1.30 A.M # In hevhan # vheri heppy - 2 books and stories free download online pdf in Marathi

१.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी! - २

१.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी! - २

"१.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी का? ओह ते! काही नाही ग.. असच लिहिलंय! लोकांना वाटल पाहिजे ना काय केल असेल..मी! "

"ओह.. असच? टिंग्या तरी टाकू नका... खर तर तू काय खर बोलतोस आणि काय मजा करत असतोस ते कळतच नाही मला..सांग ना काय आहे ते? उगाच सस्पेन्स नको वाढवूस! "

"हाहाहा.. मी स्टेटस काय लिहिलंय ते जाणून घ्यायची तुला खूप उत्सुकता वाटती आहे का काय? आपल लग्न ठरलं आहे. वी नो इच ऑदर तरी इतकी शंका?"

"हसू नकोस.. सांग पटकन! आणि लग्न ठरलय म्हणूनच आहे उत्सुकता! ह्या आधी तुझा असा स्टेटस मी तरी कधी न्हवता पहिला..आता मात्र तू काय करतोस, कुठे जातोस ते मला माहिती पाहिजे!" रिया ला काहीतरी क्लिक झाल आणि ती बोलली, "एक मिनिटं, लेट मी गेस, तू दारू प्यायला हेव्हन पब मध्ये गेला होतास आणि यु वर व्हेरी हॅपी असा काही अर्थ आहे का तुझ्या स्टेटसचा..? हेवन पब जे आपण पाहिलं होत एकदा जेव्हा फिरायला गेले होतो? मला आठवतय." विचार करतीये असा इमोजी रिया बोलायची थांबली

"ओह माय गॉड.. तुला कळल म्हणजे! तुला हि गोष्ट कळावी अस मला अजिबात वाटत न्हवत! आणि तुला 'त' वरून ताकभात कळतो? आय डीड नॉट नो रिया!" रोहित म्हणला.. आता मात्र त्यानी इमोजी वापरण बंद केल आणि तो शांत झाला.

"तू दारू पितोस?" पटकन रीयाने डोळे विस्फारलेला इमोजीजी पाठवला.. "आधी कधी नाही बोललास..हि गोष्ट लपवून का ठेवली?."

"मी दारू पितो हे लपवल वैगरे नाही ग रिया! पण कधी सांगायची वेळच आली नाही. आणि हल्ली सगळेच पितात की.. ऑफिस च्या पार्टीज.. गेट टू गेदर.. दारू पिण म्हणजे फार भयंकर काही नाहीये! भयंकर काहीतरी चूक केल्यासारखी रिअॅक्ट होऊ नकोस! आणि मला ऑकवर्ड फिल करू देऊ नकोस! आणि गिल्ट तर अजिबात देऊ नकोस! प्लीज!"

"ए.. डोंट गेट मी रॉन्ग रोहित! मी फक्त म्हणाले मला सांगायचस की.. मी पण आले असते!"

रोहितनी रियाच बोलण ऐकल आणि तो मनातून हादरलाच! त्याला वाटल होत रिया झापेल कारण तिला दारू पिणाऱ्या लोकांबद्दल तिला भयंकर राग होता.

"तू येणार माझ्याबरोबर दारू प्यायला? आर यु शुअर? आर यु सिरिअस?"

"म्हणजे काय.. मला टेस्ट करून पहायची आहे दारू! मरायच्या आधी सगळ करून मराव माणसानी.. उगाच मरतांना अस वाटायला नको हे करायचं राहून गेल... मनात किंतु राहिला, हे करायचं राहून गेल, ते राहून गेल तर मग पटकन येत नाही मरण.. अस मी ऐकलय! कशाला उगाच मनात किंतु ठेऊन जगायचं ना.. सो तेही करून बघू.."

"पण आर यु सिरिअस?" रोहित नी परत तोच प्रश्न रियाला केला.. आता तर तो इमोजी वापरायला सुद्धा विसरून गेला.. त्याला रिया कडून अस काही ऐकण्याची अपेक्षाच न्हवती.

"हो रे रोहित! आय अॅम सिरिअस! इतका डाऊट येतोय तुला? दारू पिण नॉर्मल आहे ना.. मग तरी असा रिअॅक्ट का करतोयस? मी पण पिऊ शकते की दारू! तुला काय माहिती? मी सुद्धा ऑफिस पार्टीज मध्ये जातेच की..सगळ थोडी सांगेन तुला? पण अर्थात मी अजून दारू टेस्ट नाही केलीये..म्हणून म्हणल आपण दोघ जाऊ बरोबर! वॉट से.."

"जाऊ जाऊ एकदा जाऊ एकत्र! आणि काही नाही.. असच ग! आय थिंक आपण एकमेकांना म्हणावे तसे ओळखत नाही अजून! आपण जाऊया एक दिवस दारू प्यायला एकत्र! तुला हे पण ट्राय करायचं हे मला माहित न्हवत. अजून काय काय गोष्टी आहेत ज्या मला माहिती नाहीयेत ते शोधलं पाहिजेच! तुला नीट समजून घ्यायच आहे.." आता मात्र रोहित एकदम सिरिअस झाला होता.

"हो.. आपण एकमेकांना नीट ओळखत नाही पण हळू हळू एकमेकांना समजून घेण्यातच मजा आहे ना.. सगळ एकदम कळल तर आयुष्य बोअर होणार नाही का? फुलाच्या पाकळ्या फुलाव्या तस आपल नात फुलल पाहिजे.. वॉट से?"

"बरोबर आहे.. पण आज तू वेगळीच वागलीस! मला वाटल होत मी दारू पितो हे ऐकल्यावर तू माझ्यावर चिडशील! मला तर इतक पण वाटल होत, तू मला मोठ लेक्चर देशील आणि मनसोक्त झापशील.. म्हणजे वॉज वेटिंग फॉर दॅट...आणि तू मला झापल किंवा माझ्यावर चिडलीस की तुझा कंटाळा जाईल! पण तस काहीच झाल नाही! सो जरा विचित्र वाटतंय... कशी मज्जा आहे ना... तू झापल नाहीस तरी विचित्र वाटत.. तुझ झापण सुद्धा गोड असत ना... सगळ हव हवस वाटत असत! तूच हवी आहेस मला.. म्हणजे तुझा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो! पण तुझी नाटकं.. वॉट्स अॅप वर जास्ती नाही.. हे नाही ते नाही! आय मिस यु सो मच! कर बाई आता लवकर लग्न..पण यु शूल्ड नो, आय ड्रिंक!"

"हाहाहा! लग्न करू की.. पण कर कर अजून थोड मिस कर.. मग प्रेम अजून वाढेल! आणि काहीही तुझ रोहित! झापण गोड असत? हाहा.. आणि तू निमूट माझ बोलण ऐकून घेतोस! नाईस जोक बर का! तू स्वतःला सज्जन समजू नकोस! निम्म्यावेळा भांडायला लागतोस झापल की.. आणि दोन्ही कडून बोलतोस! काय रोहित तुझ वागण? मी झापल असत तर तिथूनही बोलला असतास...आणि तसही.. का झापू? मला सुद्धा दारू टेस्ट करायची आहेच!"

"बर.. जाऊ कधीतरी!"

"येस.. ठरवून जाऊ! ए,मला सांग, दारू पिली की उलटी वैगरे होत नाही ना?"

"काय? तू इतका विचार करून दारू पिणारेस का?" रोहित हसायला लागला.."मग तू दारू पिऊ नये असा माझा सल्ला आहे! काही विचार न करता दारू प्यायची.. काय होईल, काय होणार नाही ह्याचा विचार का हवा?"

रोहितच बोलण ऐकून रिया एकदम शांत झाली. जरावेळ ती काहीच बोलली नाही...

"काय झाल? बोल की.." रोहित म्हणाला..

"बरोबर आहे तुझ! इतका विचार करून दारू पिण्यात काय अर्थ आहे? करेक्ट! फॉर अ चेंज आय अक्सेप्ट माय फॉल्ट.. जे करायचं आहे ते मोकळ्या मनानी करायचं. काय होईल असा विचार करून काही केल तर त्याची काय मजा?" रियानी चूक मान्य केली...

"गुड गुड! तुला कळल म्हणजे तू पण चुकू शकतेस! हाहा! पण रिया.. तुझे आई बाबा काय म्हणतील त्यांना कळल की आपण दोघ दारू प्यायला जाणार आहोत हे कळल्यावर?"

"चिल रोहित! एक नंबर घाबरट आहेस! मी फ्री आहे! म्हणजे मला कोणत्याही प्रकारची बंधन नाहीयेत आई बाबांकडून! ते फक्त म्हणतात काय करशील ते सांगून कर.. कोणी मला काही बंधन घालत नाही! तू नको करूस काळजी! फक्त मला नीट घरी आणून सोडायची जबाबदारी घ्यायची! आणि तू बरोबर असलास की मला कसली चिंता?"

"वा... हे लई झाक!!! यु अॅन्ड मी इन पब! मज्जा येईल! काय पिणार तू? हाहा! आणि डोंट वरी! तुला घरी नीट आणून सोडेन! तुझ्याबरोबर मी दारू पिणारच नाही... उगाच मला जास्ती चढली तर कसा वागेन माहित नाही!"

"कसाही वागेन?" रिया म्हणाली आणि तिनी डोळे विस्फारलेला इमोजी पाठवली..

"हाहा! जस्ट सांगितलं! यु शुड नो! बट यु डोंट वरी! फक्त काहीही बडबड करेन! पण नो वरीज.. तसही मी कंट्रोल सोडून पीत नाही.."

"बिनधास रे.. मला पण कळेल काय आहे तुझ्या मनात! बाय द वे, तू सारखा पितोस का?"

"काय रिया! मी सगळ तर सांगतो तुला मनातल... अजून काय ऐकायचं मनातल?"

"बरच काय काय असत ना मनात.. आणि आय डोंट थिंक तू माझ्याशी सगळ शेअर करतोस! दारू पितोस हे कुठे सांगितलं आधी?"

"मी दारू पितो हे ऐकून तू लग्न न करण्याचा निर्णय घेतला असतास तर? अशी भीती होती सो नाही सांगितलं.. लग्नानंतर कळल असत तर तू मला सोडून नक्की गेली नसतीस! तू मला बदलायचा प्रयत्न केला असतास..पण तुला कळलच आणि हे कळूनही तू चिडली नाहीस!"

"डोंट वरी! आय लव यु! आणि नाही सोडणार तुला कधीच! मला पण हवच न कोणी हक्कच त्रास द्यायला! आणि तू किती चांगला आहेस! पण सांग, किती वेळा पितोस दारू? कधीतरीच ना?"

"तू खूप गोड आहेस रिया! थॅन्कू.. यु आर इन माय लाईफ! आणि आता काय लपवायचं? सो काही लपवणार नाही! आता उगाच खोट नाही बोलत! आधी महिन्यातून एखाद्यावेळी पिली जायची दारू! पण आता सवय लागलीय... आता ऑलमोस्ट रोज!! संडे ला तर दिवसाच!"

"काय...?? दिवसा सुद्धा पितोस! ओह... प्लीज प्लीज एक करशील का माझ्यासाठी?"

"तू चिडली नाहीस रोज पितो हे सांगितल्यावर सुद्धा? आज तू स्ट्रेंज वागती आहेस! इतके धक्के सहन होत नाहीत बाई! तू नेहमीसारख वाग.. तेच बर! तुझी थंड प्रतिक्रिया पाहून मी टेन्शन मध्ये आलोय! आणि सांग काय करू तुझ्यासाठी?"

"हाहा! प्रत्येकवेळी तुला वाटेल तशीच मी वागेन हे समजू नकोस!"

"ओके.. ओके... ह्यापुढे लक्षात ठेवीन! तू काय म्हणत होतीस सांग... काय करू तुझ्यासाठी?"

"ग्रेट! बट डोंट से नो.. मला तुझ्या डोळ्यांचा फोटो पाठव.."

"कश्याला?" रोहित रियाची मागणी ऐकून हादरलाच!

"मला पहायचं.. डोळे कसे दिसतात दारू पिल्यावर? बाबा दारू पित नाहीत आणि त्यामुळे काही अंदाज नाहीये! मुवीज मध्ये पाहलय पण ते खर का हे सुद्धा नाही माहित! दारू पिणाऱ्या लोकांचे डोळे कधी पाहिलेच नाहीयेत!"

"तू वेडी आहेस का रिया? असे फोटो कसे पाठवू? चुकून काका काकूंना कळल तर गोंधळ व्हायचा!"

"ना.. मी फोटो डीलीट करेन... डोंट वरी!"

"ओह माय गॉड.. आत्ता आठवलं! मी विसरलोच ग सांगायला! माझ्या मोबाईल चा फ्रंट कॅमेरा बंद पडला आहे.. आता नवीन फोन घेतला की पाठवतो ह!" रोहित सारवासारव करत बोलला.

"हो?? कधी रे फ्रंट कॅमेरा बंद पडला? नवीन मोबाईल घेणारेस? आधी काही बोलला नाहीस.."

"आत्ताच पाहिलं फोटो काढायला लागलो डोळ्यांचा तेव्हा आठवलं... बर झाल तू म्हणलीस फोटो पाठव.. नाहीतर विसरलोच असतो!"

"किती टिंग्या टाकणार रे?"

"अग खर.. नाहीतर तुला तर नाही का म्हणेन मी?"

"हाहाहाहा..."

"आता का हसतीयेस?" रोहित म्हणाला

- अनुजा कुलकर्णी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED