विचार आणि भावनांचा आरोग्यावर होणारा परिणाम..
तुम्ही जे विचार करता किंवा तुमच्या मनात जे विचार येतात त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतो. जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर साहजिकच त्याचे चांगले रिझल्ट्स तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर झालेले दिसून येतील. त्याच विरुद्ध जर तुमचे विचार जर नकारात्मक किंवा वाईट असतील तर त्याचे वाईट परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. त्याचबरोबर ज्या लोकांमध्ये चांगल भावनिक आरोग्य असते ती लोकं विचार आणि वर्तनाबद्दल जागरूक असतात. त्यांना स्वत:बद्दल चांगल वाटत आणि त्याचबरोबर दैनंदिन ताणाला आणि प्रॉब्लेम्स ला समोर जातांना काही अडचणी येत नाहीत. नाती सुद्धा सुधृद ठेवण्यास मदत होते. त्या विरुद्ध नकारात्मक विचारांमुळे पचनाचे विकार, ब्लड प्रेशर अश्या आरोग्याच्या तक्रारी होतांना दिसून येतात. त्याचबरोबर व्यसनाधीन होण्याची शक्यता वाढते.
विचार आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. आणि आरोग्य कंट्रोल कारण आपल्याच हातात असत!! त्यामुळे भावना समजून घेण अतिशय महत्वाच आहे. विचार आणि भावना तुम्हाला ओळखता आल्या तर साहजिकच त्यासाठी तुम्ही योग्य ती पावलं उचलू शकता. आणि त्याचे योग्य ते रिझल्ट्स तुमच्या आरोग्यावर मिळवू शकता. आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीनी पाहिल्यास टेन्शन राहत नाही आणि आयुष्य उत्तम प्रकारे जगण्यास मदत होते.
१. शारीरिक आरोग्य आणि नकारात्मकता-
शरीरच आरोग्य आणि नकारात्मकता याचा खूप जवळचा संबध आहे. दीर्घकालीन चालणारे नकारात्मक विचार आणि हेल्पलेस असण्याची भावना तुमच्या शरीरातले होर्मोन्स चा समतोल बिघडवू शकते. त्यामुळे तुमच्या मेंदू मधील 'हॅपिनेस केमीकल' ची मात्रा घटू शकते. आणि शरीरातल्या प्रतिकारक शक्तिवर सुद्धा त्याचा हानिकारक परिणाम दिसू शकतो. त्याचबरोबर दीर्घकालीन नैराश्या किंवा नकारात्मक विचार ह्यांच्यामुळे आयुर्मान सुद्धा कमी होऊ शकत. स्वतःकडे दुर्लक्ष होऊ शकत आणि पोषक अन्न न घेण्याकडे कल वाढू शकतो. त्याच परिणाम आरोग्यावर दिसून येतो.
२. सकारात्मक विचारांचं महत्व-
'चांगले विचार करा तुम्हाला चांगलाच फळ मिळेल' हे काही चुकीच नाही. स्वताबद्दल आणि दुसऱ्याबद्दल चांगले विचार केल्यामुळे साहजिकच मन प्रसन्ना राहत आणि अर्थात त्याचबरोबर आरोग्य सुद्धा चांगल राहण्यास मदत होते. सकारात्मक विचारांनी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्याचबरोबर सकारात्मकतेमुळे कार्डीओव्हॅस्कुलर स्ट्रेस कमी होण्यास मदत होते, चांगली झोप लागण्यास मदत होते आणि आयुष्याकडे आनंदानी पाहायला सुरुवात होते. 'जे आहे किंवा जे झाल ते चांगल आहे' हि गोष्ट मान्य केली कि विचार सकारात्मक बनतात. आणि सकारात्मक विचारांचा खूप चांगला परिणाम जगत असलेल्या आयुष्यावर दिसून येतो.
३. भावनांना वाट मोकळी करून द्या-
जर भावना दाबून ठेवल्या तर त्याचा विपरीत परिणाम शरीरावर झालेला दिसून येऊ शकतो. कारण भावनानाचा निचरा होण अत्यंत गरजेच असत. जर तुम्हाला ताण जाणवत असेल किंवा दुखी वाटत असेल तर ते योग्य वेळी बोलून दाखवान गरजेच आहे. जर मनातल्या मनात कुढत बसलात तर त्याचे दीर्घकालीन त्रास होऊ शकतात. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या किंवा जवळच्या लोकांशी त्याबद्दल बोलल्यामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होऊ शकतो आणि साहजिकच दुष्परिणामांपासून दूर राहू शकता. जर आवश्यातता वाटली तर डॉक्टर चा सल्ला सुद्धा घ्यायला विसरू नका. त्यात कमीपणा वाटून घ्यायचं काहीही कारण नसत. डॉक्टर किंवा समुपदेशक तुम्हाला तुमच आयुष्य आणणादानी जगण्यास मदत करू शकतो.
४.आयुष्यात समतोल राखायचा प्रयत्न करा-
कामावरचा ताण, आयुष्यात येणारे छोटे मोठे ताण किंवा घरातले ताण याचा बाऊ करू नका. ह्याचा अर्थ असा नाही ताण असतांना सुद्धा तुम्ही उगाचच दाखवण्यासाठी खोट दाखवा कि तुम्ही खुश आहात. आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टींना दुर्लक्ष करायला शिकून सकारात्मक गोष्टींकडे मन वळवल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यावर चांगला परिणाम झालेला दिसेल. कधी कधी अकारण ताण येऊ शकतो पण त्याचबरोबर नकळत कोणतीतरी गोष्ट केल्यामुळे तुमच्या मनावरचा ताण आपोआप कमी होऊ शकतो. त्याची नोंद करून ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्हाला अतिरिक्त ताण जाणवेल तेह्वा त्यातून तुम्ही सहजच बाहेर पडू शकाल तेही कोणत्याही बाहेरील मदतीशिवाय! आपल्या प्रश्नांना आपणच उत्तर शोधली कि आपलाच आपल्याला चांगल वाटत आणि त्याचा परिणाम जगण्यावर दिसून येतो.
५.मन शांत आणि शरीर सुद्रुड ठेवा-
विचारांमुळे शरीरावर परिणाम होतो. पण जर ध्यान करून विचारावर नियंत्रण ठेवलं तर आयुष्य आनंदी ठेवण्यास मदत होते. ध्यानाबरोबर व्यायामाची जोड असेल तर त्याचे अजूनच चांगले परिणाम दिसून येतील. खूप व्यायाम शक्य नसेल तर थोड स्ट्रेचिंग, श्वासाचे व्यायाम आणि वॉम अप केल्यानी तुम्हाला चांगल वाटण्यास मदत होऊ शकते. एकूणच काय मन आणि शरीर हे तंदुरुस्त असेल तर त्याचा चांगला परिणाम संपूर्ण आरोग्यावर दिसून येतो.
६. लवचिकता-
तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात लवचिकता ठेवलीत तर कोणत्याही गोष्टीचा ताण येण कमी होऊ शकत. परिस्थिती चा स्वीकार केल्यामुळे बरेच प्रश्न नाहीसे होतात आणि त्याचा परिणाम लगेचच आरोग्यावर दिसून येतो. बऱ्याच वेळा काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत. आणि त्याबद्दल नकारात्मक विचार येऊ शकतात आणि साहजिकच त्याचा वाईट परिणाम आरोग्यावर दिसून येऊ शकतो. पण जर तुम्ही तुमच्या निर्णयात लवचिकता ठेवलीत तर एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तरी त्याचा ताण तुमच्यावर येणार नाही. स्वत:ला परिस्थिती बरोबर अॅड्जस्ट केलत कि नकारात्मकता तुमच्यापासून दूर राहू शकते. आणि तुमची वाढ होण्यास मदत होऊ शकते. नकारात्मक गोष्टींकडे सुद्धा सकारात्मक पद्धतीनी पाहिलं कि सगळे प्रश्न आपोआप सुटतात आणि त्याचा ताण तुमच्या मनावर आणि शरीरावर येत नाही.
७. शेवटच पण अत्यंत महत्वाच- स्वतःची काळजी घ्या-
कामच्या व्यापात, घराच्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या नादात तुमच स्वताकडे दुर्लक्ष होऊ शकत. साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर आणि जगण्यावर होऊ शकतो. त्यामुळे तुमच मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य बिघडू शकत. कधी कधी ड्रग्स च्या आहारी सुद्धा जाऊ शकता. हे टाळण्यासाठी नियमित रुटीन चालू ठेवा. पोषक आहार घ्यायला विसरू नका. वेळेवर आणि व्यवस्थित झोप ह्या सगळ्यामुळे तुम्हाला टेन्शन राहणार नाही. तुमच आरोग्य उत्तम राहण्यास नक्कीच मदत होईल. दिवसातला थोडा तरी वेळ स्वत:साठी काढा.. त्यात वेळात तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता. त्यामुळे चांगलेच विचार येतील आणि त्याचा परिणाम आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
म्हणजेच काय, जसे विचार तस आरोग्य! म्हणूनच चांगले आणि सकारात्मक विचार केले कि तुमच आरोग्य आपसूकच चांगल राहणार यात काही शंका राहणार नाही.