झपाटलेला वाडा.

(15)
  • 201
  • 0
  • 21.2k

आर्यन जेव्हा आरशात बघायचा तेव्हा त्याला लेखक नाही, एक भिकारी दिसायचा. तीन पुस्तकं. तीनही आपटली होती. शेवटच्या प्रकाशकाने पुस्तक तोंडावर फेकलं नव्हतं, त्याने एक वाक्य फेकलं होतं जे पुस्तकापेक्षा जास्त लागलं होतं. "आर्यन, तुझ्या भुतांच्या गोष्टीत भूतच नाहीये. फक्त कल्पना आहे. वाचकाला भीती वाटायला हवी, तुझी गोष्ट वाचून त्याने मागे वळून बघायला हवं. त्यासाठी तुला अनुभव घ्यावा लागेल. खरा अनुभव. मेलेल्या माणसाच्या घरात झोपून बघ." त्याला तो अनुभव हवा होता. म्हणून तो माळशेतला आला.

Full Novel

1

झपाटलेला वाडा - भाग 1

झपाटलेला वाडा - भाग 1: पहिली रात्रआर्यन जेव्हा आरशात बघायचा तेव्हा त्याला लेखक नाही, एक भिकारी दिसायचा.तीन पुस्तकं. तीनही होती. शेवटच्या प्रकाशकाने पुस्तक तोंडावर फेकलं नव्हतं, त्याने एक वाक्य फेकलं होतं जे पुस्तकापेक्षा जास्त लागलं होतं."आर्यन, तुझ्या भुतांच्या गोष्टीत भूतच नाहीये. फक्त कल्पना आहे. वाचकाला भीती वाटायला हवी, तुझी गोष्ट वाचून त्याने मागे वळून बघायला हवं. त्यासाठी तुला अनुभव घ्यावा लागेल. खरा अनुभव. मेलेल्या माणसाच्या घरात झोपून बघ."त्याला तो अनुभव हवा होता. म्हणून तो माळशेतला आला.पुण्यापासून पन्नास किलोमीटर आत, जिथे गुगल मॅप संपतो आणि लोकं रस्ता बोटाने दाखवतात, तिथे माळशेत गाव आहे. आणि गाव जिथे संपतं, तिथून एक कच्चा ...अजून वाचा

2

झपाटलेला वाडा - भाग 2

---झपाटलेला वाडा - भाग 2: विहिरीत कोणीतरी पोहतंयआर्यन झोपला नाही. त्याने प्रयत्न केला, पण डोळे बंद केले की त्याच्या चिखल भरायचा. तोच काळा, चिकट चिखल जो विहिरीत होता. त्याला उलटी येत होती, पण तोंडातून फक्त पाणी येत होतं. विहिरीतलं पाणी.सकाळी सहा वाजता त्याने हाताची मूठ उघडली. रात्री जे केस हातात आले होते ते अजूनही होते. आश्चर्य म्हणजे ते वाळलेच नव्हते. रात्रभर त्याच्या मुठीत होते तरी ओलेच होते. आणि त्यांचा वास बदलला होता. काल रात्री फक्त शेवाळाचा वास होता, आज सकाळी त्यातून ताज्या रक्ताचा वास येत होता. जणू आत्ताच सांडलेले रक्तजमिनीवर राख तशीच होती. रात्री त्याने पायाने पुसण्याचा प्रयत्न केला ...अजून वाचा

3

झपाटलेला वाडा - भाग 3

झपाटलेला वाडा - भाग 3: भिंतीतली बाईविहिरीतली दोन प्रेतं बाहेर आली. सकाळ झाली.आर्यनने गावातून चार माणसं बोलावली. हरिभाऊने रॉकेल कोणाच्याच अंगात हिम्मत नव्हती त्या दोन पांढऱ्या फुगलेल्या बॉडींना हात लावायची. वीस वर्ष पाण्यात होत्या, पण कुजल्या नव्हत्या. सुनिताने श्रुतीला अजूनही घट्ट धरलं होतं. आईची मिठी सुटलीच नव्हती.हरिभाऊ रडत रडत बोलला, "साहेब, वीस वर्ष. वीस वर्ष ही लेकरं थंड पाण्यात होती. तुम्ही पुण्य केलं."चिता जळली. दोन चिता. एक मोठी, एक छोटी. जशी आग लागली तसा विहिरीतला काळा रंग एकदम कमी झाला. पाणी पहिल्यांदा निळं दिसलं. आणि त्या ज्वाळेत आर्यनला दोन सावल्या वर जाताना दिसल्या. एक मोठी, एक छोटी. हातात हात ...अजून वाचा

4

झपाटलेला वाडा - भाग 4

झपाटलेला वाडा - भाग 4: शेकोटीतलं सत्यगच्चीच्या कोपऱ्यात जे पडलं होतं, ते सांगाडा नव्हताच. वीस वर्ष पावसात, उन्हात वाऱ्यात त्याचा एक गोळा तयार झाला होता, वेलींनी त्याला गिळून टाकलं होतं. पिंपळाच्या मुळांनी त्याच्या बरगड्यांमध्ये घर केलं होतं. कवटीवर एक मोठा खड्डा होता. हा पडून झालेला खड्डा नव्हता. हा कोणीतरी जड दगडाने हाणून पाडलेला खड्डा होता. खूनाचा पुरावा.आर्यनने हरिभाऊला हाक मारली. हरिभाऊ वर आला आणि त्या सांगाड्याकडे बघतच खाली बसला. त्याच्या डोळ्यातून आपोआप पाणी आलं."रघु... लहानपणापासून माझ्या खांद्यावर खेळला रे हा. वाईट नव्हता. पण दारूच्या आहारी जाऊन तो या मार्गाला आला... दारूने याच्याकडून आधी बायको-मुलीचा खून करवला, आणि मग त्याच ...अजून वाचा

5

झपाटलेला वाडा - भाग 5

झपाटलेला वाडा - भाग 5: दोन आत्म्यांची कहाणीसकाळ झाली. पण आर्यनसाठी सकाळ झालीच नव्हती. रात्रभर त्याने डायरीत एकच ओळ होती - "उद्या तळघरात जाणार." पण सकाळी उठल्यावर त्याच्या डोक्यात दुसराच विचार आला.रघुनाथ म्हणाला होता - "दत्ताला मी मारलं." म्हणजे दत्ताचा आत्मा कुठे गेला? त्याची बॉडी तर जाळली होती, पण आत्मा? तो तर इथेच असणार. विहिरीत.त्याने हरिभाऊला विचारलं, "काका, दत्ताची राख कुठे आहे?"हरिभाऊ म्हणाला, "त्याची बॉडी विहिरीतच सापडली होती. दोन वर्षांपूर्वी. फुगलेली. आम्हीच काढली. त्याच्या घरच्यांनी घाटावर जाळलं. पण साहेब... त्याला मुक्ती मिळाली नाही. लोक अजूनही सांगतात, पौर्णिमेला तो विहिरीच्या काठावर रडत बसलेला दिसतो विचित्र आवाज करतो शेवटी बिडी ओढतो ...अजून वाचा

6

झपाटलेला वाडा - भाग 6

झपाटलेला वाडा - भाग 6: वाड्याचा जुना मालकसहा आत्मे मुक्त झाले होते. आणि वाडा पहिल्यांदा श्वास घेत होता.पहिल्या दिवशी आला तेव्हा वाड्यात एक घुसमटणारा वास होता. कुबट, जुन्या रक्ताचा. आता तो वास नव्हता. अंगणातल्या पिंपळावर पक्षी परत बसू लागले होते. वीस वर्षात पहिल्यांदा. गावातले लोक आता म्हणू लागले होते, भोसले वाड्यात दिवा दिसतोय. कोणीतरी राहतंय तिथे. वाडा आता शांत झालाय.पण आर्यनला माहित होतं, वाडा शांत नाही. अजून दोन आत्मे बाकी आहेत. सगळ्यात जुने. सगळ्या शापाचं मूळ. भैरवनाथ आणि सावित्री. ज्यांनी हा वाडा बांधला.लॅपटॉपवर मेसेज आलाच होता - आता खरा मालक बाकी आहे. तोच सगळ्या शापाचं मूळ आहे.आर्यनने हरिभाऊला विचारलं, ...अजून वाचा

7

झपाटलेला वाडा - भाग 7

झपाटलेला वाडा - भाग 7: पायातली बाईसात आत्मे मुक्त झाले होते. अंगणात सात चिता जळून राख झाल्या होत्या. पण वाऱ्याने उडून गेली नव्हती, ती तिथेच गोल गोल फिरत होती, जणू अजूनही कोणीतरी बाकी आहे याची आठवण करून देत होती.वाडा आता हलका वाटत होता. शंभर वर्षाचं ओझं उतरल्यासारखा. पहिल्या दिवशी जो घुसमटणारा, कुबट वास होता, तो आता नव्हता. पिंपळावर पक्षी बसू लागले होते. पण रात्री... रात्री अजूनही आवाज येत होता. मुख्य खांबातून.मला बाहेर काढा... मला श्वास घेता येत नाही... मी इथे शंभर वर्षांपासून आहे... अंधारात...आर्यनला माहित होतं, ही सावित्री आहे. सगळ्या शापाची सुरुवात.सकाळी त्याने मुख्य खांबाला हात लावला. सागवानी खांब. ...अजून वाचा

8

झपाटलेला वाडा - भाग 8

झपाटलेला वाडा - भाग 8: लेखकाची परतफेडवाडा पडला होता. दोन मजली, शंभर वर्ष जुना भोसले वाडा दोन सेकंदात जमीनदोस्त होता. जिथे वाडा होता तिथे आता फक्त मातीचा ढिगारा होता. गावकऱ्यांनी ठरवलं - इथे आठ झाडं लावू. आठ आत्म्यांच्या नावाने. सावित्री, भैरवनाथ, किसन, कमला, सुनिता, श्रुती, रघुनाथ, दत्ता. त्यांची आठवण.आर्यन पुण्याला परत आला. त्याची तीच खोली. तेच टेबल. पण तो आता तो आर्यन राहिला नव्हता जो महिन्यापूर्वी गेला होता. आधी तो कल्पनेने भूतं लिहायचा. गुगल करून. आता त्याने खरं भूत पाहिलं होतं. त्यांच्या हाताला हात लावला होता. त्यांच्या चिता जाळल्या होत्या.त्याने लॅपटॉप उघडला. नवीन फाईल. नाव टाईप केलं - झपाटलेला ...अजून वाचा

9

झपाटलेला वाडा - भाग 9

झपाटलेला वाडा - भाग 9: शापित सोन्याचा शापमैदानात एक माणूस मेला होता. सोन्यासाठी. त्याच जागी जिथे शंभर वर्षांपासून बळी होते. इतिहास परत घडला होता. सोन्याने परत बळी घेतला होता.पोलिसांनी ते सोनं जप्त केलं. पाच हंडा नाही, दोन हंडा निघालं होतं. पण त्याची किंमत पन्नास कोटी. लोखंडी पेटीत भरून पोलिसांच्या गाडीत टाकलं. पोलीस स्टेशनला निघाले. पण वाड्याच्या वेशीवरच ट्रकने धडक दिली. पोलिसांची गाडी पलटली. दोन पोलीस जागीच मेले. पेटी रस्त्यावर पडली, उघडली. लोकांनी लुटायला सुरुवात केली. परत भांडण. परत एकाचा खून. फावड्याने.तीन दिवसात तीन मृत्यू. एकाच सोन्यासाठी.आर्यनने हे ऐकलं तेव्हा त्याचा थरकाप झाला. तो म्हणाला, हे सोनं नाही, हा शाप ...अजून वाचा

10

झपाटलेला वाडा - भाग 10

झपाटलेला वाडा - भाग 10: देवीच्या वाड्यात नवीन सुरुवातमंदिर बनलं होतं. जिथे शंभर वर्षांपासून झपाटलेला वाडा उभा होता, तिथे सोन्याची देवी उभी होती. चार फूट उंच, चमकणारी, त्रिशूळ हातात घेतलेली. ज्या सोन्यासाठी वीस खून झाले होते, तेच सोनं आता देवी झालं होतं. लोक आता त्या मैदानाला घाबरत नव्हते, तिथे पाया पडत होते. माळशेत गावात जत्रा भरली होती.आर्यनने पुण्याचं घर सोडलं होतं. तो आता तिथेच राहत होता. मंदिराच्या बाजूला छोटी खोली, एक खाट, एक टेबल, लॅपटॉप. सकाळी मंदिर झाडायचा, दिवा लावायचा, आणि दिवसभर लिहायचा. त्याची दुसरी कादंबरी - देवीचा वाडा.पण गोष्ट संपली नव्हती. कारण शाप संपला होता, पण हिशेब बाकी ...अजून वाचा

11

झपाटलेला वाडा - भाग 11

झपाटलेला वाडा - भाग 11: मूर्तीच्या डोळ्यात रक्तदहा आत्मे मुक्त झाले, असं सगळ्यांना वाटलं. मंदिर झालं. सोन्याची देवी बसली. जत्रा. पण आर्यनला झोप येत नव्हती.रोज रात्री बारा वाजता त्याला आवाज यायचा. मंदिरातून. तोच आवाज. जो पहिल्या दिवशी वाड्यात आला होता. पैंजणाचा. छुन... छुन... छुन...पण आता तो पैंजण मंदिरात वाजत होता. देवीच्या पायातला.त्याला वाटलं भास असेल. पण एके रात्री तो मंदिरातच झोपला. देवीसमोर. बारा वाजले. मंदिराचा दरवाजा आपोआप बंद झाला. धाड इतका जोरात की दिवे विझले. फक्त एकच प्रकाश - देवीच्या मूर्तीतून. सोन्याची चार फूट मूर्ती चमकत होती. पण तिच्या डोळ्यातून...रक्त. काळं, घट्ट रक्त. मूर्तीच्या सोनेरी गालावरून ओघळत खाली येत ...अजून वाचा

12

झपाटलेला वाडा - भाग 12

झपाटलेला वाडा - भाग 12: अकराव्या बळी नंतरसरपंच मेला होता. देवीच्या पायाजवळ. छातीत सोन्याचं त्रिशूळ. डोळे उघडे. तोंडातून काळा आणि सगळं रक्त... मूर्तीने प्यायलं होतं. मूर्तीच्या सोनेरी ओठांना ताजं रक्त लागलं होतं. जणू देवीने आत्ताच रक्त प्यायलं.गावात गोंधळ उडाला होता जिकडे तिकडे आरडाओरड चालली होती. लोक म्हणाले, ही देवी नाही ही हडळ आहे सोन्याची हडळ काल वाडा होता, आज मंदिरात हडळ बसलीय! रोज एक बळी घेणारपोलीस आले. बॉडी पाहिली इन्स्पेक्टर म्हणाला, हा खून आहे. कोणीतरी त्रिशूळ मारलं. मंदिर बंद करा ही पन्नास कोटीची मूर्ती जप्त करा. सरकारी मालमत्ता.चार पोलिसांनी मूर्तीला हात लावला. ओढायला लागले. पण मूर्ती हलली नाही. जणू ...अजून वाचा

13

झपाटलेला वाडा - भाग 13

झपाटलेला वाडा - भाग 13: पाण्यातला हातसोन्याचा हात आर्यनचा पाय पकडून ओढत होता. घट्ट. बर्फासारखा थंड नाही, आगीत तापलेल्या गरम. गोदावरीचं काळं पाणी उकळत होतं. बुडबुडे येत होते. कारण सोनं वितळत होतं, पाणी तापत होतं.आर्यन ओरडत होता, वाचवा मला कोणीतरी वाचवा माझा पाय जळतोयहरिभाऊने धावून त्याचे दोन्ही हात पकडले. मागे ओढू लागला. पण त्या सोन्याच्या हातात माणसाची ताकद नव्हती, शंभर वर्षांच्या शापाची ताकद होती. आर्यनचे पाय पाण्यात गेले. गुडघ्यापर्यंत. कंबरपर्यंत. तो हळू हळू बुडत होता.पाण्यातून आवाज येत होता. दहा आवाज एकत्र, पण आता ते रडत नव्हते, हसत होते.ये... तू अकरावा बळी... तू आमच्यात ये... आम्ही दहा जण आहोत... तू ...अजून वाचा

14

झपाटलेला वाडा - भाग 14

झपाटलेला वाडा - भाग 14: मातीची देवी आणि परत आलेला वाडासोन्याची मूर्ती गोदावरीत वितळली. दहा आत्मे तारे झाले. गाव असं सगळ्यांना वाटलं. पण आर्यनला झोप येत नव्हती.कारण त्या रात्री त्याला परत स्वप्न पडलं. तोच वाडा. दोन मजली, कौलारू, लाकडी खांब असलेला भोसले वाडा. तसाच उभा, जसा पडण्याआधी होता. पण आता वाडा नवीन होता. आणि गच्चीवर कोणीतरी उभं होतं. सोन्याची देवी. पण आता तिचं रूप बदललं होतं. अर्धा चेहरा देवीचा, अर्धा हडळीचा. अर्धं अंग सोन्याचं, अर्धं मातीचं. ती म्हणाली -तू मला वितळवलंस... पाण्यात टाकलंस... पण मी संपले नाही... मी परत येणार... कारण माझं सोनं गोदावरीत आहे... मातीत आहे... पाण्यात आहे... ...अजून वाचा

15

झपाटलेला वाडा - भाग 15

झपाटलेला वाडा - भाग 15: शेवटचा बळी आणि वाड्याचा अंत [शेवटचा भाग]वाडा बंद झाला होता. दार, खिडक्या, सगळं बंद. दहा आत्मे, हातात खंजीर, त्रिशूळ, दोर. आणि मध्ये आर्यन. अकरावा बळी. भिंतीवर ताज्या रक्ताने लिहिलं होतं -अकरावा मालक - आर्यन. मृत्यू - आज रात्री 12 वाजता. 2026.बारा वाजले होते. अमावस्या. बाहेर एवढा काळोख की हात दिसत नव्हता. आत फक्त एका तेलाच्या दिव्याचा मंद प्रकाश. आणि त्या प्रकाशात दहा सावल्या पुढे येत होत्या.सावित्री म्हणाली, ये बाळा... घाबरू नको... तुला दुखणार नाही... फक्त एकदा गळा दाबू... एकदा खंजीर... मग तू आमच्यात येशील... कायमचा... या वाड्याचा मालक होशील... शंभर वर्षांसाठी... हा वाडा परत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय