Pahilyandich books and stories free download online pdf in Marathi

पहिल्यांदीच...

पहिल्यांदीच...

'टिंग टॉंग..टिंग टॉंग...' घराची बेल बराच वेळ वाजत होती. पण दार उघडत नव्हत. आलोक निशाला भेटण्यासाठी आतुर झाला होता पण दार मात्र उघडत नव्हत. आलोकने पटकन मोबाईल काढला आणि निशाला फोन लावला पण निशा फोनला सुद्धा उत्तर देत नव्हती. आता मात्र आलोक घाबरला. त्याला काय कराव सुचत नव्हत पण काही अघटीत घडल नसेल अश्या विचारांनी तो मटकन खालीच बसला. तितकात त्याला कोणीतरी दाराशी आलंय अशी जाणीव झाली. तो लगबगीने उठून उभा राहिला.

दार उघडल्याचा आवाज आला आणि त्याच्या जिवंत जीव आला. निशाने दार उघडल आणि डोळे चोळत बोलायला लागली,

"कोण आहे?" डोळे चोळत निशा बोलली..

"अग मी ग.. आलोक!! कुठे होतीस?" निशाला आत ढकलून आलोक बोलला.

"ठीके.. तू आहेस आलोक! पण ढकलतोस काय? हे काय वागण आहे? मला ना खूप झोप येत होती सो मी झोपले होते रे.. अजूनही झोपेतच आहे."

"मी चिडलो होतो म्हणून आत ढकललं. इतक काय? इतका इश्यू नको करूस! आणि कशी झोपतेस कधीही..?" वैतागून आलोक बोलत होता, "मला इतक महत्वाच सांगायचं होत..आणि तू सगळी मजा घालवण्यात हुशार आहेस.."

"तू का चिडतो आहेस? मी चिडल पाहिजे... तू माझी झोप घालवलीस! आणि उगाच माझ्यावर चिडू नकोस रे आलोक.. झोप येऊ शकत नाही माणसाला?"

"झोप की खुशाल झोप..पण आत्ता का झोपलीस?"

"झोप आली सो झोपले.. तुझ काय जातंय रे आलोक? झोपून पण देऊ नकोस!! आज रविवार..निवांत वेळ आहे आणि काल खूप उशिरा झोप लागली सो झोपले पण आपण आलात झोप घालवायला.. आणि मला ढकललं का घरात ते सांग? यु नो...मला अस वागण अजिबात आवडत नाही.."

"हो का..." उपहासानी आलोक बोलला, "काल रात्री तुला झोप न यायला काय झाल आणि? उगाच आळशीपणा... मी कित्येक दिवस झोपत नाहीये ते सांगितलं तर तुला ऐकायला वेळ नाही आणि स्वतः ताणून झोपून गेलीस! दार उघडायला इतका वेळ लावलास...मी घाबरलो, काय झालय कळायला काही मार्ग नव्हता...किती वेळा फोन लावला, किती वेळा बेल दाबली, किती वेळा दार आपटलं सुद्धा! पण आपण कुंभकर्णाची झोप घेत होतीस..."

"ठीके रे... दमले आणि झोपले.. तुझ काय जातंय? माझ्या घरी झोपले होते. तू मला जाब विचारणारा कोण रे आलोक?" निशा चिडून बोलली. निशाच बोलण ऐकून आलोकला जाणवलं, तो जरा जास्तीच चिडून बोलतो आहे.

"सॉरी निशा.. मला तुला कधी भेटेन अस झाल होत आणि तू दार उघडत नव्हतीस. मग माझी चिडचिड झाली. माझी मनस्थिती तू कधी समजून घेताच नाहीस आणि स्वतःच्या धुंदीत आयुष्य जगत असते." थोडा उखडून आलोक बोलला.

"काय होतंय तुला आलोक? ह्या आधी तू अस असा वागला नव्हतास. आणि मी माझ्याच धुंदीत असते रे.. म्हणजे कॉलेज पासून एकटी राहतीये. आई बाबांना फार काही पडलेलं नाही मी कशी राहते, काय करते.. त्यांना वाटत त्यांनी पैसे दिले की त्यांच काम झाल. पण माझ्या मनाचा विचार त्यांनी कधीच केला नाही. त्यामुळे असेल कदाचित, मी पण फार कोणाची पर्वा नाही करत म्हणजे मी माझ आयुष्य मला हव तस जगते. आपण मित्र आहोत बरीच वर्ष पण मित्र आहोत.. तू मला काहीही बोलू शकतोस पण उगाच चिडचिड नाही करायची.. मला नाही आवडत माझ्याशी कोणी मोठ्या आवाजात बोललं तर."

"तेच तर सांगायचं आहे ना.. मी बदललो आहे. मला काय होतंय हे मला आज नव्यानेच कळल.. आणि ते सांगायला तुझ्याशी बोलायला आलो तर आपण दार उघडायला तयार नव्हता. मग चिडलो ग मी.. आणि आय नो, तू तुझ्या मर्जीनी आयुष्य जगतेस.. तो मुद्दाच नाहीये... तू दार उघडल नाहीस हा मुद्दा आहे."

"हो? मी दार उघडल नाही हा मुद्दा आहे. ओह.. तुला काहीतरी नव्याने कळल? सांग आता..काय कळल? काय होतंय? बर वाटत आहे ना?"

"बरा आहे ग.. काहीतरी वेगळ फिलिंग आहे. आणि काय निशा.. भांडलीस आणि बसायला सुद्धा नाही सांगितलं. पाणी पण नाही विचारलस.."

"ओह.. आता मी सॉरी! तू घरात शिरल्या शिरल्या कटकट करायला लागलास... मग मी पण भांडायच्या मूड मध्ये गेले.. बस मी पाणी आणते! की चहा आणू? दमला असशील न भांडून..हाहा.. चहा पी..मग सांग ह काय होतंय नवीन! काहीही काढत असतोस आलोक..." टोमणा मारत निशा बोलली,

"शट अप निशा!!! किती बडबड करतेस? तूच घे ह चहा...मला इथे किती महत्वाच बोलायचं आहे. आणि तू भांडण काय, पाणी काय, चहा काय... इतरच बोलती आहेस."

"हाहा.." निशा जोरजोरात हसायला लागली.."मला चहा हवाय रे.. आधी झोप मोड केलीस. इतकी झोप येतीये. चहा न पिता तू काय सांगशील ते कळणार सुद्धा नाही...तुला हवाय का चहा सांग पटकन.. नंतर दे म्हणलास तर देणार नाही..आधीच सांगते.."

"कर कर ब्लेम मला.. आज खरच खूप अर्जंट सांगायचं आहे सो.. आणि ठीके, मला पण कर चहा! प्लीज आलं जास्ती.."

"हो हो आलोक.. आय नो, तुला कसा चहा आवडतो.. एकदम कडक..करते आणि मग संग इतक्या अर्जंटली काय सांगायचं आहे."

निशा चहा करायला गेली आणि आलोक विचार करत बसला.. जरा वेळात निशा चहा घेऊन आली आणि आलोक समोर बसली...

"तुला बिस्कीट हवी आहेत?" निशा बोलली,

"नको.. फक्त चहा बास!! आता मी सांगू का अर्जेंट भेटायचं होत तुला?"

"हो...सांग आता. चहा पिल्यावर जरा तरतरी आली. आता तू काय सांगशील ते कळेल.." निशा बोलली..

"ओके.. बाय द वे, चहा मस्त झालाय!! मला पण तरतरी आली.. सगळी मरगळ दूर झाली. बर, आता ऐक, मी प्रेमात पडलोय!!"

"अरे वा... आलोक प्रेमात पडलाय.." निशा सोफ्यावर मांडी घालून बसली आणि आलोक काय बोलतोय ते ऐकायला लागली. पण ती थोडी अस्वस्थ झाली होती.

"हो.. मला बरेच दिवस काहीतरी विचित्र होत होत...पण काय होतंय ते कळत नव्हत. आता कळल मला काय झाल आहे. आज मी ओरडून सांगू शकतो, हो हो..मी प्रेमात पडलोय निशा!!" आलोक ओरडून बोलला आणि त्याच्या बोलण्यात उत्साह होता.

"अभिनंदन आलोक... आणि किती खुश झाल आहेस.. मी पण तुझ्यासाठी खूप खुश आहे.." हे बोलतांना निशा फार खुश न्हवती पण तिने न विसरता आलोक ला विश मात्र केल.

"प्रेमात पडल की सगळच सुंदार दिसायला लागत ग..पण तरी नाही माहिती मी का चिडलो तुझ्यावर! इतक महत्वाच तुझ्याशी बोलायच होत.. आणि तू समोर नव्हतीस सो मला थोडा राग आला होता. खरच सॉरी निशा!"

"ठीके रे.. मला समजू शकत. तुला इतक महत्वाच बोलायचं होत आणि मी झोपले होते. पण मला काय कळणार तुला काहीतरी महत्वाच सांगायचं आहे म्हणून तू येणार आहेस घरी?"

"ठरवून होत का निशा.. मला आज जाणवलं मी खरच प्रेमात पडलो आहे आणि कधी एकदा तुला सांगतो अस झाल होत मला..."

"हो ते सुद्धा बरोबर.. बर, आता सांग, कोण आहे ती मुलगी? मी तिला ओळखते?" थोडा खोलात शिरत निशा बोलली

आलोक विचारात पडला... त्यानी चेहरा वेडा वाकडा केला..आणि तो बोलायला लागला,

"ओह.. तुला नाव हव आहे त्या मुलीच? इतकी उत्कंठा?" आलोक बोलला आणि हसायला लागला.. निशाने त्याच बोलण ऐकल आणि त्याला एक चापट मारली,

"अशी पद्धत असते रे विचारायची... आणि नको सांगूस ह त्या मुलीचं नाव.. मला काय फरक पडणार ती कोणी असली तरी? पण सांग की.. कोण आहे मुलगी? मी तिला ओळखते?"

"हो? तुला काही इंटरेस्ट नसेल तर मग का चिडते आहेस निशा? आणि तू तिला ओळखतेस का..? अ..अ.. चांगला प्रश्न आहे."

"मी? मी कुठे चिडले? आणि चांगला प्रश्न आहे मग सांग की कोण आहे?"

"आय थिंक यु नो हर! आणि बघ बघ... तुझा चेहरा लाल झाला आहे. बाय द वे, तुला आवडल नाही का मी कोणाच्या प्रेमात पडलोय?"

"काहीही आलोक... तुझ आयुष्य.. पड कोणाच्याही प्रेमात! मला काय? माझ काय जातंय?" थोडी उखडून निशा बोलली

"मग नीट सांग की ते.. आणि तू चिडली आहेस."

"नाही नाही नाही... मी चिडली नाहीये..."

"हो हो हो.. तू चिडली आहेस! बघ बघ तुझ नाक.. लालेलाल झालय.."

"बर.. मी चिडली आहे.. आता सांगशील कोण मुलगी आहे?" निशाने आलोक ला दारडावून विचारलं..

"आधी नाक बघ.. आरसा कुठे आहे?"

""तुला आरसा कुठे आहे ते माहिती नाही? तू आज पहिल्यांदीच घरी आला आहेस?" उपहासाने निशा बोलली..

"हाहा... निशा च्या रागाचा पारा वाढतो आहे.. वाढतो आहे आणि वाढतो आहे!"

"होय... मी आता तुला मारेन आलोक... मी तुला कधी मारत नाही पण आत्ता मारू शकते! आणि आरसा ना? बघ की समोर! समोरच आहे आरसा..की इतका आकंठ प्रेमात आहेस की समोरच्या वस्तू पण दिसत नाहीत?" थोड चिडून निशा बोलली

"हो की... विसरलोच.. बर चल तुला तुझ लाल नाक दाखवतो आणि जिच्या प्रेमात पडलो आहे तिच नाव पण सांगतो.." आलोक बोलला आणि दोघ आरश्यासमोर गेले..

"धन्यवाद ह...आणि दाखव.. कुठे लाल झालाय माझ नाक? मला तर दिसत नाही.."

"काय? तुल तुझ लाल नाक दिसत नाही? मग ती मुलगी तरी कशी दिसणार ग?"

"काय?" निशा ओरडून बोलली, "इथे ती मुलगी कशी दिसेल... काहीही त्रास नको देऊस रे आलोक!! ठीके..मला राग आला आहे. पण तू जास्ती चिडवू नकोस रे.."

"निशा.. तुला राग का आलाय? मी सॉरी म्हणालो की झोप घालवली म्हणून? आणि तू म्हणजे ना... मंद आहेस!! एक नंबरची मंद.."

"तू मला मंद म्हणालास? कशी झाली तुझी हिम्मत माझ्याच घरात मला मंद म्हणण्याची?" डोळे बारीक करून, आवाज चढवून निशा बोलली

"हाहा.. आहेस तू मंद! आरश्यात कोण दिसतंय?"

"मी आणि माझ्या मागे तू...अजून ती मुलगी इथे कशी दिसेल?"

"ह्यालाच म्हणतात मंदपणा निशा... किती हिंट दिल्या... तरी तुला काही कळत नाही?"

निशा ऐकत होती आणि शेवटी निशाची ट्यूब पेटली.. आणि निशा उडलीच,

"यु मीन, ती मुलगी मी आहे? तू माझ्या प्रेमात पडला आहेस? ओह माय गॉड.. " निशा ची कळी खुलली...

"नशीब... आता तरी अक्कल आली.. किती उशिरा कळल तुला? मंद... तू खरच मंद आहेस निशा!"

"शट अप रे आलोक... बाय द वे, खर का? तू माझ्या प्रेमात आहेस? यु मीन आता मला नो चॉइस?" निशा हसत बोलली.. तिचे डोळे लकाकत होते. निशा खुश झाली होती. तिच्या मनातली गोष्ट आलोकने बोलली होती.

"काय? तुला मी आवडत नाही? सांग की तस तोंडावर.. आणि यु वॉन्ट अ चॉइस? स्पष्ट बोल बाई..."

"मी तसं काही म्हणाले नाहीये... चिडायचं काम नाय!! आणि मला स्वप्न थोडी पडणार होत.. तू माझ्या प्रेमात पडणार आहेस? आणि ते सांगायला आला आहेस? मग मला पण धक्का बसलाच ना?"

"सो आता फायनल विचारतो... मला तू आवडतेस.. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.. तुला माझ्या बरोबर जन्मभरासाठी राहायला आवडेल?"

निशाने आलोक च बोलण ऐकल आणि काहीही विचार न करता बोलली,

"हो मंद.. तुला काय वाटल मी नाही म्हणेन? इतका चांगला मित्र माझा आयुष्यभराचा जोडीदार होणार असेल तर मी नाही म्हणायाल इतकी वेडी थोडी आहे? तू मंद... सरळ सांगता येत नाही का...आढेवेढे आढेवेढे घेऊन बोललास... आय लव यु टू आलोक!! ए, पण मी आहे तशीच राहणार.. मला बदलायला सांगायचं नाही...चालेल ना?"

"आय लव यु निशा!! तुला बदलायला कोण सांगतय निशा? तू आहेस तशीच मला आवडतेस..." निशाच्या खांद्यावर हात ठेवत आलोक बोलला, "ए, कसल भारी फिलिंग आहे..पहिल्यांदीच मी प्रेमात पडलो.. पहिल्यांदीच मला होकार मिळला..सगळी किती मस्त वाटतंय आता..चिडू नकोस पण आता पहिल्यांदीच कॅन आय किस यु?" आलोक बोलला..आणि हसला.. निशा त्याच बोलण ऐकत होती आणि जोरात ओरडली,

"गुड!! पण किस? हो का आलोक?" डोळे मोठे करून निशा बोलली, "आता पहिल्यांदीच तुला माझा मार खायचा आहे?" निशा इतक बोलली आणि दोघे जोरजोरात हसायला लागले... आणि मैत्रीच नात प्रेमात बदलायला लागल आणि सगळा आसमंत प्रेमाने भरून गेला..

--- अनुजा कुलकर्णी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED