Ayushya Badalnara Kavadasa - 2 books and stories free download online pdf in Marathi

आयुष्य बदलणारा कवडसा- २

आयुष्य बदलणारा कवडसा- २

निशाला वाटलं होत गौरांग वेगळा आहे पण तिला जाणवलं गौरांग इतरांसारखाच आहे. ह्या अनुभवानी निशा भारतात परतण्या बाबतीत खंबीर झाली. झालेला प्रकार निशासाठी सुखद नव्हता तरी निशा मनोमन हसली. निशाला अजिबात दुःख झाल नव्हत कारण तिच्यासाठी ही गोष्ट नवीन नव्हती. ह्या आधी सुद्धा अस झाल होत. तिला माहिती होत तिच्या पैश्यांसाठी आणि अमेरिकेत राहता येईल फक्त ह्याच कारणासाठी तिला २-३ मुलांनी लग्नासाठी विचारलं होत. कारण तिला ओळखत असलेल्या सगळ्यांना निशाला लग्न करायचं नाहीये हे माहिती होत. निशाला सुद्धा माहिती होत आता कोणी तिच्याशी लग्न केल तर ते फक्त फायद्यासाठीच. तिचा खर प्रेम असत ह्यावरून तर तिचा विश्वास कधीच उडला होता. निशाने बरेच पैसे खूप आधीच मिळवले होते आणि आता फक्त पैसे मिळवण्यात तिचा फार काही रस राहिला नव्हता. काही दिवसातच ती नोकरीचा राजीनामा देऊन भारतात राहायला जाणार होती तिच्या आईसोबत राहायला. कोणत्याच गोष्टीचा आता निशाला फरक पडत नव्हता. निशानी आता काही निर्णय घेतले होते. ठरवल्याप्रमाणे तिने नोकरीचा राजीनामा दिला आणि भारतात परतायचा निर्णय घेतला. तिने आईला फोन करून मी भारतात परत येतेय अस कळवलं आणि ती उरलेली कामं उरकायला लागली..

निशा भारतात परतायच्या आधी एकटीच विचार करत बसली होती. खूप कमी वयात तिने अमाप पैसे कमावला होता. अर्थात, त्यासाठी तिने खूप कष्ट देखील केले होते. तिच्या पायाशी सगळी सुख लोटांगण घालत होती तरी निशाला काहीतरी मिसिंग वाटत होत. त्यामुळे खूप पैसे असून सुद्धा निशा खुश न्हवती. कोणी जोडीदार मिळावा ही इच्छा तर तिने कधीच मागे सोडली होती कारण कोणासोबत राहण्यापेक्षा तिला आयुष्य एकटीनेच जगायचं होत. आता निशा तिच आयुष्य एकटीने जगणार होती आणि त्याबद्दल निशाच्या मनात अजिबात दुःख नव्हत. पण मनातून नेहमीच उदास रहायची निशा! पैसे सगळी सुखं देऊ शकत नाही ही गोष्ट तिला समजली होती. आता नवीन आयुष्य जगायला लागू अश्या विचारात ती होती पण ते नवीन आयुष्य काय पद्धतीनी जगावं हे मात्र तिला समजत नव्हत. तिच्या मनात गोंधळ चालू होता. त्या गोंधळापासून पळण्यासाठी शेवटी तिने डोळे मिटून घेतले. आणि जादू झाली. तिच्या मनातून सगळेच विचार दूर गेले. त्या विचारांची जागा आता लहानपणी पाहिलेल्या स्वप्नांनी घेतली होती. तिच अगदी पाहिलं स्वप्न होत ते रंगांशी खेळण्याच!! लहानपणी तिला चित्रकलेची खूप आवड होती आणि तो विचार आल्या आल्या तिने डोळे खाडकन उघडले. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारच तेज आलं होत. तिला आलेली सगळी मरगळ मागे पडली होती. आता तिला काय करायचं ते माहिती होत. खरंच..नोकरी मिळाली आणि त्यानंतर निशा नुसती धावत होती ते फक्त पैसे कमवायला. पैसे मिळाले पण आनंद मात्र कुठेतरी मागेच राहिला होता. सगळीच सुखं पैश्यांनी विकत घेता येत नाहीत ते निशा ला जाणवलं आणि ती स्वतःवरच हसली. तिच्या लक्षात आल, पैसे मिळवण्यासोबत तिने स्वतःसाठी वेळ द्यायला हवा होता. पण स्वतःसाठी थोडाही वेळ तिने दिला नव्हता. आता मात्र तिला तिची चूक उमगली होती. आता निशा जगणार होती ते पैसे मिळवण्यासाठी नाही तर अर्धवट राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी. विचार करता करता तिला जाणवत होत की तिनी फक्त पैसे मिळवण्याच्या नादात काय गमावलं होत. खूप काही करायचं राहून गेलंय ही गोष्ट निशाच्या लक्षात आली आणि आता ती तिची चूक सुधारणार होती. तिनी पटापट जाऊन तिचा मोबाईल काढला आणि काय करायचं राहून गेल त्याची निशा यादी करायला लागली. १. नवीन मित्र २. आईला वेळ ३. पेंटिंग ४. गिटार शिकणे ५. लेख आणि गोष्टी लिहिणे ६. भरपूर हिंडणे ७. गरजूंना मदत करणे-फक्त पैसे नाही तर वेळ सुद्धा ८. भरपूर कुकिंग करणे ८. निसर्गात रमणे ९. आनंद वाटणे इत्यादी इत्यादी... तिच्या यादीला जणू अंतच नव्हता. आपली यादी तयार करतांना निशा ला हसू आवरत न्हवत. आपण काय मिस केल ह्याची जाणीव तिला झाली. आणि तिने कपाळावर हात मारून घेतला. निशानी यादी पुन्हा वाचली. यादीत पहिली गोष्ट होती 'नवीन मित्र..' आणि निशाच्या चेहऱ्यावर गोड हसू आल. बऱ्याच दिवसांनी निशा मनमोकळी हसत होती. तिचे नवीन मित्र सगळ्यांसारखे नव्हते. तिचे नवीन मित्र कोण असतील तो प्लान आधीच ठरला होता आणि आता निशा ते भारतात जाऊन पूर्ण करणार होती. निशाच्या चेहऱ्यावर खूप गोड हसू आल आणि समाधानचं हसू होत ते! तिच्या डोळ्यासमोर तिची अर्धवट राहिलेली सगळी स्वप्न एक एक करून यायला लागली. निशा तिच्या बॉक्स मधून बाहेर पडून आयुष्य जगणार होती ते कोणाला दाखवायला नाही तर स्वतःसाठी!! आता निशानी ठरवलं होत, पैश्यापेक्षा जास्त महत्वाच आयुष्य मनाप्रमाणे जगणं हे आहे. आणि तिला जे जे करायचं होत आणि राहून गेल होत ते ते सगळ निशा करणार होती. स्वप्न पूर्ण करायची वेळ कधी जात नसते आणि आता निशा तेच करणार होती. पैसे हा आयुष्यातला महत्वाचा भाग होताच आणि हे निशा नाकारत नव्हती पण ते करण्यासाठी स्वप्नांची तडजोड आता तिला मान्य नव्हती. मागे केलेल्या चुका आता निशा सुधारणार होती. आणि ह्या निर्णयावर निशा ठाम होती. ती तडक उठली आणि मॉल मध्ये गेली. तिने रंग आणि खूप सारे ब्रश विकत घेतले. त्याचबरोबर ती कॅनवास घ्यायला विसरली नाही. निशाला पाणी आणि निसर्ग नेहमीच भुरळ घालयाचा पण आपल्या बिझी लाईफ मध्ये तिने कधी निसर्गाकडे पाहिलं पण नाही. भारतात परतण्यापूर्वी ती तिच्या आवडीच्या ठिकाणी गेली. समोर एक निळंशार पाणी असलेला तलाव होता आणि बाजूनी मस्त क्रिसमस ट्री त्या तलावाची शोभा वाढवत होते. निशा ते दृश्य पाहून खुश झाली. तिने सगळ दृश्य डोळ्यात साठवून घेतलं आणि डोळे मिटून घेतले. डोळे उघडले आणि कॅनवास वर पेंटिंग काढायला लागली. ब्रशचा प्रत्येक स्ट्रोक निशा च्या चेहऱ्यावर समाधान आणत होता. ३ तास तिच्या आणि निसर्गामध्ये कोणीच आलं नव्हत. तिचं पेंटिंग पूर्ण झाल आणि निशा आनंदून गेली. त्यावेळेची निशा उदास नव्हती. आणि त्याचं तेज तिच्या चेहऱ्यावर आलं होत. स्वतःसाठी दिलेल्या वेळेची निशाला कित्येक दिवसापासून गरज होती आणि आता ते क्षण मिळाल्यावर तिच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. आता निशा तिचा प्रत्येक क्षणामधून काही ना काही वेचणार होती. निस्वार्थीपणे डोळे उघडे ठेऊन काहीतरी करण्यातला आनंद कल्पनातीत सुंदर होता. त्या पुढे कश्याचीच किंमत नाही हे निशाला जाणवत होत. आणि ह्यापुढे निशा तिच्या स्वप्नांच्या मध्ये काश्यालाच येऊन देणार नव्हती. कॅनवास वर एक सुंदर पेंटिंग कधी तयार झाल हे निशाला कळलं पण नव्हत. पण पेंटिंग पूर्ण झाल्यावर निशाला जो आनंद मिळाला होता तो अवर्णीय होता!! ह्याच क्षणाची निशा वाट पाहत होती आणि तो क्षण प्रत्यक्षात आला तेव्हा निशाच्या चेहऱ्यावर समाधानचं हसू अवतरल होत.

निशा भारतात परतली. आल्या आल्या तिने आईला घट्ट मिठी मारली तेव्हा आईला सुद्धा बदललेली निशा जाणवली. निशाची आई सुद्धा मनोमन सुखावली. आईला अंदाज होता निशा नी किती मोठा पल्ला किती कष्ट करून गाठला होता. आईशी बऱ्याच गप्पा मारून निशानी आईला जॉब सोडल्याच सांगितलं. आपली मुलगी आपल्यासोबत आहे ह्यापेक्षा आईला सुद्धा अजून काहीच नको होत. निशानी आईला ह्यापुढे तिच्यासाठी स्वप्न जगणं महत्वाचं असेल हे सांगितलं आणि निशाच्या आईच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलं. तिने लगेच लग्नाचा विषय काढून पाहिला पण निशा लग्न करण्याच्या मनस्थितीत अजूनही आली नव्हती. आता निशा ला लग्न आणि काम सोडून अनेक गोष्टी खुणावत होत्या. ठरल्याप्रमाणे निशाने तिच्या आवडीची गिटार शिकण्यासाठी क्लास मध्ये नाव नोंदवलं. निशाची एक नाही दोन नाही किती स्वप्न अर्धवट राहिली होती आणि आयुष्य संपायच्या आत जमतील ती स्वप्न पूर्ण करायची होती. आता निशाचं वेगळ आयुष्य चालू झाल होत आणि ते तिच्या मनाप्रमाणे!!! निशाला स्वतःचा शोध लागत होता. तिच्यासाठी ही सेकंड इनिंग होती. पहिली इनिंग फक्त कष्ट करण्यात गेली होती. ही सेकंड इनिंग म्हणजे ६० नंतरच आयष्य नवत. वयाच्या ४० सवय वर्षीच ती तिची सेकंड इनिंग जगात होती. आता तिची सेकंड इनिंग जगतांना निशा खुश होती. आपल्या यादीप्रमाणे सगळ्या गोष्टी निशा करत होती. तिने ठरवल्याप्रमाणे भारतात आल्या आल्या तिने दर शनिवार रविवार फक्त अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमासाठी राखून ठेवला होता. तेच तिचे 'नवीन मित्र' होते. आता तिच्या आयुष्यात तिला कश्याचीही कमी वाटत नव्हती. कामात सुद्धा तिचा अनुभव खूप असल्यामुळे तिने एक छोटीशी कंपनी चालू केली. पाहता पाहता त्याचा पसारा वाढला. पण आता निशासाठी फक्त काम महत्वाचे नव्हतेच. आता निशा कामाबरोबर तिच्या हॉबीला सुद्धा वेळ देत होती. निशाला एक गोष्ट समजली होती की आयुष्य जगण्यासाठी फक्त पैसे नाही तर इतर गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. पाहता पाहता निशाने चाळीशी सुद्धा ओलांडली. निशा आपल्याला वेळ देते आहे ही गोष्ट निशाच्या आईला आनंदायी होती. निशाच्या एका निर्णयामुळे तिच्या आयुष्यात खूप काही बदललं होत. आणि सगळेच बदल सकारात्मक होते. तिने लिखाण सुद्धा चालू केल होत. निशा तशी कामामुळे फेमस होतीच पण लिखाणामुळे ती अजूनच फेमस होत होती. निशासाठी फेमस होण्यापेक्षा लिहिण्यातला आनंद जास्त सुखावत होता. अचानक एके दिवशी तिला एका पब्लिकेशन हाऊस मधून फोन आला आणि तिच्या अनुभवांचं पुस्तक छापायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तो तिच्यासाठी अजूनच सुखद धक्का होता आणि तेव्हा 'निशा- द राइटर' चा उगम होत होता! त्याचबरोबर तिने एनजीओची पण स्थापना केली!! निशाच आयुष्य आता भरलेल होत. त्यात पैसे, सुख, समाधान, आनंद सगळ काही होत. आता निशा फक्त एकाच गोष्टीत अडकली न्हवती. पैसे फक्त हे उद्दिष्ट तिला राहिलेलं नव्हत. तिच्या आयुष्यात पैश्याबरोबर खूप साऱ्या गोष्टी अॅड झाल्या होत्या. तिला आता कश्याचीच उणीव भासत न्हवती. तिच्या चेहऱ्यावरचं समाधानाच तेज आता स्पष्ट दिसत होत. निशाच आयुष्य बदलायला एक कवडसा सुद्धा पुरेसा ठरला..एका संध्याकाळी निशा निवांत बसली होती. तिच्या आयुष्यातली रोलर कोस्टर राईड तिच्या डोळ्यासमोरून गेली. आणि छोटस हसू तिच्या चेहऱ्यावर स्थिरावलं. समाधानानी निशा आरामखुर्चीवर पहुडली आणि डोळे मिटून घेतले अगदी शांतपणे.. तिच्या मनातली सगळी वादळं स्थिरावली होती. आणि नवा आसमंत तिला खुणावत होता.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED