home sweet home - marathi film review books and stories free download online pdf in Marathi

होम स्वीट होम..मराठी फिल्म समिक्षा

होम स्वीट होम..

घर म्हणजे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय!! प्रत्येकालाच स्वतःच्या घराबद्दल खूप ओढ असते. घर म्हटले की किती बोलू आणि नको असं होतं. प्रत्येकाच घराशी आपल असं वेगळाच नातं असत. घराशी अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. घर म्हणजे फक्त दारे भिंती नव्हेत अस बोलायला आवडत आणि असे दारं भिंतीत राहणाऱ्यांना ऐकणे खूप आवडते. घराबद्दल अनेक आठवणी जोडल्याने भिंतीचे घर होताना पाहिलेला त्याबद्दल भाऊक होतोच. आपल घर सोडून जाणे ही घर सोडण्याची घटना महाकाव्य असू शकते, महाकादंबरी होऊ शकते आणि उत्कृष्ट चित्रपटही बनू शकतो. आणि त्याच आशयाचा हा चित्रपट आहे. 'होम स्वीट होम' ह्या चित्रपटात दिग्गज कलाकार आपल्या भेटीला येतात. उत्तम अभिनय कौशल्य असलेल्या कलाकारांचा अभिनय ह्या चित्रपटाची जमेची बाजू! घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं, याच घराविषयी आणि घरातील नात्यांविषयी भाष्य ह्या चित्रपटात केलेलं दिसत.

नात्यात संवादाचे प्रेशर जपणे असेल, खाण्यासंबंधीचे पथ्य असेल, अथवा दाम्पत्यातील खट्याळपणा असेल, अशा सर्वच बाबी टीझर मध्ये कवितेच्या रूपाने सादर केल्या आहेत. ३५ वर्षे एकाच घरात वास्तव्य केलेल्या दाम्पत्याच्या मनात घराविषयी असणारे स्थान टीझरमध्ये उल्लेखिले आहे. टीझरच्या शेवटी प्रसाद ओक, विभावरी देशपांडे आणि हृषीकेश जोशी दारातून डोकावताना दिसतात. या अत्यंत हृदयस्पर्शी टीजर मधून ‘होम स्वीट होम’ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण होतेच आणि हा चित्रपट एकदा तरी पाहावा अस वाटून जातंच!!

दर्जेदार अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत लौकिक प्राप्त करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. मराठी–हिंदी नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाचा अमिट ठसा उमटविला. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यां निधन झाले. आणि प्रेक्षकांना हुरहूर लाऊन गेल्या. पण त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. रिमा यांना त्यांच्या आईकडून अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांनी 50 पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांनी प्रथम मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटामधून काम करण्यास सुरुवात केली. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना त्यांच्या अभिनय क्षमतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू झाला. त्यांचे खरे नाव नयन भडभडे होते तर त्यांची आई मंदाकिनी भडभडे या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. हिंदी चित्रपटात यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका सर्वात जास्त केल्या आहेत. पण त्यांच्या सर्वच भूमिका जबरदस्त गाजल्या. आता रिमा लागू पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत ‘ या चित्रपटातून. हा चित्रपट जेष्ठ अभिनेत्री रीमा लागू ह्यांचा शेवटचा चित्रपट!! या चित्रपटाचे दिग्दर्शन लेखक, अभिनेते हृषिकेश जोशी यांनी केले आहे.

व्हॉट्सअपवर कितीही जीवन पालटणारे फॉरवर्ड आले तरी आपल्यावर त्याचा जसा तसूभरही फरक पडत नाही, त्याप्रमाणे या 'स्वीट होम'मध्ये कितीही मोठे पाहुणे कलाकार एकानंतर एक येत राहिले तरी कथेवर त्याचा परिणाम होत नाही आणि तो चित्रपट पुढे सरकत नाही. नित्याच्या सिरियलच्या एपिसोडसारखा तो एका ठिकाणी ठिय्या मांडून राहतो आणि चित्रपट पुढे हलत नाही अस वाटून जात!! ह्या चित्रपटाला जर नीटस कथानक असते तर घर बदलण्याबद्दलचा हा चित्रपटही नक्कीच चांगला झाला असता.

चित्रपटाची कथा-

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत, कुटुंबसंस्था उदयास आल्यापासून घर ही संकल्पना रूढ झाली. घर हे फक्त चार भिंतीमुळे उभे राहत नाही, त्यासाठी लागतो कुटुंबाचा जिव्हाळा. प्रदेश,संस्कृती बदलली की घराची रचना बदलते भावना मात्र कायम असतात. घर हे काहीही न बोलता देखील घरातील सदस्यांबद्दल नकळतपणे खूप काही सांगून जाते. कुटुंब आणि घर यांच्यातील अनोखे नाते नव्या दृष्टीकोनातून सांगणारा ‘होम स्वीट होम’ हा मराठी चित्रपट!

विद्याधर महाजन (मोहन जोशी) आणि श्यामल (रीमा लागू) या साठी पार केलेल्या मुलंबाळं नसलेल्या जोडप्यांची ही कहाणी आहे. महाजन कुटुंबीय दारारच्या घरात जवळपास ३५ वर्ष राहतात. सहज म्हणून कळता कळता त्यांच्या राहत्या घराची किंमत साडेतीन कोटी असल्याचं त्यांना कळतं. त्यानंतर सौ. महाजनांच्या मनात नवे विचार येऊ लागतात. जुन्या इमारतीतील फ्लॅटमध्ये आयुष्यभर राहिलेल्या, गुडघेदुखीचा त्रास असलेल्या श्यामलला आता या लिफ्ट नसलेल्या या इमारतीतून टॉवरमध्ये राहायला जायचे आहे; तर आयुष्यात समाधानी असलेल्या विद्याधरला आठवणींनी भरलेल्या, सवयीच्या या जागेतच राहायचे आहे. त्यात आपल्या स्वत:च्या घराची स्वप्ने रंगवणारा दलाल सोपान (हृषीकेश जोशी) या तिघांत ही कथा… असा दोन मतांचा गोंधळ ह्या चित्रपटात पाहायला मिळती. ह्यात नव्या विचारांची ही गोष्ट आहे. याच्यामध्ये नाती येतात. त्यामुळे मतं-मतांतरं येतात. आणि घराबद्दलची आपआपली कन्सेप्ट उघड होऊ लागते. बदलेला काळ, घराकडे पाहण्याचा दृष्टीकोन ह्या चित्रपटात अधोरेखित केला गेला आहे. फ्लॅट संस्कृती आली तेव्हा चाळीच्या आठवणीने दु:खाचे कढ काढून डोळ्यांच्या कडा ओलावणारी पिढी लाकडाऐवजी विद्युतदाहिनीतून कधीच मोक्षास प्राप्त झाली. त्यानंतरची फ्लॅट नामक कडीकुलपातील आणि बंद दारातील जगण्याच्या काळात पोचलेल्या पिढी पाहायला मिळेल. थोडक्यात काय, घराविशायीची आपापली मतं ह्या चित्रपटात पाहायला मिळतात.

कायम उघड्या असणाऱ्या दारांमुळे होणाऱ्या मोकळ्या जीवन व्यवहारांच्या समाप्तीबद्दल पुलंनी बटाट्याच्या चाळीच्या निमित्ताने चिंतन करून कैक दशके लोटली तरी मराठी साहित्यकलाजीवनात तोच विषय अजूनही काढला जात आहे. हा त्याच पठडीतील एक चित्रपट. चाळीच्या जागी फ्लॅट आणि फ्लटॅच्या जागी टॉवरनामक नवीन स्वप्न. आशय तोच, त्यामुळे संवादही तेच. फार काही नवीन अनुभवायला मिळेल अस नाही पण उत्तम अभिनय, संवाद आणि आशय मात्र नक्की पाहायला मिळेल.

चित्रपटाची कथा पुढे सरकत राहावी लागते, त्यालाच कथानक, घाट म्हणतात. मात्र तसे घडत नसल्याने एरव्ही तिन्ही प्रमुख पात्रांचे रेखाटन नेटके होऊनही (आणि त्यांनी अभिनय उत्तम करूनही) हाती काहीच लागत नाही. बाकी अनेक पात्रे इंटेरिअर डेकोरेशनसारखी जोडली म्हणून कथा गुंतागुंतीची बनत नाही. कविता टाकल्या म्हणून तो कलात्मक होत नाही. प्रत्येकजण बडबडला म्हणजे संवाद होत नाहीत. भाबडा म्हणजे भाऊक नव्हे आणि एक घर मिळाले नाही म्हणून विकलेले मूळ घर पुन्हा खरेदी करत नाही.

निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रायव्हेट. लिमिटेड यांची असून प्रोअॅक्टिव्ह आणि स्वरूप रिक्रीएशन्स अँड मीडिया प्रस्तुतकर्ता आहेत. हृषिकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत असलेल्या या ‘होम स्वीट होम’ या चित्रपटात रिमा यांनी एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. रिमा यांच्यासह मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषिकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका ‘होम स्वीट होम’ मध्ये आहेत. मोहन जोशी ह्यांचा अभिनय नेहमीच सुंदर असतो!! रिम लागू आणि मोहन जोशींबरोबर इतर कलाकार सुद्धा चांगल काम करून जातात!! 'होम स्वीट होम’ ची कथा हृषिकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे. संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. नात्यांच्या रिडेव्हलपमेंटवर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ चित्रपट अभिनयासाठी अभिनयासाठी पाहावा आणि रीमा लागू यांची शेवटची कलाकृती पहायची असेल तर नक्की हा चित्रपट पहा.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED