रहस्य कथा- नीलिमा..-२ Anuja Kulkarni द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रहस्य कथा- नीलिमा..-२

रहस्य कथा- नीलिमा..-२

चंद्र ग्रहणाचा दिवस उजाडला. चंद्र ग्रहणरात्री ३.३० ला होत. अनुराग १ वाजता जेव्हा सगळीकडे सामसूम होती तेव्हा घर बाहेर पडला. चंद्र ग्रहण चालू होण्यासाठी काहीच काळ राहिला होता. ग्रहणाच्या आधीपासूनच हवा कुंद झाली होती. नकारात्मक उर्जा चाहुबाजुला फिरती आहे असा भास अनुरागला होत होता. खरच तस होत की तो त्याचा भास होता हे अनुरागला काळात नव्हत. गावात सगळीकडे शांतता होती. गावातले सगळे रात्री लवकरच झोपले होते. पण अश्यावेळी निर्जन रस्त्यावरून अनुराग चालत होता. अनुराग अंधाऱ्यारात्री एकटाच कुठेतरी जात होता. त्याची नजर फक्त समोर पाहत होती. बाकी काही पाहायला त्याला शुद्ध न्हवतीच. अनुराग च्या मनावर थोड दडपण आल होत पण पुन्हा मन खंबीर करून तो चालत होता. अनुराग चालत होता कुठेही न थांबता. अनुराग त्या गावात नवीन होता पण गावाची नीट माहिती असल्यासारखा अनुराग झपा झप पावलं टाकत होता. पण त्याच्याकडे पाहायला रस्त्यावर कोणीच न्हवत. रस्ता सुनसान होता. फक्त रस्त्यावर कुत्री होती. त्यांच्या स्वभावानुसार कुत्री ओरडत होती. मधेच एखाद कुत्रा रडत देखील होत. जणू कुत्री अनुराग ला इशारा देत होती कि पुढे जाऊ नकोस. पण अनुरागच मात्र कुत्र्यांच्या भुंकण्याकडे लक्ष न्हवत. अनुराग आपल्या वाटेनी चालत होता. भयाण शांतता एखाद्याला नको नकोशी वाटावी अशी होती पण त्याचा काही परिणाम अनुराग वर होत न्हवता अस न्हवत पण त्यानी स्वतःच्या भीतीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. फक्त रात्रीची भयाण शांतता कुत्र्यांमुळे भंग पावत होती. मधेच रातकिड्यांचा किर्र किर्र आवाज रात्रीच्या भयाण शांततेत अधिकच गूढता आणत होता. पण अंधाराची आणि कोणत्याच गोष्टीची तमा न बाळगता, अनुरागची पावलं झपाझप पडत होती. त्याच्या मनावर थोड दडपण होत पण त्याची उत्सुकता त्याला घरात बसून देणार न्हवती. आणि तो घाईघाईनी फक्त चालत होता. चालता चालता त्याच्या पाय एका दगडाला लागला आणि त्याला ठेच लागली. त्याच्या अंगठ्यातून रक्त वाहायला लागल. त्याला आपल्याला लागल आहे याची जाणीव झाली तरी अनुराग थांबला नाही. तो चालतच होता. त्याला कुठेतरी जायचं होत. कुठे ते त्यालाही माहिती न्हवत. अनुराग फक्त चालत होता जिथे वाट नेईल तिथे.. बरच अंतर पार केल्यावर अनुराग एका ठिकाणी थांबला. त्यानी चारी बाजूला नजर फिरवली. त्याला कोणी हाक मारल्याचा भास झाला. पण आजूबाजूला कोणीच न्हवत. कोणीच नाही हे पाहून अनुराग परत चालायला लागला. तितक्यात समोरून एक अल्लड मुलगी त्याला त्याच्याकडे येतांना दिसली. अनुरागच्या मनावरचा ताण एकदम वाढला पण त्यानी शांत राहायचा प्रयत्न चालू ठेवला. त्या मुलीचे केस मोकळे होते. एकदम नाजूक अशी गोड मुलगी होती ती पण अंधाऱ्या रात्री ती भयानक वाटत होती. ती मुलगी अनुरागच्या दिशेनी चालत येत होती. पण ती मधेच थांबली आणि तिनी अनुरागला निरखून पाहिलं. अनुराग तिला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही ह्याची खात्री केली आणि ती अनुराग समोर आली. आता मात्र अनुराग ला घाम फुटला. उगाच ग्रहणाच्या दिवशी बाहेर पडलो असा विचार त्याच्या मनात आला. तिथून पाहून जाऊ असाही विचार त्यानी केला पण अनुरागच्या पायातले त्राण जणू गेले होते. त्याच्या हृदयाचे ठोकेजोरात वाजत होते. पळून जाता येणार नाही मग काहीतरी बोलू असा विचार करून त्यानी बोलायचं प्रयत्न केला पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत न्हवते. शेवटी ती मुलगी बोलायला लागली,

"काय झाल तुम्हाला??"

"अ..अ.." अनुराग इतक बोलला पण नंतर अनुरागला मूर्च्छा आली. जरा वेळानी त्याला शुद्ध आली. ती मुलगी त्याच्याच जवळ उभी होती. अनुराग घाबरून जोरात ओरडला,

"कोण आहेस तू? तू नीलिमा आहेस का?"

"नाही नाही मी नीलिमा नाही.. मी तिची मैत्रीण.." ती मुलगी बोलली, "मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे."

"पण.." अनुराग थरथरत होता..

"काय पण? तुम्हाला वाटल नीलिमा च भूत आहे मी? नाही नाही.. माझ नाव सुरेखा आहे! मी नीलिमा ची खास मैत्रीण. आणि काही वर्षांपूर्वी नीलिमा बरोबर एक हादसा झाला होता. सगळ्यांना वाटल ती ग्रहण पाहिल्यामुळे गायब झाली. पण खर कारण ते न्हवतच. नीलिमा गायब झाली नाही तर तिला घरातल्यांनी मारून टाकल आणि ते ग्रहणाच्याच दिवशी आणि आळ घातला तो ग्रहणावर! आणि गावात अफवा पसरवली की तिच भूत रात्री हिंडत असत. नीलिमा ला मुल होत नाही त्यामुळे ती तिच्या घरच्यांना नकोशी झाली होती. गावात मुलीचं कधी एकदा लग्न होतंय अशी घाई असते. तिच्याही बाबतीत तेच झाल. तिला शिकायचं होत पण शिकून पण नाही दिल घरच्यांनी. तिच बालपण हिरावून घेतलं. तिच जबरदस्तीनी लग्न लावून दिल आणि मग तिचा नवरा जो तिच्या पेक्षा दुप्पट वयाचा होता त्याचे अत्याचार चालू झाले. तिच्या मनाचा कधी कोणी विचारच नाही केला. मी तिला असंख्य वेळा रडतांना पाहिलं होत. पण मी तरी तिची काय मदत करणार होते?" सुरेखा बोलत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. अनुराग सुद्धा तिच बोलण ऐकत होता. त्याला सुद्धा नीलिमा ची कहाणी ऐकून भरून आल.

"पुढे काय झाल?" अनुराग घाबरला होता कारण त्याला कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा कळत न्हवत. पण तरी अवसान गोळा करून तो बोलला.

"नीलिमा नी ग्रहण पाहिल्यामुळे ती गायब झाली आणि तिच भूत झालाय अशी अफवा तिच्या घरच्यांनी पसरवली. आणि गावात काय, काश्यावरही विश्वास ठेवतात. तिचे आई बाबा काय किंवा तिचा नवरा. नवरा कसला, निर्दयी माणूस होता तो." सुरेखा चे अश्रू थांबा थांबत न्हवते.. "त्यांनी मारून टाकल माझ्या मैत्रिणीला! मला तेव्हा खूप वाईट वाटल होत. मी गावातल्या लोकांशी बोलायचं प्रयत्न करत होते पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवेल अस मला वाटलच नाही. मग मी मध्यरात्री बाहेर पडते म्हणजे कोणी मला असा भेटेल तो नीलिमाची मदत करू शकेल. कधी कोणी मला रात्री चुकून पाहिलं तर नीलिमा च भूत आहे असा समज करून घ्यायचे आणि ताण सहन होऊन हृदयविकाराच्या झटका येऊन मरायचे. पण नीलिमा च भूत बीत काही नाही. आज तुम्हाला पाहून तुमच्याशी बोलायची संधी मला मिळाली.. तुम्ही गावातले वाटत नाही. आणि तुम्ही नीलिमा ला न्याय मिळवून द्याल अशी माझी खात्री आहे. दिवसा तर ह्या विषयावर कोणाशीच बोलता येत नाही कारण सगळ्यांनी मलाच वेड्यात काढल असत."

"हो.. मी शहरातून आलो हे. मला कुतूहल आहे गावातल्या लोकांबद्दल. पण मला वाईट वाटल नीलिमाची गोष्ट ऐकून. मी नीलिमाला नक्की न्याय मिळवून देईन." अनुराग बोलला..

"तुम्ही नीलिमाला न्याय नक्की मिळवून द्या. मी तुम्हाला नीलिमाला कुठे मारलं आणि पुरलं ती जागा दाखवते. आणि तुम्ही तिच्या घरच्यांना शिक्षा द्या." सुरेखा चे डोळे लकाकले. अनुरागच्या चेर्यावर सुद्धा स्मित हास्य आल होत. शेवटी त्याच काम फत्ते झाल होत.

"हो..का नाही? मला खरच वाईट वाटतंय नीलिमा बद्दल ऐकून. आजही जगात मुलींना इतक्या त्रासांना तोंड द्याव अलगत हे मला माहितीच न्हवत. मी नीलिमा ला नक्की न्याय मिळवून देणार! आणि मी गावात सांगितलं नाही पण मी स्वतःच एक पोलीस ऑफिसर आहे. आता नीलिमाला न्याय नक्की मिळणार. माझावर विश्वास ठेव.. आणि आता नीलिमा सारख्या कोणत्याही मुलीचा बळी जाणार नाही. निलीमाची अफवा सगळीकडे पसरली आहे आणि म्हणूनच त्याचा छडा लावायलाच मी गावात आलो होतो. मी पोलीस आहे हे कोणाही समोर उघड करायचं न्हवत. नाहीतर माझ्या तपासात अडचणी आल्या असत्या. "

सुरेखा अनुरागच बोलण ऐकत होती. अनुराग पोलीस मध्ये आहे आणि तो नीलिमा बद्दल जाणून घेण्यासाठीच गावात आला आहे हे ऐकून सुरेखा ला आनंद झाला. सुरेखाचे डोळे लकाकत होते आणि आता नीलिमाला- तिच्या जीवा भावाच्या मैत्रिणीला न्याय मिळेल अश्या विचारांनी मनोमन आनंदी झाली. माणुसकी अजूनही जिवंत आहे ह्यावर तिचा विश्वास बसला आणि अनुराग ला धन्यवाद देत ती परत गावाकडे जायला लागली.

अनुजा कुलकर्णी.