेखक नाही, एक भिकारी दिसायचा. तीन पुस्तकं. तीनही आपटली होती. शेवटच्या प्रकाशकाने पुस्तक तोंडावर फेकलं नव्हतं, त्याने एक वाक्य फेकलं होतं जे पुस्तकापेक्षा जास्त लागलं होतं. "आर्यन, तुझ्या भुतांच्या गोष्टीत भूतच नाहीये. फक्त कल्पना आहे. वाचकाला भीती वाटायला हवी, तुझी गोष्ट वाचून त्याने मागे वळून बघायला हवं. त्यासाठी तुला अनुभव घ्यावा लागेल. खरा अनुभव. मेलेल्या माणसाच्या घरात झोपून बघ." त्याला तो अनुभव हवा होता. म्हणून तो माळशेतला आला.

1

झपाटलेला वाडा - भाग 1

झपाटलेला वाडा - भाग 1: पहिली रात्रआर्यन जेव्हा आरशात बघायचा तेव्हा त्याला लेखक नाही, एक भिकारी दिसायचा.तीन पुस्तकं. तीनही होती. शेवटच्या प्रकाशकाने पुस्तक तोंडावर फेकलं नव्हतं, त्याने एक वाक्य फेकलं होतं जे पुस्तकापेक्षा जास्त लागलं होतं."आर्यन, तुझ्या भुतांच्या गोष्टीत भूतच नाहीये. फक्त कल्पना आहे. वाचकाला भीती वाटायला हवी, तुझी गोष्ट वाचून त्याने मागे वळून बघायला हवं. त्यासाठी तुला अनुभव घ्यावा लागेल. खरा अनुभव. मेलेल्या माणसाच्या घरात झोपून बघ."त्याला तो अनुभव हवा होता. म्हणून तो माळशेतला आला.पुण्यापासून पन्नास किलोमीटर आत, जिथे गुगल मॅप संपतो आणि लोकं रस्ता बोटाने दाखवतात, तिथे माळशेत गाव आहे. आणि गाव जिथे संपतं, तिथून एक कच्चा ...अजून वाचा

2

झपाटलेला वाडा - भाग 2

---झपाटलेला वाडा - भाग 2: विहिरीत कोणीतरी पोहतंयआर्यन झोपला नाही. त्याने प्रयत्न केला, पण डोळे बंद केले की त्याच्या चिखल भरायचा. तोच काळा, चिकट चिखल जो विहिरीत होता. त्याला उलटी येत होती, पण तोंडातून फक्त पाणी येत होतं. विहिरीतलं पाणी.सकाळी सहा वाजता त्याने हाताची मूठ उघडली. रात्री जे केस हातात आले होते ते अजूनही होते. आश्चर्य म्हणजे ते वाळलेच नव्हते. रात्रभर त्याच्या मुठीत होते तरी ओलेच होते. आणि त्यांचा वास बदलला होता. काल रात्री फक्त शेवाळाचा वास होता, आज सकाळी त्यातून ताज्या रक्ताचा वास येत होता. जणू आत्ताच सांडलेले रक्तजमिनीवर राख तशीच होती. रात्री त्याने पायाने पुसण्याचा प्रयत्न केला ...अजून वाचा

3

झपाटलेला वाडा - भाग 3

झपाटलेला वाडा - भाग 3: भिंतीतली बाईविहिरीतली दोन प्रेतं बाहेर आली. सकाळ झाली.आर्यनने गावातून चार माणसं बोलावली. हरिभाऊने रॉकेल कोणाच्याच अंगात हिम्मत नव्हती त्या दोन पांढऱ्या फुगलेल्या बॉडींना हात लावायची. वीस वर्ष पाण्यात होत्या, पण कुजल्या नव्हत्या. सुनिताने श्रुतीला अजूनही घट्ट धरलं होतं. आईची मिठी सुटलीच नव्हती.हरिभाऊ रडत रडत बोलला, "साहेब, वीस वर्ष. वीस वर्ष ही लेकरं थंड पाण्यात होती. तुम्ही पुण्य केलं."चिता जळली. दोन चिता. एक मोठी, एक छोटी. जशी आग लागली तसा विहिरीतला काळा रंग एकदम कमी झाला. पाणी पहिल्यांदा निळं दिसलं. आणि त्या ज्वाळेत आर्यनला दोन सावल्या वर जाताना दिसल्या. एक मोठी, एक छोटी. हातात हात ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय