जीवनगाणे गातच राहावे.. Anuja Kulkarni द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

जीवनगाणे गातच राहावे..

जीवनगाणे गातच राहावे..

आयुष्य खरच खूप सुंदर आहे! मिळालेल्या आयुष्याचा मान ठेऊन ते पूर्णपणे जगण महत्वाच असत आणि "जीवनगाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे..." हे सतत डोक्यात ठेवलं कि आयुष्य खूप सुंदर असल्याची प्रचीती आपल्याला येईल!! माणसाच आयुष्य म्हणल की त्यात चढ उतार येणारच.. कधी काही मनाविरुद्ध गोष्टी, कधी कोणाशी भांडण.. किंवा नको असलेली परिस्थिती निर्माण होण स्वाभाविक आहे. पण त्यातूनही तरून जाऊन, झाल त्यात न अडकता परत नव्यानी आयुष्य जगण हीच तर आयुष्य जगण्याची कला आहे. खर तर आयुष्यात चढ उतार आहेत म्हणूनच तर आयुष्याची खरी मजा आहे... सतत एकसारखी परिस्थिती असेल तर आयुष्य नक्कीच कंटाळवाण बनू शकत. आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. जगण्याचा अविभाज्य घटक आहे! आयुष्यात चढ असो वा उतार.. ह्या दोन्ही गोष्टी बदलणार हे नक्की असत. कारण परिवर्तन हा काळाचा नियम आहे. परिस्थिती एकसारखी कधीच राहत नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थिती मध्ये आनंद शोधण अत्यंत महत्वाच असत. कधी मनाविरुद्ध गोष्टी होतात, कधी जवळचे लोकं दूर जातात पण कोणत्याही परिस्थिती मध्ये आयुष्य थांबत नसत मग आपण तरी जगण का थांबवायचं? जगण थांबवलं तर नुकसान आपलच आहे. मग ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यागोष्टींनी आयुष्य उदास का बनवायचं? कधी कळत तर कधी नकळत, आयुष्य रंगांची उधळण करत असत. ते रंग नेहमीच हेरून जगत राहाण म्हणजे आयुष्य पूर्णपणे जगण!! प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधून आयुष्य जगून त्याचा क्षणोक्षणी आनंद घेण गरजेच असत. पण जर आपण नवीन गोष्टींना सामोर जायला नकार दिला तर मात्र आयुष्य जगण्यातला आनंद कुठेतरी हरवू शकतो.

आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगता आल पाहिजे अस सर्वांनाच वाटत असत. आयुष्य मनाप्रमाणे जगता आल की त्याचा पूर्ण आनंद घेता येतो. पण कधी परिस्थिती आपल्याला बदलायला भाग पडते पण अश्यावेळी खचून न जाता चालत राहील तर असंख्य नवीन पर्याय दृष्टीपथात येतात. आणि नवीन पर्याय उपलब्ध होतात त्यामुळे आयुष्य जस समोर येत राहील तस ते पूर्णपणे जगल तर त्या जगण्यातली मजा काही औरच असेल!! कधी कधी काही नकोश्या वाटणाऱ्या गोष्टी आयुष्यात होऊ शकतात पण त्यातूनही काहीतरी चांगलाच निघेल असा विचार केला तर मनाविरुद्ध झालेल्या गोष्टीमधून सुद्धा यशस्वीपणे बाहेर पडून आयुष्याचा आनंद घेता येऊ शकतो. शेवटी महत्वाच म्हणजे प्रत्येक क्षण जगण असत. परिस्थितीवर मात कली कि त्यातूनही वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळालेला दिसून येईल. आयुष्य क्षणभंगुर आहे.. आयुष्याचे फासे कधीही पालटू शकतात त्यामुळे नेहमीच सकारत्मक दृष्टीकोन ठेवण हितकारक ठरत. आयुष्य कोणाला दाखवायला जगण्यापेक्षा जर स्वतःसाठी जगल तर त्याचा आनंद अधिक मिळतो. जगाला सतत काहीतरी दाखवत राहायच्या नादात आपण आपण आयुष्य जगणंच विसरून जातो. आणि सुंदर क्षण हरवल्याची भावना मनात येऊ शकत. मनाची शांती, आतला आनंद मिळवायचा असेल तर त्यासाठी आत्मपरीक्षण केल्याचा बराच फायदा झालेला दिसून येतो. कोणासारख जगण्यापेक्षा, सतत दुसऱ्याशी बरोबरी करण्यापेक्षा "मी माझ्या मनाप्रमाणे जगती/जगतो आहे आणि मी माझ्या आयुष्यातले सुंदर क्षण हरवू देत नाहीये" हि गोष्ट अत्यंत आनंददायी असते आणि त्यामुळे आयुष्याचा प्रत्येक क्षण बहरण्यास मदतच होते. पुढचा क्षण काय घेऊन येईल ते कोणालाच माहिती नसत पण जर आयुष्य जगायचं ठरवलं तर कोणत्याही परिस्थिती मध्ये आपण आनंदी राहू हे अगदी नक्की. आयुष्य जगण्यातली मजा, आयुष्याच गाण गाण्याची मजा न विसरता घेण अत्यंत गरजेच असत. पाण्याच्या प्रवाहासारख आयुष्य चालत राहत आणि त्या आयुष्यात जगण्यासारखी दुसरी आनंददायी गोष्ट नक्कीच नसेल. परिस्थितीला सामोर जाऊन त्याचा सामना केल्यानी आयुष्य अधिकाधिक फुलेल हे नक्की. जीवन गाणे नेहमीच गातच राहावे... आणि तस केल्यानी आयुष्य जगण्यातली मजा कित्येक पटींनी वाढलेली दिसून तर येईलच पण आत्मशांती, समाधान सुद्धा जाणवेल हे नक्की...

अनुजा कुलकर्णी.