Joshimath te auli books and stories free download online pdf in Marathi

जोशीमठ ते औली - माणसांच्या आतमीयतेची अनुभूती - एक धाडसी आणि हुरहुर लावणारी

पाडव्यानिमित्त आठवलेलं.... म्हणजे खरंतर न विसरलेलं...
ही घटना माझ्या विशेष लक्षात आहे कारण या घटनेच्या निमित्ताने मी प्रथमच आणि बहुधा शेवटचा माझ्या उण्यापुरा आयुष्यातला सर्वात रूबाबदार आणि देखणा पुरुष पाहिला.... सैन्यदलातला अधिकारी.... घडलेल्या घटनेने सर्वच चिंतातुर असताना हा मात्र शांत संयमित आणि किंचीतही विचलित न झालेला,... त्याच्या शांतपणाबरोबरच त्याचा करारीपणाही लक्षवेधी होता.... मी शेवटचं वळूनही त्याच्याकडे पाहून घेतलं होतं डोंगर चढायला सुरुवात करताना..
तर मूळ घटना अशीः आॅगस्ट महिन्यात आम्ही जोशीमठ,व्हॅली आॅफ फ्लाॅवर्स अशी गिरीभ्रमंती करायला सुदूर हिमालयात पोहोचलो. पुष्पदरीत लोळलो.हेमकुंडजीसाहेबला नतमस्तक झालो. जोशीमठला दर्शन घेऊन कृतार्थ झालो. एक अख्खा दिवस तिथलं सृष्टीसौदर्य आणि निवांतपणा अनुभवला आणि नियोजनाप्रमाणे  हरिद्वारकडे प्रवासाची सांगता करायला मार्गस्थ झालो.भल्या पहाटे बोचर्‍या थंडीत मी आणि आशुतोष हरिद्वारला यायला निघालो.चालत बसथांब्यापाशी आलो. बाहेर पडल्यावर कळलं की गाड्या भरभरून वाहत आहेत कारण आधीच्या land slide मुळे अडकलेले लोक आता दोन दिवस वाट पाहिल्यावर रस्ता मोकळा झाल्याने परतीला निघाले आहेत.
आजही गाडीअभावी रहावे लागणार बहुधा... विष्णु फारच प्रेमात पडलाय आपल्या.... 
एक तिथल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे छोटी बस आली.मी खिडकीतून घुसून जागा पकडली अक्षरशः.... तेव्हा जमत होतं म्हणा....
कंटाळलेल्या प्रवाशाँशी हुज्जत घालणारा कंडक्टर ड्रायव्हर आणि गर्दी... पण आज सूर्यास्ताला हरिद्वार दिसणार तर.. बसलो तसेच चूपचाप. आमच्या नियोजनात कायमच सगळीकडे एक दिवस मोकळा राखलेला होता दोन्ही हिमालय पदभ्रमणात.लहरी निसर्गावर रागावण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी... हातातला वेळ उनाडपणे कसाही घालवतो येतो कारण
तर.... आज पोहोचू पोहोचू करत निघालो आणि तासाभरातच एक नवा land slide वाटच पाहत होता.दोन दिवसांची निश्चिंती घेऊनच आला.दोन्हीकडे अडकलेल्या गाड्या, मधे हा उभा ठाकलेला, पलीकडे दरी... पडलो की गेलोच...
यात्रेकरूंना घेऊन आलेल्या नियोजित कंपन्यांच्या मालकांनी रस्त्यात बसूनच मोठ्या भांड्यात स्वयंपाक आरंभला... आमच्यासारखी  सुटी मंडळी खाली ऊतरून आशावादावर जगू लागली. दो दिन कुछ नही होग्!!! बैठे रहो या वापस चलके जाओ!!!!!
गाडीला गाडी चिकटून.वळणार कसे जाणार कसे!!!!
माझा धीर संपलाच. पतीराज नेहमीप्रमाणे शांत आणि थंड! रस्ता मोकळा झाला की जाऊ.....
मला काही झेपेना.... अग आपलं जे झालं आहे तेच सगळ्यांचं झालय.... 
दोन तास वाट पाहिली मी... जीपमधून रूबाबात उतरलेल्या त्या आर्मी आॅफिसरकडे लक्ष गेलं आणि माझा पुतळा झाला..... मी त्याच्याकडे एकटक आणि जोशी माझ्याकडे एकटक,,,,
टपरीवजा हाॅटेलातून शिल्लक दुधाचा चहा घेउन पोरगा फिरू लागला... मला तोही नकोसा झाला.
नंतर पाहिलं की हा भलालाला मोठाठा डोंगर नव्हे घरंगळलेला डोलारा ओलांडत स्थानिक मंडळी जात आहेत.... तेवढ्यात एक बुढे सरदारची डोक्यात वरून येणारा मलामोठा धोंडा डोक्यात पडता पडता वाचले..
हरिद्वारकडून आलेल्या गाड्या परत फिरायला वाव होता.त्या वळे लागलेल्या दिसल्या मधल्या जागेतून...
आम्हीही जायचं ठरवल.... पाय निसटला तर दरीत आणि सुखरूप पोचलो तर हरिद्वार....
पायातले ट्रेकशुज सॅकेत कोंबले... आशुतोषच्या पाठीवर आणि पुढे एएकेक सॅक आणि माझ्याकडे एक.. घट्ट हात धरले... क्षणभर एकमेकांकडे पाहिलं आणि चढायला सुरूवात केली तो भूस्खलनाचा मोठा पर्वत..... मी तर जीवाच्या आकांताने धावत चढत होते.... मला सुखरूप पलीकडे जायचं होतं..... माथ्यावर आलो आणि वेगाने उतरंड उतरलो. RCF च्या दोन जवानांनी मला वेगाने उतरताना पाहिलं आणि खाली पोचल्यावर धरून माझा वेग थांबवला.एकाने आशुतोषला हात दिला......
खाली दरी,,, पाय सटकवणारे भूस्चलन आणि जीवावर बेतलेले धाडस.... ओक्साबोक्षी रडायला लागले मी... सुखरूप हातीपायी धड पलीकडे आलो... बहनजी रोना नहीँ, ऐसे करनेमें बडी हिम्मत जुटाई है आपने.....
एकाने छोटुकल्या कपात चहा आणून पाजला.अजूनही लटपटतच होते मी....  हरिद्वारहून वर आलेली जीप परतत होती.त्यात कोंबून बसलो.... निघताना मला त्याला पहायचच होतं पण नाही दासू शकला तो.....
हरिद्वारच्या सायंआरतीत दिसला मला त्याचा करारी गंभीर पण संयमित चेहरा... गंगौघात...
आर्या

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED