Pausalyat aarogya uttam theva.. books and stories free download online pdf in Marathi

पाऊसाळ्यात आरोग्य उत्तम ठेवा..

पाऊसाळ्यात आरोग्य उत्तम ठेवा..

पाऊस म्हणजे सगळ्यांचा आवडता ऋतू असतो. उन्हाच्या काहीलेने नको नकोस होत असतांना पाऊसाळ्याचे आगमन होते. मन प्रसन्न होते पण जसा जसा पाऊस वाढेल तश्या आरोग्याच्या तक्रारी वाढायला लागू शकतात. पण पाऊसात निरोगी राहण्यासाठी काही काळजी घेतली की पाऊसाचा आनंद पुरपूर लुटता येतो. पाऊसात मुख्यत्वे सर्दी खोकल्याची साथ दिसते. या वातावरणात साथीचे रोग आणि ऍलर्जी याचे प्रमाण जास्त असते. आता साथीचे रोग म्हणचे सर्वात आधी आपल्यावर अतिक्रमण करते ती सर्दी आणि खोकला. पण आपणच आपली नीट काळजी घेतली तर या आजारपणाचे प्रमाण काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. आणि पाऊसात कोणत्याही प्रकारचा त्रास सुद्धा होणार नाही. पाऊस म्हणजे नवचैतन्य आणणारा ऋतू. निसर्ग हिरवाइने नटतो. मन प्रफुल्लीत होते अश्या सुंदर ऋतूत आपल्या तब्येतीची काळजी घेतली तर पाऊसाची मजा सुद्धा घेता येईल.

* पाऊसाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे-

१. सर्दी खोकल्यापासून बचावासाठी-

सगळ्यात आधी, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे महत्वाचे असते. पाउसाळ्यात तर रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणे गरजेचे असते. त्यासाठी गरजेचा असतो उत्तम आहार. हवा बदलामुळे सर्दी खोकला सर्दी-खोकल्यासाठी होण्याच प्रमाण जास्ती असत. सर्दी खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी आहारात रोज ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्व यचा समावेश आवर्जून करणे हितावह असते. त्याचबरोबर, प्रथिनाचा समावेश सुद्धा गरजेचा आहे. या गोष्टींचा आहारात समावेश असला की प्रतिकार शक्ती चांगली राहण्यास मदत होते आणि संसर्ग झाला तरीही त्याचे प्रमाण आणि तीव्रता कमी राहण्यास देखील मदत होते. प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आहारात कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाणही चांगले असणे सुद्धा गरजेचे आहे.

२. पाऊसात परिसरातली स्वच्छता अत्यंत महत्वाची-

पावसाळ्यात परिसर स्वच्छ ठेवणे अतिशय महत्वाचे असते. पण राहतो ती जागा सुद्धा स्वच्छ ठेवली पाहिजे. भरपूर पाऊस पडला की पाणी साठून राहू शकत. आणि साचलेले पाणी डासांच्या वाढीसाठी अतिशय पोषक असते. त्यामुळे साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढू शकते. आणि डासामुळे होणारे आजार म्हणजेच, चिकुनगुनिया, मलेरिया, डेंग्यू सारखे आजार वाढण्याची सुद्धा शक्यता असते. त्यमुळे पाऊसात डासांपासून स्वतःचे आणि आप्तजनांचे रक्षण करणे गरजेचे असते. ह्यासाठी पाणी साठून न राहण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे असते. मच्छरदाणी, डासापासून वाचण्यासाठी क्रीम्स, घरातली स्वच्छता ह्य्कडे लक्ष देण गरजेच आहे. त्याचबरोबर, फिशटँक, फुलदाणी इत्यादी मधले पाणी वारंवार बदलणे सुद्धा तितकेच गरजेचे असते कारण स्वच्छ पाण्यात डेंग्यू चे डास उत्पन्न होतात.

३. पाऊसात स्वतःची स्वच्छता-

पावसाळ्यात कितीही काळजी घेतली तरी भिजायला होतंच. भिजलो तर मात्र डोक्यात पावसाचे पाणी मुरणार नाही याची काळजी घ्यायला हवी. नाहीतर सर्दी, खोकला, ताप इत्यादीना आमंत्रण मिळू शकत. थंड हवे मध्ये कानाला वारे लागेल असे किंवा जास्त भिजणे होणार नाही याची काळजी घेण गरजेचे आह. त्याचबरोबर, गरम पाणी पिणे आणि वाफारा घेणे यांमुळे सर्दीला आराम पडू शकतो. त्याचबरोबर, आले, सुंठ, तुळस, वेलची इत्यादी घालून केलेला चहा पिल्याने तब्येत चांगली राहण्यास मदत होते.

४. आहाराकडे लक्ष देणे महत्वाचे-

पाऊसा मध्ये पचनशक्ती थोडी कमी होते. त्यामुळे पचनाला हलके असे अन्न आहारात समाविष्ट केल्याचा फायदा दिसून येतो. कितीही इच्छा झाली तरी तळलेले पदार्थ जरा कमी प्रमाणात खाल्ल्याने पोटाला काही त्रास होत नाही. पाऊसा मध्ये शक्यतो ताजे आणि गरम केलेले अन्न खाणे हितावह ठरते. आणि त्याचबरोबर, खूप थंड पदार्थ, जास्ती तेलकट पदार्थ टाळणे फायद्याचे ठरते. त्यामुळे प्रकृती तर उत्तम राहते आणि जास्ती तेलकट पदार्थ खाल्ले नाही की वजन वाढीचा प्रश्न सुद्धा येणार नाही. त्याचबरोबर, पाऊसाळ्यात पाणी दुषित असण्यची शक्यता असते. असे पाणी पिल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. अश्यावेळी,उकळलेले पाणी पिण्यामुळे फायदा मिळू शकतो.

५. वैयक्तिक स्वच्छता अत्यंत महत्वाची-

जर कधी चुकून भिजलो तर त्यावेळी केस करणे तर महत्वाचे असतेच पण त्याचबरोबर, पाऊसाळ्यात असलेल्या दमट हवेमुळे अंग नीट कोरडे केले नाही तर फंगल इन्फेक्शन चा धोका वाढू शकतो. पाऊल ओले राहिले तर चिखाल्यांचा त्रास होऊ शकतो. सर्दी, खोकला झाला तर स्वतः जवळ एक रुमाल नेहमी थवा म्हणजे आपल्यामुळे कुणाला इन्फेक्शन चा धोका राहत नाही. आणि घरातल्या लोकांच्या तब्येत सुद्धा उत्तम राहू शकते.

६. आजार अंगावर काढणे टाळा-

कधी कधी थोड बर नसेल तर 'जाऊदेत, बघू काय होतंय' असा बऱ्याच लोकांचा कल असतो. पण पाऊसा मध्ये बरेच साथीचे रोग आलेले असतात. कधी कधी साधा वाटणारा ताप पण धोकादायक असू शकतो. आठवड्या पेक्षा जास्ती सर्दी, खोकला, ताप टिकून राहत असेल तर डॉक्टर चा सल्ला घेऊन त्यावर वेळीच उपाय योजना करणे गरजेचे असते. त्याचबरोबर, साथीच्या आजारांचे साधारण लक्षणे काय आहेत ते पाहू घ्यावे. अर्थात, त्यावरून स्वतःचे निर्णय घेण्यापेक्षा डॉक्टर चा सल्ला घेणे कधीही महत्वाचे असते.

पाऊसा मध्ये थोडी काळजी घेतली की तब्येत उत्तम ठेवता येऊ शकते आणि पाऊसाची मजा सुद्धा लुटता येते. त्यामुळे थोडी काळजी, थोडी खबरदारी नेहमीच महत्वाची...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED